Submitted by ववि_संयोजक on 30 July, 2023 - 23:40
कालचा ववि धम्माल झाला. सगळी मरगळ दूर झाली असेलच. आम्हा संयोजकांना तर "याची साठी केला होता अट्टाहास" अशी भावना दाटून आली.
प्रचि गृप फोटो इथे दिलाच आहे. बाकी फोटोंची देवाणघेवाण वैयक्तीकच राहू द्यावी ही विनंती. काही आयडींनी गृप फोटो व्यतिरिक्त वैयक्तीक फोटो पब्लिक फोरमवर टाकू नये असा पर्याय निवडल्यामुळे त्याच्या मताचा आदर म्हणून ही विनंती आहे. बाकी बच्चे कंपनीचा (गृपमधे किंवा स्वतःच्या मुला/मुलीचा), स्वतःचा, निसर्गाचा, खादाडीचा, बॅनरचा असे फोटो यायला हरकत नाही.
चला तर मग, येऊद्या तुमचे अनुभव इथे.
शब्दखुणा:
Groups audience:
- Private group -
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हर्पेन, मस्त वृतांत.>>> +
हर्पेन, मस्त वृतांत.>>> ++११११
ह्या वर्षी वविला यायची इच्छा
ह्या वर्षी वविला यायची इच्छा होती, पण नेमका ह्याच आठवड्यात बाहेर असणार होतो, त्यामुळे काही सहभाग घेता आला नाही. पण हे वृत्तांत वाचून हूरहूर वाटते आहे. पुढच्या वर्षी नक्की जमवायचा प्रयत्न करणार.
वृत्तांत भाग १ :
वृत्तांत भाग १ :
इतके वर्ष माबोकर असून ववि ला का जावे वाटले नाही माहित नाही. या वर्षी मात्र ववि जाहीर झाल्यापासून 'जावे जावे' असे आतून वाटू लागले.
दोनचार दिवस आधी काढलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपने खुद्द ववि इतकीच मज्जा आणली. तिथे सुरुवातीपासून इतका दंगा सुरू झाला की 'इथेच इतका तर तिथे किती' या कल्पनेने मन ववि ची आतुरतेने वाट पाहू लागले.
वविचे प्लॅनिंग इतके काळजीवाहू (आयडी नव्हे) असते मला माहीत नव्हते. ववि च्या आदल्या रात्रीपर्यंत संयोजक मला कुठल्या थांब्यावर बसणार हे विचारत होते. आत्तापर्यंत अश्या ग्रुप ट्रीप मध्ये "बस अमुक वाजता अमुक थांब्यावर असेल.. जेवढे तिथे असतील त्यांना'च' बस घेऊन जाईल" अश्या छापाच्या सूचना वाचण्याची सवय असल्याने लोक माझ्या थांब्याच्या मागे का पडलेत कळेना.
खुद्द ववि च्या दिवशी पावणेचार वाजल्यापासून पावणेसहा वर्षाचा लेक अती उत्साहात उठून (आणि मला उठवून) बसला होता. त्यामुळे वेळेआधीच सगळे आवरले. अगदी देवाला सुद्धा दिवा वगैरे लावून निघालो इतका वेळ हातात होता. त्यामुळे अर्थातच थांब्यावर वेळेआधीच पोचलो. बस यायची होती तोवर शुन्य शून्य एक ला फोन करून ठेवले. तो बस डेपो मधून घेऊनच आला असावा अशी मला शंका आहे कारण तो पहिल्याच थांब्याला ऑलरेडी बशीत बसून आलेला होता. (रच्याकने एवढ्या सकाळी सुद्धा ग्रूपवर कोणीतरी मी नक्की कोणत्या थांब्यावर चढणार हे विचारलेच होते).
मग बस मध्ये चधलो. ड्रायव्हर मंगेश हा पूर्वाश्रमीचा पायलट असावा याची खात्री पटेल इतक्या वेगात बस दामटली. हा हा म्हणता आम्ही पुढच्या स्टॉप ला पोचलो सुद्धा. तिकडे योकु+छोटा योकु आणि हर्पेन येऊन थांबले होते. योकु फ्लेक्स लावायची दोरी विसरल्याने त्याने अतरंगी येईपर्यंत कुठे दोरी, नाडी किंवा बांधता येण्यासारखे मटेरियल मिळते का याची अयशस्वी चौकशी केली. मग अतरंगी + सौ अतरंगी आणि त्यांची अतिशय गोड बाळे हजर झाले आणि आमची बस निघाली.
पुढे एका ठिकाणी रीया + पिल्लू आणि केदार + वहिनी + पिल्लू असे लोक add झाले आणि मजेला सुरुवात झाली.
