सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.

एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्‍या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?

ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणताही पक्ष, कोणताही महान संत, कोणताही हिरो, कोणताही गुरू, साक्षात देव जरी आला तरी 22 लाख लोकांनी ऊन सहन करत तडफडत बसणे, नेत्यांनी त्याबद्दल स्तुती करणे, डॉक्टर ची व्यवस्था ठेवून सोहळा करणे यातलं काहीच क्षम्य नाहीये.सदर व्यक्तीने पुरस्कार परत करावा.

यासाठीच राज ठाकरेंचं पटतं. सकाळी दहा हे टायमिंगच नसतं त्यांच्याकडे.
जागे होऊन तयारी करेपर्यंत संध्याकाळ होते. त्यानंतरच सभा, समारंभ ! असले प्रकार कधी होत नाहीत त्यांच्या सभेत.

मुख्य मीडिया पूर्णतः सरकारी नियंत्रणात असल्या मुळे .
महत्वाच्या बातम्या,महत्वाची माहिती जी सरकारी निर्णय विरुद्ध असते ती प्रसिद्ध च केली जात नाही.
त्या मुळे lokana प्रसंगाचे गांभीर्य,सरकारच्या घोड चुका माहीत च पडत नाहीत.
सोशल माध्यम आहेत म्हणून थोडीफार तरी माहिती मिळत आहे.
नाही तर ही दुर्घटना पण लोकांना माहीत पडून दिली नसती.
प्रसार माध्यम इतकी दबावात प्रथमच बघत आहे.
हेच जर विरोधी पक्षांच्या राज्यात घडले असते तर.
24तास सर्व मीडिया नी बोंब मारली असती.

Hemant 333
दुर्दैवाने तुमच्या प्रत्येक प्रतिसादाशी मला सहमत व्हावंं लागतंय!

आशुचॅम्पच्या पोस्टशी पूर्णपणे सहमत. जश्या सरकारी पातळीवर अक्षम्य चुका झाल्या तश्याच श्रीसदस्य/अनुयायांकडूनही झाल्या.

उदा. उन्हाळ्यात विदर्भात प्रचंड तापमान असते हे सर्वश्रुत आहे, त्यामुळे विदर्भवासीयांना उन्हे सहन करायची बऱ्यापैकी सवय आहे. पण तरीही शेतकरी व कष्टकरी वर्ग सकाळी ६ ते ११-१२ पर्यंतच शेतातील कामे करून घरी येतात. अगदीच महत्वाचे काम नसल्यास कुणीही माध्यान्हानंतर प्रखर उन्हात थांबण्याचे धाडस करत नाहीत. एवढेच नव्हे तर, नागपूर शहरात सिग्नल सुटायची वाट बघतांना दुचाकी/सायकलस्वार सिग्नलवर न थांबता जवळच्या झाडाखाली थांबतात. माझ्या माहितीप्रमाणे शहरातील सर्वात मोठा सिग्नल हा ३ मिनिटांचा आहे, त्यामुळे तेवढ्या वेळासाठी का होईना कुठेतरी सावली भेटणे म्हणजे एक मोठे सुख असते. पण आता तेही सुख राहिले नाही. महामार्ग व रस्ते बांधण्याची आवड असलेल्या एका अवजड मंत्र्याच्या कृपेने शहरातील रस्ते विस्तारीकरणात झाडेच राहिली नाहीत (नागपूर शहराचे प्रातिनिधिक उदाहरण आहे, समाज माध्यमांवर अनेक शहरांतील अनेक फोटो व्हायरल झाली आहेत).

