
नाटक ही जिवंत कला आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते हे अगदी मान्य. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर एक नजर टाकल्यास बरेच असमाधान जाणवते. अनेक शहरांमधल्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबद्दल वारंवार माहिती प्रसारित होत आहे. नाट्य कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटक या दुरवस्थेमुळे मनातून नाराज आहेत.
काल पुण्यातील तीन महत्त्वाच्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत विस्तृत अहवाल ‘सकाळ’मध्ये वाचण्यात आला. त्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटले आहे की नाटकांचे प्रयोग करून आम्ही कधीच दमत नाही परंतु रंगमंदिरांबाबतच्या तक्रारी करून मात्र आता खरंच प्रचंड दमलो आहोत ! त्यांचे हे विधान सर्व कलाकार व नाट्यरसिकांचे प्रातिनिधिक म्हणता येईल.
आता एकंदरीत रंगमंदिरांची भाडेवाढ, कमालीची अव्यवस्था आणि अस्वच्छता, घटता प्रेक्षकवर्ग आणि आंतरजालावरील उपलब्ध असलेली व्यापक करमणूक या सगळ्यांचा परिणाम प्रत्यक्ष नाट्यप्रयोगांवर झालेला दिसतो. कोणे एकेकाळी रंगमंदिरातील बाल्कनीमधून कमी दरात नाटक पाहायची सोय असायची. अलीकडे ती बंद झाल्यात जमा आहे. त्यामुळे फक्त खालच्या मजल्यावरील आसनव्यवस्थेतील नाटकांचे वाढीव दर हे सर्वांनाच परवडण्याजोगे नाहीत. मध्यंतरीच्या कोविड पर्वात तर जाहीर नाट्यप्रयोग दीर्घकाळ बंदच होते.
मी काही महिन्यांपूर्वी रंगमंदिरात जाऊन २ नाटके पाहिली. तेव्हा ते नाटक संपल्यानंतर त्यातील चारही कलाकारांनी उभे राहून प्रेक्षकांना अभिवादन केले. तसेच त्यांनी त्यांच्या पुढील प्रयोगांची जाहिरातही अशी केली:
" नाटक पाहणारी मंडळी आता आपण थोडीच राहिली आहोत. म्हणून जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवाराला ते पाहण्यास जरूर सांगा, जेणेकरून ही खालची सर्व आसने भरली जावीत".
यावर अधिक बोलणे न लगे.
खऱ्याखुऱ्या नाट्य रसिकाला अधूनमधून नाटक पाहिल्याशिवाय काही चैन पडत नाही आणि नवे नाटक वरील कारणांमुळे पाहण्याचे राहून जाते. मग अशा रसिकासाठी दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवण्यासाठी आंतरजालावरील युट्युबचा एक बरा पर्याय उपलब्ध आहे. तिथे आपल्याला अनेक जुनी नाटके पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी काही नाटके ही मुळातच चांगल्या अनुभवी कलाकारांना घेऊन व्यावसायिक पद्धतीने चित्रित केलेली आहेत. काही नाटके महाराष्ट्रातील विविध नाट्य स्पर्धांमध्ये किंवा हौशी रंगभूमीवर सादर झालेली आहेत. तर अन्य काही नाटके दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पूर्वी प्रक्षेपित झालेली आहेत.
गेल्या ७ वर्षांमध्ये युट्युबवरील अशा अनेक नाटकांचा मी आस्वाद घेतला. मी पाहिलेल्या नाटकांची यादी एक संदर्भ म्हणून इथे लिहून ठेवतो. यथावकाश प्रतिसादांमधून त्या नाटकांबद्दल अजून माहितीची भर घालत राहीन. ज्या वाचकांनी या माध्यमातून नाटके पाहिली असतील त्यांनीही प्रतिसादांमधून त्या नाटकाबद्दल थोडक्यात लिहायला हरकत नाही. अशा तऱ्हेने या धाग्याच्या निमित्ताने मराठी नाटकांची एक आंतरजाल संदर्भयादी सर्वांसाठी उपलब्ध राहील.
