मराठी : वाचन घडते कसे ?

Submitted by कुमार१ on 30 April, 2023 - 22:32

आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन अर्थात मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

यंदाच्या २७ फेब्रुवारी रोजी आपण इथे मराठी भाषा गौरव दिन धुमधडाक्यात साजरा केला. त्या दरम्यान मराठी भाषेच्या अनेक पैलूंना आपण स्पर्श केला. आज मराठी भाषा दिनानिमित्ताने नवा लेख लिहिण्याचा मानस नाही परंतु एक वेगळी कल्पना मनात आली.

मराठी भाषकांचे मराठी वाचन किती प्रमाणात आहे आणि ते कोणकोणत्या माध्यमांमधून केले जाते याचा कानोसा घेण्याचा एक प्रयत्न करावा म्हणतो. मराठी वाचन करण्याची जी विविध माध्यमे आहेत त्यांचे खालील प्रमुख गटांमध्ये वर्गीकरण करता येईल:

* दैनिके
*नियतकालिके
* मराठी संस्थळे
* पुस्तके

या माध्यमांच्या अनुषंगाने खाली एक प्रश्नावली तयार केलेली आहे. आपल्या सवडीनुसार आपल्याला योग्य वाटेल त्या प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांमधून द्यावीत ही विनंती. या प्रश्नांव्यतिरिक्तही आपणास काही अन्य टिप्पणी करायची असल्यास करू शकता. हा धागा जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ललित विभागात काढलेला आहे. कृपया सहकार्य करावे.

दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?

अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
२. त्यातील आवडणारी सदरे
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
४. नावडणारे विभाग / प्रकार
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?

पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?

* वाचनाच्या इतर प्रकारांसंबंधी काही लिहावयाचे असल्यास स्वागत.

वरील प्रश्नांच्या उत्तरांची सुरुवात माझ्यापासून करत नाही. माझी उत्तरे मी चर्चा समारोपाच्या शेवटी देईन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !
धन्यवाद !
*************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीकांत बोजेवार ( तंबी दुराई) ह्यांना साहित्य वलय पुरस्कार मिळाला..
त्यानिमित्ताने त्यांचे मनोगत,

Screenshot_20251010-210911.png

त्याचं सोमवारी(?) दीड दमडी नावाचं एक सदर येतं ( FB वर ते पोस्ट करतात) . चांगलं असतं
एक सदरांचा धागा आहे, शोधून त्यावर टाकते.

१५ ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन. ते गेल्यानंतर म्हणजे २०१५ सालापासून तो दिवस महाराष्ट्र शासनाने वाचन प्रेरणा दिन म्हणून घोषित केला. यासंबंधीचे कार्यक्रम शैक्षणिक संस्थांत होतात. मुलांसाठी पुस्तके प्रकाशित करणार्‍या एका संस्थेने वाचना प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मुलांसाठीची दोन पुस्तके फुकट देऊ केली होती. मुलांच्या समूहात त्या पुस्तकाचे प्रकट वाचन करून त्या कार्यक्रमाचा वृत्तान्त आणि फोटो त्यांना पाठवावे, अशी अपेक्षा होती. मी एका ऑर्फनेजमध्ये मराठी शिकवायला जात असे. तिथल्या एका वर्गातल्या मुलांना घेऊन मी एका पुस्तकाचे वाचन करवले होते. मुले मराठी लेखनवाचनात बरीच मागे होती, म्हणून इंग्रजी पुस्तक निवडले होते. त्या मुलांचे फोटो काही पाठवले नाहीत.

आज आमच्या मुंमग्रंसंच्या शाखेत कलामांच्या पुस्तकांचे प्रदर्शन आहे. एके वर्षी त्यांनीही पुस्तकांतील काही उतार्‍यांचे प्रकट वाचन करवले होते.

चांगलंच आहे की.
( याअगोदर डोंबिवलीची फ्रेंडस लायब्ररी करत होती हा उद्योग. अजूनही असेल.)

Pages