‘मराठी बाणा’ आणि ‘मराठीपणा’

Submitted by अनिंद्य on 1 January, 2023 - 04:35

अनेक दिवसांपासून मला असलेला प्रश्न इथे मांडायचे धाडस करतो आहे. 'मराठी बाणा', 'मराठमोळा/ळी', ‘मराठीपणा’ (हो, हा शब्द अनेकदा ऐकतो), मराठी संस्कृती हे शब्द अनेकदा कानावर पडतात. प्रत्येकवेळी वेगवेगळा अर्थ / अर्थछटा असल्याचे लक्षात येते, अर्थ संदर्भाप्रमाणे बदलतो हे ही. पण मुळात 'मराठी बाणा' म्हणजे काय, त्याचा अर्थ मराठी आणि अ-मराठी व्यक्ती काय घेतात असा प्रश्न मला आहे.

थोडे संशोधन म्हणून आधी 'बाणा' या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ बघितला. "ठराविक वर्तनक्रम" अशी एका शब्दात बोळवण केलीन त्यांनी. धिस इज नॉट फेयर, चालबे ना, चालणार नाही, खपवून घेतले जाणार नाही Happy

आणखी काही दुसरे शब्दकोश बघितले मग, त्यातले अर्थ :-

- स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.

- अभिमान; शेखी; आढ्यता; डौल (एखाद्या विशेष गुणाचा, अधिकाराचा इ॰).

- लाकडी मूठ व जाड धारेचे पान असलेला पट्टा; एक हत्यार.

- जन्म-स्वभाव; मनःस्थिती

- वस्त्राच्या विणीतील आडवा धागा

एवढे सगळे अर्थ असूनही 'मराठी बाणा' किंवा 'मराठीपण' त्यात सामावत नाही असे वाटले. काय बघून आपण / इतरजण आपले 'मराठीपण' ओळखत असतील ? मराठी भाषा तर आहेच. आपले खानपान? कपडेपट? सण समारंभ, लग्न सोहळे? गणेशोत्सव? मंगळागौर, दहीहंडी? कोळी नृत्य, भावगीते? लावणी अन तमाशा ? पंढरीची वारी? शिवरायांचा गौरवशाली इतिहास, गडकिल्ले? ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग?

मराठीजन महाराष्ट्रात आहेत तसे देशभर-जगभर विखुरले आहेत. इतर मराठी आणि अमराठी बांधवांशी त्यांचा भरपूर संपर्क आहे / असावा. तर मंडळी, तुमच्या मते 'मराठी बाणा' म्हणजे काय ? ‘मराठीपणा’ची खास अशी लक्षणे कोणती ? अन्य मराठी -अमराठी लोकं 'मराठी' म्हणून आपल्यात काय बघतात / नोटीस करतात असे तुम्हाला वाटते? तुमचे निरीक्षण, विचार आणि अनुभव जाणून घ्यायला उत्सुक !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांना असलीच ही मराठी वाटते. >> पण मग शाळेत बरोबर मराठी शिकवायची की अशी भाषा ? लोकांची भाषा खराब आहे मग आपण शालेय पुस्तके पण त्याच भाषेत तयार करू असे काही सुरू आहे का?

… निव्वळ त्या कवितेला दोष देणे योग्य नसून एकूणच मराठीबाबतची अनास्था, उदासीनता…

+१

सहमत.

रोगाचे लक्षण आणि रोगाचे कारण हे वेगवेगळे विषय आहेत.

कविता हास्यास्पद आहेच, पण विषय अजून डीप आहे. इतके वाभाडे निघूनही धोरणकर्ते कविता, कवितेची निवड आणि त्यातील भाषा (!) याचे समर्थन करत आहेत हे जास्त दुर्दैवी नाही का ?

>>> लोकांची भाषा खराब आहे मग आपण शालेय पुस्तके पण त्याच भाषेत तयार करू असे काही सुरू आहे का?

अगदी सहमत आहे. प्राथमिक पातळीवरच शुद्धता पाळली जायला हवी. मात्र, असे ज्यांना वाटू शकेल असे लोक आता त्या ठिकाणी नसावेत.

