
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बारा होता."
"नाचता येईना अंगण वाकडे."
"गाढवाला गुळाची चव काय?"
ही आणि अशी ठसकेदार वाक्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, कधी आजी-आजोबांकडून, तर कधी आई-बाबांकडून. मग शाळेत चौथी पाचवीला मराठी व्याकरण शिकताना कळते की ह्यांना "म्हणी" म्हणतात.
"म्हण" म्हणजे नेहेमीच्या व्यवहारात म्हटले जाणारे सरळ सोपे वाक्य. ते वर्षानुवर्षाच्या अनुभवातून, जगराहाटीतून तयार झालेले असते आणि त्याचा अन्वयार्थ सर्वमान्य असतो. एक छोटीशी म्हण आपल्याला बराच मोठा गाभा सांगून जाते, जसे की, तत्कालीन परिस्थिती, त्यात गुंफलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव वगैरे वगैरे.
अशा शेकडो म्हणी मराठीत आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांना आठवूया आणि खेळूया म्हणींच्या भेंड्या. आपण गाण्यांच्या भेंड्या खेळत आलो आहोत, तश्याच. पण यात थोडी भर किंवा बदल म्हणून आधीच्या म्हणीत आलेला एखादा शब्द किंवा त्या म्हणीतले शेवटचे अक्षर घेऊन पुढची म्हण लिहावी.
समजा, पहिली म्हण दिली असेल,
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता."
तर पुढचा लिहील,
"तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे."
किंवा
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ.
सर्वसामान्यपणे भेंड्यांच्या खेळात ण चा न होतो. त्यामुळे मग पुढची,
"नाचता येईना अंगण वाकडे "
... आणि हा खेळ सुरूच राहील.
चला तर मग, खेळूया, म्हणींच्या भेंड्या.
राजा बोले, दळ हाले.
राजा बोले, दळ हाले.
रात्री खाते तूप, सकाळी पाहते
रात्री खाते तूप, सकाळी पाहते रूप
जो खाईल तूप त्याला येईल रूप.
जो खाईल तूप त्याला येईल रूप.
पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
नको नको म्हणायचं आणि पायलीचं
नको नको म्हणायचं आणि पायलीचं हाणायचं
चोराच्या मनात चांदणं .
चोराच्या मनात चांदणं .
नळी फुंकली सोनारे, इकडून
नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे
इकडे आड तिकडे विहीर
इकडे आड तिकडे विहीर
आडात नाही तर पोहऱ्यात कुठून
आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?
रिकामा न्हावी भिंतीला
रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.
वड्याच तेल वांग्यावर.
वड्याच तेल वांग्यावर.
तेलही गेलं, तुपही गेलं, हाती
तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धुपाटणं (किंवा हाती धुपाटणं आलं असं दोन्ही म्हणतात).
खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.
खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.
खायला कोंडा निजेला धोंडा
खायला कोंडा निजेला धोंडा
खायला काळ, भुईला भार.
खायला काळ, भुईला भार.
काळ आला होता पण वेळ आली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
चहाला वेळ लागत नाही, पण
चहाला वेळ लागत नाही, पण वेळेला चहाच लागतो
(No subject)
वेळेला केळं आणि उपासाला
वेळेला केळं आणि उपासाला सीताफळं
लहान तोंडी मोठा घास
लहान तोंडी मोठा घास
सुसरबाई तुझी पाठ मऊ
सुसरबाई तुझी पाठ मऊ
ऊस गोड लागला म्हणून मुळासकट
ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये/ खायचा नाही.
ये रे माझ्या मागल्या आणि ताक
ये रे माझ्या मागल्या आणि ताक कण्या चांगल्या
ताकाला गेल्यावर भांड का
ताकाला गेल्यावर भांड का लपवायचे.
ताकाला गेल्यावर भांड का
ताकाला गेल्यावर भांड का लपवायचे.
चोराच्या उलट्या बोंबा.
चोराच्या उलट्या बोंबा.
चोरा वर मोर
चोरा वर मोर
चोरीचा मामला हळूहळू बोंबला
चोरीचा मामला हळूहळू बोंबला
चोरून पोळी बोंबलून तूप
चोरून पोळी बोंबलून तूप
पेराव्ह तस उगवते.
पेरावें तस उगवते.
Pages