मराठी भाषा गौरव दिन २०२३ - खेळ - शब्दशोध
आमचे काही शब्द हरवले आहेत. त्यांचा माग काढायचा आहे. पण त्यांच्या पाउलखुणा इतस्ततः विखुरल्या आहेत ; गूढ संकेतांसारख्या !
मायबोलीकर हरवलेल्या वस्तू , विशेषतः शब्द शोधण्यात किती पारंगत आहेत हे तर अखिल विश्वाला माहीत आहे.
चला तर मग! येताय ना शब्द शोधायला?
संच पहिला
कंसात शब्दातील अक्षरांची संख्या दिली आहे.
१ .छोट्याशा विहीरीत हात घातल्यास मिळणारा खाऊ?. (५)
२. रात्र होण्या आधी सावकार येण्याची करा खात्री . (४)
३. माकडाला दिसणारी गाय. (३)
४, कळे थोरवी फ़िरता माहिम. (३)
५. मादक शस्त्र? (२)
६. व्यवहार करावा सम प्रमाणामधला (३)
७. मिळालेले नवे आयुष्य उलट सुलट झाले तरी काय फरक पडतो? (५)
संच दुसरा
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. विपरीत भाव. (३)
२. हा दुकानात असतो (३)
३. आनंदून गेल्यावर अनुभवा (३)
४. घराचे रक्षण करणार पण तिच्यापुढे हातबल ! (5, 2)
५. अरे बापरे ! तापाबरोबर हे पण आले काय (3)
६. याला झाडावर पहा (३)
७. तरुणीची नेहमीची समस्या (४)
संच तिसरा
खाली एकूण ७ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ७ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.
सूत्र : ज्ञानाशी निगडीत
1. बकध्यानामुळे
2. दिवाकरपंतांच्या
3. अमरपट्ट्यातून
4. विवाद्यघटनेच्या
5. विषयवासनाधीन
6. एकात्मभावनेमुळे
7. महाप्रलयकारी
संच चौथा
१. अमली मात्रा घेऊन केलेला नैवेद्य (३)
२ पंखसुंदरी वागणूक पाहून रूपांतर करते. (५)
३ सातजणांना दिला पैसा. पहिल्याने दिले साहित्य, शेवटल्याने दिला मृ्त्यू. (3, 3) दोन शब्द ओळखायचे आहेत.
४. वादविवाद करताना साखरेचा खाऊ संपवला नाही तर यात कुटावे. (४)
५. किल्ल्याच्या मागे लक्ष गेल्यास होणारा घोटाळा. (४)
६. दुपारच्या वेळेत आढळणारे पक्षी? (३)
७. डोंगराच्या तळाला गाईचे दूध ठेवणारा गणिततज्ज्ञ. (६)
संच पाचवा
प्र. गाळलेल्या जागा भरा:
खाली भूकंपासंबंधी दहा वाक्ये दिली आहेत. त्यातील गाळलेल्या जागी फक्त एक शब्द भरायचा आहे.
शब्द शोधण्यासाठी पुढील माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
प्रश्न:
१. पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक **व***** बसलेल्या धक्क्याला भूकंप म्हणतात. (७, व)
२. भूकंप तरंग जेथे उगम पावतात त्या स्थानाला **** म्हणतात. (५, प)
३. ****** हे भूकंपाचे एक मानवनिर्मित कारण आहे. (५, चा)
४. भूकंपाच्या मोठ्या धक्क्यांनंतर त्या भागात लहान धक्क्याना ****** म्हणतात.(५, त)
५. भूकंपामुळे झालेल्या खडकांच्या हालचालीला **** म्हणतात. (५, त)
६. भूकंपामुळे बर्फाळ प्रदेशात होतात. (४, लो )
७. ****** हा भूकंपाचा एक विधायक परिणाम आहे (५, नि )
८. भूकंपाचे धक्के ****** या साधनावर नोंदले जात असतात. (६, प)
९. भूकंपाची पूर्वसूचना तात्काळ पोचण्यासाठी ***** व्यवस्था कार्यक्षम असावी लागते. (६, श)
१०. काही सौम्य भूकंपांचे पूर्वानुमान करण्यात ******* यश आले आहे. (६, ज्ञा )
संच सातवा
९ अक्षरी शब्द उपशब्दांसह ओळखा: त्यातील अक्षरांपासून बनणारे उपशब्द खालीलप्रमाणे आहेत. उपशब्द आणि मूळशब्द ओळखायचे आहेत.
