ड्रीम ईलेव्हन, माय ईलेव्हन, माय सर्कल वगैरे नावांनी जे बेटींग ॲप निघाले आहेत त्याला सरकार कशी परवानही देतेय कल्पना नाही. कदाचित महसूल जास्त मिळत असेल. पण आजूबाजूला दिसणारी तरुण पिढी अक्षरशा या नादाला लागलेली दिसत आहे.
वेळ जातोय. पैसा जातोय. युवा पिढीची क्रयशक्ती बरबाद होतेय. जुगाराने कसे लोकं बरबाद होतात, होऊ शकतात हे आपणा सर्वांना माहीत असेलच..
बर्रं दारूच्या थेट जाहिरातींवर बंदी आहे तसे याच्या जाहीरातींबाबत काही दिसत नाही. उलट क्रिकेटप्रेमींच्या आवडीचे खेळाडूही एकेका ॲपसोबत जोडले गेले आहेत. आणि लोकांना हा जुगार देखील एक खेळ असल्याचे भासवून खेळायला उद्युक्त करत आहेत.
क्रिकेट भारतीयांचा आवडता खेळ आहे. आपल्याला तो खेळायला आवडतो, बघायला आवडतो, त्यावर चर्चा करायलाही आवडते. आता कदाचित त्यावर जुगार खेळायला जास्त आवडू लागले आहे.
मी माझ्यापरीने माझ्या काही तरुण मित्रांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण आपल्याला क्रिकेटमधील बरेच कळते तर ते नॉलेज वापरून पैसे का कमावू नये असा काहींचा ॲटीट्यूड दिसला. तर काहींनी आनंदासाठी शे पाचशे रुपये गेले रोजचे तर त्यात काय एवढे असाही सूर लावला. जुगारची चटक लागलेल्यांना समजावणे अवघड असते.
सरकारच आता यावर निर्बंध आणू शकते. पण त्याआधीही आपण याचा निषेध करणे गरजेचे.
झाले एकदाचे बंद
झाले एकदाचे बंद
चांगली बातमी
चांगली बातमी
28 करोड़ यूजर... 9600Cr रेवेन्यू, Dream 11 का खेल खत्म, गेमिंग बिल के बाद शटडाउन की तैयारी! - Dream11 game end shutdown plan after Online Gaming Bill business revenue tutc - AajTak https://share.google/NKsPGG6aJee40UiaT
Online Gaming Bill 2025 रियल मनी पेमेंट पर आधारित फैंटेसी स्पोर्ट गेम्स, पोकर और रमी पर पूर्ण प्रतिबंध लगाता है. इसमें सिर्फ E-sports और सोशल गेमिंग की अनुमति शामिल हैं और तय किए गए नियमों का उल्लंघन करने पर तीन साल की जेल या 1 करोड़ रुपये जुर्माने का प्रावधान रखा गया है.
Pages