त्यामुळे, काही पोस्टमधून असा सूर दिसून येतो की १६ एप्रिलला खरंच मुंबई/नवी मुंबईत (महाराष्ट्रात) मरणाएवढी उष्णता नव्हती; त्या सर्वांना माझे जाहीर आव्हान आहे की एप्रिल महिन्यात एखाद्या दिवशी (अर्थातच ज्या दिवशी पावसाळी हवामान नसेल) ज्या ठिकाणी आडोश्याला कुठलेही छप्पर नाही वा अजिबात सावलीस एकही झाड नाही, त्या ठिकाणी आपण (तुमच्यासोबत मीही) अगदी सकाळपासून पूर्ण दिवसभर राहूया आणि मग उष्णतेच्या तीव्रतेबद्दल चर्चा करूया.

ह्या सगळ्यांची साधक बाधक चर्चा होऊ नये म्हणून सरकारी पातळीवर मौन बाळगणे पसंत केले जात आहे. तरीही काही मंत्र्यांनी पुरस्कार विजेत्यांकडेच अंगुलीनिर्देश केला आहे. त्यातच जाणूनबुजून विरोधी पक्षनेत्यांच्या सत्ताधारी पक्षात प्रवेशाच्या कंड्या फिरवण्यात आल्या, त्यामुळे मूळ मुद्दा आपोआपच अनुल्लेखित राहीला.

"Hemant 333
तुमच्या प्रत्येक प्रतिसादाशी मला सहमत व्हावंं लागतंय! "
मला पण.
Lol

पण गंभीरपणे, मला श्रीसंघटना अथवा पंथाकडेच बोट दाखवावेसे वाटते आहे. त्यांनी हा एव्हढा मोठा खर्चिक आणि तमाशाचा सोहळा अथवा सोहोळ्याचा तमाशा आयोजित करण्यासाठी अथवा त्यात भाग घेण्यासाठी साफ आणि ठाम नकार द्यायला हवा होता. एका आध्यात्मिक म्हणावल्या जाणाऱ्या पंथाला हा डामडौल, झगमगाटाचा हव्यास शोभत नाही. असा सोहोळा आयोजित करण्याची सरकारची इच्छा किंवा दबाव होता असेल तर तो झुगारून द्यायला हवा होता.
लोलुपतेमुळे त्यांचे आध्यात्माखालचे पितळ उघडे पडले आहे.

खोलवर विचार केला तर लगेच लक्षात येईल.
अध्यात्म चे गुरू, मौला, मोलावी,
हे सर्व प्रायोजित केलेली लोक असतात.
त्यांना funding होते.
ह्यांची काम असतात लोकांना जमवून त्यांचा ब्रेन वॉश करणे आणि एका गठ्ठा मत निर्माण करणे

जास्त प्रमाण अशाच लोकांचे आहे.
ह्यांच्या कडे अफाट पैसा कोठून येतो हा प्रश्न पडतोच मला.
विवीध सामाजिक संस्था ज्या आम्ही समाज कार्य करत आहे असे दाखवत असतात.
त्यांचा पण मूळ चेहरा वेगळाच असतो.
अध्यात्म, शी कोणाला काही देणे घेणे नसते.
धर्माशी कोणाला काही देणे घेणे नसते.
फक्त आंधळे भक्त निर्माण करणे इतकेच ह्यांचे काम असते.

द्वेष,स्वार्थ, कपटी पना,हिंसक पना .
ह्या अशा बैठकीत जावून कोणाचाच नष्ट होत नाही.
फक्त झापड बंद भक्त तयार होतात

पण त्यांच्या अनुयायांना तसे वाटणार नाही. अगदी पेपर वाल्यांनी ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्यापैकी काहींनी कोणाचाही दोष नाही, असं म्हटलं.

तेच तर. हे आपल्याकडचं शेकडो वर्षांचं pseudo अध्यात्माचं मेंदुमार्जन अथवा लिंपण इतकं मजबूत बनलं आहे की मेंदू by default ते स्वीकारून त्याप्रमाणे वागतो. बहुजन वर्गात व्रते वैकल्ये, किंवा छद्म भक्तिमार्ग, उत्सवप्रियता अलीकडे फारच बोकाळली आहे. ती तशी बोकाळावी ह्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जे अभिजनांनी केव्हाच सोडून दिलं ते आता बहुजनांच्या माथी मारलं जात आहे.

