मराठी भाषा गौरव दिन २०२३ - खेळ - शब्दशोध

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 27 February, 2023 - 08:03

मराठी भाषा गौरव दिन २०२३ - खेळ - शब्दशोध

आमचे काही शब्द हरवले आहेत. त्यांचा माग काढायचा आहे. पण त्यांच्या पाउलखुणा इतस्ततः विखुरल्या आहेत ; गूढ संकेतांसारख्या !
मायबोलीकर हरवलेल्या वस्तू , विशेषतः शब्द शोधण्यात किती पारंगत आहेत हे तर अखिल विश्वाला माहीत आहे.

चला तर मग! येताय ना शब्द शोधायला?

संच पहिला

कंसात शब्दातील अक्षरांची संख्या दिली आहे.

१ .छोट्याशा विहीरीत हात घातल्यास मिळणारा खाऊ?. (५)
२. रात्र होण्या आधी सावकार येण्याची करा खात्री . (४)
३. माकडाला दिसणारी गाय. (३)
४, कळे थोरवी फ़िरता माहिम. (३)
५. मादक शस्त्र? (२)
६. व्यवहार करावा सम प्रमाणामधला (३)
७. मिळालेले नवे आयुष्य उलट सुलट झाले तरी काय फरक पडतो? (५)

संच दुसरा

एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. विपरीत भाव. (३)
२. हा दुकानात असतो (३)
३. आनंदून गेल्यावर अनुभवा (३)
४. घराचे रक्षण करणार पण तिच्यापुढे हातबल ! (5, 2)
५. अरे बापरे ! तापाबरोबर हे पण आले काय (3)
६. याला झाडावर पहा (३)
७. तरुणीची नेहमीची समस्या (४)

संच तिसरा

खाली एकूण ७ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ७ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.

सूत्र : ज्ञानाशी निगडीत
1. बकध्यानामुळे
2. दिवाकरपंतांच्या
3. अमरपट्ट्यातून
4. विवाद्यघटनेच्या
5. विषयवासनाधीन
6. एकात्मभावनेमुळे
7. महाप्रलयकारी

संच चौथा

१. अमली मात्रा घेऊन केलेला नैवेद्य (३)

२ पंखसुंदरी वागणूक पाहून रूपांतर करते. (५)

३ सातजणांना दिला पैसा. पहिल्याने दिले साहित्य, शेवटल्याने दिला मृ्त्यू. (3, 3) दोन शब्द ओळखायचे आहेत.

४. वादविवाद करताना साखरेचा खाऊ संपवला नाही तर यात कुटावे. (४)

५. किल्ल्याच्या मागे लक्ष गेल्यास होणारा घोटाळा. (४)

६. दुपारच्या वेळेत आढळणारे पक्षी? (३)

७. डोंगराच्या तळाला गाईचे दूध ठेवणारा गणिततज्ज्ञ. (६)

संच पाचवा

प्र. गाळलेल्या जागा भरा:
खाली भूकंपासंबंधी दहा वाक्ये दिली आहेत. त्यातील गाळलेल्या जागी फक्त एक शब्द भरायचा आहे.
शब्द शोधण्यासाठी पुढील माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).

प्रश्न:
१. पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक **व***** बसलेल्या धक्क्याला भूकंप म्हणतात. (७, व)

२. भूकंप तरंग जेथे उगम पावतात त्या स्थानाला **** म्हणतात. (५, प)

३. ****** हे भूकंपाचे एक मानवनिर्मित कारण आहे. (५, चा)

४. भूकंपाच्या मोठ्या धक्क्यांनंतर त्या भागात लहान धक्क्याना ****** म्हणतात.(५, त)

५. भूकंपामुळे झालेल्या खडकांच्या हालचालीला **** म्हणतात. (५, त)

६. भूकंपामुळे बर्फाळ प्रदेशात होतात. (४, लो )

७. ****** हा भूकंपाचा एक विधायक परिणाम आहे (५, नि )

८. भूकंपाचे धक्के ****** या साधनावर नोंदले जात असतात. (६, प)

९. भूकंपाची पूर्वसूचना तात्काळ पोचण्यासाठी ***** व्यवस्था कार्यक्षम असावी लागते. (६, श)

१०. काही सौम्य भूकंपांचे पूर्वानुमान करण्यात ******* यश आले आहे. (६, ज्ञा )

संच सातवा

९ अक्षरी शब्द उपशब्दांसह ओळखा: त्यातील अक्षरांपासून बनणारे उपशब्द खालीलप्रमाणे आहेत. उपशब्द आणि मूळशब्द ओळखायचे आहेत.

