मराठी भाषा गौरव दिन २०२३ - खेळ - शब्दशोध
आमचे काही शब्द हरवले आहेत. त्यांचा माग काढायचा आहे. पण त्यांच्या पाउलखुणा इतस्ततः विखुरल्या आहेत ; गूढ संकेतांसारख्या !
मायबोलीकर हरवलेल्या वस्तू , विशेषतः शब्द शोधण्यात किती पारंगत आहेत हे तर अखिल विश्वाला माहीत आहे.
चला तर मग! येताय ना शब्द शोधायला?
संच पहिला
कंसात शब्दातील अक्षरांची संख्या दिली आहे.
१ .छोट्याशा विहीरीत हात घातल्यास मिळणारा खाऊ?. (५)
२. रात्र होण्या आधी सावकार येण्याची करा खात्री . (४)
३. माकडाला दिसणारी गाय. (३)
४, कळे थोरवी फ़िरता माहिम. (३)
५. मादक शस्त्र? (२)
६. व्यवहार करावा सम प्रमाणामधला (३)
७. मिळालेले नवे आयुष्य उलट सुलट झाले तरी काय फरक पडतो? (५)
संच दुसरा
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. विपरीत भाव. (३)
२. हा दुकानात असतो (३)
३. आनंदून गेल्यावर अनुभवा (३)
४. घराचे रक्षण करणार पण तिच्यापुढे हातबल ! (5, 2)
५. अरे बापरे ! तापाबरोबर हे पण आले काय (3)
६. याला झाडावर पहा (३)
७. तरुणीची नेहमीची समस्या (४)
संच तिसरा
खाली एकूण ७ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ७ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.
सूत्र : ज्ञानाशी निगडीत
1. बकध्यानामुळे
2. दिवाकरपंतांच्या
3. अमरपट्ट्यातून
4. विवाद्यघटनेच्या
5. विषयवासनाधीन
6. एकात्मभावनेमुळे
7. महाप्रलयकारी
संच चौथा
१. अमली मात्रा घेऊन केलेला नैवेद्य (३)
२ पंखसुंदरी वागणूक पाहून रूपांतर करते. (५)
३ सातजणांना दिला पैसा. पहिल्याने दिले साहित्य, शेवटल्याने दिला मृ्त्यू. (3, 3) दोन शब्द ओळखायचे आहेत.
४. वादविवाद करताना साखरेचा खाऊ संपवला नाही तर यात कुटावे. (४)
५. किल्ल्याच्या मागे लक्ष गेल्यास होणारा घोटाळा. (४)
६. दुपारच्या वेळेत आढळणारे पक्षी? (३)
७. डोंगराच्या तळाला गाईचे दूध ठेवणारा गणिततज्ज्ञ. (६)
संच पाचवा
प्र. गाळलेल्या जागा भरा:
खाली भूकंपासंबंधी दहा वाक्ये दिली आहेत. त्यातील गाळलेल्या जागी फक्त एक शब्द भरायचा आहे.
शब्द शोधण्यासाठी पुढील माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
प्रश्न:
१. पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक **व***** बसलेल्या धक्क्याला भूकंप म्हणतात. (७, व)
२. भूकंप तरंग जेथे उगम पावतात त्या स्थानाला **** म्हणतात. (५, प)
३. ****** हे भूकंपाचे एक मानवनिर्मित कारण आहे. (५, चा)
४. भूकंपाच्या मोठ्या धक्क्यांनंतर त्या भागात लहान धक्क्याना ****** म्हणतात.(५, त)
५. भूकंपामुळे झालेल्या खडकांच्या हालचालीला **** म्हणतात. (५, त)
६. भूकंपामुळे बर्फाळ प्रदेशात होतात. (४, लो )
७. ****** हा भूकंपाचा एक विधायक परिणाम आहे (५, नि )
८. भूकंपाचे धक्के ****** या साधनावर नोंदले जात असतात. (६, प)
९. भूकंपाची पूर्वसूचना तात्काळ पोचण्यासाठी ***** व्यवस्था कार्यक्षम असावी लागते. (६, श)
१०. काही सौम्य भूकंपांचे पूर्वानुमान करण्यात ******* यश आले आहे. (६, ज्ञा )
संच सातवा
९ अक्षरी शब्द उपशब्दांसह ओळखा: त्यातील अक्षरांपासून बनणारे उपशब्द खालीलप्रमाणे आहेत. उपशब्द आणि मूळशब्द ओळखायचे आहेत.
शोधसूत्रे ( अक्षर क्रमांकानुसार) :
१२ अगोदरचे
३४ पीस
५६७ अंश.
८९ बरोबर
पूर्ण शब्द : रजेसंबंधी
उत्तर - पूर्वपरवानगीसह
संच आठवा
शब्द ओळखण्यासाठी खूण आणि शब्दातील अक्षरांची संख्या दिले आहेत.