चांगली चर्चा, फेसबुक वर बरीच नवीन माहिती कळली. विकुंच्या कल्ट बाफ ची आठवण आली. मृत्युंबद्दल तर वाइट वाटलेच.

मी बरीच वर्शे आंध्रा/ तेलंगणात राहिलेले आहे. तेव्हा घरची बापे मंडळी उन्हाळ्यात टूर ला जात तेव्हा फार काळजी घेत. उन्हे जास्त व्हायच्या आत हॉटेल वर परत व संध्याकाळी निघून रात्र साडे नौ दहा होईपरेन्त मार्केट व्हिजिट्स. पण तेव्हा म्हणजे ८० ज मध्ये पण उन्हाळा असह्यच होता.
पीक उन्हाच्या वेळात १२ - ३ घरी किंवा ऑफिसात राहायचे. चार शिवाय स्कूटर वरुन पण फिरायचे नाही. डोक्यावर रुमाल व वरुन टोपी. हे मस्ट होते. तसेच ओरि सात तर - जो आंध्रा ओरिसा बेल्ट आहे रामागुंडम वगिअरे तिथे ४७ डिग्री परेन्त कधी कधी तापमान जायचे. रोज मेक्स टेंपरेचर कुठे किती आहे ते हिंदू पेपर वाचून चर्चा करत असु. विजय वाड्यात हॉटेलात सुद्धा रात्री जमिनीवर पाणी ओतायचे तेव्हा वाफा निघायच्या मग खाली गाद्या टाकून झोपायचे. त्यात अनेकदा पावर कट. डास हे आहेच. ओरिसात डोक्या वर फडके व एक कांदा मग टोपी अशी पद्धतच होती. हीट स्ट्रोक झाला तर लगेच कांदा फोडून नाकाला लावत. तात्पर्य कडक उन्हाळा - नागपूर सारखाच - थोडा वेगळा ह्याची सवय होती. कूलरची पण कमी ऐपत होती. एसी तर सोडाच.

तेव्हा हे लोक मुंबईस कामा निमित्त येत.व हरखून जात. नुसता पंखा लावला तरी काम झाले. दमट हवा कमी टेंपरेचर आपल्यामानाने असे बोलत.
आता इथे पण उश्माघात होत आहे हे वाचून पहिले तर अचंबित व्ह्यायला झाले मग वाचून व व्हिडीओ बघून व्याप्ति कळली. बिचारे भक्त लोक.
विश्वास ठेवून आले व मृत्यु मुखी पडले.

तेव्हा ऑफिसातुन पण दुपार तीन च्या चहाच्या ऐवजी ग्लास भरून ताक देत. कडक उन्हाळ्यात म्हणूनच घरी थांबण्यापेक्षा ऑफिसात बरे अशी मानसिकता झाली. निदान भरप्पोर पंखे व कूलर असत ऑफिसात व पडेल ते काम करत राहायचे. तेव्हा हैद्राबादेत सिंगल स्क्रीन एसी थिएटर होती खूपशी. तिथे लोक तिकीट काढून दुपारचे एसीत झोपायला जात.

इथल्या लोकांना कडक उन्हाळ्याची सवय नाही व गुरु रक्षण करतील असा भाबडा विश्वास असावा. वाइट झाले.

जे दगावले ते मेले नाहीत तर त्यांना मोक्ष मिळाला अशी मत भक्त व्यक्त करत आहेत.
इकडे मोक्ष आहे तर तिकडे जन्नत मिळते.

आणि हे लोकांना पटते.

(अवांतर टाईमपास)

टेक्निकल चूक झाली सर. मोक्ष मिळाला म्हणजे माणूस मेला नाही असे नाही. उलट माणूस मेल्यावरच मोक्ष मिळतो. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी म्हण पण आहे बघा.

