कुठले पॉडकास्टस ऐकता?

Submitted by स्वप्ना_राज on 2 November, 2018 - 12:30

गेल्या अनेक महिन्यांपासून मी सगळ्या एफएम चॅनेल्सना रामराम ठोकलाय. बीबीसी वरून डाऊनलोड केलेले बरेचसे पॉडकास्टस ऐकतेय. सहज वाटलं की इतर मायबोलीकर काय ऐकतात ते विचारावं. तुम्ही ऐकत असलेल्या पॉडकास्टस बद्दल लिहाल का?

माझी बीबीसी पॉडकास्टसची लिस्ट पुढीलप्रमाणे:

१. हिस्टरी अवर: https://www.bbc.co.uk/programmes/p016tmg1/episodes/downloads - जगातल्या सद्य आणि भूतकालीन घटनांवर आधारित. प्रत्येक एपिसोड जवळजवळ ४५-५० मिनिटांचा. त्यात ४-५ विषय असतात.

२. विटनेस: हttps://www.bbc.co.uk/programmes/p004t1hd/episodes/downloads - हिस्टरी अवर मधलेच भाग सुटे करून. प्रत्येक भाग ९ मिनिटांचा. विटनेस ऐकायला लागल्यापासून मी हिस्टरी अवर ऐकायचं सोडलंय. त्यात कदाचित अधिक माहितीही असू शकते.

३. डेथ इन आईस व्हॅली: https://www.bbc.co.uk/programmes/p060ms2h नोव्हेंबर १९७० मध्ये नॉर्वेच्या एका व्हॅलीत एका स्त्रीचं मृत शरीर सापडलं. ह्या गुन्ह्याच्या उकलीची माहिती देणारा पॉडकास्ट. एकूण १० एपिसोड्स.

४. अ‍ॅसासिनेशन: https://www.bbc.co.uk/programmes/p05r6cgx/episodes/downloads पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तों ह्यांच्या हत्येबाबत तपासाची माहिती देणारा पॉडकास्ट. एकूण एपिसोड्स १०.

५. क्केकः https://www.bbc.co.uk/programmes/p052lph7/episodes/downloads कल्पित कथा. भूकंपात अडकलेल्या विविध लोकांच्या दृष्टीकोनातून कथन केलेली. एकूण एपिसोडस १२

६. हू किल्ड एल्सी फ्रॉस्ट: https://www.bbc.co.uk/programmes/p02vn2mt/episodes/downloads ऑक्टोबर १९६५ मध्ये यूकेमध्ये हत्या झालेल्या एल्सीच्या मारेकर्‍याचा शोध घेणारा पॉडकास्ट. एकूण एपिसोडस १०

७. बॉडी ऑन द मूर: https://www.bbc.co.uk/programmes/p03wy14r/episodes/downloads यूकेमधल्या एका moor वर सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवणं आणि मृत्यूचं कारण शोधणं ह्या हेतूने केलेल्या तपासाची कहाणी. एकूण एपिसोडस ७

८. अवर मॅन इन द मिडल इस्टः https://www.bbc.co.uk/programmes/b08rmkcd/episodes/guide मध्यपूर्वेच्या इतिहासातल्या अनेक घटनांचा वेध तसंच सद्यस्थितीचा आढावा.

९. जर्मनी मेमरीज ऑफ अ नेशनः https://www.bbc.co.uk/programmes/b04dwbwz/episodes/downloads

ह्याखेरीज https://www.bbc.co.uk/programmes/p02nq0lx/episodes/downloads इथेही खूप छान माहिती मिळते.

हॉरर स्टोरीज आवडणार्यांना https://www.thenosleeppodcast.com/ सुध्दा आवडेल.

https://serialpodcast.org/season-one - हाही खूप इंटरेस्टींग होता. सीझन २ चा विषय आवडला नाही म्हणून स्किप केला. सीझन ३ https://serialpodcast.org/ इंटरेस्टींग वाटतोय. डाऊनलोड करून बघेन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग!

कानांत बोंडुक खुपसून मी ५ मिनिटांच्या वर काहीही ऐकू शकत नाही. त्यामुळे अजून या प्रकाराच्या वाट्यालाही गेलेले नाही.
मात्र इथे वाचायला येईन.

