ववि २०२३ (यशोदा फार्म & रिसॉर्ट) - वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 30 July, 2023 - 23:40

कालचा ववि धम्माल झाला. सगळी मरगळ दूर झाली असेलच. आम्हा संयोजकांना तर "याची साठी केला होता अट्टाहास" अशी भावना दाटून आली.

प्रचि गृप फोटो इथे दिलाच आहे. बाकी फोटोंची देवाणघेवाण वैयक्तीकच राहू द्यावी ही विनंती. काही आयडींनी गृप फोटो व्यतिरिक्त वैयक्तीक फोटो पब्लिक फोरमवर टाकू नये असा पर्याय निवडल्यामुळे त्याच्या मताचा आदर म्हणून ही विनंती आहे. बाकी बच्चे कंपनीचा (गृपमधे किंवा स्वतःच्या मुला/मुलीचा), स्वतःचा, निसर्गाचा, खादाडीचा, बॅनरचा असे फोटो यायला हरकत नाही.

vavi 2023.jpg

चला तर मग, येऊद्या तुमचे अनुभव इथे.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटोत जेमतेम ३३-३५ अ‍ॅडल्ट दिसत आहेत. पुण्यातून आणि मुंबईहून फक्त इतकेच सदस्य आले वर्षाविहाराला?

अतरंगी प्रांजळ वृतांत...आवडला...
गाणी, नाच वगैरे खटकले...
पण असलं व्यक्त होणं अशावेळी नाही तर कधी....
या गोष्टी प्रत्येक सहलीत असतात.

ववि वृत्त्तांत २०२३ (भाग पहिला)
----------------------------------------------------

हम एक बार जिते है, हम एक बार मरते है, और ववि भी एक ही बार करते है..
असे म्हणत मी माझ्या आयुष्यातील ववि २०१२ सालीच झाला आहे असे समजून दर वर्षी ईतर वविकरांचे वृत्तांत वाचून सुखसमाधानाने माझे आयुष्य जगत होतो.
(मी म्हणजे कोण हे वरच्या डायलॉगवरून समजले असेलच Happy )

पण या वविची घोषणा झाली तेव्हाच आतून आवाज आला, या वविला जरूर जायचेच. कारणे दोन. पहिले खूप पर्सनल. जे ईथे सांगू शकत नाही. पण एका मौजमस्तीच्या ब्रेकची मानसिक गरज होती. दुसरे म्हणजे त्या ब्रेकसाठी वविच का? तर तब्बल सहा वर्षांच्या ब्रेकनंतर येणारा हा पहिलाच ववि होता. पहिल्यावेळची जी एक वेगळीच मजा असते ती याच वेळी अनुभवायला मिळणार होती. त्यामुळे या उत्सवात सामील होण्यास उत्सुक होतो.

पण मी ठरलो माणूसघाणा Happy , लोकांत मिसळायला फारसे आवडत नाही. पण वविला मुलांना सोबत नेताच हा प्रश्न सुटणार होता. त्यामुळे जायचेच आहे हे पक्के करूनच वविच्या धाग्यावर प्रतिसाद देत होतो. घरी मुलांना वविबद्दल सांगून झाले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे बायकोचीही परवानगी घेऊन झाली होती. पण आयुष्यात सारे काही ठरवल्याप्रमाणे कुठे घडते?

वविच्या तीन आठवडे आधी आमची स्कूल पिकनिक होती. त्यानंतर जे आजारी पडलो ते वविपर्यंत आजारीच होतो. जुनाच आजार, आयुष्यभराचा सोबती, पुन्हा साथ द्यायला आला होता. वर्ष दोन वर्षभराने हा नियमित येतो आणि कमावलेली सारी तब्येत एकसाथ सोबत घेऊन जातो. यावेळी त्याने नेमका वविचा मुहुर्त धरला होता. थंडीतापाने सुरुवात झाली ते उलट्या, जुलाब, मळमळणे, भूक न लागणे, तीन आठवड्यात तब्बल सहा किलो वजन उतरले होते. हातापायातील शक्ती निघून गेली होती. वर्क फ्रॉम होम करायची सुद्धा ताकद नसल्याने घरात बसूनच, घराचा ऊंबरठाही न ओलांडता खिडकीतूनच पावसाचा आनंद उपभोगणे चालू होते. त्यामुळे माझ्यापुरता ववि कॅन्सलच झाल्यात जमा होता.

