
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बारा होता."
"नाचता येईना अंगण वाकडे."
"गाढवाला गुळाची चव काय?"
ही आणि अशी ठसकेदार वाक्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, कधी आजी-आजोबांकडून, तर कधी आई-बाबांकडून. मग शाळेत चौथी पाचवीला मराठी व्याकरण शिकताना कळते की ह्यांना "म्हणी" म्हणतात.
"म्हण" म्हणजे नेहेमीच्या व्यवहारात म्हटले जाणारे सरळ सोपे वाक्य. ते वर्षानुवर्षाच्या अनुभवातून, जगराहाटीतून तयार झालेले असते आणि त्याचा अन्वयार्थ सर्वमान्य असतो. एक छोटीशी म्हण आपल्याला बराच मोठा गाभा सांगून जाते, जसे की, तत्कालीन परिस्थिती, त्यात गुंफलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव वगैरे वगैरे.
अशा शेकडो म्हणी मराठीत आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांना आठवूया आणि खेळूया म्हणींच्या भेंड्या. आपण गाण्यांच्या भेंड्या खेळत आलो आहोत, तश्याच. पण यात थोडी भर किंवा बदल म्हणून आधीच्या म्हणीत आलेला एखादा शब्द किंवा त्या म्हणीतले शेवटचे अक्षर घेऊन पुढची म्हण लिहावी.
समजा, पहिली म्हण दिली असेल,
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता."
तर पुढचा लिहील,
"तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे."
किंवा
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ.
सर्वसामान्यपणे भेंड्यांच्या खेळात ण चा न होतो. त्यामुळे मग पुढची,
"नाचता येईना अंगण वाकडे "
... आणि हा खेळ सुरूच राहील.
चला तर मग, खेळूया, म्हणींच्या भेंड्या.
तुला ना मला,घाल कुत्र्याला
तुला ना मला,घाल कुत्र्याला
ते ड्याचा रंग तीन दिवस..
ते ड्याचा रंग तीन दिवस..
उचलले बोट बडवला कळफलक
उचलले बोट बडवला कळफलक
छंदीफंदी च्या म्हणीतला दिवस
छंदीफंदी च्या म्हणीतला दिवस शब्द घेते
दिवस गेला उटारेटी, चांदण्याखाली कापूस शिंपी.
अंजु तुमच्या म्हणीतला दिवस
अंजु तुमच्या म्हणीतला दिवस घेऊन same त्याच अर्थाची म्हण,
दिवस गेला रेटा रेटी अर्ध्या रात्री पापड लाटी
माझ्या मैत्रिणीची आई म्हणायची आम्हाला, परीक्षेला जाताना चा आमचा अभ्यास पाहून
मस्तच.
मस्तच.
रात्र थोडी, सोंगं फार !
रात्र थोडी, सोंगं फार !
राजाचे घोडे आणि खासदार उडे
राजाचे घोडे आणि खासदार उडे
रोज घालतो शिव्या आणि एकादशीला
रोज घालतो शिव्या आणि एकादशीला गातो ओव्या.
विचारांची तूट तिथे भाषणाला ऊत
विचारांची तूट तिथे भाषणाला ऊत
तळे राखील तो पाणी चाखील
तळे राखील तो पाणी चाखील
लग्नाला गेली आणि बारशाला आली
लग्नाला गेली आणि बारशाला आली
लाथ मारीन तिथे पाणी काढीन.
लाथ मारीन तिथे पाणी काढीन.
नाव गंगाबाई न रांजणात पाणी
नाव गंगाबाई न रांजणात पाणी नाही
हात दाखवून अवलक्षण
हात दाखवून अवलक्षण
नाचता येईना अंगण वाकडे, चूल
नाचता येईना अंगण वाकडे, चूल पेटेना ओली लाकडे
सुक्याबरोबर ओलंही जळतं.
सुक्याबरोबर ओलंही जळतं.
ज्याचं जळत त्यालाच कळत
ज्याचं जळत त्यालाच कळत
त वरून ताकभात
त वरून ताकभात
शितावरून भाताची परीक्षा
शितावरून भाताची परीक्षा
असतील शित तिथं जमतील भुतं
असतील शित तिथं जमतील भुतं
तीन तिघाडा काम बिघाडा.
तीन तिघाडा काम बिघाडा.
अती तिथं मती
अती तिथं मती
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
शहाण्याला शब्दांचा मार.
शहाण्याला शब्दांचा मार.
मी मारल्यासारखे करतो तो
मी मारल्यासारखे करतो तो रडल्यासरख कर
राजा बोले, दळ हाले.
राजा बोले, दळ हाले.
बोलेल तो करेल काय अन गरजेल तो
बोलेल तो करेल काय अन गरजेल तो पडेल काय
मारणाऱ्याची काठी धरता येते,
मारणाऱ्याची काठी धरता येते, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही.
लहान तोंडी मोठा घास
लहान तोंडी मोठा घास
Pages