(पूर्वी भावे यांची ती कविता घेण्याचे इतर काही कारण असल्यास -- पैसा, प्रभाव वगैरे -- माहीत नाही)

>>> वर पुन्हा कोशिष पण चुकतंय

तो माझ्याकडून झालेला टायपो आहे. कोशिश हवे आहे. Prediction वर ष आला व कंटाळून मी तोच डकवला.

(कोशिश हेही चुकीचे असल्यास अवश्य सांगावेत)

मात्र, हा संवाद माझ्यादेखत झालेला आहे. यात अतिरेक नाही.

तुमचा प्रतिसाद आल्यानंतर PTO झाल्यामुळे तुमचा प्रतिसाद आत्ता बघितला व म्हणून उशीर झाला

पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरीत लिहीलेली कविता घेतली आहे यात तारतम्य सांभाळले गेले आहे असे वाटत नाही का ?
जर ती कविता बीए मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी असती तर ?

हिंदी भाषेच्या पाठ्यपुस्तकात "भीगे होंठ तेरे" आहे का पहायला पाहीजे.

माझे गृहीतक!

बालकविता = अक्षर ओळख असलेल्या लहान मुलांना हे कळावे की पद्य म्हणून एक असते, जे चालीत म्हणता येते, त्याला थोडा अर्थ असतो , ते चांगले लक्षात राहते व त्यातून एखादे मजेशीर सूत्र मिळू शकते

बडबडगीत = बोलायला सुरुवात होते तेव्हा विविध उच्चार करता यावेत, स्पष्ट उच्चारांची ओळख व्हावी हा हेतू

पूर्वी भावे यांची ती रचना काहीशी बडबडगीतासारखी आहे व त्यामुळेही ती अस्थानी म्हंटली जायला हवी.

(या धाग्यावरील माझ्या पहिल्या प्रतिसादात मी एक मुद्दा मांडला होता त्याबाबत हे माझे स्पष्टीकरण)

आत्ताच आपण कु. पूर्वी भावे, इयत्ता तिसरी, या विद्यार्थिनीची कविता वाचलीत. या वयात अनेक प्राण्यांच्या स्वभावविशेषांची जाणीव, अनेक भाषांची जाण, छंदोबद्ध आणि छंदविरहित तसेच कमीअधिक प्रमाणात गेय अशी रचना केल्याबद्दल त्यांना नान् सरंजामे (उदयोन्मुख कवी) प्राईझ देण्यात यावे अशी शिफारस कमिटीस केली जात आहे. मराठी भाषेच्या या र्‍हासपर्वात, वेळेला केळं अथवा कमी तिथे आम्ही या न्यायाने, एक नवी तारका उदयास येत असल्याबद्दल निवड समितीने समाधान व्यक्त केले आहे.

तरी यावरून झालेली एक धमाल तिसरीच आहे. कोणीतरी बहुधा खिल्ली उडवायला ही कविता पोस्ट केली फेबुवर. तेथे मग इतर वाचकांनी ही कविता कशी "सुधारता" येईल हे दाखवायला स्वतःची व्हेरिएशन्स टाकली. काहींनी हेच प्राणी घेऊन पूर्ण स्वतंत्र कविता लिहील्या आहेत. लिंक सापडली तर देतो. एक मिनि-कविसंमेलनच झाले आहे तेथे.

अत्यंत भिकार आणि टुकार आहे कविता. सकाळ मध्ये वाचले की २००८ पासून स्टेट बोर्डाची पहीलीची मुले ही कविता शिकत आहेत. हे खरे आहे का?? अवघड आहे एकंदर. ह्या कवितेला सहज अशी गेयता पण नाहीये. र ला ट जोडला आहे झालं.
त्यामानाने सी बी एस ई मराठी कविता खूपच उजव्या आहेत. किंवा त्या पुस्तकांना अगदी टिपीकल फील आहे बालभारती जुन्या पुस्तकांचा. आभाळ वाजले धडाड धूम, वीज चमकली लख लख लख ही आपली पहिलीची कविता पण बहुदा आहे त्यांना दुसरी की तिसरीला.
संवाद साधताना भाषा प्रमाण नसली तरी चालेल पण लेखनात ती प्रमाण असायलाच हवी.

