ड्रीम ईलेव्हन नावाचे जुगार - निषेध धागा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 April, 2023 - 01:34

ड्रीम ईलेव्हन, माय ईलेव्हन, माय सर्कल वगैरे नावांनी जे बेटींग ॲप निघाले आहेत त्याला सरकार कशी परवानही देतेय कल्पना नाही. कदाचित महसूल जास्त मिळत असेल. पण आजूबाजूला दिसणारी तरुण पिढी अक्षरशा या नादाला लागलेली दिसत आहे.

वेळ जातोय. पैसा जातोय. युवा पिढीची क्रयशक्ती बरबाद होतेय. जुगाराने कसे लोकं बरबाद होतात, होऊ शकतात हे आपणा सर्वांना माहीत असेलच..

बर्रं दारूच्या थेट जाहिरातींवर बंदी आहे तसे याच्या जाहीरातींबाबत काही दिसत नाही. उलट क्रिकेटप्रेमींच्या आवडीचे खेळाडूही एकेका ॲपसोबत जोडले गेले आहेत. आणि लोकांना हा जुगार देखील एक खेळ असल्याचे भासवून खेळायला उद्युक्त करत आहेत.

क्रिकेट भारतीयांचा आवडता खेळ आहे. आपल्याला तो खेळायला आवडतो, बघायला आवडतो, त्यावर चर्चा करायलाही आवडते. आता कदाचित त्यावर जुगार खेळायला जास्त आवडू लागले आहे.

मी माझ्यापरीने माझ्या काही तरुण मित्रांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण आपल्याला क्रिकेटमधील बरेच कळते तर ते नॉलेज वापरून पैसे का कमावू नये असा काहींचा ॲटीट्यूड दिसला. तर काहींनी आनंदासाठी शे पाचशे रुपये गेले रोजचे तर त्यात काय एवढे असाही सूर लावला. जुगारची चटक लागलेल्यांना समजावणे अवघड असते.

सरकारच आता यावर निर्बंध आणू शकते. पण त्याआधीही आपण याचा निषेध करणे गरजेचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज एक जण जिंकला त्याने हे ग्रूपवर टाकले.
आता सर्वांना हा जुगार पैसे छापायची मशीन वाटू लागेल.

IMG-20230428-WA0019.jpg

सर
तुम्ही ड्रीम ११ ची छुपी जाहिरात करत आहात.
तुमचे १९७ भक्त आता तुम्ही सर्टी्फाय केलेल्या ड्रीम ११ ची वाट पकडतील. वेळ गेली नसेल तर अजूनही तो प्रतिसाद काढून टाका.

केशवकूल
छे. ते नाही पकडत चुकीची वाट.
पण मी जाहीरात करतोय हे बघून ईथल्या हजारो लोकांना आता या खेळाचा तिरस्कार वाटू लागेल ना?

आणि तुम्ही नक्की कुठल्या बाजूने आहात हे ठरवा. ड्रीम ईलेव्हन लोकांनी खेळू नये असे तुम्हाला का वाटते? जुगाराचे दुष्परीणाम कालपर्यंत तुम्हाला मान्य नव्हते ना?

सर
आम्हा भक्तांना स्वतःची बाजू नसते.
तुमची बाजू ती आमची बाजू.

इतके खुळे नसतात लोक!!
>>>

प्रत्येक व्यसनी माणसाला ते व्यसन जडायच्या आधी असाच फाजील आत्मविश्वास असतो.. मी फार पित नाही, मी काही अट्टल बेवडा नाही, आपले लिमिटमध्ये असते, आपण रोज पितो पण पचते आपल्याला वगैरे वगैरे..

लोकांना वेगवेगळ्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी ऋन्मेषजी घेत असलेली मेहनत, त्यांची तळमळ यांचा आदर केलाच पाहीजे.
त्यांनी या ध्येयासाठी धागे न काढता रचनात्मक असे कार्य उभारले तर त्यांच्या मनाला सुद्धा आनंदच होईल.
पुण्यात अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस ही संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक अनिल अवचट होते हे ठाऊकच असेल. संस्था पुल देशपांडे यांच्या प्रेरणेने आणि योगदानाने सुरू झालेली आहे.