पण घडते तेच,
जे नियतीने ठरवले असते.

नावनोंदणी करायला दोन दिवस शिल्लक असताना अचानक लेकीला आठवले. अरे पप्पा, आपण त्या पिकनिकला जाणार होतो ना, तिचे काय झाले?

लेकीच्या डोक्यातून ते गेले नव्हते. तिला मी पुन्हा एकदा विचारले, तुला नक्की जाण्यात ईंटरेस्ट आहे का? तर हो म्हणताना तिच्या चेहर्‍यावर जो उत्साह दिसला ते पाहून ठरवले की आता पोरांसाठी तरी घराचा उंबरठा ओलांडायलाच हवा. म्हणून जे होईल ते बघूया म्हणत अंतिम दिवशी नाव नोंदवले. तेव्हा माझ्यापेक्षा जास्त आनंद कविन यांना झाला असावा. कारण पहिल्या दिवशीपासून तू पोरांसोबत वविला येतोस म्हणून त्या आग्रही होत्या आणि माझ्या सर्व शंकांचे वेळोवेळी निरसन करत होत्या.

नाव नोंदवले आणि तब्येत लवकरात लवकर सुधारावी, किमान येण्याजाण्यापुरती ताकद अंगी यावी यासाठी प्रार्थना सुरू केली. पण सुधारणा होत नव्हती. बाहेरचे वातावरण पाहता कुठे पाय मोकळे करायला चालून यावे असे वाटत नव्हते. घरातल्या घरात चालले तरी थोड्यावेळाने पाय ठणकू लागायचे. मोबाईलची स्क्रीन जास्त वेळ पाहिली तरी डोके चढायचे. दिवसेंदिवस उत्साह मावळतच होता. पण वविच्या तीन दिवस आधी संयोजकांनी वविचा व्हॉटसपग्रूप बनवला आणि अचानक मूड चेंज झाला.

कोण येतेय, कसे येतेय, जुन्या जाणत्या वविकरांचे आधीचे अनुभव, थट्टा मस्करी, या ववित काय धमाल करायची याची आखणी, यात दिवस कसा जाऊ लागला समजत नव्हते. मोबाईल बघून होणारा त्रासही जणू थांबला. मी दिवसभर त्या ग्रूपवर पडीक राहू लागलो. वविकरांशी अर्धीअधिक ओळख त्या ग्रूपवरच झाली. ओळखीचे नसलेल्यांचे आयडी विचारायचे आणि मायबोलीवर येऊन त्यांचे प्रोफाईल चेक करायचे यातही गंमत वाटत होती. थोडक्यात वविपुर्वीचा माहौल खेळीमेळीच्या गप्पांतून तयार होत होता. माझ्या आजारपणात तर हा ग्रूप वरदानच ठरला, पण प्रत्यक्ष पिकनिकच्या आधी काही दिवस जी हुरहूर वाटते तो अनुभव या ग्रूपने सर्वांना मिळवून दिला.

त्याच ग्रूपवर आलेला एका जुन्या वविचा ग्रूप फोटो लेकीला दाखवला. तर तिच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह!
या काकामामा आणि ताईमाई अक्कांसोबत पिकनिकला जायचेय??