क्रमशः
पियू मस्त.
पियू मस्त.
एकंदर सगळ्यांचे लेख वाचून ववी
एकंदर सगळ्यांचे लेख वाचून ववी भयंकर कंटाळवाणा होता असं दिसतंय. आपली फजिती होऊ नये म्हणून सगळे बळेच चांगला होता छान झाला असं म्हणत आहेत. बसमधील भेंड्या हा महाभयानक प्रकार असतो. लोकं स्वतः ला तानसेन, किशोर, रफी, लता समजून असे काय दहाव्या बाराव्या सुरत गात असतात विचारू नका. जे गेले ते पुन्हा वविला जाणार नाहीत. ववी सोडा ते अजून दोन चार वर्षे ईतर सहलीला पण जाणार नाहीत. अर्थात हे ते मान्य करणार नाहीत.
वृत्तांत भाग २:
वृत्तांत भाग २:
वर सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे केदार जाधव इतका लांबचा प्रवास करून डायरेक्ट ववि साठी जॉईन होतोय याचे खरोखर खूप कौतुक वाटले.
बस सुरू झाल्यावर मला सकाळी राहिलेली झोप पूर्ण करायला मिळेल अशी आशा होती. पण अंताक्षरी सुरू झाली आणि बसमध्ये मज्जा यायला लागली. सगळीच झोप उडाली. मग भरपूर गाणी, भेंड्या, गाणी न आठवल्याने भेंड्या चढायला लागल्यावर आपण कैक वर्षात गाण्याच्या भेंड्या खेळलो नाही याची एकदम झालेली जाणीव, मी चुकीची ऐकलेली-म्हटलेली गाणी या धाग्यासाठी चिक्कार मटेरियल जमा झाले.
हर्पेन यांचे इथले लिखाण वाचून
हर्पेन यांचे इथले लिखाण वाचून वेगळीच प्रतिमा मनात होती. फोटो भारी आहे.
मळका हरी भाग ३ मधे लीड रोल मधे त्यांना कास्ट करता येईल. काय म्हणता हर्पेन ?
अतरंगी, मस्तच लिहीलेय. असाही वृत्तान्त. आवडेश.
function at() { [native code] }रंगी म्हणजे फोटोत सर्वात पुढे बुल्गॅनिन दाढीत उकीडवे बसलेलेच का ?
येऊद्यात अजून.
function at() { [native code] }उल सरांचा वृ कधी येणार ? वाट बघतोय.
बहुतेक त्यांनी हबलची छोटी बहीण सोबत आणली असणार. पूलमधे उडी मारताना हवेत असताना खाली पृथ्वी फिरताना तिची गती काय असते, यशोदा फार्म पासून ब्लॅकहोम डब्ल्यू सीएम ३४५ किती प्रकाशवर्षे दूर आहे हे तिथे सांगितले नसेल तर वृ मधे येईलच.
सेक्रेटरी सोबत कुणीच नाही का आले ?
वृत्तांत भाग ३:
वृत्तांत भाग ३:
एवढ्या गाणी बिणी दंगा मस्ती मध्ये बायो ब्रेक घ्यायचे, संयोजकांना वडापाव किंवा चहा आणि कांदा भजी खाऊ घालायचे ठरवले होते त्याचा ठार विसर पडला. भज्यांचे वास येऊ लागले तेव्हा रिसॉर्ट १५ च मिनिटांवर आहे असे गुगल मॅप ने सांगितल्यामुळे तेही मागे पडले.
क्रमशः
भज्यांचे वास येऊ लागले तेव्हा
भज्यांचे वास येऊ लागले तेव्हा रिसॉर्ट १५ च मिनिटांवर आहे >> इतक्या लांब वास आला ?
Are वाह.. हर्पेन पियू .. दोन
Are वाह.. हर्पेन पियू .. दोन वृत्तान्त वाढले..
@ पियु.. तीन वेळा क्रमशः केले.. पण अजून तुझी बस रिसोर्टला पोहोचेना
सर्वांचे वृतांत छान ! रिसॉर्ट
सर्वांचे वृतांत छान ! रिसॉर्ट ही मस्त आहे .
पावसाचे एक लिहायचे राहिले. हा
पावसाचे एक लिहायचे राहिले. हा जुलै महिना विक्रमी पावसाचा असला तरी वविच्या दिवशी तिथे पाऊस अगदी तेवढाच होता जेवढा हवा असतो. अध्येमध्ये सर येऊन भिजायचा आनंद देऊन जायची. पण श्या कधी हा थांबणार असे दिवसभरात झाले नाही.
सर्वांचे वृतांत छान ! रिसॉर्ट
सर्वांचे वृतांत छान ! रिसॉर्ट ही मस्त आहे .
