मराठी भाषा गौरव दिन २०२३ - खेळ - शब्दशोध

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 27 February, 2023 - 08:03

मराठी भाषा गौरव दिन २०२३ - खेळ - शब्दशोध

आमचे काही शब्द हरवले आहेत. त्यांचा माग काढायचा आहे. पण त्यांच्या पाउलखुणा इतस्ततः विखुरल्या आहेत ; गूढ संकेतांसारख्या !
मायबोलीकर हरवलेल्या वस्तू , विशेषतः शब्द शोधण्यात किती पारंगत आहेत हे तर अखिल विश्वाला माहीत आहे.

चला तर मग! येताय ना शब्द शोधायला?

संच पहिला

कंसात शब्दातील अक्षरांची संख्या दिली आहे.

१ .छोट्याशा विहीरीत हात घातल्यास मिळणारा खाऊ?. (५)
२. रात्र होण्या आधी सावकार येण्याची करा खात्री . (४)
३. माकडाला दिसणारी गाय. (३)
४, कळे थोरवी फ़िरता माहिम. (३)
५. मादक शस्त्र? (२)
६. व्यवहार करावा सम प्रमाणामधला (३)
७. मिळालेले नवे आयुष्य उलट सुलट झाले तरी काय फरक पडतो? (५)

संच दुसरा

एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. विपरीत भाव. (३)
२. हा दुकानात असतो (३)
३. आनंदून गेल्यावर अनुभवा (३)
४. घराचे रक्षण करणार पण तिच्यापुढे हातबल ! (5, 2)
५. अरे बापरे ! तापाबरोबर हे पण आले काय (3)
६. याला झाडावर पहा (३)
७. तरुणीची नेहमीची समस्या (४)

संच तिसरा

खाली एकूण ७ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ७ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.

सूत्र : ज्ञानाशी निगडीत
1. बकध्यानामुळे
2. दिवाकरपंतांच्या
3. अमरपट्ट्यातून
4. विवाद्यघटनेच्या
5. विषयवासनाधीन
6. एकात्मभावनेमुळे
7. महाप्रलयकारी

संच चौथा

१. अमली मात्रा घेऊन केलेला नैवेद्य (३)

२ पंखसुंदरी वागणूक पाहून रूपांतर करते. (५)

३ सातजणांना दिला पैसा. पहिल्याने दिले साहित्य, शेवटल्याने दिला मृ्त्यू. (3, 3) दोन शब्द ओळखायचे आहेत.

४. वादविवाद करताना साखरेचा खाऊ संपवला नाही तर यात कुटावे. (४)

५. किल्ल्याच्या मागे लक्ष गेल्यास होणारा घोटाळा. (४)

६. दुपारच्या वेळेत आढळणारे पक्षी? (३)

७. डोंगराच्या तळाला गाईचे दूध ठेवणारा गणिततज्ज्ञ. (६)

संच पाचवा

प्र. गाळलेल्या जागा भरा:
खाली भूकंपासंबंधी दहा वाक्ये दिली आहेत. त्यातील गाळलेल्या जागी फक्त एक शब्द भरायचा आहे.
शब्द शोधण्यासाठी पुढील माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).

प्रश्न:
१. पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक **व***** बसलेल्या धक्क्याला भूकंप म्हणतात. (७, व)

२. भूकंप तरंग जेथे उगम पावतात त्या स्थानाला **** म्हणतात. (५, प)

३. ****** हे भूकंपाचे एक मानवनिर्मित कारण आहे. (५, चा)

४. भूकंपाच्या मोठ्या धक्क्यांनंतर त्या भागात लहान धक्क्याना ****** म्हणतात.(५, त)

५. भूकंपामुळे झालेल्या खडकांच्या हालचालीला **** म्हणतात. (५, त)

६. भूकंपामुळे बर्फाळ प्रदेशात होतात. (४, लो )

७. ****** हा भूकंपाचा एक विधायक परिणाम आहे (५, नि )

८. भूकंपाचे धक्के ****** या साधनावर नोंदले जात असतात. (६, प)

९. भूकंपाची पूर्वसूचना तात्काळ पोचण्यासाठी ***** व्यवस्था कार्यक्षम असावी लागते. (६, श)

१०. काही सौम्य भूकंपांचे पूर्वानुमान करण्यात ******* यश आले आहे. (६, ज्ञा )

संच सातवा

९ अक्षरी शब्द उपशब्दांसह ओळखा: त्यातील अक्षरांपासून बनणारे उपशब्द खालीलप्रमाणे आहेत. उपशब्द आणि मूळशब्द ओळखायचे आहेत.

शोधसूत्रे ( अक्षर क्रमांकानुसार) :

१२ अगोदरचे
३४ पीस
५६७ अंश.
८९ बरोबर

पूर्ण शब्द : रजेसंबंधी

उत्तर - पूर्वपरवानगीसह

संच आठवा

शब्द ओळखण्यासाठी खूण आणि शब्दातील अक्षरांची संख्या दिले आहेत.

१. बावीस जुलैस हो ला हो दिल्यास मिळणारा आंबा (३)

२. हवा पालट करण्याचा पर्याय दिल्यास होणारी वाखाणणी. (३)

३. मरणाचा कंटाळा आणणारा प्राणी? (४)

४. पौष्टिक खाऊ मिळवण्यास वासु कामे चुकवतो. (४)

संच नववा

खाली दिलेल्या अक्षरांच्या चक्रव्यूहातून ७ मराठी शब्द ओळखायचे आहेत. हे शब्द मराठी भाषेने अन्य भाषांमधून स्वीकारलेले आहेत. प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या (कंसात) आणि तो कोणत्या भाषेतून स्वीकारला आहे ती भाषा ओळखण्याचे शोधसूत्र दिलेले आहे. (भाषेचे नाव किती अक्षरी आहे याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. मुद्दामच ती अक्षरसंख्या दिलेली नाही. शब्द ओळखल्यावर त्याची मूळ भाषा लिहावी).