त्यांच्याशी संपर्क साधून मुंबईत व्यसनमुक्ती केंद्र सुरू केल्यास प्रचंड प्रतिसाद लाभेल तसेच हजारो जणांना व्यसनमुक्त होण्यासाठी मदत होईल. सरांना स्वयंसेवक सुद्धा बनवता येतील. मुंबईतल्या प्रत्येक घरात काम पोहोचले तर मायबोलीकरांना निश्चितच अभिमान वाटेल. डॉ. मुक्ता सुद्धा ही तळमळ ध्यानात घेऊन निश्चितच मदत करतील. गुगलवर सर्च दिल्यास सगळी माहिती सहज मिळू शकेल. त्यासाठी वेगळ्या धाग्याची आवश्यकता पडणार नाही असे वाटते.

या केंद्रातून किती जण व्यसनमुक्त झाले त्यांचे अनुभव, फोटो याचे धागे मायबोलीवर सहजच काढता येतील. अर्थात त्या सर्व नव व्यसनमुक्तांना मायबोलीवर धागे काढण्याचे व्यसन लागू नये हीच वेताळचरणी प्रार्थना !

एक बातमी वाचनात आली
------
आम्ही भारतरत्न सचिन तेंडुलकरला पेटीएम फर्स्टच्या जुगाराच्या जाहिराती बंद करण्याची वारंवार विनंती केली, पण त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. आम्ही तेंडुलकरच्या विरोधात नाही पण भारतरत्न सन्मानित व्यक्तीला हे अशोभनीय आहे. सचिनने एकतर जाहिरात थांबवावी किंवा भारतरत्न परत करावा.
-------

सगळेच सेलिब्रिटी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्वे हल्ली ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती करताना दिसतात हे बघून असेच वाटते हे काय चालवले आहे सगळ्यांनी.. कोणालाच असे वाटत नाही का की हे चूक आहे.. का या पापात सहभागी होतात हे लोक?

पुण्यात अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस ही संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक अनिल अवचट होते हे ठाऊकच असेल.
>>> नाही ठाऊक.. कोणालाच ठाऊक नाहीय हे.. कारण चुकीची इन्फॉर्मेशन आहे..

सगळेच सेलिब्रिटी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्वे हल्ली ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती करताना दिसतात हे बघून असेच वाटते हे काय चालवले आहे सगळ्यांनी.. कोणालाच असे वाटत नाही का की हे चूक आहे.. का या पापात सहभागी होतात हे लोक?>>
यांना फक्त पैसा दिसतो.
तो विमल ची जाहिरात करणारा सांगेल का आपल्या पोरांना की कधीमधी विमल पण ट्राय करून बघ म्हणून.
या भारत रत्न ची पोरगी तो जी जाहिरात करतो तो ऑन लाईन जुगार खेळायला लागली तर याला चालेल का? याने भारत रत्न परत करावा आणि मग काय सट्टा मटका विड्या काड्या ताडी माडी यांच्या जाहिरात करायच्या त्या कराव्या. कोणी अडवलंय त्याला.

सचिन कधी दारू तंबाखूच्या जाहिराती करायचा नाही. त्याचे तसे तत्व होते. पण जुगाराबाबत त्याने का वेगळा नियम लावला हे समजत नाही. पैसे हा मुद्दा सचिनसाठी तरी नसावा. की जुगार म्हणजे काहीतरी वाईट हे माझ्याच डोक्यात आहे. जग त्याकडे तसे बघत नाही असे या जाहिराती बघून आता वाटू लागलेय.

सचिन कधी दारू तंबाखूच्या जाहिराती करायचा नाही. >> चांगला रोकडा मिळाला तर करू पण शकतो. जुगाराची जाहिरात केलीच आहे त्याने.

पैसे हा मुद्दा सचिनसाठी तरी नसावा>> हे कोणी सांगितले तुम्हाला.