आता थोडे अशा नाटकांच्या चित्रफित-दर्जाबद्दल. काही नाटकांचा दर्जा खरोखरच उत्तम आहे. काहींचा तो मध्यम आहे परंतु त्यातून नाट्य संवादांचा अनुभव चांगला घेता येतो. सह्याद्री वाहिनीवरील जी नाटकं इथे चढवली गेली आहेत त्यांचा दर्जा मात्र साधारण आहे आणि त्यातील ध्वनीमुद्रण फारसे खास नसते.
प्रतिसादांमधून लिहिताना आपणही संबंधित नाटकाचे नाव, लेखक, प्रमुख कलाकार, तुमचे मत आणि चित्रफितीच्या दर्जाबद्दल जरूर लिहावे. आता मी पाहिलेल्या नाटकांची लेखकानुसार फक्त यादी लिहितो. ती गेल्या ५-७ वर्षांपासून पाहत असल्याने आता एकदम प्रत्येकाबद्दल छोटा परिच्छेद लिहीणे अवघड आहे. पण अगदी अलीकडे जी नाटके पाहिलीत किंवा यापुढे जी पाहीन, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती प्रतिसादांमधून देईन. या नाटकांचा लेखनकाल अंदाजे गेल्या ५०-५५ वर्षांपूर्वीपासूनचा आहे. सध्याच्या तरुण पिढीला आवड असल्यास ही नाटके जरूर पाहता येतील. त्यातले एखादे नाटक आपण पूर्वी प्रत्यक्ष रंगमंदिरात पाहिले असल्यास आता त्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येईल.
मी पाहिलेली (चित्रित) नाटके:
* विजय तेंडुलकर
शांतता ! कोर्ट चालू आहे
अशी पाखरे येती
सखाराम बाईंडर
कमला
*जयवंत दळवी
बॅरिस्टर, पर्याय, लग्न, महासागर
*वसंत कानेटकर
अश्रूंची झाली फुले, अखेरचा सवाल, बेइमान, मला काही सांगायचंय
* पु ल देशपांडे
सुंदर मी होणार
* आचार्य अत्रे
तो मी नव्हेच
* रत्नाकर मतकरी
इथं हवय कुणाला प्रेम
* शं ना नवरे
सूर राहू दे
धुक्यात हरवली वाट
* मधुसूदन कालेलकर
शिकार
* अशोक समेळ
कुसुम मनोहर लेले
{केशव मनोहर लेले : लेखक आठवत नाही. सध्या उपलब्ध नाही }
* प्र. ल. मयेकर
आसू आणि हसू
* उदय नारकर
खरं सांगायचं तर ( मूळ इंग्लिश; अगाथा ख्रिस्ती)
* शेखर ढवळीकर
नकळत सारे घडले
* डॉ. शिरीष आठवले
मित्र
* समीर कुलकर्णी
तुझ्या माझ्यात
* वसंत सबनीस
कार्टी काळजात घुसली
* मनोहर सोमण
द गेम
* विजय निकम
रघुपती राघव राजाराम
*सुरेश जयराम
डबल गेम
* चंद्रशेखर गोखले
अनोळखी ओळख
* शिवराज गोर्ले
बुलंद
* क्रांती बांदेकर
कोर्ट मार्शल (मूळ हिंदी - स्वदेश दीपक)
*सुरेश खरे
ती वेळच तशी होती
* बाळ कोल्हटकर
वेगळं व्हायचंय मला
..
मागच्या पिढीतील गाजलेले अभिनेते प्रभाकर पणशीकरांच्या वरीलपैकी एका नाटकाच्या शेवटी त्यांची मुलाखत दिलेली आहे. त्यात त्यांनी नाटकांच्या चित्रीकरणाबद्दलचे त्यांचे बदललेले मत व्यक्त केले आहे. एकेकाळी त्यांचा अशा चित्रीकरणाला कट्टर विरोध होता. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले, की महाराष्ट्रातील मोजकी पाच सहा शहरे वगळता अन्यत्र जिल्हा पातळीवर देखील चांगली नाट्यगृहे नाहीत. जर नाटकाला महाराष्ट्रातील सर्व इच्छुक प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे असेल तर आता नाटक चित्रीकरण हाच पर्याय उरतो.
कदाचित, अजून पंचवीस तीस वर्षांनी वरील हेतू साध्य करण्यासाठी सशुल्क आंतरजाल वाहिन्या हेच व्यावसायिक नाटक सादरीकरणाचे महत्त्वाचे माध्यम ठरेल काय? माहित नाही. सच्चा नाट्यप्रेमीला हा विचार मानवणारा नसला तरी भविष्यात तो स्वीकारायला लागू शकतो.
