पाककृती स्पर्धा-१ - उपासाची गोड कचोरी - साक्षी

Submitted by साक्षी on 29 September, 2023 - 01:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य -

सारण -
खजूर : ४-५
काजु - ७-८
बदाम - ७-८
अक्रोड - ५-६
तूप - १ चमचा

आवरण -
१) उकडून सालं काढून मॅश केलेले बटाटे - २ छोटे
२) आरारूट / साबुदाणा पीठ / उपवास भाजणी (जिरे विरहित) - १ किंवा २ चमचे

तळणीसाठी तेल (फोटोत नाहिये)

Ingredients_0.jpg

क्रमवार पाककृती: 

कृती

१) तूप घालून सगळी ड्राय फ्रुट्स मिक्सरवर भरड वाटून घ्या.
२) मॅश केलेल्या बटाट्यात आरारूट / साबुदाणा पीठ / उपवास भाजणी घालून हलक्या हाताने मळून घ्या. (उपासासाठी करायच्या नसतील तेंव्हा ब्रेड क्रम्स घातले तरी चालतील)
३) बटाट्याचे आणि सारणाचे गोळे करून घ्या.
Gole.jpg
४) बटाट्याच्या गोळ्याची वाटी करून त्यात सारण भरून बॉल्स करून घ्या.
Vaati.jpg

५) मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
Fry1.jpgFry2.jpg
६) तयार कचोरी वाढा.
Ready1.jpg
दुसर्‍या अ‍ॅंगलने
Ready2.jpg

वाढणी/प्रमाण: 
१ किंवा २
अधिक टिपा: 

तेल कमी पुरेल म्हणून कचोर्‍या आप्पेपात्रात तळल्या.

माहितीचा स्रोत: 
नेहमीची उपासाची गोड कचोरी असतेच, तिचं सारण बदलून
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालची स्वीट रॅव्हिओली जरा complicated झाली. ती कृती करताना ही सुचली. शेवटची सकाळ शिल्लक आहे म्हणून ही अजुन एक जरा सोपी कृती Happy

ही पण मस्त आहे. एरवी काय सारण वापरता? ओलेखोबरे, मिरची कोथंबीर आले व ड्रायफ्रूट्स का? ही माझ्या आईने एकदाच केली होती व लै भारी टेस्ट. आता परत एकदा करून बघेन. ही ताजी गरम खायला हवी. इथे मिळते पण ती गुज्जु टाइप असते.

एरवी काय सारण वापरता? ओलेखोबरे, मिरची कोथंबीर आले व ड्रायफ्रूट्स का?>>
मी एरवी खरं तर फार करत नाही.
पण हो, बाहेर मिळते त्यात हेच असतं.
गोडाची असेल तर गूळ, खोबरं ड्रायफ्रूट्स

मस्त!
तुमच्या दोन्ही पाकृ छान आहेत..
शुभेच्छा

आता मत कोणत्या पाकृ ला द्यायचे हा गहन प्रश्न पडलेला आहे. Sad
>>>
स्वतः एक पाकृ बनवून टाका. मग प्रश्न सुटेल Wink

लोल Lol Lol

अभिनंदन साक्षी !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

पाककृती स्पर्धा क्र १ - नैसर्गिक घटक वापरून गोड पदार्थ - तृतीय क्रमांक-साक्षी.jpg

अभिनंदन साक्षी..!
माफ करा पहिल्या प्रतिसाद चुकून मानवजीचं नाव लिहिले होते..!

Pages