Submitted by ववि_संयोजक on 30 July, 2023 - 23:40
कालचा ववि धम्माल झाला. सगळी मरगळ दूर झाली असेलच. आम्हा संयोजकांना तर "याची साठी केला होता अट्टाहास" अशी भावना दाटून आली.
प्रचि गृप फोटो इथे दिलाच आहे. बाकी फोटोंची देवाणघेवाण वैयक्तीकच राहू द्यावी ही विनंती. काही आयडींनी गृप फोटो व्यतिरिक्त वैयक्तीक फोटो पब्लिक फोरमवर टाकू नये असा पर्याय निवडल्यामुळे त्याच्या मताचा आदर म्हणून ही विनंती आहे. बाकी बच्चे कंपनीचा (गृपमधे किंवा स्वतःच्या मुला/मुलीचा), स्वतःचा, निसर्गाचा, खादाडीचा, बॅनरचा असे फोटो यायला हरकत नाही.
चला तर मग, येऊद्या तुमचे अनुभव इथे.
शब्दखुणा:
Groups audience:
- Private group -
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आणि त्यातल्या त्यात
मायबोली आणि त्यातल्या त्यात वर्षाविहार याच माझ्या मनात एक वेगळंच स्थान आहे. २०१२ पासून एकही वर्षाविहार मी चुकवला नव्हता . त्यामुळे २०२३ च्या वर्षाविहाराची घोषणा झाली आणि त्यात कविता संयोजक आहे पाहिलं, तेव्हा मी तिला लगेच फोन केला आणि तारीख कधी आहे विचारलं.
तिने ज्यावेळी ३० जुलै सुद्धा शक्य आहे असे सांगितलं, त्यावेळी मला प्रचंड आनंद झाला .कारण इथे जर्मनीत कुठल्याही कारणासाठी एक दिवस ही शाळा चुकवून चालत नाही आणि २८ जुलै शाळेचा शेवटचा दिवस होता . त्यामुळे आम्ही २९ जुलै चे तिकीट बुक केली. नशिबाने ३० जुलैचाच दिवस वविचा ठरला
२९ जुलै रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान आम्ही मुंबईत आलो. आणि मुंबई पुण्याच्या रस्त्याचे ट्राफिक चुकवत साधारण सकाळी चार वाजता पिंपळे सौदागरला पोहोचलो .साडेसहाला परत निघायचं असल्यामुळे झोपण्यात काही अर्थच नव्हता . त्यामुळे तो वेळ गप्पा मारतच घालवला . घरातून निघालो आणि नाशिक फाट्याला पोचलो तर बस वेळेवर तयार होतीच . मल्ली सोडला तर सगळे पुणेकर आमच्या आधीच आत होते. त्याला घेऊन आम्ही निघालो .
थोड्याच वेळात सगळे स्थिरस्थावर झाल्यावर अंताक्षरी सुरू झाली . आपल्याबरोबर आपल्याच 'लेवलचं' गाणारं (खर तर त्याला गाणं म्हणणं कठीण आहे) कोणी असेल तर खेळायला काय मजा येते , हे प्रत्यक्ष अनुभवावच लागेल. असंच दोन तास मस्त टाईमपास करत आम्ही रिसॉर्टवर कधी पोहोचलो हे कळलच नाही.
मुंबईकर अजून यायचे होते तेवढ्यात आम्ही मस्त नाश्ता करून घेतला (आवर्जून सांगायची बाब म्हणजे नाश्ता जेवण हाय टी सगळेच अगदी उत्तम होतं).आमचा नाश्ता संपेपर्यंत मुंबईकर पोचलेच. मग त्यांना सगळ्यांना भेटायचा कार्यक्रम झाला . मुग्धा, विनय , आनंद, निल इत्यादी सगळ्यांना सहा वर्षानंतर भेटत असून सुद्धा अगदी कालच भेटलो होतो असं वाटत होतं .
मग आम्ही पाण्यात उतरलो .पाणी हा ओवीचा अगदी आवडता विषय. तिच्या पहिल्या वविला जेव्हा अगदी धड चालता येत नव्हतं, तेव्हा सुद्धा ती पाण्यात मस्त एन्जॉय करत होती . आता तर काय ? पुढचे तीन तास पोहणे काय, पाण्यात बॉल खेळणे काय , सगळं अगदी मस्त चालू होतं .