जुगार म्हणजे काहीतरी वाईट हे माझ्याच डोक्यात आहे.>> शंका आहे का तुम्हाला.
जुगार फक्त ज्याचा जुगार मटक्याचा अड्डा असतो त्यांच्या साठी चांगला अस म्हणा फारतर.

he didn't have a sticker on his bat for about two years while other players were promoting two cigarette brands. But when marketers suggested he use the stickers to make money, Sachin Tendulkar refused because he wanted to stay committed to his father's advice

@वीरु
सचिनला देव समजणारे बरेच जण आहेत. देवाला थोडा प्रसाद दिला, तर त्याचे काय इतके? लोकांच्या श्रद्धा महत्त्वाच्या.

कायद्याने tax भरतो.
कायद्यात राहून वाचवता येईल का बघतो.
यात काही गैर नाही.
उगाच बवाल केला जातो या मुद्याचा कारण त्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते.

मात्र चुकीच्या जाहिराती त्याने करून युवा पिढीला चुकीचे मार्गदर्शन करू नये. ते घातक आहे.

कायद्यात राहून वाचवता येईल का याबद्दलच शंका घेतली होती इन्कम टॅक्स च्या लोकांनी. (वरील बातमीनुसार)
असो, धाग्याचा विषय तो नाही.

भारतरत्न दिला म्हणुन आपण सचिनला विकत घेतला नाही. त्याच्या घरासमोर आंदोलन हे प्रसिध्दी साठी केलं जातेय. सचिनचं मत हे फक्त क्रिकेट पुरतच seriously घ्यायला पाहिजे. बाकी इतर विषयी तो काय बोलतोय ह्याला काहीही महत्व नाही. कोणती जाहिरात करायची हा फक्त त्याचाच निर्णय आहे.

आज एक जण जिंकला त्याने हे ग्रूपवर टाकले.
आता सर्वांना हा जुगार पैसे छापायची मशीन वाटू लागेल .
>>>>>>>>>>
साधारण २००९ च्या आसपास पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन या गावात नरके या व्यक्तीने महिन्याला १० %रिटर्न् ची अफलातून स्कीम आणली होती .
सुरवातीला ज्यांनी पैसे लावले त्यांचे सगळे पैसे 10 महिन्यात रिटर्न भेटले होते .पण नंतर त्यांनी लोभापायी ते आलेले पैसे आणि भिश्या उचलून , सोने गहाण ठेवून , बँकेतून कर्ज काढून , सावकार कडून 2% व्याजदराने घेवून लावले होते .
महिन्याला येणारे १० % देखील पुन्हा नरके कडे महिन्याला त्या स्कीम मध्ये गुंतवायचे .
माझे पैसे स्पिक एशिया , pancard क्लब आणि कल्कात्याची पर्ल कंपनीत बुडाले होते म्हणून मी नर्केच्या किंवा इतर कोणत्याही स्किमच्या नादी लागलो नाही .
माझ्या ओळखीच्या बऱ्याच जणांनी उरुळी कांचन च्या स्कीम मध्ये पैसे लावले होते , त्यात माझे दाजी देखील होते त्यांनी साधारण ३५ लाख ला टोपी घालून घेतली होती , पण मला ते नंतर समजले होते .
साधारण 2011 च्या आसपास त्या स्कीम चा फुगा फुटला , आणि शेकडो गुंतवणूकदार देशोधडीला लागले होते त्याची आठवण ऋन्मेश ने टाकलेल्या त्या फोटो मुळे झाली !
कारण ते लोकं येणाऱ्या १० %चा चेक असेच सर्वांना दाखवत सुटायचे आणि त्या नरके ला नवनवीन बकरे मिळायचे !

इथे लोकं खुलेआम धागा काढून दारू कशी प्यावी याची चर्चा करतात. त्याने कोणा निर्व्यसनी माणसाला दारू प्याविशी वाटेल असा विचार तिथे कोणाच्या मनाला शिवत नाही. प्लीज या त्या धाग्यावर आणि हेच विचार मांडा.