शोधसूत्रे ( अक्षर क्रमांकानुसार) :
१२ अगोदरचे
३४ पीस
५६७ अंश.
८९ बरोबर
पूर्ण शब्द : रजेसंबंधी
उत्तर - पूर्वपरवानगीसह
संच आठवा
शब्द ओळखण्यासाठी खूण आणि शब्दातील अक्षरांची संख्या दिले आहेत.
१. बावीस जुलैस हो ला हो दिल्यास मिळणारा आंबा (३)
२. हवा पालट करण्याचा पर्याय दिल्यास होणारी वाखाणणी. (३)
३. मरणाचा कंटाळा आणणारा प्राणी? (४)
४. पौष्टिक खाऊ मिळवण्यास वासु कामे चुकवतो. (४)
संच नववा
खाली दिलेल्या अक्षरांच्या चक्रव्यूहातून ७ मराठी शब्द ओळखायचे आहेत. हे शब्द मराठी भाषेने अन्य भाषांमधून स्वीकारलेले आहेत. प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या (कंसात) आणि तो कोणत्या भाषेतून स्वीकारला आहे ती भाषा ओळखण्याचे शोधसूत्र दिलेले आहे. (भाषेचे नाव किती अक्षरी आहे याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. मुद्दामच ती अक्षरसंख्या दिलेली नाही. शब्द ओळखल्यावर त्याची मूळ भाषा लिहावी).
प्रत्येक अक्षर एकदाच घ्यावे. दिलेली सर्व अक्षरे वापरली गेली पाहिजेत. सर्व उत्तरे एकदम द्यावीत.
र.. था.. ळ .. ड.. णी
क.. ग.. ल.. चो .. ली
क.. स.. द .. र .... र
र .. ट्टे .. ने .. व .. ब
ग .. ला .. मा .. क .. आ
भु .. द .. न .. कु .. र
शोधसूत्रे :
१. महाराष्ट्राशी येता-जाता भांडणाऱ्या राज्याची भाषा ( ओळखायचा शब्द ५ अक्षरी)
२. भारतातील स्थापना कालानुसार सर्वात नवे असलेल्या राज्याची भाषा ( ५ )
३. भारतात उत्तर व दक्षिणेत वाद निर्माण करणारी भारतीय भाषा ( ४ )
४. भारतातील प्रगतिशील राज्याची भाषा (५ )
५. ही भाषा भारत व त्याच्या ‘शेजारी’ देशात सुद्धा बोलली जाते (3)
६. ही ज्या देशाची भाषा आहे तो युरेशियात विस्तारला आहे ( ४)
७. इतिहासात भारतावर आक्रमण केलेल्या एका युरोपीय देशाची भाषा (४)
संच दहावा
संच पाचवा
खाली एकूण ७ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ७ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.
सूत्र : कालदर्शक शब्द
१. परतीचे मार्ग
२. आकाशकंदिलाच्या
३. तहसीलदारांकडे
४. मगजमारीतून
५. कुठपर्यंत नेणार
६. इनमिनतीन
७. कालपरवासारखे
ओके... ३. रोमांच
ओके...
३. रोमांच
मला काटा हा एक समान धागा
मला काटा हा एक समान धागा वाटला. तराजू >> वजन काटा.
आनंदाने रोमांच येणे - अंगावर काटा येणे?
तापात पण पुरळ, वावडे?
काटा झाडावर पण असतो.
हाहा - बघा, ग्रेट माइंड्स!
हाहा - बघा, ग्रेट माइंड्स!
चला निदान उत्तर बरोबर नसले
चला निदान उत्तर बरोबर नसले तरी निदान कंपू एक सारखाच विचार करतो ते दिसले
पण काटा असेल तर साधासोपा चमचा
पण काटा असेल तर साधासोपा चमचा - काटा अर्थ का नाही घेतला?
मराठी मातीतले नाहीत ना ते!
मराठी मातीतले नाहीत ना ते!