प्रत्येक अक्षर एकदाच घ्यावे. दिलेली सर्व अक्षरे वापरली गेली पाहिजेत. सर्व उत्तरे एकदम द्यावीत.
र.. था.. ळ .. ड.. णी
क.. ग.. ल.. चो .. ली
क.. स.. द .. र .... र
र .. ट्टे .. ने .. व .. ब
ग .. ला .. मा .. क .. आ
भु .. द .. न .. कु .. र

शोधसूत्रे :

१. महाराष्ट्राशी येता-जाता भांडणाऱ्या राज्याची भाषा ( ओळखायचा शब्द ५ अक्षरी)

२. भारतातील स्थापना कालानुसार सर्वात नवे असलेल्या राज्याची भाषा ( ५ )

३. भारतात उत्तर व दक्षिणेत वाद निर्माण करणारी भारतीय भाषा ( ४ )

४. भारतातील प्रगतिशील राज्याची भाषा (५ )

५. ही भाषा भारत व त्याच्या ‘शेजारी’ देशात सुद्धा बोलली जाते (3)

६. ही ज्या देशाची भाषा आहे तो युरेशियात विस्तारला आहे ( ४)

७. इतिहासात भारतावर आक्रमण केलेल्या एका युरोपीय देशाची भाषा (४)

संच दहावा

संच पाचवा

खाली एकूण ७ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ७ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.

सूत्र : कालदर्शक शब्द

१. परतीचे मार्ग
२. आकाशकंदिलाच्या
३. तहसीलदारांकडे
४. मगजमारीतून
५. कुठपर्यंत नेणार
६. इनमिनतीन
७. कालपरवासारखे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहिलेली अक्षरे
.. था.. .. ड.. णी
.. ग.. ल.. चो .. ली
क.. स.. द .. ....
.. ट्टे .. ने .. व ..
ग .. ला .. मा .. क ..
भु .. .. न .. कु .. र

राहिलेल्या भाषा

१. महाराष्ट्राशी येता-जाता भांडणाऱ्या राज्याची भाषा ( ओळखायचा शब्द ५ अक्षरी)

२. भारतातील स्थापना कालानुसार सर्वात नवे असलेल्या राज्याची भाषा ( ५ )

३. भारतात उत्तर व दक्षिणेत वाद निर्माण करणारी भारतीय भाषा ( ४ )

४. भारतातील प्रगतिशील राज्याची भाषा (५ )

५. ही भाषा भारत व त्याच्या ‘शेजारी’ देशात सुद्धा बोलली जाते (3)

६. ही ज्या देशाची भाषा आहे तो युरेशियात विस्तारला आहे ( ४)

७. इतिहासात भारतावर आक्रमण केलेल्या एका युरोपीय देशाची भाषा (४)

ओळखलेले शब्द - आरमार (पोर्तुगीज) बदली (उर्दू ) कुळकरणी (भाषा नीट ओळखा) भुट्टेचोर (हिंदी)

अधिक शोधखुणा
१. मंगलकार्याशी संबंधित एक प्रसंग
२. ज्यांची यंदा जन्मशताब्दी आहे असे एक लेखक या लिहीत.

नवकथा

भाषांपैकी १. कानडी - त्यातील शब्द कुळकरणी.
२. तेलुगु

४. उडिया?

आणि तो शब्द: नवलकथा , गुजराती. ४ गुजराथी. (पण मला वाटते हा प्रगत आहे भारतातील राज्यांची तुलना केली तर)

गुजरातला १ भांडणारा आणि ४. कर्नाटकला प्रगतीशील जाहीर करतो.

-----
नवलकथा - गुजराथी
गडगनेर (केळवण)
दसकला (चामड्याचा बंद) - ग्रीक

हे शब्द बरोबर आहेत.
कुळकरणी - तेलुगु- भारतातील स्थापना कालानुसार सर्वात नवे असलेल्या राज्याची भाषा ( ५ )
गडगनेर - कानडी - महाराष्ट्राशी येता-जाता भांडणाऱ्या राज्याची भाषा (केळवण . गडू + नीर)
नवलकथा - गुजराथी -भारतातील प्रगतिशील राज्याची भाषा (५ ) (गंगाधर गाडगीळ आर्थिक नवलकथा लिहीत)

राज्यांसाठी वापरलेली काही विशेषणे सापेक्ष आहेत, असे दिसते.

आता चारच अक्षरे आणि भाषेसंबंधी एकच संकेत शिल्लक आहेत.

सकलाद - तुर्की बरोबर पायस. तुर्कस्थान Türkiye हा देश युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांचा भाग आहे.

दहावा आणि शेवटचा संच

संच दहावा

संच पाचवा

खाली एकूण ७ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ७ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.

सूत्र : कालदर्शक शब्द

१. परतीचे मार्ग
२. आकाशकंदिलाच्या
३. तहसीलदारांकडे
४. मगजमारीतून
५. कुठपर्यंत नेणार
६. इनमिनतीन
७. कालपरवासारखे

गडगनेर कानडी शब्द आहे का, भारीच. मी गुजराथी किंवा वरच्या राज्यातील समजत होते. गुजराथ एम पी मधे जास्त ऐकला आहे, इथे केळवण जास्त प्रचलीत आहे.

Pages