तसे मी तिला पुढचा फोटो दाखवला ज्यात तीच लोकं चिखलात लोळत होते. आणि म्हटले यांची वये काहीही दिसली तरी धमाल लहान बनूनच करतात सारे. आणि तुलाही त्यांची भीड न बाळगता तसेच बिनधास्त वागायचे आहे. तसे ती खुलली पण तिच्या वाढलेल्या अपेक्षा आता पुर्ण होतील का याचे मला वेगळेच टेंशन आले Happy

तब्येतीचे टेंशन मात्र अखेरपर्यंत कायम होते. थंडीताप वविच्या दोन दिवस आधीही होता. पाय आदल्या दिवशीही ठणकत होते. आदल्या रात्री जे मळमळू लागले त्याने रात्री जेवलोही नाही. झोपायचा टाईम माझा तसा उशीराचाच आहे, त्यात पिकनिक म्हटले की झोप अजून उशीरा येते. पण देवाने जणू माझ्या निश्चयाची परीक्षाच घ्यायची ठरवली होती. झोप येणे तर दूर, पुर्ण रात्रभर डोळे लख्ख उघडे होते. अलार्म त्याच्या वेळेला वाजला. पण मी त्याआधीच तयारीला लागलो होतो. मुले सुद्धा रात्री अडीच तीन वाजता झोपली होती, पण पिकनिक म्हणताच एका आवाजात ताडकन उठली. अर्ध्या तासात तयारी आटोपून आम्ही आमच्या पहिल्या वविच्या अनुभवासाठी सज्ज झालो.

हा घरातून निघतानाचा पहिला फोटो.
माझा ईतका चेहरा सुकलेला, खांदे उतरलेला आणि सिक्स पॅक गायब झालेला फोटो ईतरवेळी मी कुठे टाकला नसता. पण आज वविपश्चात तितक्याच कौतुकाने शेअर करावासा वाटतोय. कारण या आजाराचा दिवसभर जणू विसरच पडला होता Happy

01_5.jpg

रिक्षा पकडून आमच्या पिकअप पॉईंटला पोहोचलो. समोर बस नुकतीच आली होती. लेकीने विचारले, ही आपली आहे का? त्यावर आधी मी सावधगिरी बाळगून आपली नसेल म्हणालो. कारण ईतकी भलीमोठी सुंदर बस आपली असेल याची खात्री नव्हती Happy मग हळूच पाहिले तर खिडकीतून माझ्याकडेच बघणारे काही ओळखीचे चेहरे दिसले.

हा बसचा फोटो.

02_5.jpg

बसमध्ये चढताच सुरुवातीच्या सीटवर दूरवर नजर जाईल तिथवर बायकाच दिसल्याने लेडीज स्पेशलमध्ये चढल्याचा फिल आला. अर्थात त्याचे सुखंदु:ख नव्हते. पण आता गाण्यांच्या भेंड्या ऐकत प्रवास सुखकर होणार हे समजले. सुक्या खाऊचा ब्रेक झाल्यावर एकीकडून विनय भिडे आपल्यातील विनय आणि भीड सोडून गायला सुरू झाला तर दुसरीकडून आनंद चव्हाण तितक्याच आनंदाने त्याला साथ देऊ लागला. ढोलकीनेही छान ताल पकडला होता. रिसॉर्ट येईपर्यंत सर्वांचा लागलेला सूर वाढतच होता. माझ्या घश्यातून सकाळीच थोडासा रक्तपात झाला असल्याने मी टाळ्या वाजवण्यातच धन्यता मानली. पण मायबोली वविची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली होती.

सर्व चिल्लर पार्टीने लास्ट सीटवर कब्जा केला होता. पण माझी दोन पोरे माझ्या जवळच्या एका सीटवर बसली होती. नवीन हिंदी आणि ईंग्लिश गाण्यांची आवड असलेली मुलगी जुन्या हिंदी आणि मराठी गाण्यांनी कंटाळेल याची भिती होती. पण हळूच तिला विचारले असता म्हणाली, उलट मला तर मजा येतेय गाणी ऐकत प्रवास करायला. तेव्हा मला हे पटले नाही. पण नंतर तिच्या फोनमध्ये गाण्यांचे काही विडिओ रेकॉर्ड केलेले सापडले. याचा अर्थ ती खरेच बोलत असावी. काहीतरी गंमत वाटल्याशिवाय तिने रेकॉर्ड केले नसते. तसेच मराठी गाणी तिला माहीत नसली तरी शेवटी घेतलेली गणपतीची आरती आणि भजन पाठ असल्याने ती सुद्धा त्यात सामील झाली Happy