मी सुमारे तासभर पाण्यात थ्रो बॉल साठी दोन टीम तयार करायची प्रयत्न करत होतो .शेवटी अथक प्रयत्नानंतर मुंबई वि. पुणे असा सामना सुरू करता आला . पुणेकर संख्येने जास्ती असले तरी प्रत्येक गेम मध्ये आमचा धुव्वा उडाला.त्यानंतर सुरू झाली रेन डान्सची धमाल . स्पेशली विनय आणि आनंद यांचा 'मार डाला' तर कहरच होता !! चेंज करून दमले भागलेले माबोकर जेवायला आले. तेवढ्या वेळात आम्ही चॉकलेटचे वाटप करून टाकले. परत एकदा जेवण अतिशय सुंदरच होते.
आणि त्यानंतर दिवसातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात एन्जॉयबल 'सांस्कृतिक कार्यक्रम' सुरू झाला .खखदेजा (खर खोट देव जाणे )आणि भोआकफ (भोगा आपल्या कर्माची फळं) अशा दोन टीम तयार झाल्या. कविताने याच्यावर घेतलेली मेहनत दिसून येत होती . पण त्याचवेळी १० मायबोलीवरचे शब्द आणि त्यांचे लाँगफॉर्म लिहिल्यावर फक्त १ गुण देऊन 'कर्म किये जा , फल की इच्छा ना कर ' असा मेसेजही तिने दिला. म्हणींचा Dumb Charades ही अगदी सुरेखच होता. आमची टीम जरा जास्तीच स्ट्राँग होती. अगदी शर्थीचे प्रयत्न करूनही समोरची टीम आमच्या जवळपासही पोचू शकली नाही !!
त्यानंतर सगळ्यात शेवटी ओळख परेड (तशी थोडी लवकरच) झाली आणि मग जड अंत:करणाने आम्ही परत यायला निघालो.दिवसभराच्या दगदगीने दमलेली बच्चे कंपनी लगेच झोपली आणि मोठ्या मंडळींची माबोच्या भूतकाळ अन भविष्याबद्द्ल गहन चर्चा सुरू झाली .साधारण साडेआठ वाजता आम्ही आमच्या स्टॉप वर उतरलो आणि पुढच्या वविला सगळ्यांना परत भेटायच ठरवून इचलकरंजीच्या प्रवासाची तयारी करू लागलो !
त. टी. : आमच्या सर्वांतर्फे वविला अगदी १०० पैकी १०० गुण . सांस्कृतिक कार्यक्रम, वेळेचं नियोजन, स्वच्छता , खाणे , पिणे सर्व अगदी परफेक्ट होत . त्याबद्दल कविन , विनय , नील , आनंद , योकु , मुग्धा , अतरंगी यांसह सर्व संयोजन समितीचे अगदी मनापासून आभार !!
केदार जाधव
केदार जाधव
त. टी. +७८६
आणि तुझे थेट जर्मनीहून वविला येणे ग्रेट होते. आणि ते येणे तुला सार्थक झाले वाटत असेल तर यापेक्षा मोठी जाहिरात ती काय वविची
थेट जर्मनीहून येऊन वविला
थेट जर्मनीहून येऊन वविला म्हणजे भारीच! मस्त!
ज्यांना जायला जमलं नाही ते
ज्यांना जायला जमलं नाही ते मनोमन खुश आहेत. पुढच्या वेळी येऊ बोलताहेत पण मनात काय जायची ईच्छा नाही.
आता गप्पाष्टकासाठी म्हणून
आता गप्पाष्टकासाठी म्हणून भेटू >>>> नक्की...
आपल्या गप्पा होऊ शकल्या नाही त्यात तुझी काहीच चूक नव्हती. कान सोडले तरी चालतील.
वृत्तांत आवडल्याचे कळवलेल्या सगळ्यांना धन्यवाद.
लिहायचे राहूनच गेले ते म्हणजे केदारनी आणलेली चॉकलेटस खूपच छान होती. परीने मला बसल्या जागेवर आणून दिली ती ही दोन दोन. थँक्यु केदार
भज्यांचे वास येऊ लागले तेव्हा
भज्यांचे वास येऊ लागले तेव्हा रिसॉर्ट १५ च मिनिटांवर आहे >> इतक्या लांब वास आला ?