ललिता-प्रीति, इतिहासाची आवड असल्यास बीबीसीचा विटनेस पॉडकास्ट ट्राय करू शकता. ९ मिनिटाच्या वर नसतो.

अरे सही धागा. असाच धागा काढायचा विचार होता.
१. हिडन ब्रेन, बाय शंकर वेदांतम. एनपीआर. . हा रविवारी एन.पी.आर वर असतो. फार रोचक आणि विचार करायला लावणारी माहिती फारच आकर्शकपणे प्रेझेंट केलेली असते.

२. अ‍ॅज इट हॅपन्स - सी.बी.सी. - हा रोज साधारण तासाचा असतो. वर्तमान काळातील घडणार्‍या घटनांवर प्रत्यक्ष मुलाखतींनी टाकलेला प्रकाश. सध्या केरल ऑफ आणि जेफ डगलस सादर करतात. गेली ४० वर्षे चालू आहे हा शो. माय फेवरेट.

३. द करंट - सी. बी.सी - सद्य घटनांवर इनवेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग करणारा शो. हा ही रोज मला वाटतं अर्धा तास आणि दोन स्टोरी कवर करतो. बाय अ‍ॅन-मरिआ ट्रमाँटी.

४. महाभारता पॉडकास्ट: लॉरन्स मेंझो महाभारताची गोष्ट अमेरिकन माणसाने १०० भागात सांगितली आहे. मला साधारण गोष्ट माहित होती, पण बारिक बारिक संदर्भ आणि बिगर पिक्चर मध्ये ते ही कोरी पाटी असलेल्या व्यक्ती कडून पाश्चिमात्य परिप्रेक्षातुन ऐकणे फार म्हणजे फार आवडलं.

५. फ्रेश एअर - एनपीआर - टेरी ग्रोस वेगवेगळ्या विषयांवरच्या घेतलेल्या मुलाखती. फार मजा येते ह्या मुलाखती ऐकताना.

या वरील सगळ्या पॉडकास्ट मध्ये सादर करणार्‍यांची एम्पथी, वॉर्म्थ, जेन्युईन क्युरिऑसिटी आणि बुद्धीमत्ता मला स्वतःला थक्क करुन सोडते.
आणखी आठवेल तसे लिहितो.

अर्रे मीही महाभारताचाच लिहाय्ला आले! Happy
टेड रेडिओही ऐकते.

आता वर आलेलेही शोधून पाहीन. धन्यवाद या धाग्याबद्दल. Happy

नाही मेंबरशिप नसते. रेडिओ वरचे, किंवा इतरही अनेक ऑडिओ शो असतात. अ‍ॅपल, अ‍ॅन्डॉईड, स्मार्ट स्पिकर सगळ्याची पॉडकास्ट साठीची अ‍ॅप्स आहेत त्यावर सबस्क्राईब केलं की नवे एपिसोड आलेले नोटिफाय होतात. मी पॉडकास्ट अ‍ॅडिक्ट वापरतो पण बरीच अ‍ॅप्स आहेत.

ललिता, ओव्हर द इअर, नॉइझ कॅंसलिंग हेडफोन्स किंवा गाडी चालवताना चक्क सेल फोनवर हेडफोन शिवाय असा प्रयत्न करुन पहा . मला स्वतःला इअर बड प्रकार आवडत नाही. पण ओव्हर द इयर , ब्लू टुथ हेडफोन्स एकदम बेस्ट.
हे हेडफोन्स मस्त आहेत https://www.amazon.com/Sennheiser-HD-4-40-Headphones-BT/dp/B01MSZSJE9/re...

