काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.
तुमचे मत काय आहे जरूर लिहा.
तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.
नाही
नाही
दाबोळकर ना प्रश्न जेव्हा लोक
दाबोळकर ना प्रश्न जेव्हा लोक करत तुम्ही हिंदू न च्याच अंध श्रद्धा न वर का टीका करत असता?
तेव्हा त्यांचे ठरलेले उत्तर.
भारतात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून अंध श्रध्दा न ची प्रकरण पण हिंदू न चीच जास्त आहे .
बस इतकाच फरक आहे आणि सर्व धर्मीय अंध shradha न विरोध करतो.
पण कोणाला ती .००१ टक्के विरोध पण कधीच दिसला नाही.
आवाज प्रदूषण करणारे उत्सव म्हणजे पूर्ण भारतात दोन च बर का?
एक गणेश उत्सव आणि दुसरा नवरात्र.
बाकी देशात कोणताच उत्सव आवाज प्रदूषण करत नाही.
कोणताच उत्सव धांगड धिंगा करत नाही.
रस्ता aadvat नाही.(रस्त्यावर नमाज विषयी कोण धर्मांध बोलला)
फटाके फक्त आणि फक्त दिवाळी मध्ये च वाजवले जातात.
बाकी कधीच भारतात फटाके वाजवले जात नाहीत.
Dj/डॉल्बी, लेसर फक्त आणि फक्त गणेश उत्सव त च वापरले जातात बाकी कधीच नाही.
हिंदू हेच देशात आवाज प्रदूषण करत आहेत.
बाकी सर्व धर्मीय बिलकुल आवाज प्रदूषण करत नाहीत.
हे समजून घ्या.
हे समजून घ्या. >>>>>
हे समजून घ्या. >>>>>
सर हे बाकीच्याना उद्देशून आहे का स्वगत आहे?
ब्लँकेट बंदी केंद्र सरकार नी.
ब्लँकेट बंदी केंद्र सरकार नी.
फटाके, लेसर,dj, डॉल्बी ह्या वर टाकली तर ..अल्प संख्यंक च रस्त्यावर येतील..
आणि पुरोगामी समाज माध्यमावर...आणि काही कोर्टात
चला. वार्याची दिशा पुन्हा
चला. वार्याची दिशा पुन्हा फिरली.
सण सार्वजनिक करावे अथवा नाही.
सण सार्वजनिक करावे अथवा नाही... मधे दाभोलकर कशासाठी? ठिक आहे.
हिंदू धर्मातील अंधश्रद्धांमुळे सर्वात जास्त नुकसान कुणाचे होते आहे?
अंधश्रद्धा आहेत हे मान्य होत असेल तर त्यांना काढून टाका.... आधी आपले घर स्वच्छ करा मग इतरांकडून तशी अपेक्षा करा. शेजारी रहाणार्याचे घर अस्वच्छ आहे हे आपले घर स्वच्छ न ठेवण्याचे कारण हास्यास्पद वाटते.
<< Dj/डॉल्बी, लेसर फक्त आणि फक्त गणेश उत्सव त च वापरले जातात बाकी कधीच नाही.
हिंदू हेच देशात आवाज प्रदूषण करत आहेत.
बाकी सर्व धर्मीय बिलकुल आवाज प्रदूषण करत नाहीत. >>
------ DJ/ डॉल्बी/ लेझर बद्दल चा अट्टाहास आत्मघातकी आहे. याने नुकसान कुणाचे होणार आहे? डोळे/ कान हे अवयव वारंवार मिळणार नाही. फक्त एकदाच. ते करतात ( हे मला माहित नाही) म्हणून आम्ही पण करु हा अविवेक आहे.
उदय.
उदय.
कधी भविष्यात ब्लँकेट ban टाकला तर.
फटाके , लेसर..चे निर्माते कोण आहेत,वितरक कोण आहेत.
कोणत्या लोकांची पोट ह्या वर भरत आहेत.
ह्याचे आकडे येतील आणि आता विरोध करणारे ban कसा अन्यायकारक आहे ह्या वर ज्ञान देतील.
क्षणात u टर्न घेतील
ह्याचे आकडे येतील आणि आता
ह्याचे आकडे येतील आणि आता विरोध करणारे ban कसा अन्यायकारक आहे ह्या वर ज्ञान देतील. क्षणात u टर्न घेतील पुन्हा एकदा तोच प्रश्न, हे तुम्ही लोकांबद्दल बोलताय का स्वत:बद्दल
दिल्ली आप सरकारने फटाक्यांवर
दिल्ली आप सरकारने फटाक्यांवर बंदी घातली तर दिल्ली भाजपवाले - यात तो बग्गा आघाडीवर लोकांना फटाके वाटू लागले.