>>> कदाचित कोणीतरी बस मध्ये बेसन खाऊन पादला असेल
केदार- फोटो सुरेख... मला ओवी
केदार- फोटो सुरेख... मला ओवी नाव फार आवडले.. इट्स युनिक... मस्त मस्त मस्त...
कोतबो मोड ऑफ झाल्या झाल्या
कोतबो मोड ऑफ झाल्या झाल्या आली गाडी मूळ पदाला ( प ला काना नाहीये हे लक्षात घ्या. कृ. ध. )
वा! केदार सकुसप थेट जर्मनी
वा! केदार सकुसप थेट जर्मनी टू कर्जत व्हाया मुंबई-पुणे म्हणजे हद्द झाली. मस्त वृत्तांत. दोन्ही फोटो मस्त आणि असे फोटो टाकण्याची आयडियाही मस्त.
सगळ्यांचे वृत्तांत वाचायला मजा येते आहे.
लिहायचे राहूनच गेले ते म्हणजे
लिहायचे राहूनच गेले ते म्हणजे केदारनी आणलेली चॉकलेटस खूपच छान होती. परीने मला बसल्या जागेवर आणून दिली ती ही दोन दोन. थँक्यु केदार
>>>
मला खरंच ही चॉकलेट मिळाली नाहीत. डोळ्यांना दिसली सुद्धा नाहीत आणि आणली होती हे सुद्धा माहीत नव्हतं.
केदार सकुसप थेट जर्मनी टू
केदार सकुसप थेट जर्मनी टू कर्जत व्हाया मुंबई-पुणे
>>
लगेच त्याच रात्री इचलकरंजी सुद्धा. खूप कौतुक आहे तुझं. अर्धी पुणेकर मंडळी दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊन घरी बसलेली नुसतं पुणे to कर्जत करून.
परीने मला बसल्या जागेवर आणून
परीने मला बसल्या जागेवर आणून दिली ती ही दोन दोन..
>>>>
संस्कार !

आणि हो, चोकलेट छान होते. मलाही आवडले.
धन्यवाद ऋन्मेऽऽष , वावे ,
धन्यवाद ऋन्मेऽऽष , वावे , हर्पेन , च्रप्स, मामी
छान चालू आहेत पोस्टी...
छान चालू आहेत पोस्टी...
केदार, जर्मनीतून आल्या आल्या लगेच ववि _/\_
लगेच त्याच रात्री इचलकरंजी
लगेच त्याच रात्री इचलकरंजी सुद्धा. खूप कौतुक आहे तुझं. अर्धी पुणेकर मंडळी दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊन घरी बसलेली नुसतं पुणे to कर्जत करून.
>> धन्यवाद रीया
केदार, जर्मनीतून आल्या आल्या
केदार, जर्मनीतून आल्या आल्या लगेच ववि _/\_ >>
धन्यवाद ललिता-प्रीति ,
आता अगदी काही लोकांना बालिश वाटेल , पण जेव्हा माझ्या पहिल्या १ / २ वविला तुम्ही (किंवा इतर कुणीतरी असेल , पण माझ्या डोक्यात हेच नाव बसले_/\_ ) अमेरिकेहून आलं होतं. (रोप वरून चालणे इत्यादी अॅक्टीव्हिटी असलेला ववि) त्यावेळी ते इतकं भारी वाटल होतं.
ते दिवस पर्सनली आणि प्रोफेशनलीही फारसे चांगले नव्हते , पण त्याना पाहून एक अनामिक प्रेरणा मिळाली होती हे मात्र नक्की
मेधा आय.डी. होता
मेधा आय.डी. होता
wow !! भारीच मज्जा केलीय (हे
wow !! भारीच मज्जा केलीय (हे वाक्य मला खोडायचे नाहीये )
.. प्रत्यक्ष न भेटता ही फोटो बघून काहींना ओळखले. खाण्याचे फोटो नाही का काढले? इकडे नुसती नावे वाचूनच आमच्या तों पा सु!!
अतरंगी, ऋन्मेष, पियू, हर्पेन, केदार तुम्हा सगळ्यांचे सविस्तर व वि वृ वाचून केलेली धमाल डोळ्यासमोर दिसतेय
केदार जाधव थेट जर्मनीतून तिकडे व वि साठी हजर म्हणजे कमालच आहे ! ते पण सकुसप!!