१. बावीस जुलैस हो ला हो दिल्यास मिळणारा आंबा (३)
२. हवा पालट करण्याचा पर्याय दिल्यास होणारी वाखाणणी. (३)
३. मरणाचा कंटाळा आणणारा प्राणी? (४)
४. पौष्टिक खाऊ मिळवण्यास वासु कामे चुकवतो. (४)
संच नववा
खाली दिलेल्या अक्षरांच्या चक्रव्यूहातून ७ मराठी शब्द ओळखायचे आहेत. हे शब्द मराठी भाषेने अन्य भाषांमधून स्वीकारलेले आहेत. प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या (कंसात) आणि तो कोणत्या भाषेतून स्वीकारला आहे ती भाषा ओळखण्याचे शोधसूत्र दिलेले आहे. (भाषेचे नाव किती अक्षरी आहे याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. मुद्दामच ती अक्षरसंख्या दिलेली नाही. शब्द ओळखल्यावर त्याची मूळ भाषा लिहावी).
प्रत्येक अक्षर एकदाच घ्यावे. दिलेली सर्व अक्षरे वापरली गेली पाहिजेत. सर्व उत्तरे एकदम द्यावीत.
र.. था.. ळ .. ड.. णी
क.. ग.. ल.. चो .. ली
क.. स.. द .. र .... र
र .. ट्टे .. ने .. व .. ब
ग .. ला .. मा .. क .. आ
भु .. द .. न .. कु .. र
शोधसूत्रे :
१. महाराष्ट्राशी येता-जाता भांडणाऱ्या राज्याची भाषा ( ओळखायचा शब्द ५ अक्षरी)
२. भारतातील स्थापना कालानुसार सर्वात नवे असलेल्या राज्याची भाषा ( ५ )
३. भारतात उत्तर व दक्षिणेत वाद निर्माण करणारी भारतीय भाषा ( ४ )
४. भारतातील प्रगतिशील राज्याची भाषा (५ )
५. ही भाषा भारत व त्याच्या ‘शेजारी’ देशात सुद्धा बोलली जाते (3)
६. ही ज्या देशाची भाषा आहे तो युरेशियात विस्तारला आहे ( ४)
७. इतिहासात भारतावर आक्रमण केलेल्या एका युरोपीय देशाची भाषा (४)
संच दहावा
संच पाचवा
खाली एकूण ७ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ७ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.
सूत्र : कालदर्शक शब्द
१. परतीचे मार्ग
२. आकाशकंदिलाच्या
३. तहसीलदारांकडे
४. मगजमारीतून
५. कुठपर्यंत नेणार
६. इनमिनतीन
७. कालपरवासारखे
आठ भूकंपमापक.
आठ भूकंपमापक.
२ भूकंपनाभी
२ भूकंपनाभी
३ अणू चाचणी
४ पश्चातधक्के
५ भूमी तरंग
८ भूकंप आलेख
१० भूवैज्ञानिकांना
जयु, तुमची २,३,४,१० ही
जयु, तुमची २,३,४,१० ही उत्तरे बरोबर आहेत.
५ पृष्ठतरंग ८ भूकंपमापक ?
५ पृष्ठतरंग
८ भूकंपमापक ?
जयु, ८ बरोबर.
जयु, ८ बरोबर.
१. वरच्या कवचाला?
१ हा मूळ शब्द नाही. एका
१ हा मूळ शब्द नाही. एका दोन शब्दांच्या संयोगातून बनलेले विशेषण आहे.
५. हे लक्षावधी वर्षे होत आले आहे ; तेही मोठ्या प्रमाणात.
एक गंमत म्हणून वरचा उत्तर
एक गंमत म्हणून वरचा उत्तर आलेला प्रश्न क्रमांक ४ चॅट जीपीटी मध्ये टाकून पाहिला तेव्हा असे उत्तर आले :
प्र. :भूकंपाच्या मोठ्या धक्क्यांनंतर त्या भागातल्या लहान धक्क्याना काय म्हणतात ?
उ : भूकंपाच्या मोठ्या धक्क्यांनंतर लहान धक्क्यांची संभावना बर्तावली जाते की नाही, हे भौतिक विज्ञानाच्या विषयावर अधिक माहिती आणि शोधास आधारित आहे.

१. जाणवण्या एवढा
१. जाणवण्या एवढा
१ बरोबर.
१ बरोबर.
आता ५,६,७,९ राहिलेत.
९ ही सध्या अन्न वस्त्र निवारा यांच्याइतकीच प्राथमिक गरज झाली आहे.