पूर्वी भावे यांचा फोटो पाहिला. एक मराठी मालिकेत असाच दिसणारा अभिनेता आहे.
बहुतेक अभिनेत्री, कवयित्री याखेरीज त्या अभिनेता म्हणूनही काम करत असाव्यात. बहुगुणी प्रतिभा आहे!

पुर्वी भावे ताईनी किमान २५-३० वर्शापुर्वी लिहलेली कविता त्याच्या पालकानी जपुन ठेवली हेही एक विशेषच नाहही का?...त्याच्या बाकिच्या दोन कविता ज्या फेसबुकवर आहेत त्यातही यमक इतर कवितेला अर्थ देणार्‍या गोस्टि मिसिन्ग आहेत ..त्यावरुन तरी तिसरीतली कविता ही थाप असावी.

कवितेतल्या इंग्रजी किंवा हिंदी शब्दांपेक्षा त्या कवितेचा एकूण दर्जाच (बालभारतीच्या मानाने) आक्षेपार्ह आहे.

वावे +१.
इंग्रजी/ हिंदी शब्द हा फारच गौण मुद्दा आहे. मुळात त्यात आशय नाही, गेयता नाही, काही नवी कल्पना नाही, चमत्कृतीपूर्ण काही गंमत नाही. केवळ प्राणी वाद्य आणि यमक.
यमक म्हणजे काय आणि ते जुळवायला मुलं अशा कविता करणार. पण म्हणुन पुस्तकात सुमार कविता घालून नाही ना चालणार! कवयित्री, कविता यात काही गैर नसून ती बालभारती येऊ शकली यात गल्लत आहे. लागेबांधे किंवा राजकीय दडपण या शिवाय मला तरी इतकं सुमार साहित्य पुस्तकात येण्यासाठी कारण दिसत नाही.

वावे अमितव अनुमोदन...
एक पूर्वी भावे नावाची सेलिब्रिटी होती मराठीत काही वर्षांपूर्वी. तिचं ही असेल तर वशिल्या शिवाय दुसरं काही दिसत नाही मला ही

एवढा गहजब कशासाठी हे कळत नाही. बालभारतीचे पुस्तक वगळता वर्तमानपत्रे, मासिके, दूरदर्शनवरील मालिका, चित्रपट, बातम्या, जाहिराती, शब्दांद्वारे होणारी बहुतांशी अभिव्यक्ती तसाही मराठी भाषेचा इतका भयानक संस्कार मुलांना देत आहेत की त्यामानाने ही एक कविता नि:संशयपणे टुकार असली तरी अगदीच निरुपद्रवी वाटते.
हे समर्थन नाहीये पण सध्याच्या काळात भारतातील ८-९ वर्षांच्या मुलांना 'कळेल' किंवा समजावता येईल, अशी आहे. खरंच एका तिसरीतल्या मुलीने ती लिहिली असेल तर शिक्षकांनी ते सांगून, बघा, तुम्ही यापेक्षा चांगली कविता लिहू शकाल असे उत्तेजन देऊन इतर मुलांनाही कविता लिहिण्यास प्रेरित करावे.

स्वप्नात पाहिली राणीची बाग
हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग

हरणाबरोबर खेळत पत्ते
बसले होते दोन चित्ते

उंट होता वाचत कुराण
माकड होते सांगत पुराण

सिंह होता व्याख्यान देत
गाढव होते उतरुन घेत

जिराफ होता गात छान
माने इतकीच लांब तान

कोल्हा होता दुकानदार
त्याच्या दुधात पाणी फार

मला पहाता म्हणती सारे
एक पिंजरा याला द्यारे

त्याबरोबर आली जाग
स्वप्नात पाहिली राणीची बाग!
कसली भारी कविता होती. अजुनही पूर्ण पाठ आहे. अशी कविता ८ -९ वर्षांच्या मुलांना समजवता येणार नाही? गम्मत आहे, गेयता आहे, लेअर्स आणि अर्थ आहेत, भावविश्वाशी निगडित आहे, गमतीतून काही तरी नवं दिसतं.

आभाळ वाजलं धडाडधुम
वारा सुटला सुं सूं सुम्म
वीज चमकली चकचकचक
जिकडे तिकडे लखलखलख
पाऊस आला धोधोधो
पाणी वाहीलं सोंसोंसों
पाण्यात बोट सोडली सोडली
हातभर जाउन बुडली बुडली
बोटीवर बसला बेडूक
तो ओरडला डरांवडुक डरांवडुक

ही माझी आवडती कविता. केळीच्या बागा मामाच्याहूनही जास्त आवडती.

