ववि २०२३ (यशोदा फार्म & रिसॉर्ट) - वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 30 July, 2023 - 23:40

कालचा ववि धम्माल झाला. सगळी मरगळ दूर झाली असेलच. आम्हा संयोजकांना तर "याची साठी केला होता अट्टाहास" अशी भावना दाटून आली.

प्रचि गृप फोटो इथे दिलाच आहे. बाकी फोटोंची देवाणघेवाण वैयक्तीकच राहू द्यावी ही विनंती. काही आयडींनी गृप फोटो व्यतिरिक्त वैयक्तीक फोटो पब्लिक फोरमवर टाकू नये असा पर्याय निवडल्यामुळे त्याच्या मताचा आदर म्हणून ही विनंती आहे. बाकी बच्चे कंपनीचा (गृपमधे किंवा स्वतःच्या मुला/मुलीचा), स्वतःचा, निसर्गाचा, खादाडीचा, बॅनरचा असे फोटो यायला हरकत नाही.

vavi 2023.jpg

चला तर मग, येऊद्या तुमचे अनुभव इथे.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल, भयंकर रिव्ह्यू Happy
"कुणाच्या अध्यात ना मध्यात, माझा मी इथे शांतपणे उभा आहे. आणि काय म्हणून माझ्या अंगावर हा चेंडू फेकत आहे?" हे वाचून ऑफिस क्रिकेट मॅच मधली मी आठवले.(2 बायका मुली प्रत्येक टीम मध्ये असल्याचं पाहिजे असा नियम होता.त्या एका मॅच मध्ये माझी बॅट कितीतरी बॉल मध्ये एकदाच बॉल ला लागली.रन काढत नसल्याने रन आऊट चा संबंधच नव्हता.)

हपा का गेला नाहीत ?
कि दुसर्‍या आयडीने जाऊन आलात ? Lol >> र आ, तुमचा प्रतिसाद आत्ता पाहिला. त्या फोटोत मला ओळखा पाहू. Happy

पियुचा वृत्तांत अजून पुर्ण व्हायचा आहे ना!

>> बाप्रे. तुमच्या लक्षात आहे होय. त्याचं काये.. माझा आत्तापर्यंत लिहिलेला वृ जिथे संपला.. तिथे माझा लेक जागा झाला. मग त्यानंतरचा माझा संपूर्ण वृत्तांत त्याच्या भोवती फिरतो ज्याने इतरांना बोर होऊ शकते.

माझा लेक जागा झाल्यानंतर मला फक्त आणि फक्त स्विमिंग पूल आणि रेन डान्स च आठवतोय. कारण जागे झाल्या झाल्या त्याला पूल मध्ये जायचे होते. मी आणि नवर्‍याने त्याला जमेल तसे खाऊ घालून जमेल तसे कपडे बदलून एकदाचे पोहायला पाठवले.

त्यानंतर मी आणि रीया ने जास्तीत जास्त वेळ स्विमिंग पूल मध्ये थांबायचा उच्चांक गाठला. तिथे चालू होत्या त्या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटिज मध्ये भाग घेऊन (रेन डान्स, रीना चे रील्स, वॉटर गेम्स, फोटो सेशन इ.) जे काही एन्जॉय करायचे ते तिथेच केले. त्यामुळे आमचे फोटो फक्त आणि फक्त स्विमिंग पूल मध्येच दिसतील. Lol

ओके ओके लिही...
वरची माझी पोस्ट ट्रेलर किंवा आगामी आकर्षण म्हणून राहू दे..

आ, तुमचा प्रतिसाद आत्ता पाहिला. त्या फोटोत मला ओळखा पाहू. Happy >>> माझ्या पासून दोन रांगा मागे आहात. Wink

really should have written the name on the photo so it would have been understood.

I have only known Vinay Bhide, Harpen, Kavin, Mugdha, Yoku, Manjiri Vedak and his children, Rhea. And Manju D did not see me in the photo

सर्वाना मन:पूर्वक धन्यवाद Happy

>> नंतर मी तिला गपचूप रिक्वेस्ट केली की बापाची इज्जत ठेव जरा गधडे.. नशीब ऐकले तिने

Lol

>> घोरत पडलेले पुणेकर असा बहुमान मिळालेले ते तुम्हीच.

बहुमान आम्हालाच मिळाला कि काय ते माहित नाही. पण बहुमानासाठी नामांकनास मात्र नक्कीच पात्र Proud

>> तुमचा आयडी बदला बुवा. अ पुढे त लिहिणं कठीण आहे.

असुद्या हो. ते मध्ये function at वगैरे येते ते तसेच ठेवा हरकत नाही. मी समजून घेईन Lol

>> एका मॅच मध्ये माझी बॅट कितीतरी बॉल मध्ये एकदाच बॉल ला लागली.

Lol सेम पिंच! ती बॅट सुद्धा चेंडू येऊन अंगावर आदळू नये म्हणून स्वसंरक्षणासाठी फिरवलेली असते, ना कि स्कोअर वाढवण्यासाठी Biggrin

>> अतुलने पुण्याचे नाव राखले हे वाचून आनंद झाला

पुढच्या वेळी जर क्रिकेट असेल तर त्यामध्ये दुपारी तीन ते चार अशी सोय व्हावी म्हणून मी संयोजकांना विनंती करेन Proud

PuneTeam3To4CricketFunny.jpg

Biggrin
पुन्हा एकदा सर्वाना मन:पूर्वक धन्यवाद Happy

फोटु. Lol
हा मैदानावर काहीतरी माश्या आलेल्या तेव्हाच आहे ना

>>>>> मी जरी आयडीने जुना असलो तरी अठरा-वीस वर्षांत माबोकरांना प्रत्यक्षात मात्र पहिल्यांदाच भेटत होतो (शेम ऑन मी Proud ).
अतुल, जर मी आपल्याला ओळखण्यात चुकत नसेन, तर १०/१२ वर्षांपूर्वीच्या कोणत्यातरी ववि मधे आपण स्वच्छतागृहात एकमेकांना पाहिल्याचे व तेव्हा मी माझ्या पन्टची झीप फोल्डिंग पक्कडने दुरुस्त करत असताना आपले मोजके बोलणे झाल्याचे आठवते आहे !

झीप ?

नमस्कार वविकर्स! ववि दणक्यात झाला, सगळ्यांमुळे फार धमाल आली. तुमच्या सहभागाकरता आभार!
तर जमा झालेली यंदाची देणगी आपण मैत्री संस्थेला दिली आहे.
मैत्रीचे कोऑर्डीनेटर हर्पेन यांच्याकडे देणगी रक्कम (टीशर्ट देणगी जमा ५३००/- + वविची शिल्लक रक्कम ५२०/-) सुपूर्त केली आहे.
पावती मिळाल्यानंतर इथे स्कॅन करुन पोस्ट करु.

VaVi2023Denagi.jpg

--
धन्यवाद Happy

माझ्याकरता हा अत्यंत सुखद धक्का होता.
मैत्री परिवारातर्फे मायबोलीकर दात्यांचे मनापासून आभार.
लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा असे काम हातून घडत रहावे ही प्रार्थना.

टी शर्टचे जमा झालेले पैसे मैत्री संस्थेला दिलेत हे प्रेरणादायी काम आहे.
टी शर्टला कुणी फायनान्स केलेले मग ? त्यांना सा.दं.

अतुलजी, नसेल केलं तुम्ही पकडीने काहीही सरळ !! आमचा विश्वास आहे.
त्यासाठी वविला गेल्याचं का नाकारायचं ?

Pages