इतक्या लांब वास आला ?
इतक्या लांब वास आला ?
>> रिसॉर्ट मधल्या भज्यांचा नाही हो.. आजूबाजूच्या गाड्यांवरील भज्यांचा. रिसॉर्ट वर सकाळी पोचल्या पोचल्या नव्हती कांदाभजी. संध्याकाळी होती.
फूलपाखरांच्या मागे पळून झाले.
फूलपाखरांच्या मागे पळून झाले. पुन्हा मांजरीची गचांडी धरली. या सगळ्यात ज्युनिअर ऋन्मेषचे चिखलात पडून झाले. पण मला कार्यक्रमाच्या मध्ये डिस्टर्ब करायला नको म्हणून परीनेच त्याला कुठल्यातरी नळाखाली नेऊन धुतले.
मध्येच काही बायका सांस्कृतिक कार्यक्रमातून ऊठून बाहेर आल्या. तेव्हा तिला वाटले की कार्यक्रम संपला यांचा.. पण त्यांनी खचाखच फोटो काढले आणि पुन्हा आत गेल्या. >>>
ऋन्मेषचे मुलांनी काय केले ते वाचून
कमाल वृत्तांत आहेत सगळे!
कमाल वृत्तांत आहेत सगळे! आधीच्या जाहिराती वाचून एवढं काही वाटलं नव्हतं (सॉरी संयोजक; तुमचा दोष नाही), पण वृतांत वाचून आता हुरहूर लागून राहील असं वाटतंय.
आधीच्या जाहिराती वाचून एवढं
आधीच्या जाहिराती वाचून एवढं काही वाटलं नव्हतं
>>>>>
जाहिरातीचा एका वेगळा धागा बनवून जुन्या वविकरांचे अनुभव त्यांना लिहायला सांगितले असते, तसेच जुन्या वृत्तांतातले निवडक उतारे आणि फोटो टाकले असते तर माहौल तयार झाला असता असे वाटते. व्हॉट्सअँप ग्रूप निघायच्या आधी मी सुद्धा जरा साशंकच होतो. तोच मूड जर माबोवर आधीच तयार झाला असता तर नक्कीच आकडा वाढला असता.
येनीवेज न आलेले आता पुढच्या वर्षी. मी तरी पुन्हा माझी दोन पोरे घेऊन येणार हे नक्की आहेच. तरी पुन्हा त्याच लोकांसोबत आणखी नवीन लोकांना भेटायला जास्त आवडेल. त्यामुळे पुढच्या वेळी मी सुद्धा स्वयंसेवक बनून जाहीरात करतो वविची
जाहिरातीचा एका वेगळा धागा
जाहिरातीचा एका वेगळा धागा बनवून जुन्या वविकरांचे अनुभव त्यांना लिहायला सांगितले असते, तसेच जुन्या वृत्तांतातले निवडक उतारे आणि फोटो टाकले असते तर माहौल तयार झाला असता असे वाटते.>> ही कल्पना मस्त आहे
त्यामुळे पुढच्या वेळी मी सुद्धा स्वयंसेवक बनून जाहीरात करतो वविची Happy>> अरे वा! ब्येष्ट
जाहिरातीचा एका वेगळा धागा
जाहिरातीचा एका वेगळा धागा बनवून जुन्या वविकरांचे अनुभव त्यांना लिहायला सांगितले असते, तसेच जुन्या वृत्तांतातले निवडक उतारे आणि फोटो टाकले असते तर माहौल तयार झाला असता असे वाटते. >> +१ पुढच्या वेळी हे अमलात आणायला हरकत नाही.
ऋण्म्या, तु कायप्पा वर झालेले
ऋण्म्या, तु कायप्पा वर झालेले बोलणे तुझ्या वृत्तांतात टाकले नाही याबद्दल तुझा जाहिर णिषेध..... दिल्या शब्दाला जागावं माणसाने....
मी पण आता यापुढे प्रत्येक वविला येणार तर आहेच आणि संयोजक मंडळामधेपण असणार आहे .
अतरंगी, त्या भावना वृत्तांत
अतरंगी, त्या भावना वृत्तांत पलीकडे होत्या
आता टाकतो घ्या...