***********************************************************************************
या कलाकाराला मी प्रथम पाहिले
*अक्षयचे अपघाती निधन>>
या कलाकाराला मी प्रथम पाहिले ते युट्युब वरच; त्यापूर्वी माहीत नव्हता. हे नाटक इथे पाहिल्यानंतर काही दिवसातच त्याचा अपघाती मृत्यू झाला. तेव्हा एक उमदा कलाकार आपल्यातून गेल्याची हळहळ वाटली.
अपघाती मृत्यूच्या बाबतीत भक्ती बर्वे आणि आनंद अभ्यंकर यांचे मृत्यूही चटका लावून गेले होते.
आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे
आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचं एकाच मोटार अपघातात निधन झालं.
ओह , धन्यवाद .
ओह , धन्यवाद .
एक तप उलटले . . .
बायकोच्या नकळतच
बायकोच्या नकळतच
शशांक येवले
सुनील बर्वे, मंजुषा गोडसे, माधवी निमकर आणि इतर
एक बांधकाम व्यवसायिक विवाहित असून त्याच्या बायकोच्या नकळत त्याच्या सेक्रेटरीच्या प्रेमात पडतो त्याची गोष्ट .
पहिला अंक अपेक्षा उंचावून ठेवतो. दुसऱ्या अंकाचा बराचसा भाग प्रेक्षकांना गोंधळात टाकतो पण शेवट छान केला आहे. नाटकात श्रीरंग गोडबोले यांची तीन नृत्यगीते आहेत. ती चांगली लयबद्ध आहेत.
सर्व कलाकार उत्तम !
'देशमुख = कंट्री माऊथ ' यासारखे काही बाष्कळ विनोद मात्र रसभंग करतात.
एकंदरीत घटकाभर मनोरंजन म्हणून बरे आहे.
https://www.youtube.com/watch?v=lnwIritLUDg
नाटकाच्या विषयाशी संबंधित
नाटकाच्या विषयाशी संबंधित नाही. पण कथाकथनाचा अस्सल खजिना युट्यूबवर उपलब्ध आहे. त्यासाठी वेगळा धागा सापडत नाही म्हणून इथे नोंदवत आहे.
शाळेतील समारंभ - द. मा. मिरासदार
https://www.youtube.com/watch?v=Wdb1IRwUZRI
सुखवस्तु शं ना नवरे मोहन
सुखवस्तु
शं ना नवरे
मोहन जोशी, अमिता खोपकर व इतर
दोन पिढ्यांमधले प्रेमविवाह : समज गैरसमज इत्यादी.
हलकेफुलके. ठीक.
https://www.youtube.com/watch?v=hEl3koqVBvI&t=3972s
पती गेले गा काठेवाडी..
पती गेले गा काठेवाडी..
व्यंकटेश माडगूकरांच संगीत नाटक आहे.
कथानक साधारण असे,
पेशव्यांच्या काळातील त्यांचा एक सरदार सारा वसुली करायला काठेवाडला जातो, बायको बरोबर सुगंधी ताजा गजरा/ तुरा देते. जिथपर्यंत तिची पतीनिष्ठा अबाधित राहील तोवर गजरा टवटवीत राहील हा तीह विश्वास.. शिवाय या खेपेला त्याची पत्नी काही कामही मागून घेते .
त्या टवटवीत गाजाऱ्यापायी पुढील नाट्य घडते..
तो काळ,त्या वेळची सामाजिक परिस्थिती ह्यामुळे प्रत्येक गोष्ट पटते असे नाही..
नाटकातील पदही लेखकच लिहायचा.
कलाकार स्वतः ती गाणी म्हणायचे.
अर्थात नाट्य संगीताचा तो अविभाज्य भाग होता.. पण आता ते विशेष नमूद करावेसे वाटते.