मी ऐकलेले काही पॉड कास्ट

https://www.manager-tools.com/ - हे कामाकरता बरेच उपयोगी आहेत. डिस्क प्रोफाईल वगैरे छान माहिती आहे

https://saltandspine.com/ - नव्या कूकबूक ऑथर्सचे इंटरव्ह्यू आहेत
स्वातीने सांगितलेला महाभारत पॉडकास्ट - http://mahabharatapodcast.com/
कम्युनिकेशन , रीलेशनशिप, इत्यादीबद्दल https://theartofcharm.com/podcast/
एन पी आर https://www.npr.org/podcasts/
https://www.poetryfoundation.org/podcasts

https://www.newyorker.com/podcast/poetry
https://www.poetryfoundation.org/podcasts - इथे विलियम्स कार्लोस विलियम्स यांनी स्वतःच्या कविता वाचल्याचं रेकॉर्डिंग सापडलं

डिअर एच बी आर - इथे पण काही काही एन्गेजिंग कास्ट्स आहेत.

मुळात पॉड-कास्ट्स म्हणजे काय हे धाग्याच्या हेडरमधे दिलं तर बर्‍याच लोकांना कळेल...
मी एनपीआर आणि टेड अधूनमधून आईकतो बाकी वर दिलेले अ‍ॅडतो आता. आयफोनातल्या अ‍ॅप मध्ये सर्च दिला की आईकता येतं, सबस्क्राईबही करता येत.

@अमितव, सीबीएस पॉडकास्ट बद्दल धन्यवाद. सध्या कॅनडात आहे आणि त्यामुळे अजून मजा येइल ऐकायला.

मराठी पॉडकास्टबद्दल विचारले कारण माझ्या वडलांना आता वाचणे हळूहळू अवघड होत चालले आहे. इ-बूक वर फाँट मोठा करून वाचणे हा पर्याय आहे. त्याबरोबरीने मराठी पॉडकास्ट त्यांना मिळाले तर थोडी वाचनाची भूक भागू शकेल. ते इंग्रजी वाचतात पण इंग्रजी विशेषतः अभारतीय/अमेरिकन अ‍ॅक्सेंटमधले इंग्रजी ऐकणे जमत नाही.

खूप छान धागा..
न्यूजलॉड्रीचे विकली पॉडकास्ट ऐकतो, आठवडाभरातल्या महत्वाच्या बातम्यांवर चर्चा करतात, एखादया बातमीची सखोल माहिती पटकन मिळते.
मराठीत न्यूज, चित्रपट, पुस्तकं यावर पॉडकास्ट यायला हवेत.

कॅनडात असताना सी बी सी वर 'क्यू' पण ऐकायचो. आर्ट/ म्युझिक/ टीव्ही/ थिएटर आधारित मुलाखत टाईप असतो शो. पॉडकास्टही होतो, मी पॉडकास्ट नाही ऐकलेली.

अनिगेरा दिदून नावाचा एक अमेझिंग जपानी पॉडकास्ट आहे ज्याविषयी माझे नम्र मत असे आहे - यासारखा पॉडकास्ट गेल्या दहा हज्जार वर्षात झाला नाही आणि पुढच्या दहा हज्जार वर्षात होणार नाही.

अनिगेरा ऐकण्याविषयी थोडक्यात इथे वाचता येईल

सुगिता तोमोकाझू नावाचा एक जपानी व्हॉईस अ‍ॅक्टर आहे आणि हा त्याचा स्वतःचा पॉडकास्ट आहे. सुगिता नैसर्गिक हजरजबाबी आणि सुपीक डोक्याचा मनुष्य आहे. मुख्यत्वे या पॉडकास्टवर तो इतर लोकांना बोलावून गप्पा मारतो आणि कधीकधी व्हिडिओ गेम्स खेळतो. या शोमध्ये त्याने क्रॅक केलेले जोक्स फिरवून/रिसायकल करून शेकडो स्टँड अप्स, स्केचेस आणि पॉडकास्टमध्ये वापरलेले मी पाहिले/ऐकले आहेत. ज्यांना जपानी येतं त्यांच्यासाठी काही प्रश्न उद्भवत नाही. ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी रेडिटवर ठराविक कालावधीने याच्या सबटाइटल्स वाल्या आवृत्त्या येतात. सबटाइटल्स सोबत बघणं पॉडकास्टचा अनुभव देत नाही हे मान्य! पण इट इज टू गुड टू इग्नोर!

धन्यवाद या धाग्याबद्दल स्वप्ना. बर्‍याच दिवसांपासून असे काहीतरी हवे होते.