मोठे मोठे मराठी सिनेमा आणि बॉलिवूड अभिनेते या सर्व जुगारांची जाहिरात करत असतात.गरीब वस्त्यांना स्वस्त देशी दारू विकण्यासारखंच हे.याचा सोपेपणा कमी केला जावा.

चार तास होऊन गेल्याने एडीट करता येत नाही.
उपाशी बोका या आयडीने डोण्ट फीड द ट्रोल्स हा इशारा या धाग्यावर दिला आहे, तो मी त्या धाग्यावर पाळुन उपाशी बोका या ट्रोलला फीड नव्हते करायला पाहिजे हे ध्यानात आले. उबो कोण हे समजले हे तसे खरे नाही, फक्त अंदाज आला. ही मनोवृत्ती या आधी अनुभवलेली आहेच.

उपाशी बोका यांचे सर्व प्रतिसाद उथळ आहेत. त्यांना उपहास सुद्धा समजलेला नाही. गुगल सर्च दे कि टाक लिंक असा प्रकार करून ज्या लिंका चिकटवलेल्या आहेत त्या पाहिलेल्या नाहीत. त्यांना मी जी उत्तरे दिली आहेत, ती ट्रोल्ची ओऴख न पटल्याने दिलेली आहेत.

उबो म्हणजे कोण ते समजले. >> Biggrin एक सांगू इच्छितो की मी कुणाचाही डू.आय.डी. नाही, मायबोली प्रशासनाशी माझा काहीही संबंध नाही, मी एकाही सदस्याला कधी प्रत्यक्ष भेटलो नाही आणि भेटायची शक्यता नाही.

<< लिंक असा प्रकार करून ज्या लिंका चिकटवलेल्या आहेत त्या पाहिलेल्या नाहीत. >> जमल्यास बघत चला. कदाचित उपयुक्त माहिती मिळू शकेल. नाही तर दुर्लक्ष करणे सोपे आहेच. एक फुकटची माहिती देतो अजून. मायबोलीवर वेळ घालवता तसा 'हॅकर न्यूज' या साईटवर पण घालवा, माहिती (त्यापेक्षा प्रतिसाद) छान आणि माहितीशीर असतात. लिंक मुद्दाम दिली नाही तुमच्या सोयीसाठी Wink

एकंदरीत असं दिसतंय की तुम्ही मलाच ट्रोल करत आहात. Happy हरकत नाही. माझे प्रतिसाद तुमच्या अपेक्षेसारखे नसले तरीही मी लिहितो कारण लोकांना दुसरी बाजू पण कळावी. माझे कुणाशीही हेवेदावे नाहीत आणि कुणीही माझा मित्र किंवा शत्रू नाही. मी माझ्या मनात आहे ते स्पष्ट लिहितो. कदाचित ते शार्प वाटायची शक्यता आहे, पण केवळ माहितीची देवाणघेवाण या एकाच कारणासाठी मी इथे लिहितो. ज्यांचे लेख मला आवडतात (उदा. डॉ.कुमार), त्यांच्या लेखावर पण मी शंका घेतल्या आहेत आणि प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे तुम्ही माझे प्रतिसाद व्यक्तिगत घेतले नाहीत तर बरे. कळावे, लोभ असावा.

हरकत नाही. माझे प्रतिसाद तुमच्या अपेक्षेसारखे नसले तरीही मी लिहितो कारण लोकांना दुसरी बाजू पण कळावी. >> सर्टिफाईड ट्रोल ला ट्रोलिंग होऊ शकते का ? दुसरी बाजू दाखवणे आणि आपण बिनडोक असल्याचे प्रदर्शन करणे यात फरक नाही का ?
माझ्यावर वैयक्तिक हल्ले करत , तशी भाषा वापरत दिलेले प्रतिसाद म्हणजे दूसरी बाजू हे नव्याने समजले. बिनडोक लोकांशी डोकं लावण्यापेक्षा हुकूमत आणि ऐलान ए जंग लागोपाठ पाहणे पसंत करेन.

Pages