वेळेवर निघालेली बस बरेपैकी वेळेवर रिसॉर्टला पोहोचली. पुण्याची बस आमच्याही आधी पोहोचली होती. सध्याच्या विक्रमी पावसापाण्यात हे करून दाखवले याबद्दल संयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!!

आणि या नोटवर एक ब्रेक घेऊया ...
पण माबोकरांना रिसॉर्टचा लूक समजायला आणि पावसाळी वातावरणाचा फील यायला दोनचार नजरेला सुखावणारे फोटो बघूया.

क्रमशः

हे फोटो गेल्यागेल्याच एका निवांत क्षणी टिपलेले. एकदा वर्दळ झाली की मग कोणाचा फोटो टाकायचा कोणाचा नाही या झमेल्यात न अडकलेलेच बरे Happy

03_5.jpg
.
04_5.jpg
.
05_5.jpg
.
06_5.jpg
'
07_5.jpg

ऋन्मे§ष, सुरेख फोटो आहेत.. हिरवाईनं निवले डोळे अगदी. वृत्तांत भाग पहिला आवडला.
अतरंगी, पहिला भाग वाचून उत्सुकता वाढली आहे.

मस्त लिहिले आहेस

तुझी दोन्ही लेकरं गोड आहेत. परी तर विशेष गोड. स्वतः धमालही करत होती पण एकीकडे धाकट्यावर लक्षही ठेवून होती. धाकट्याची काळजी घेणारी गोड ताई एकदम

तुझी दोन्ही लेकरं गोड आहेत. परी तर विशेष गोड. स्वतः धमालही करत होती पण एकीकडे धाकट्यावर लक्षही ठेवून होती. धाकट्याची काळजी घेणारी गोड ताई एकदम >>> +१

ऊत्तरार्ध.

अकरा साडे अकराच्या सुमारास मी बायको मुलांना पुलमधून बाहेर काढले. हळूहळू एक एक जण बाहेर पडू लागले, पण जेवण अजून तयार झालेच नव्हते. मग प्रत्येकाच्या बॅगमधला कोरडा खाऊ बाहेर येऊ लागला. धाकटा मुलगा चिज कटोरी खात होता. त्याला म्हणलं सगळ्यांशी शेअर कर तर त्याने प्रत्येकाच्या हातावर प्रसाद दिल्या सारखी एक एक टेकवली. काही काहींना तर सरळ नाही देणार म्हणून पुढे निघून गेला. मुलांना काही गोष्टींचे ज्ञान ऊपजतच असते नाही……

माझी दोन्ही मुले दुपारपर्यंत शांत होती पण लंचनंतर ओवी, परी आणि विहानने चांगली गट्टी जमवली आणि दंगा करत बसले होते. मी मधेच एकदा त्या रूममधे डोकावलो तर सगळे जंक फुड खात होते. जंक फुड का खाताय म्हणून मी डोळे वटारले तर परीने कमरेवर हात ठेऊन “पार्टीला आणि ट्रिपला जंक फुड नाही खायचे तर काय खायचे?” असे विचारून मला निरूत्तर केले.