पण तुम्ही एक प्रश्न सुरेख उभा केला आहे. मृत्यू म्हणजे शेवट, अस्तित्वाचा अंत अशी संकल्पना असताना, मृत्यूनंतर सुध्दा स्वर्ग किंवा नरक आहे असे कल्पणे ही मृत्यू ह्या संकल्पनेची हत्या नाही का ?

आप्पा स्वारींचा काहीही दोष नाहीये. उन सोसवत नव्हते तर कार्यक्रमाला गेलेच कशाला. उगाचच स्वारींवर बालंट आले हो. नका हो लक्ष देऊ या पातक्यांकडे. त्यांनी १० जन्म घेतले तरी त्यांना स्वारींची महत्ती समजणार नाही ( ही माहिती आम्हास ट्ठिटर वर मिळाली आणि त्यावरून या बुवांना स्वारी म्हणत असावेत असा अंदाज आहे)

मी पण सुरवातीला कन्फ्युज झालो होतो.
हे स्वारी कोण म्हणून.

ग्रामीण मराठी सिनेमात नवऱ्याला स्वारी,स्वामी म्हणायचे हे ऐकून होतो.
पण तो अर्थ ह्या प्रसंगात लागणं.
पुरुष आमचे स्वारी म्हणत आहेत इथे.
खुप गोंधळ झाला

मृत्यूनंतर पुण्यवान आत्मे स्वर्गात जातात आणि अतिपापी लोक नरकात. मग त्यांच्या कर्मानुसार त्यांना सुख किंवा दुःख भोगावे लागते. भोग संपले की पुन्हा पृथ्वीवर येतात. जो काही जन्म मिळेल त्यात सुकर्मे किंवा दुष्कर्मे घडतात. मग पुन्हा स्वर्ग नरक. असे होता होता पुण्याचा balance जेव्हा खूप वाढतो, एक आवश्यक मर्यादा गाठतो तेव्हा मरणानंतर पुनर्जन्म नाही मिळत. तेव्हा मोक्ष मिळतो. मुच् - मुंचति = सुटका होणे. मुक्त होणे, मुक्ती मिळणे. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. सुटका होते.

नोटबंदी झाली तेव्हा लोक मरतील असे वाटले तरी होते का ?
कॉरोन वेळी लोकडोवन झाले तेव्हा रुळा वर झोपणारे मजूर रेल्वे खाली आले ,वाराणसी मध्ये प्रेत नदीत फेकावी लागली
राम्डेसिवीर अभावी माझे दोन नातेवाईक गेले
आपल्या देशात मनुष्य जीवाची किंमत शून्य आहे

New

Mumbai, April 19 (IANS) In a major decision, the Maharashtra government has banned all open-air public meetings/rallies between 12 noon to 5 p.m., state Tourism Minister Mangal Prabha Lodha said here on Wednesday.

काल मुरबाड मध्ये ४४ डिग्री से तापमान नोंदले गेलं.

बैल गेला आणि झोपा केला.
असले काहीही प्रदान समारंभ मोकळ्या मैदानात करूच नयेत. आता शपथग्रहण विधीसुद्धा मोकळ्या मैदानात होतो, जो पूर्वी संसदेच्या बंदिस्त दालनात होत असे. आता राज्यकर्त्यांमध्ये थोडी maturity येऊं दे.

हे निवेदन आपल्य्याला उद्देशून आहे का?
मी खूप घाबरलो आहे.
माझे पाय पॅंटच्या आत थरथरत आहेत.
स्वामी अप्पासाहेब मला ह्या अजाण बालकाला क्षमा करा.

राहुल बावनकुळे, हीरा,aashuchamp,हेमंत यांच्या पोस्ट्स जबरी आहेत.

वाईट वाटते ते मृतांसाठी आणि अजूनही काही अत्यवस्थ असणाऱ्या लोकांबाबत!

the Maharashtra government has banned all open-air public meetings/rallies between 12 noon to 5 p.m

आणि सकाळी १० ची?

Pages