शोधसूत्रे ( अक्षर क्रमांकानुसार) :

१२ अगोदरचे
३४ पीस
५६७ अंश.
८९ बरोबर

पूर्ण शब्द : रजेसंबंधी

उत्तर - पूर्वपरवानगीसह

संच आठवा

शब्द ओळखण्यासाठी खूण आणि शब्दातील अक्षरांची संख्या दिले आहेत.

१. बावीस जुलैस हो ला हो दिल्यास मिळणारा आंबा (३)

२. हवा पालट करण्याचा पर्याय दिल्यास होणारी वाखाणणी. (३)

३. मरणाचा कंटाळा आणणारा प्राणी? (४)

४. पौष्टिक खाऊ मिळवण्यास वासु कामे चुकवतो. (४)

संच नववा

खाली दिलेल्या अक्षरांच्या चक्रव्यूहातून ७ मराठी शब्द ओळखायचे आहेत. हे शब्द मराठी भाषेने अन्य भाषांमधून स्वीकारलेले आहेत. प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या (कंसात) आणि तो कोणत्या भाषेतून स्वीकारला आहे ती भाषा ओळखण्याचे शोधसूत्र दिलेले आहे. (भाषेचे नाव किती अक्षरी आहे याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. मुद्दामच ती अक्षरसंख्या दिलेली नाही. शब्द ओळखल्यावर त्याची मूळ भाषा लिहावी).

प्रत्येक अक्षर एकदाच घ्यावे. दिलेली सर्व अक्षरे वापरली गेली पाहिजेत. सर्व उत्तरे एकदम द्यावीत.
र.. था.. ळ .. ड.. णी
क.. ग.. ल.. चो .. ली
क.. स.. द .. र .... र
र .. ट्टे .. ने .. व .. ब
ग .. ला .. मा .. क .. आ
भु .. द .. न .. कु .. र

शोधसूत्रे :

१. महाराष्ट्राशी येता-जाता भांडणाऱ्या राज्याची भाषा ( ओळखायचा शब्द ५ अक्षरी)

२. भारतातील स्थापना कालानुसार सर्वात नवे असलेल्या राज्याची भाषा ( ५ )

३. भारतात उत्तर व दक्षिणेत वाद निर्माण करणारी भारतीय भाषा ( ४ )

४. भारतातील प्रगतिशील राज्याची भाषा (५ )

५. ही भाषा भारत व त्याच्या ‘शेजारी’ देशात सुद्धा बोलली जाते (3)

६. ही ज्या देशाची भाषा आहे तो युरेशियात विस्तारला आहे ( ४)

७. इतिहासात भारतावर आक्रमण केलेल्या एका युरोपीय देशाची भाषा (४)

संच दहावा

संच पाचवा

खाली एकूण ७ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ७ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.

सूत्र : कालदर्शक शब्द

१. परतीचे मार्ग
२. आकाशकंदिलाच्या
३. तहसीलदारांकडे
४. मगजमारीतून
५. कुठपर्यंत नेणार
६. इनमिनतीन
७. कालपरवासारखे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संच नववा

खाली दिलेल्या अक्षरांच्या चक्रव्यूहातून ७ मराठी शब्द ओळखायचे आहेत. हे शब्द मराठी भाषेने अन्य भाषांमधून स्वीकारलेले आहेत. प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या (कंसात) आणि तो कोणत्या भाषेतून स्वीकारला आहे ती भाषा ओळखण्याचे शोधसूत्र दिलेले आहे. (भाषेचे नाव किती अक्षरी आहे याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. मुद्दामच ती अक्षरसंख्या दिलेली नाही. शब्द ओळखल्यावर त्याची मूळ भाषा लिहावी).

प्रत्येक अक्षर एकदाच घ्यावे. दिलेली सर्व अक्षरे वापरली गेली पाहिजेत.
र.. था.. ळ .. ड.. णी
क.. ग.. ल.. चो .. ली
क.. स.. द .. र .... र
र .. ट्टे .. ने .. व .. ब
ग .. ला .. मा .. क .. आ
भु .. द .. न .. कु .. र

शोधसूत्रे :

१. महाराष्ट्राशी येता-जाता भांडणाऱ्या राज्याची भाषा ( ओळखायचा शब्द ५ अक्षरी)

२. भारतातील स्थापनाकालानुसार सर्वात नवे असलेल्या राज्याची भाषा ( ५ )

३. भारतात उत्तर व दक्षिणेत वाद निर्माण करणारी भारतीय भाषा ( ४ )

४. भारतातील प्रगतिशील राज्याची भाषा (५ )

५. ही भाषा भारत व त्याच्या ‘शेजारी’ देशात सुद्धा बोलली जाते (3)

६. ही ज्या देशाची भाषा आहे तो युरेशियात विस्तारला आहे ( ४)

७. इतिहासात भारतावर आक्रमण केलेल्या एका युरोपीय देशाची भाषा (४)

संच आठवा

1. पायरी
2. वाहवा
3. काळवीट
4. सुकामेवा

क्षमा वगैरे मागू नका हो. नजरचुकीने होतं असं. एवढं काही नाही. त्यात मी आकडा अक्षरात लिहिला होता.