जेवण झाल्यावर सांस्कृतिक समितीच्या कार्यक्रमांना मात्र धमाल आली. माबोवर वापरले जाणारे शॅार्टफॅार्म्स, सर्वात जुना आयडी कोणाचा, म्हणींचे dumb charades यात मजाच आली. कुंतलने केलेल्या “ घरात नाही दाणा आणि बाजीराव म्हणा” यातल्या शब्दांचा अभिनय फारच भन्नाट होता. प्रत्येक राऊंडवर आमच्याच गृपचे निर्विवाद वर्चस्व होते. शेवटी अर्थातच आम्हीच जिंकलो…..
डोळे बंद करून कॅडबरी भरवायच्या राऊंडचा भिडेंनी होम मिनिस्टर प्रोग्रॅम करून टाकला… डायरेक्ट घास भरवणे आणि ऊखाणेच…. मला वाटले की आता सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यावर एखादी घाणेरडी पैठणी पण देतायत की काय…..
(काही आयडी सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना रुममधे जाऊन घोरत पडले होते. संयोजकांनी याची नोंद घ्यावी व पुढील वविला असे कोणी केल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा अथवा त्यांना एक डेअर द्यावे. )

सगळे झाल्यावर सर्वांची ओळख परेड झाली. अनेक जुने जाणते आयडी कळाले. आयडींना चेहरे आणि नाव मिळाले.

ओळख परेड संपल्यावर रितसर फोटो, चहा, कांदाभजी झाली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. रात्री अडीच पासून जागरण झाल्याने मला पेंग येत होती पण रिया, मल्ली, हर्पेन, योकु, केदार आणि पियू माबोची बखर लिहायची जबाबदारी दिल्यासारखे चर्चा करत बसले होते. माणसांमधे वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंटस असतात असे म्हणतात, रीयाचे काणाचा डयु आयडी कोण हे ओळखण्याचे कसब वादातीत आहे. त्यांच्या चर्चेला ब्रेक लावायचे मी दोन तीन निष्फळ प्रयत्न करून बघितले पण त्यांनी काही दाद दिली नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून अगदी मोठ्या आवाजात गाणी लावली तर दोन चार गाणी झाल्यावर योकुने या सर्वांची बडबड प्लस मोठ्या आवाजात लावलेली गाणी हे असह्य झाल्याने मलाच गाणी बंद करायला सांगितली. त्याला माहित होते की ही बाकी मंडळी काही शांत होणार नाहीत. अजून एक निष्फळ प्रयत्न म्हणून मनावर दगड ठेऊन त्या सर्वांना मला जो केक शेअर करायला आवडत नाही तो दिला, जेणे करून खाण्याच्या नादात तरी हे सगळे शांत होतील, तर सगळ्यांनी फक्त केक झक्कास आहे असे अंगठ्यानेच सांगुन बडबड चालूच ठेवली. मग मात्र मला ते सर्व सहन करण्यावाचून पर्यायच राहीला नाही. शेवटी नऊ साडे नऊला मी डेक्कनला ऊतरलो आणि त्या जाचातून सुटलो.

ओव्हरॲाल मस्त मजा आली. छान अनुभव. मुलांनी पण जाम मजा केली. पुढच्या प्रत्येक वविला सकुसप यायचा नक्की प्रयत्न करणार.

वविला आल्यावर मायबोली हे एक कुटुंब आहे असे सगळे कायम का म्हणतात हे कळले……

खेळीमेळीत काही चुकले माकले असेल, कोणाला वाईट वाटले असेल तर क्षमस्व.. सर्वांचा स्नेह असाच राहो ही सदिच्छा…..

भारीच अतरंगी वृत्तांत Rofl
आमच्या फार वेगळी वेगळी स्टेशनं लागलेली मागे. तू आला असतास तर तुला पण शहाणं करून सोडलं असतं.
तू होतास काय तो गाणं लावणारा. तुझं नशीब चांगलं की मी नाचायच्या अवस्थेत नव्हते नाही तर आणखी वैतागला असतास. माझा मुलगा पण झोपला होता म्हणून नाही तर मी आणि मल्याने बस उठवली असतेच नक्की.