ही मी अनेकदा ऐकलेली. आता बर्‍याच दिवसांत ऐकली नाहीत पण तसे ऑन ऑफ सुरूच असते
राजकीय्/कॉमेडी
- Real Time with Bill Maher - हो शो एचबीओ वर शुक्रवारी असतो. मग त्याचे पॉडकास्ट रिलीज होते. मधे जरा याचा "फटीग" आल्याने सोडले होते पण सहसा मस्त असते.
- The Bugle - अ‍ॅण्डी झाल्ट्झमन आणि जॉन ऑलिव्हर हे पूर्वी सादर करत. आजकाल जॉन ऑलिव्हर नसतो. पण पूर्वी या जोडीने सादर केलेली पॉडकास्ट प्रचंड धमाल आहेत - सहसा देशोदेशीच्या घटनांवर कॉमेण्टरी असते. यातला अ‍ॅण्डी हा क्रिकेट फॅनही असल्याने त्याच्या बोलण्यात क्रिकेटचे खूप संदर्भ येतात. हाच क्रिकइन्फो वरही अधूनमधून मजेदार लिहीतो.
- एनपीआर चे Wait Wait Don't Tell Me हे ही मस्त असते

इतर
- Motley Fool कंपनीची २-३ वेगवेगळी पॉडकास्ट आहेत. खूप फायनान्शियल माहितीपेक्षा जनरल माहितीवर भर असतो म्हणून ऐकायला आवडतात. मी त्यातली विशेषत: इण्डस्ट्री फोकस, मार्केट फूलरी, आणि मनी ही तीन ऐकतो.
- This Week in Tech - हे ही खूप इण्टरेस्टिंग आहे ऐकायला. मात्र एकेक जवळजवळ तासाचे असते.

बाकी सेल्फ-हेल्प, इन्स्पिरेशनल वगैरे अधूनमधून हुक्की आल्यावर ऐकतो आणि विसरून जातो.

@स्वाती_आंबोळे
धन्यवाद.. सिनेगप्पाचा एक एपिसोड ऐकून झाला, छान माहिती मिळाली

अरे वा! खूप छान प्रतिसाद आलेत की. मायबोलीवरचा स्वानुभव आणि अनेक धाग्यांवरची मारामारी बघून असं वाटत होतं की एक तर इथे कोणी प्रतिसाद देणार नाही. प्रतिसाद आले तर विषयाला सोडून असतील. किंवा इथेही भांडण उकरून काढलं जाईल Sad पण असं काही झालेलं नाही.....निदान सध्या तरी....हे पाहून आनंद झालाय. टच वूड. Happy

नव्या पॉडकास्टसच्या लिंक्स दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. मी बीबीसीची फॅन झाले असले तरी फक्त इतिहासाशी निगडित पॉडकास्टसच ऐकायचे नव्हते. खूप वेगवेगळ्या विषयांवरच्या लिंक्स मिळाल्या. मराठी पॉडकास्टबद्दल प्रथमच ऐकलं. आपल्या संतवाडःमयावर (हा शब्द इथे कसा लिहायचा कळलं नाही!) आधारित काही पॉडकास्टस आहेत का? किंवा जुन्या मराठी लेखकांची पुस्तकं? हिंदी लेखकांचीही चालतील कारण आठवीनंतर हिंदीशी संबंध आला नाही. त्यातलं काहीएक साहित्य वाचलेलं नाहिये. Sad

आयटीमधल्या लोकांनी मशिन लर्निंग, आर्टिफिशल इन्टेलिजन्स, ब्लॉकचेन ह्या विषयांवरचे प्राथमिक माहिती देणारे काही पॉडकास्ट्स असतील तर प्लीज सांगा. मी मध्यंतरी एक लिस्ट बनवली होती पण एकही ट्राय नाही केला.

अमितव, आणखी पॉडकास्टस आठवले तर नक्की इथे लिंक द्या.