महाराष्ट्रात लॉकडाउनमध्ये भाजप नेत्यांची मागणी काय तर देवळं उघडा, आम्हांला आमचे सण दणक्यात साजरे करू द्या.
राज ठाकरेंना आता डीजेचा त्रास कळला (असं ते दाखवताहेत) . पण भाजपकडून सुपारी घेऊन नमाजाची बांग होईल तेव्हा त्यापेक्षा मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवू असं तेच म्हणाले होते.
Bomb blast, जैविक हत्यार,dj,
Bomb blast, जैविक हत्यार,dj, डॉल्बी, लेसर ,अणू बॉम्ब ., .
हे समुदायाला टार्गेट करतात.
जातीचा ,धर्माचा,ओळखीचा काही बघत नाहीत.
अशा आणि बाकी अशाच गोष्टी न वर ब्लँकेट ban हाच एकमेव उपाय आहे.
पूर्ण देशात कडक बंदी.
खून होतात,हिंसा होते पण ते टार्गेट किलिंग असते , शिकार फिक्स असते बाकी लोकांना त्रास नसतो.
ते गुन्हेगारी कृत्य आहे त्यावर त्या घटने नुसार कारवाई होते.
मला वाटतं विस्तरून सांगण्याची गरज नसावी
५८१
५८१
हेमंत - या विषयावर तुमची ठाम
हेमंत - या विषयावर तुमची ठाम भुमिका असेलही पण मानवी शरिराच्या मर्यादांना समजायला हवे.
८० Db पेक्षा मोठ्या आवाजां एकल्यामुळे कानाचे पडदे मजबूत नक्कीच होणार नाही. यात भाग घेणार्या तरुणांचे डोळे/ कान यांचे नुकसान होण्याची दाट " शक्यता " आहे. अवयवांची कार्यक्षमता कमी झाल्यावर पुढे कधीच भरुन निघणार नाही. होणारा डॅमेज irreversible असण्याची पण शक्यता आहे.
लेझर बद्दलही तसाच युक्तीवाद असेल. झोपेतून उठल्यावर डोळ्यांवर प्रकाश पडतो तेव्हा आपल्याही नकळत पापणी बंद होण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरु होते. तेव्हढाच प्रकाश कमी.
laser light intensity/ light flux/ photon energy- wavelength/ interaction time/ age अनेक गोष्टींवर होणारा डॅमेज अवलंबून असेल. सामान्य लोकांना हे सर्व तत्काळ कळणार नाही. लाईट हा visible range मधे असला, तरी तो डॅमेज करु शकतो.
RGB रंग खूप आकर्षक असतांत आणि मनाला काही काळ मोहवतात. पुढे पश्चाताप होण्यापेक्षा मोहाला आवर घालणे कधी पण शहाणपणाचे आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याकडे अनेक जाणकार /तज्ञ आहेत. सार्वजनिक ठिकाणी लेझर वापरासंदर्भात मार्गदर्शक तत्वे नाहीत हे पटत नाही. मी शोधले पण मला काही मिळाले नाही. guidelines आहेत/ नाही याबद्दल कुणाला माहिती असल्यास लिहा.
ते करतात म्हणून आम्ही करु हा युक्तीवाद उपयोगाचा नाही.... तुम्ही नका करु आणि इतरांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करा. यात कुठलाही धार्मिक रंग आणायला नको.
ब्लँकेट ban का टाकत नसेल
ब्लँकेट ban का टाकत नसेल सरकार.
१) medical क्षेत्रात लेसर ची गरज आहे.
बस इतकेच कारण मला दिसत आहे.
. बेकारी वाढेल, रोजगाराच्या संधी कमी होतील.
सार्वजनिक हिताला असंख्य गोष्टी कारणीभूत आहेत.
त्या वर प्रश्न उभे राहतील.
ही भीती सरकार ल असावी.
म्हणून ब्लँकेट ban नाही.
हितसंबंध हा अदृश्य घटक खूप पॉवर फुल रित्या सरकार वर दबाव टाकत असतो.
गौ हत्या बंदी वर ब्लँकेट ban नाही.
Beef वर ब्लँकेट ban नाही.
Ban असता तर भारत मोठा निर्यात दार ह्या क्षेत्रात झालाच नसता.
1.5 मिलियन मेट्रिक टन beef भारत एक्सपोर्ट करतो.