मला कधीही यायला मिळणार नाहीय हे माहित आहे त्यामुळे इथल्या व वि वृत्तांतावरच मी खूष व समाधानी आहे
मला खरंच ही चॉकलेट मिळाली
मला खरंच ही चॉकलेट मिळाली नाहीत. डोळ्यांना दिसली सुद्धा नाहीत आणि आणली होती हे सुद्धा माहीत नव्हतं.
>> तू, मी, ऋन्मेष आपण छोट्यांसोबत पूल मध्येच खिंड लढवत होतो तेव्हा मिस्लं.
केदार आमाला पण पाहिजेत चॉकलेट.. भॉऑऑऑऑ
मेधा आय.डी. होता>> मला
मेधा आय.डी. होता>> मला आठवतात त्याम्च्या पोस्टी ववीला गेल्याच्या अमेरिकेची फ्लाइट उतरून लगेच. कौतूकास्पद व स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व.
तू, मी, ऋन्मेष आपण
तू, मी, ऋन्मेष आपण छोट्यांसोबत पूल मध्येच खिंड लढवत होतो तेव्हा मिस्लं
>>>>>
मी खाल्ले ग.. आपण पूल मधून एकत्र बाहेर आलो पण तुम्ही दोघी जेवायला उशिरा आलात
मेधा आय.डी. होता >> धन्यवाद
मेधा आय.डी. होता >> धन्यवाद योकु
केदार आमाला पण पाहिजेत चॉकलेट
केदार आमाला पण पाहिजेत चॉकलेट.. भॉऑऑऑऑ >> पुढच्या वविला तुला (अन राहिलेल्याना) डबल
रोप वरून चालणे इत्यादी अ
रोप वरून चालणे इत्यादी अॅक्टीव्हिटी असलेला ववि
>>> रोपवरून चालणार्यांच्यात मी सुद्धा होतेच, पण अमेरिकेहून येऊन लगेच वविला आलेली मेधा.
त्या वविला तू होतास हे मी सपशेल विसरले... सॉरी, हां!
हर्पेन, पियू, केदार -
हर्पेन, पियू, केदार - खुमासदार वविवृत्तांतासाठी हार्दिक आभार. केदार जुनेनवे छायाचित्र फारच छान. जर्मन भाषा शिक्षक प्रत्यक्ष भेटायचे आहेच तुम्हाला.
रोपवरून चालणार्यांच्यात मी
रोपवरून चालणार्यांच्यात मी सुद्धा होतेच, पण अमेरिकेहून येऊन लगेच वविला आलेली मेधा. >> ओह
त्या वविला तू होतास हे मी सपशेल विसरले... सॉरी, हां! >> माझ्याकडून पण नावांची गल्लत झाली, पण तुला भेटलेल आठवत होत
जर्मन भाषा शिक्षक प्रत्यक्ष
जर्मन भाषा शिक्षक प्रत्यक्ष भेटायचे आहेच तुम्हाला. >> धन्यवाद किशोर , नक्की भेटू
नमस्कार वविकर्स! तुम्हा
नमस्कार वविकर्स! तुम्हा सगळ्यांच्या उपस्थिती आणि सहभागामुळे ववि मस्त झाला!
पुढील वर्षी पुनः भेट होईलच तोवर ही शिदोरी पुरेल!
वर्षाविहार २०२३ तपशील पुढीलप्रमाणे -
एकूण जमा = ६६६००/-
एकूण खर्च = ६६०८०/-
रिसॉर्ट = ४२९००/-
बस खर्च (मुंबई + पुणे) = २१३००/-
सांस्कृतिक समिती, पाणी वगैरे = १८८०/-
शिल्लक रक्कम = ५२०/-
शिल्लक रक्कम टीशर्ट देणगी रकमेत जोडून देणगी देण्यात येईल.
देणगीचे तपशील या धाग्यावर दिले जातील.
हर्पेन, पियू, केदार, ऋन्मेऽऽष
हर्पेन, पियू, केदार, ऋन्मेऽऽष
सगळ्यांनी वृत्तांत खूप खूप छान लिहिलेत.
कामामुळे उशीर झालाय पण मी आज रात्री लिहू शकेन.
हपा का गेला नाहीत ?
हपा का गेला नाहीत ?
कि दुसर्या आयडीने जाऊन आलात ?
Pages