संयोजक
एकदम दोन संच लागोपाठ आले आहेत

संच आठवा

1. पायरी
2. वाहवा
3. काळवीट
4. सुकामेवा

कुमार१, चारही उत्तरे बरोबर आहेत.

४. भारतातील प्रगतिशील राज्याची भाषा (५ ) >>> मलयालम

७. इतिहासात भारतावर आक्रमण केलेल्या एका युरोपीय देशाची भाषा (४) >>> पोर्तुगीज

लोकहो,
संयोजकांची सूचना बघा:

(भाषेचे नाव किती अक्षरी आहे याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. मुद्दामच ती अक्षरसंख्या दिलेली नाही.

अक्षरसंख्या शब्दाची आहे.

नवव्यातील काहीच झेपत नाहीये. हुषार लोकांनी थोडे शब्द उडवले की येतो Proud
एक थाळ दिसतंय. मोहनथाळ माहित आहे... आणखी थाळ असतील तर सांगा लोकहो.
बाकी हे शब्द कशाशी निगडीत आहेत का?

तुम्ही दिलेली अक्षरं वापरायची तर ३ अक्षरी शब्द कसा होईल?
काहीतरी गडबड आहे नियमांत.
>>> भाषेचे नाव किती अक्षरी आहे याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. मुद्दामच ती अक्षरसंख्या दिलेली नाही
नक्की का?

नियम बरोबर आहेत, जरा गोंधळात टाकणारे आहेत. पण बरोबर आहेत. एकून तीस अक्षरे आहेत आणि त्या सात शब्दांची बेरीज तीस होते आहे. मी पण आधी सॅनिटी, कॉर्नर केसेस चेक करुन बग इनव्हॅलिड होतोय का तेच बघितलेलं. Proud
ती अक्षर संख्या भाषेच्या नावाची नाही तर त्या भाषेतून आलेल्या शब्दाच्या नावाची आहे. Proud

अगं एका रांगेत ५ अक्षरे आहेत आणि एकून सहा रांगा आहेत याला शून्य किंमत आहे. त्या मॅट्रिक्स फॉर्मॅट मुळे घोळ होतोय. पण तिथे एकून ३० शब्दांची भेळ आहे.
(हे माझं अनुमान आहे. चुकीचं असेल तर सांगा हो संयोजक)

काही शब्दांचे अर्थ दाखवणार्‍या वाटा

एक आडनाव
मंगलकार्याशी संबंधित एक प्रसंग
या सारख्या उच्चाराचा आणि अर्थाचाही शब्द मराठीत आहे
अशाच उच्चाराचा आणि अर्थाचा शब्द इंग्रजी व अन्य काही भाषांतही आहे.
यंदा ज्यांची जन्मशताब्दी आहे असे एक लेखक या लिहीत .

हो एकूण दिलेल्या ३० अक्षरांमधून ७ शब्द शोधायचेत. वेगवेगळ्या भाषांतून मराठीत रुळलेले.( असे दिसतेय)

<एका रांगेत ५ अक्षरे आहेत आणि एकून सहा रांगा आहेत याला शून्य किंमत आहे> बरोबर.
तिथे एकून ३० शब्दांची अक्षरांची भेळ आहे.

पूर्वी शब्दरंजन धाग्यांवर आम्ही हे खेळ खेळलेलो आहोत म्हणून एक सूचना .
आता ब, द आणि ली ही तीन अक्षरे जी वापरली गेली आहेत ती काढून टाकायची. उरलेल्या 27 मध्ये बाकीचे शोधायचे

भाषा शोधून थांबायचे नाही. त्या भाषेतून मराठीत आलेले शब्द शोधायचे आहेत. >>> ओहह मला खेळ कळलाच नाही.

थोडी अवांतर आणि रोचक माहिती
काल सोडवलेल्या दुसर्‍या संचातील काटा या शब्दाबद्दल
दातेकृत महाराष्ट्र शब्दकोशात त्याचे एवढे सारे अर्थ आहेत
त्यातील पहिला समानार्थी शब्द व्यत्यय हा होता आणि दाते कृत शब्दकोशात त्याचा एक अर्थ विपरीत भाव असा आहे.
मात्र वा.गो. आपटे कृत मराठी शब्दकोशात व्यत्यय = अडथळा, प्रतिबंध एवढाच अर्थ आहे.
विपरीत अर्थ या साठी व्यतिक्रम, व्यत्यास हे शब्द दोन्ही शब्दकोशांत आहेत.

Pages