आहे ना जोक
ब्लँकेट ban का टाकत नसेल
ब्लँकेट ban का टाकत नसेल सरकार>>>
डीजे-डॉल्बी वर ब्लॅंकेट बॅन महाराष्ट्र सरकार ने टाकलेली पण मुंबई हायकोर्टाने ती उठवली, कारण नैसर्गिक न्यायाचे तत्व - जोपर्यंत एखादा गुन्हा होत नाही तो पर्यंत त्यासाठी शिक्षा करणे चुकीचे आहे आणि कायद्याच्या मर्यादेत राहून एखाद्याला कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्याला तो अधिकार घटनेनेच दिला आहे....डिजे - डॉल्बी संघटनेचे म्हणणे हे होते की सर्वच जण आवाज मर्यादेचे उल्लंघन करतात हा आरोप चुकीचा आहे...तुम्ही जे कायदा मोडतील त्यांना शिक्षा करा जे काहीच गुन्हा करत नहीत त्यांच्यावर ब्लॅंकेट बॅन मुळे अन्याय होईल... न्यायालयाने ते मान्य करून ब्लॅंकेट बॅन उठवली.
दाबोळकर ना प्रश्न जेव्हा लोक
दाबोळकर ना प्रश्न जेव्हा लोक करत तुम्ही हिंदू न च्याच अंध श्रद्धा न वर का टीका करत असता?
तेव्हा त्यांचे ठरलेले उत्तर.
भारतात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून अंध श्रध्दा न ची प्रकरण पण हिंदू न चीच जास्त आहे >>> हेमंत सरांकडे दुर्लक्षच करायचं ठरवलं होतं. हेमंत सर या चर्चा २००३ / ४ सालच्या. आज २०२३ चालू आहे. वीस वर्षे मागे आहात का ? आधी वाचा कि मायबोली किंवा इतर संस्थळे. मग बोटाची वाफ दवडा.
रच्याकने,दाभोळकर मुसलमान होते का त्यांनी हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धांवर बोलले म्हणून झोंबायला ?
तुम्ही हिंदू असून एका हिंदूलाच आपल्या धर्मात सुधारणा व्हाव्यात असे वाटण्याला बंदी घालताय तर मुसलमानांनी परधर्मियाला का एंटरटेन करायचे ? दाभोळकरांना आपले घर स्वच्छ, सुंदर ठेवायचेय, शेजारच्याला नाही. पण तुम्हाला शेजारचा कसा घाण करतो घर तसेच आपले पण असावे असे का वाटते ?
दहा दिवस होते ते प्रदुषण ,
दहा दिवस होते ते प्रदुषण , नदीला गटारे जोडली आहेत खास करुन महानगर पालिकेने जोडली आहेत ते काय भुषण आहे ?
आवाजाचे प्रदूषण ते सुध्दा वर्षभर होत असते. वाहने आणि गर्दी काय कमी प्रदूषण निर्माण करतात ?
रस्त्यावरचा कचरा झाडून ( गळलेली पाने ) पेटवून महानगर पालिका कर्मचारी वायु प्रदुषण करतात त्यावर काय म्हणणे आहे.
उत्सवातून काहीच लोकांची करमणूक होते, प्रबोधन शुन्य होते, ही बाब वर्गणी देताना वारंवार सांगावी
ज्यांना ज्यांना उत्सवातल्या
ज्यांना ज्यांना उत्सवातल्या लेझर आणि ढोल,स्पीकरचा त्रास होत नाही त्यांनी फेसलेस न राहता स्पीकरला कान लावून आणि लेझरच्या डोळ्यात डोळे घालून आपापले फोटो, व्हिडीओ अपलोड करावेत. डेसीबल मीटर सुद्धा दाखवावा. इथे जे लिमिट सुसह्य आहे असे सांगितलेले आहे, त्या पेक्षा ध्वनीची तीव्रता कमी असेल तर आवाज वाढवायला सांगावा.
ब्लँकेट ban ची मागणी होत आहे
ब्लँकेट ban ची मागणी होत आहे
वाहने ही समाजाची गरज आहे.
वाहने ही समाजाची गरज आहे. त्यामुळे होणारे प्रदुषण हे अपरिहार्य व नाईलाजाने स्वीकारलेले आहे. तेही कमी करण्याकडेच सरकारचा कल आहे म्हणून नवीन कडक मानके येत आहेत. एवीतेवी वाहनांने प्रदुषण होतेच आहे, मग १० दिवस ढोल बडवून लोकांना बहिरे करण्यात व लेसर लावून आंधळे करण्यात काय चूक आहे ? हा प्रश्न आहे का ? काही पोलिसही बहिरे झाले आहेत म्हणे.