मेधा, तू दिलेल्या लिंकवरचे हेडफोन्स तर मी १ मिनिटही कानावर ठेवू शकत नाही. Sad

मराठी पॉडकास्ट्सबद्दल कुणीतरी विचारलं आहे, म्हणून -
मायबोलीकर चिमणच्या काही लेखांचं पॉडकास्टिंग झालं होतं अशी ७-८ वर्षांपूर्वी चर्चा झाल्याची आठवते. मला वाटतं, चिमणनं त्याबद्दल एक लहानसा लेखही टाकला होता.
तो वाचून मी त्याला पॉडकास्ट म्हणजे काय असं विपूत विचारलं होतं; त्यावर त्यानं त्या पॉडकास्टची लिंकही पेस्ट केली होती. त्या लिंकवर इतरही काही मराठी पॉडकास्ट्स पाहिल्याचं अंधूक आठवतं. ऐकलं एकही नाही.
तेव्हाच्या सर्वांच्या विपू नंतर नष्ट झाल्या. त्यात ती लिंकही गेली.

१)The Great leap years मधले एक घेतलय.
When we were young.
२) पाचसहा अॅप्स घेतली.
Podcasted विंडोज १० uwp ( developer : JimmyRespwan) - sd card file download देतय.

मी पॉडकास्टस साठी पॉकेट कास्ट्स वापरतो . बेस्ट अँप . पेड आहे , पण प्रीमियम क्वालीटी , खालील सर्व पॉडकास्टस तिथे आहेत. लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=au.com.shiftyjelly.pocketc...

१.http://ivmpodcasts.com/geek-fruit-episode-list/
सिनेमा , सिनेमा आणि सिनेमा !

२.https://www.newslaundry.com/category/podcast
बातम्या आणि विश्लेषण

३.http://www.seenunseen.in/

इकॉनॉमिक्स आणि सोशल issues

४.http://radio.economist.com/

५.https://soundcloud.com/nosuchthingasafish
माहिती नसलेल्या गोष्टी, trivia

६.http://podcasts.joerogan.net/
लांबच , लांब interview , नुकताच elon musk येऊन गेलाय

७.http://billburr.com/category/podcast/
जबर्दस्त विनोदी पोड्कास्त

८.http://www.hellointernet.fm/
CGP Grey; Brady Haran इनफ सेड !

९.https://samharris.org/podcast/

१०.https://audioboom.com/channel/maed-in-india
म्युझिक आणि interview

११.http://ivmpodcasts.com/the-pragati-podcast-episode-list/
इकॉनॉमिक्स आणि सोशल issues

१२.https://irlpodcast.org/
ऑनलाईन जग आणि आपण !

१३.https://themoth.org/podcast

१४. http://radioopensource.org/
विविध विषयावरील चर्चा

१५.http://ivmpodcasts.com/simblified/
फॅक्टस विथ ह्यूमर

१६.https://open.spotify.com/show/2UtdM2mvBQesTqGTyiKn8w
आमी शुमर चा विनोदी शो

१७.https://www.npr.org/podcasts/510053/on-point
विविध विषयावरील चर्चा,

१८.https://tim.blog/podcast/
मुलाखत

१९.https://talksat.withgoogle.com/
विविध विषयावरील चर्चा

२०.https://thebuglepodcast.com/
अँडी झाल्ट्झमन चा विनोदी शो

Search - marathi podcast -
storytel_dot_in वर मराठी पॅाडकास्ट सापडले॥ मेघना एरंडेची मुलाखत डाउनलोड केली.
अँन्ड्राइड अॅपसवर डाउनलोड फाइल अॅपमध्येच राहाते ना? एसडी कार्डवर मिळते?

मी सिन्टॅक्स आणि जावास्क्रीप्ट जॅबर हे दोन वेब डेवलपमेंटवरचे पॉडकास्ट ऐकते. इथल्या नोंदी करून ठेवल्य आहेत. एकएक ऐकून बघेन.

<< १. हिडन ब्रेन, बाय शंकर वेदांतम. एनपीआर. . हा रविवारी एन.पी.आर वर असतो. फार रोचक आणि विचार करायला लावणारी माहिती फारच आकर्शकपणे प्रेझेंट केलेली असते.
५. फ्रेश एअर - एनपीआर - टेरी ग्रोस वेगवेगळ्या विषयांवरच्या घेतलेल्या मुलाखती. फार मजा येते ह्या मुलाखती ऐकताना. >>

+१

Pages