पुढच्या प्रत्येक वविला सकुसप यायचा नक्की प्रयत्न करणार.
>>>>>
पुण्याच्या बसमध्ये पुन्हा तुम्हाला घेतील असे वाटत नाही Lol

तर परीने कमरेवर हात ठेऊन “पार्टीला आणि ट्रिपला जंक फुड नाही खायचे तर काय खायचे?”
>>>>>>
बाजूलाच बसलीय. कन्फर्म केले लगेच आणि पाठीवर कौतुकाची थाप दिली Proud

@ कविन, हर्पेन
हो, घरात दोघे कुत्र्यामांजराचे वैर दाखवतील. पण बाहेर गेले की तिचे हे ताई रूप नेहमी दिसते. लोकांना वाटते मी दोन पोरे सांभाळतो. पण प्रत्यक्षात आम्ही दोघे मिळून एक पोर सांभाळत असतो Happy

>>>(काही आयडी सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना रुममधे जाऊन घोरत पडले होते. संयोजकांनी याची नोंद घ्यावी व पुढील वविला असे कोणी केल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा अथवा त्यांना एक डेअर द्यावे. )>>>
बहुतेक पुणेकर...मग दंड कसला वसूल करणार...१ ते ४ बंद म्हणजे बंद... आणि हो घोरणं पुणेकर असंस्कृत मानत नाहीत Happy
मुंब‌ईकर असतील तर अपवाद... बिच्चारे कसली रोज कुतर‌ओढ... त्यामुळे दंड नाही. Wink

अतरंगी (पुणे) आणि ऋन्मेऽऽष (मुंबई) दमदार वृत्तांत सुरवात. वविचा अनुभव दिल्याबद्दल आभार. सालाबादप्रमाणे (६ वर्षांनी) वविची पारंपारिक रूपरेषा अबाधित ठेवल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद. सांस्कृतिक कार्यक्रम खूप छान मजेशीर असतो. यावेळीही मज्जा आली असेलच.

ऋन्मेष तुझी मुले अगोदरच्या लेखांतील फोटोंमुळे मायबोलीचे सिलेब्रिटी झाले होतेच. अजून दोन वर्षांनी युवाववि यंग संयोजक होणार हे नक्की. आणि मग धमाल.

मस्त लिहिलंय अतरंगी.

मला वाटलेच की गाणी ही केवळ आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणून लावली आहेत.

रीया म्हणाली तसं मागे मोक्षाचा मार्ग ते कर्माचा सिद्धांत व्हाया जीवात्म जगाचे कायदे एवढी वाईड रेंज चर्चा चालू होती. तू वेडाच झाला अस्तास मागे आला अस्तास तर.

पुण्याच्या बसमध्ये पुन्हा तुम्हाला घेतील असे वाटत नाही>>>>

मी कारने येणार आहे.

वेडाच झाला अस्तास मागे आला अस्तास तर.>>>

बरं झालं नाही आलो ते.

वृत्तांत मस्त ... ववि मध्ये भिजत असल्यासारखं वाटतंय...!

रुन्मेष काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा .

पण प्रत्यक्षात आम्ही दोघे मिळून एक पोर सांभाळत असतो >>>

तू कबूल करणार नाहीसच पण प्रत्यक्षात परी केवळ ऋनूलाच नव्हे तर तुलाही सांभाळून घेत होती.

मजा येतेय वाचायला.
हर्पेन, परी रून्मेशला सांभाळत होती यात आलं की सगळं Wink

धमाल आहेत सगळे वृत्तांत Lol
जुन्या vavichya आठवणी जाग्या झाल्या. Yo Rocks ला पण न्यायचेत na उचलून. त्याचे "मला जाऊ द्या ना घरी.." नृत्य अजून डोळ्यासमोर येते Lol

मस्तsssssssssss वृत्तांत. मी मिस केला वावि. पुढच्या वेळी नक्की येईन. अत्ता मी माझ्या घराच्या कामामध्ये बुडलेय. मला निदान टीशर्ट मिळाला असता तरी त्यातल्या त्यात समाधान मानलं असतं.पण तिथेही मी लेट

Pages