ईतक्या सगळ्या आयडींमधे मला अतरंगीला भेटून छान वाटले. ईतका नम्र, शांत, सालस आणि सुसंस्कृत व्यक्ती मी ऊभ्या आयुष्यात पाहीला नाही. वविला आलेल्या प्रत्येकाची त्याने आवर्जुन चौकशी केली. त्याच्या भोवती कायम असलेल्या गर्दीमुळे तो किती पॅाप्युलर आहे हे वेगळे सांगावे लागलेच नाही. मुले तर रेसॅार्टला पोचल्यापासून नुस्ता दादा दादा करत सतत त्याच्या अवती भोवतीच होती. त्याच्या पॅाप्युलर असण्याचे सिक्रेट मला जाणून घ्यायचे होते पण त्याला एका क्षणाचीही उसंत नव्हती. असो परत कधीतरी. ओळक परेड झाल्यावर तर माझा त्याच्या बद्दलचा आदर दुणावला. काय चतुरस्त्र आणि बहुरंगी व्यक्तिमत्व आहे . विविध विषयांमधले त्याचे ज्ञान, प्रभुत्व अगदी सहज कळत होते. मानलं बुवा याला. काश मला असे जगता आले असते….. त्याच्याकडे यावर्षी क्लासच लावावा म्हणतो. पुढच्या वविपर्यंत त्याच्या प्रसिद्धीतली एक टक्का प्रसिद्धी जरी माझ्या वाट्याला आली तरी मी स्वतःला ग्रेट समजू लागेन….
टी-शर्ट आणलेस का अर्थातच लगेच
टी-शर्ट आणलेस का अर्थातच लगेच हो म्हणून सांगीतले तर तो अतरंगी कसा! त्याने साभिनय, अर्रे आणायचे म्हणून वर काढून ठेवले आणि नेमके विसरलो बघ असे सांगीतले. मला खरे वाटले यात नवल नाही पण योकुलाही ते खरे वाटले. त्यामुळे याठिकाणी अभिनयाचा सर्वोच्च पुरस्कार त्याला देण्यात यावा म्हणून मी शिफारस करत आहे. >>>>>>
असू द्या असू द्या हो. पुरस्कार वगैरे नको. तुमच्या कडून पोचपावती मिळाली हेच पुरेसे आहे.
मी पण शिंगे मोडून दोन डाव म्हणतात तसे दोन डाव्या पायांवर पावसातले कोळीनृत्य केले.>>>>>
अरे, हे कधी झाले? आणि मी कसे काय मिस केले?
कोणीतरी गाडीत गाणी-गिणी लावा की अशी लापि वाजवली गेली. ज्यावर सोडलेले इग्नोरास्त्र भारी पडले असे आता सिद्ध झाले आहे. >>>>
हे मी पण नोट केले आहे. पुढच्या वेळेस एकमेकांनी बोललेला एक शब्दही ऐकू येणार नाही एवढे दणदणीत स्पिकर्स असलेल्या बसची सोय करतो.
अतरंगी + सौ अतरंगी आणि
अतरंगी + सौ अतरंगी आणि त्यांची अतिशय गोड बाळे हजर झाले आणि आमची बस निघाली.>>>>
पियू यात एक डिटेल मिस झाले आहे....
"गोड अतरंगी + सौ अतरंगी आणि त्यांची अतिशय गोड बाळे हजर झाले आणि आमची बस निघाली."
असे हवे
हांगाशी ऋण्म्या, आत्ता कसं
हांगाशी ऋण्म्या, आत्ता कसं झ्याक वाटतंय.....
धाग्यावरचे काही प्रतिसाद
धाग्यावरचे काही प्रतिसाद सुद्धा पियूच्या एकेका भागापेक्षा मोठे आहेत....
मी मायबोलीवर स्वतःचेच कौतुक
मी मायबोलीवर स्वतःचेच कौतुक करत असलो तरी प्रत्यक्ष आयुष्यात इतरांचेही करतो हे सुद्धा यातून लोकांना समजेल अशी आशा करतो
हे मी पण नोट केले आहे.
हे मी पण नोट केले आहे. पुढच्या वेळेस एकमेकांनी बोललेला एक शब्दही ऐकू येणार नाही एवढे दणदणीत स्पिकर्स असलेल्या बसची सोय करतो.
>>>>
हे कराचं. मग काय होईल ते कळेल पुढच्या वविला.
सगळेच वृत्तांत खूप छान आहेत
सगळेच वृत्तांत खूप छान आहेत आणि वाचताना खूप फ्रेश आणि रिलॅक्स वाटते आहे..
पियू यांची गाडी बऱ्याच सिग्नल ला थांबतेय...लवकर क्रमशः पूर्ण करा ....वाचायला आवडतेय.
सगळ्या नवख्या वृत्तांतकरांचं
सगळ्या नवख्या वृत्तांतकरांचं लिहून झालं असेल तर माझा वृत्तांत लिहायला घेते.
हर्पेन, ऋन्मेश आणि पियू मजा
हर्पेन, ऋन्मेश आणि पियू मजा आली वाचायला.
हल्ली डिसेंबरातही पाऊस पडतो ना? तेव्हा का नाही करत ववि?
Pages