गाडी आली गाडी आली - झुक्‌ झुक्‌ झुक्‌
शीटी कशी वाजे बघा - कुक्‌ कुक्‌ कुक्‌

इंजिनाचा धूर निघे - भक्‌ भक्‌ भक्‌
चाके पाहू तपासून - ठक्‌ ठक्‌ ठक्‌

जायचे का दूर कोठे - भूर्‌ भूर्‌ भूर्‌
कोठेहि जा नेऊ तेथे - दूर्‌ दूर्‌ दूर्‌

तिकिटाचे पैसे काढा - छ्न्‌ छ्न्‌ छ्न्‌
गाडीची ही घंटा वाजे - घण्‌ घण्‌ घण्‌

गाडीमधे बसा चला - पट्‌ पट्‌ पट्‌
सामानाहि ठेवा सारे - चट्‌ चट्‌ चट्‌

नका बघू डोकावून - शुक्‌ शुक्‌ शुक्‌
गाडी आता निघालीच - झुक्‌ झुक्‌ झुक्‌

ही पण छान होती

सुंदर आहेत वर लोकांनी लिहिलेल्या कविता. पण आता बघा, ही एक अत्यंत सुंदर कुसुमाग्रजांची कविता मला आठवतंय त्यानुसार माझ्या वेळी इयत्ता तिसरीला होती. अजून व्यवथित लक्षात आहे. आताच्या तिसरीतल्या मुलांना बहुदा समजेल पण आवडेल की नाही याबद्दल शंका वाटते.

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळाजांभळ्या जळांत केशर सायंकाळी मिळे
फेसफुलांचे सफेद शिंपीत वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे
मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती
तुफान केव्हा भांडत येते सागर ही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने दार जरा राहतो
संथ सावळी दिसती जेव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे पहावयाला जावेसे वाटते
क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवि
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी
प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

या आणि अशा सुंदर कविता वगैरेंचे संस्कार झालेली पिढीसुद्धा इतके भयंकर मराठी बोलते आणि चालवून घेते की काय उपयोग झाला या सगळ्याचा असे वाटते. सध्याच्या वादाचा विषय असलेली कविता म्हणजे हिमनगाच्या टोकावरचा एक कण आहे.

सुरेख कवितेची आठवण काढलीत!

या आणि अशा सुंदर कविता वगैरेंचे संस्कार झालेली पिढीसुद्धा इतके भयंकर मराठी बोलते आणि चालवून घेते की काय उपयोग झाला या सगळ्याचा असे वाटते >>> खरं आहे Sad

तेच.

रोगाचे लक्षण आणि रोगाचे कारण हे वेगवेगळे विषय आहेत. कविता फक्त लक्षण आहे. बंब सोमेश्वरी गेलाय !

बरं, असे टुकार साहित्य (!) अभ्यासक्रमाला असणे हे या कवितेपुरते किंवा पहिल्या इयत्तेपुरतेच
नाही आहे.

या आणि अशा सुंदर कविता वगैरेंचे संस्कार झालेली पिढीसुद्धा इतके भयंकर मराठी बोलते आणि चालवून घेते >>> सिरीयसली.

गदिमांची "शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा" ही कविता आठवली. शाळेत नव्हती पण असायला हवी होती. बालकविता म्हणूनही लहान मुलांना सहज आवडेल अशी आणि त्यातील अर्थाच्या दृष्टीने सुद्धा उच्च आहे. प्रत्येक प्राण्यांच्या संदर्भात त्यांच्या शेपटीचा चपखल उल्लेख, आणि शेवटी माणसांचा संदर्भ देऊन "शेपटीचा वापर केला नाही तर ती झडून जाईल" हे उत्क्रांतीबद्दलही! ते गाणेही मस्त आहे.

“मराठी कवितेत रुढ झालेला इंग्रजी शब्द आला तर बिघडलं कुठे?” दीपक केसरकरांचा ‘त्या’ कवितेवर सवाल >> लोकसत्ता.

https://www.loksatta.com/maharashtra/deepak-kesarkar-education-minister-...

Pages