प्रश्न:१. पृथ्वीच्या
प्रश्न:
१. पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक व ***** बसलेल्या धक्क्याला भूकंप म्हणतात. (७, व)२. भूकंप तरंग जेथे उगम पावतात त्या स्थानाला **** म्हणतात. (५, प)३. ****** हे भूकंपाचे एक मानवनिर्मित कारण आहे. (५, चा)४. भूकंपाच्या मोठ्या धक्क्यांनंतर त्या भागात लहान धक्क्याना ****** म्हणतात.(५, त)५. भूकंपामुळे झालेल्या खडकांच्या हालचलीला **** म्हणतात. (५, त)
६. भूकंपामुळे बर्फाळ प्रदेशात होतात. (४, लो )
७. ****** हा भूकंपाचा एक विधायक परिणाम आहे (५, नि )
८. भूकंपाचे धक्के ****** या साधनावर नोंदले जात असतात. (६, प)९. भूकंपाची पूर्वसूचना तात्काळ पोचण्यासाठी ***** व्यवस्था कार्यक्षम असावी लागते. (६, श)
१०. काही सौम्य भूकंपांचे पूर्वानुमान करण्यात ******* यश आले आहे. (६, ज्ञा )९. संदेशवहन
९. संदेशवहन
९ बरोबर.
९ बरोबर.
राहिलेली उत्तर आम्ही सांगू
राहिलेली उत्तर आम्ही सांगू का?
७. लाव्हानिर्मीती ...
७. लाव्हानिर्मीती ... ज्याची कालांतराने सुपिक जमीन होते.
त्यास काही खास शब्द असेल.
६. हिमस्खलनला बर्फलोट हा शब्द सापडला.
हिमलोट.
तुमचा प्रवास योग्य दिशेने
तुमचा प्रवास योग्य दिशेने चालू आहे.
बर्फ आणि हिम यांत फरक आहे का?
जमीन सुपीक कशाने ठरते?
६ वर हिमलोट नंतर लिहिले ते
६ वर हिमलोट नंतर लिहिले ते बरोबर ना?
५. शिलावर्तन?
७. मृदानिर्मिती (शोध शोधून सापडला)
६ हिमलोट बरोबर.
६ हिमलोट बरोबर.
५. हे माणसे, पक्षी, प्राणी सुद्धा करतात.
संच पाच सुटल्यासारखाच आहे.
संच पाच सुटल्यासारखाच आहे.
संच सहावा
. ८ अक्षरी शब्द उपशब्दांसह ओळखा:
त्यातील अक्षरांपासून बनणारे उपशब्द खालीलप्रमाणे आहेत. उपशब्द आणि मूळशब्द ओळखायचे आहेत.
शोधसूत्रे ( अक्षर क्रमांकानुसार) :
१ वर्ण
२३ रोगजन्य प्रक्रिया
३४५ प्राण्याला मारलेली हाक
७८ दगडापासून तयार केलेले
पूर्ण शब्द : झलक
उ दाह रणा ? १ २३ ४५
उ दाह रणा ?
१ २३ ४५
------
उ
दाह
हरणा
खल
उदाहरणादाखल
७ मृदानिर्मिती बरोबर.
७ मृदानिर्मिती बरोबर.
उदाहरणादाखल बरोबर.
संच सातवा
संच सातवा
९ अक्षरी शब्द उपशब्दांसह ओळखा: त्यातील अक्षरांपासून बनणारे उपशब्द खालीलप्रमाणे आहेत. उपशब्द आणि मूळशब्द ओळखायचे आहेत.
शोधसूत्रे ( अक्षर क्रमांकानुसार) :
१२ अगोदरचे
३४ पीस
५६७ अंश.
८९ बरोबर
पूर्ण शब्द : रजेसंबंधी
उत्तर आले आहे.
उत्तर आले आहे.
इतर खेळाडूंसाठी ठेवतो.
जयु, ८ बरोबर. >>> संयोजक मी
जयु, ८ बरोबर. >>> संयोजक मी तेच उत्तर दिलेलं सकाळी. पहीलीच पोस्ट आहे बघा इथली.
होय अंजू, तुमचं उत्तर बरोबर
होय अंजू, तुमचं उत्तर बरोबर होतं. नोंद घ्यायची राहून गेली. क्षमस्व.
१२ अगोदरचे....पूर्व
१२ अगोदरचे....पूर्व
३४ पीस .... पर
५६७ अंश ..वानगी?
८९ बरोबर...युक्त /
पूर्वपरवानगी बरोबर.
पूर्वपरवानगी बरोबर.
पुढची दोन अक्षरे वेगळी आहेत.
पूर्वपरवानगीसह?
पूर्वपरवानगीसह?
बरोबर म्हणजे सह( हा अर्थ नव्हता लक्षात आला आधी. चूक बरोबर मधला बरोबर शोधला आधी)
हो . पूर्वपरवानगीसह.
हो . पूर्वपरवानगीसह.
संच आठवा
संच आठवा
शब्द ओळखण्यासाठी खूण आणि शब्दातील अक्षरांची संख्या दिले आहेत.
१. बावीस जुलैस हो ला हो दिल्यास मिळणारा आंबा (३)
२. हवा पालट करण्याचा पर्याय दिल्यास होणारी वाखाणणी. (३)
३. मरणाचा कंटाळा आणणारा प्राणी? (४)
४. पौष्टिक खाऊ मिळवण्यास वासु कामे चुकवतो. (४)
Pages