नाही... त्याच्या समानार्थी
नाही... त्याच्या समानार्थी शब्दांची जंत्री आहे. काट्याला (फोर्कला) मराठी समानार्थी शब्द नसेलच. आणि त्यांना काटा शब्द उत्तर येईल असं सांगायचा नसेल.
#फुकटचंरिवर्सइंजिनिअरिंग
हो, बरोबर.
हो, बरोबर.

मग समाज'कंटक' वगैरेतरी? की ते झाडावरचे कंटकच आहेत?
घराचे रक्षक कडीकोयंडा का मग?
६: झाडावर काट्याला समानार्थी
६: झाडावर काट्याला समानार्थी काय असतं? ३ अक्षरी
कंटक येप!
कंटक येप!
आता खेळाचा दुसरा संच
आता खेळाचा दुसरा संच
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. विपरीत भाव. (३)
२. हा दुकानात असतो (३)
३. आनंदून गेल्यावर अनुभवा (३)
४. घराचे रक्षण करणार पण तिच्यापुढे हातबल ! (5, 2)
५. अरे बापरे ! तापाबरोबर हे पण आले काय (3)
६. याला झाडावर पहा (३)
७. तरुणीची नेहमीची समस्या (४)
(सारखं मागे जाऊन बघायला नको.
)
१. विपरीत भाव. (३) - शिसारी??
१. विपरीत भाव. (३) - शिसारी??
३. आनंदून गेल्यावर अनुभवा (३)
३. आनंदून गेल्यावर अनुभवा (३)
रोमांच, हे उत्तर बरोबर आहे.
५. अरे बापरे ! तापाबरोबर हे पण आले काय (3)
पुरळ, हे उत्तर बरोबर आहे.
१. विपरीत भाव. (३)
१. विपरीत भाव. (३)
२
. हा दुकानात असतो (३). तराजू३.
आनंदून गेल्यावर अनुभवा (३)रोमांच४. घराचे रक्षण करणार पण तिच्यापुढे हतबल ! (5, 2)
५.
अरे बापरे ! तापाबरोबर हे पण आले काय (3)पुरळ६. याला झाडावर पहा (३)
७. तरुणीची नेहमीची समस्या (४)
आंतरजालावरील दाते शब्दकोशात
आंतरजालावरील दाते शब्दकोशात शोधल्यास उत्तर मिळवणे सोपे जाईल.
मला काटा हा एक समान धागा
मला काटा हा एक समान धागा वाटला. >>>>
योग्य दिशेने सुरू आहे.
७. मुरूम
७. मुरूम
विपरित भाव कंटाळा का?
विपरित भाव कंटाळा का?
७. चार अक्षरी शब्द आहे.
७. चार अक्षरी शब्द आहे.
कंटाळा, नाही.
घ्या! दातेदेखील कांटाळा
घ्या! दातेदेखील कांटाळा म्हणतायत!
नाहीच होय! जौद्या!
४. वास्तु पुरूष
४. वास्तु पुरूष
१- विपरीत भाव - विकट?
१- विपरीत भाव - विकट?
७ - पुटकुळी?
४. वास्तु पुरूष
४. वास्तु पुरूष
नाही. यात दोन शब्द आहेत, पहिला पाच अक्षरांचा व दुसरा दोन.
७: शिरशिरी?
७: शिरशिरी?
७ला पुटकुळी म्हटलेलं पण संयोजक स्ट्राईक औट नाय करत.
ओह मला वाटले दोन वेगळे शब्द
ओह मला वाटले दोन वेगळे शब्द आणि टोटल पाच अक्षरे.
१- विपरीत भाव - विकट?
१- विपरीत भाव - विकट?
७ - पुटकुळी?
नाही.
६. मोहोर?
६. मोहोर?
४. कुलुपादिका खिळा ... अर्थ
४. कुलुपादिका खिळा ... अर्थ मला विचारू नका. दाते म्हणतात ६ कुलुपादिकाचा खिळा, जो कुलुपाच्या दांडींत बसतो व मागें सरतो तो
कॉपी करायची पर्मिशन आहे म्हटल्यावर भोआकफ
६. मोहोर
६. मोहोर
६. मोहोर , बरोबर आहे.
६. मोहोर , बरोबर आहे.
४.कुलपातला खिळा , बरोबर आहे.
Pages