हिंदुत्ववादी बावळटच का असतात ? फटाक्याचा शोध चीन मध्ये लागला, आता आता ते भारतात आले. पण दिवाळीत फटाके नको म्हणले की नाक रागाने लाल होते.
फटाके ,dj वर ब्लँकेट ban ची
फटाके ,dj वर ब्लँकेट ban ची मागणी आहे.
तुमचे काय मत आहे
आमच्याच गाडीने केलेलं प्रदूषण
आमच्याच गाडीने केलेलं प्रदूषण दिसतं का तुम्हाला ?
त्या तीन आकडेवाल्या गाडीचं प्रदूषण दिसत नाही का ?
तुम्ही कुठे ही जमीन खरेदी
तुम्ही कुठे ही जमीन खरेदी करू शकत नाही पण आम्ही मात्र कुठे ही जमीन खरेदी करू शकतो.
आम्ही कोणत्या ही धर्मावर ,त्यांच्या श्रद्धा स्थानावर गल्लीच्छ भाषेत टीका करू शकतो पण तुम्ही तशी टीका करू शकत नाही ते कृत्य गुन्हा आहे..
आम्ही dj/डॉल्बी,फटाके वाजवून आवाज प्रदूषण करू शकतो तो गुन्हा नाही हक्क आहे ..पण तुम्ही तसे करू शकत नाही तो गुन्हा आहे.
आम्ही work hours मध्ये देवाची प्रार्थना करू शकतो पण तुम्ही तसे करू शकत नाही ते धर्म निरपेक्ष देशात चालत नाही.
मोठी लिस्ट आहे
लशीचा आणखी एक डोस द्यायची गरज
लशीचा आणखी एक डोस द्यायची गरज आहे.
(No subject)
आम्ही मात्र कुठे ही जमीन
आम्ही मात्र कुठे ही जमीन खरेदी करू शकतो.>>>> सर थोडं औषध घेऊन बघता का, बरं वाटेल
हे पुन्हा उद्धव ठाकरे गटातून
हे पुन्हा उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे गटात गेले.
हेमंत सर,
पद्मासनात बसा. दोन्ही हात मांडीवर पालथे ठेवा. मुद्रा बनवा. डोळे बंद करा. श्वास घ्या. श्वासावर लक्ष केंद्रीत करा. एक दिव्य ज्योत दिसू लागेल.
मग एक आवाज येईल "हिंदू खतरे मे"
दुसरा आवाज येईल " बाळ तू रॅशनल ना रे ?"
तिसरा आवाज येईल " चल रे भोपळ्या टुणूक टुणूक "
कोलाहल माजेल.
यातल्या कुठल्या तरी एकाच आवाजावर लक्ष केंद्रीत करा. आणि मग बघा....
इथे कोलांट्या बंद होतील.
लेझर लाईटवरून कॉलेजचे दिवस
लेझर लाईटवरून कॉलेजचे दिवस आठवले. फायनल इयरला आम्ही चार पाच जणांनी लेझर प्रोजेक्ट घेतला होता. ज्या सराच्या अंडर प्रोजेक्ट करणार होतो तो खूप नावडता होता. मी वैतागलो होतो. वैतागून मित्रांना बोललो की मी हा प्रोजेक्ट डेडली बनवणार आहे. लेझर वेव्हलेंथ अशी बनवणार की सरांवर फिरवली की त्यांचे दोन तुकडे होणार. आमचं हे संभाषण सरांनी ऐकलं आणि त्यांची पाचावर धारण बसली. कारण मी ज्या गोष्टी बोलायचो त्या खरोखर करून दाखवायचो. सर जे काय पळत सुटले विचारू नका. पान पाठीवर पडलं तर आभाळ पाठीवर पडलं म्हणत पाळणाऱ्या सश्यासारखी सरांची अवस्था झाली. दोन चार महिने गायबच होते. आज पण मी कॉलेजला कधी गेलो तर त्या दिवशी ते सुट्टीवर असतात
बोकलत
बोकलत
बरोबर आहे. लेझर सर्जरीसाठी
बरोबर आहे. लेझर सर्जरीसाठी वापरतात. डॉक्टरांनी वापरलं तर उपयुक्त आणि अडाणी सामान्य नागरिकांनी वापरलं तर प्राणघातक काय! हा अन्याव आहे. करायचा तर ब्लँकेट ban करा. कुणीच वापरायचं नाही. पण मग रात्री थंडी वाजते म्हणून हेच लोक तक्रार करतील. कुठून आणायचं मग ब्लँकेट?
हर्पा
हर्पा
Pages