तरीही मला आवडलं.
https://youtu.be/Yx6W3vG6WJI?si=koDU5lDiX6TfPncj
कन्यादान
कन्यादान
* विजय तेंडुलकर यांच्या सामाजिक नाटकाचे हिंदी रूपांतर
* नाथच्या भूमिकेत दर्शन जरीवाला तर ज्योतीच्या भूमिकेत मृण्मयी गोडबोले
या रूपांतरात अधूनमधून मूळ मराठी वाक्ये कायम ठेवली आहेत. मराठी नाटक बघण्याचा कधी योग आला नव्हता. जातीयता या विषयावरील दमदार आणि प्रक्षोभक नाटक. काही प्रसंग अक्षरशः अंगावर येतात. नाटकाच्या अखेरच्या दहा मिनिटातला नाथ व ज्योतीचा संवाद थरकाप उडवतो आणि ‘मूल्य’ नामक गोष्टींच्या चिंधड्या उडवतो. तिच्या तोंडचे,
“राक्षस पण तोच आहे आणि कवी पण तोच आहे”,
हे वाक्य सदर नाटकात मराठीतच ठेवून उत्तम परिणाम साधला आहे.
https://www.youtube.com/watch?v=Y7G7z_3VWjM
. . .
एकेकाळी तेंडुलकरांनी दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते,
“कन्यादानमधील नाथ देवळालीकर हा मी आहे आणि तो माझ्या पिढीतले मला कळणारे अनेक ‘लिबरल’ प्रवृत्तीची माणसे आहे”.
या नाटकाबद्दलचा मायबोलीवरचा
या नाटकाबद्दलचा मायबोलीवरचा जुना लेख
अरे वा !
अरे वा !
त्यातले मूळ कलाकार अगदी A1 आहेत.
काही गाजलेली जुनी मराठी नाटके
काही गाजलेली जुनी मराठी नाटके आता प्रत्यक्षात होत नाहीत आणि युट्युबवर सगळी नसतात. परंतु अशा काही नाटकांची हिंदी रूपांतरे अलीकडे युट्युबवर येऊ लागलेली आहेत. त्यातली ही दोन पाहिली :
१.
कालचक्र (हिंदी रूपांतर)
जयवंत दळवी
https://m.youtube.com/watch?v=CaXyHSUet4g
एका वृद्ध जोडप्याला त्यांची मुले सांभाळायला तयार नाहीत म्हणून दुसरे एक तरुण जोडपे या जोडप्याला ‘दत्तक’ घेते हा विषय.
प्रमुख कलाकार चांगले आहेत.
...
२.हमिदाबाई की कोठी
२.
हमिदाबाई की कोठी
अनिल बर्वे
दि. : विजया मेहता
कोठीवरील गाणे बजावणे यांची संस्कृती अस्ताला जात असताना त्या विश्वात वावरणाऱ्या माणसांची झालेली शोकांतिका.
https://www.youtube.com/watch?v=FkwuoWm1iuA
यात अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी व गणेश यादव हे मराठी कलाकार आहेत.
भरत लेखाच्या दुव्याबद्दल
भरत लेखाच्या दुव्याबद्दल आभार.
हिमालयाची सावली - जुनं नप्ण,
हिमालयाची सावली - जुनं नाटक, पण नव्या संचात. सह्याद्री वाहिनी च्या You Tube चॅनल वर.
https://www.youtube.com/watch?v=bQhqNem0njA
किमयागार - हेलन केलर वरील
किमयागार - हेलन केलर वरील नाटक
वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले हे नाटक.
मूळ संचात भक्ती बर्वे यांनी काम केलं होतं, माझ्या आठवणीप्रमाणे तिच्या शिक्षिकेच. ते इतक प्रभावी होत इतक्या वर्षांनंतरही भक्ती बर्वे म्हटलं की ती जेव्हा तिला शिकवायला सुरुवात करते तो प्रवेश डोळ्यासमोर तरळतो.
https://youtu.be/GkYK1NKm00I?si=_aP9FKEN-LYxzzPp
नवीन संचासह ते नाटक दूरदर्शन सह्याद्री वर आहे.
मी हे यू ट्यूब वरील नाटक अजून पाहिलेले नाही ..
त्याचे बहुदा खूप थोडे प्रयोग झाले होते.
ह्याला जबाबदार कोण हे नाटक
ह्याला जबाबदार कोण हे नाटक कोणी पाहिले आहे का? रहस्यमय होते, एक काहीतरी फुल्याफुल्यांच्या चित्रामधे सांकेतिक संदेश होता? युट्युबवर उपलब्ध आहे का?
तसेच भरत जाधवचे सही रे सही कुठे उपलब्ध आहे का?
सध्या छावा चित्रपट चर्चेत आहे
सध्या छावा चित्रपट चर्चेत आहे. त्यावरून वसंत कानेटकरांचं इथे ओशाळला मृत्यू आठवलं. इथे लिहिण्याआधी या धाग्यावरचे त्याबद्दलचे प्रतिसाद वाचले आहेत . पाहणार्यांना संभाजीच्या भूमिकेतील किरण भोगले खटकले. मला फक्त शेवट कसा दाखवला आहे, ते पाहायचे होते.
कानेटकरांनी स्वराज्याच्या लढ्यावर रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू , तुझा तू वाढवी राजा आणि इथे गवतालाही भाले फुटतात ही नाटके लिहिली.
ह्याला जबाबदार कोण >>> कोण
ह्याला जबाबदार कोण >>> कोण कलाकार होते यात?
मी खूप पूर्वी एक विकास राज आणि क्षमा राज चे नाटक पाहिले होते ज्यात असाच तीन फुल्यांचा क्लू होता. तेच का?
मी खूप पूर्वी एक विकास राज
मी खूप पूर्वी एक विकास राज आणि क्षमा राज चे नाटक पाहिले होते ज्यात असाच तीन फुल्यांचा क्लू होता. तेच का?>>
हा हेच. ते कुठे उपलब्ध आहे का? साधारण काय कथा होती? तेव्हा बघायचे राहून गेले होते.
यूट्यूबवर बहुधा उपलब्ध नाहीये
यूट्यूबवर बहुधा उपलब्ध नाहीये हे. मी नाट्यगृहात पाहिलं होतं.
साधारण कथा बहुधा अशी होती की विलासराज आणि क्षमा राज नवरा बायको असतात. आणि त्याला तिचा खून करायचा असतो. हा क्लू तिला सापडतो. मला पूर्ण आठवत नाहीये. पण तो क्लू ती डिकोड करते. त्या तीन फुल्या नसून W आणि M असतात. त्याची इनिशिअल्स. त्यातून तिला समजतं तो खूनी आहे. त्याने त्याच्या पहिल्या बायकोचा पण खून केलेला असतो आणि आता हिलाही मारायचे असते. तो पैशांसाठी लग्न करत असतो असं आहे बहुतेक.
खूपच वर्षं झाली आता त्यामुळे जे आठवतंय ते लिहिले. कोणाला वेगळं काही आठवत असेल तर प्लीज सांगा
मूळ नाटकात नसेल त्यापेक्षा
मूळ नाटकात नसेल त्यापेक्षा अधिक कठीण करून सांगितल्याबद्दल धन्यवाद
अरे केवढी वर्षं झाली हे नाटक
विलास राज आणि क्षमा राज या
विलास राज आणि क्षमा राज या जोडीचे एक नाटक बहुतेक टीव्हीवर पाहिले होते. पण त्यात त्यांच्या मुलाचे पण पात्र असून तो काहीसा चमत्कारिक आहे.
नक्की आता आठवत नाही.
यूट्यूबवर बहुधा उपलब्ध नाहीये
यूट्यूबवर बहुधा उपलब्ध नाहीये हे. मी नाट्यगृहात पाहिलं होतं.
साधारण कथा बहुधा अशी होती की विलासराज आणि क्षमा राज नवरा बायको असतात. आणि त्याला तिचा खून करायचा असतो. हा क्लू तिला सापडतो. मला पूर्ण आठवत नाहीये. पण तो क्लू ती डिकोड करते. त्या तीन फुल्या नसून W आणि M असतात. त्याची इनिशिअल्स. त्यातून तिला समजतं तो खूनी आहे. त्याने त्याच्या पहिल्या बायकोचा पण खून केलेला असतो आणि आता हिलाही मारायचे असते. तो पैशांसाठी लग्न करत असतो असं आहे बहुतेक.
खूपच वर्षं झाली आता त्यामुळे जे आठवतंय ते लिहिले. कोणाला वेगळं काही आठवत असेल तर प्लीज सांगा Happy>>>
धन्यवाद! कुठे उपलब्ध असेल तर बघायला नक्कीच आवडेल!
Pages