‘मराठी बाणा’ आणि ‘मराठीपणा’

Submitted by अनिंद्य on 1 January, 2023 - 04:35

अनेक दिवसांपासून मला असलेला प्रश्न इथे मांडायचे धाडस करतो आहे. 'मराठी बाणा', 'मराठमोळा/ळी', ‘मराठीपणा’ (हो, हा शब्द अनेकदा ऐकतो), मराठी संस्कृती हे शब्द अनेकदा कानावर पडतात. प्रत्येकवेळी वेगवेगळा अर्थ / अर्थछटा असल्याचे लक्षात येते, अर्थ संदर्भाप्रमाणे बदलतो हे ही. पण मुळात 'मराठी बाणा' म्हणजे काय, त्याचा अर्थ मराठी आणि अ-मराठी व्यक्ती काय घेतात असा प्रश्न मला आहे.

थोडे संशोधन म्हणून आधी 'बाणा' या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ बघितला. "ठराविक वर्तनक्रम" अशी एका शब्दात बोळवण केलीन त्यांनी. धिस इज नॉट फेयर, चालबे ना, चालणार नाही, खपवून घेतले जाणार नाही Happy

आणखी काही दुसरे शब्दकोश बघितले मग, त्यातले अर्थ :-

- स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.

- अभिमान; शेखी; आढ्यता; डौल (एखाद्या विशेष गुणाचा, अधिकाराचा इ॰).

- लाकडी मूठ व जाड धारेचे पान असलेला पट्टा; एक हत्यार.

- जन्म-स्वभाव; मनःस्थिती

- वस्त्राच्या विणीतील आडवा धागा

एवढे सगळे अर्थ असूनही 'मराठी बाणा' किंवा 'मराठीपण' त्यात सामावत नाही असे वाटले. काय बघून आपण / इतरजण आपले 'मराठीपण' ओळखत असतील ? मराठी भाषा तर आहेच. आपले खानपान? कपडेपट? सण समारंभ, लग्न सोहळे? गणेशोत्सव? मंगळागौर, दहीहंडी? कोळी नृत्य, भावगीते? लावणी अन तमाशा ? पंढरीची वारी? शिवरायांचा गौरवशाली इतिहास, गडकिल्ले? ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग?

मराठीजन महाराष्ट्रात आहेत तसे देशभर-जगभर विखुरले आहेत. इतर मराठी आणि अमराठी बांधवांशी त्यांचा भरपूर संपर्क आहे / असावा. तर मंडळी, तुमच्या मते 'मराठी बाणा' म्हणजे काय ? ‘मराठीपणा’ची खास अशी लक्षणे कोणती ? अन्य मराठी -अमराठी लोकं 'मराठी' म्हणून आपल्यात काय बघतात / नोटीस करतात असे तुम्हाला वाटते? तुमचे निरीक्षण, विचार आणि अनुभव जाणून घ्यायला उत्सुक !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी भावे नामक मराठी प्रतिभावान कवयित्रीची कविता बालभारती च्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकात आहे.
चिकीमिकी माऊस या शब्दाची त्यांनी मराठीला भेट दिली आहे. भाषा अशीच समृद्ध होत असते.
पूर्वीजींच्या आभाराचा ठराव मांडला जावा ही विनंती.

पूर्वी भावे यांचा धडा होता असे वाचले. म्हणजे आता बालभारतीच्या पुस्तकात तो नसावा असे वाटले आधी.

करूया की आभार प्रस्ताव, चिकिमिकी माउस तर चिकिमिकी माउस. Lol

“चिकिमिकी माउस” आणि “गुंडू पांडू लांडगे” गाजतेय. “मराठी” कविता अचानक सर्वत्र चर्चेत असण्याच दुर्लभ योग.

हीच ती कविता, माबो रसिकांच्या कृपादृष्टीची अभिलाषा _/\_

IMG_6870.jpeg

mi _any >> सहमत

वाघोबा म्हणाले, नाही ना बात? >> हे कसले मराठी? अर्थ काय याचा?

वरचा 'सां' सां-नुनासिक का आहे? आणि बात, शोर, वन्समोअर आता मराठी शब्द झालेत का?
हे असलं 'साहित्य' बालभारतीत आहे?!

पुर्वी भावे यांच्या चाहत्यांकडून जंगली महाराज रस्त्यावर मोर्चा.
वाहतूक खोळंबली.
अध्यक्ष - रघू आचार्य

चुका काय पाहता, कवयित्रीचं सौंदर्य पहा सौंदर्य !

भयंकर आहे हे. पण मला कळत नाही आधीच्या इतक्या वर्षांच्या बालभारती अभ्यासक्रमातील कविता नाही का परत ठेऊ शकत ते?
किती सुंदर कविता होत्या त्या.

फक्त भाषाच खटकणारी नव्हे तर कवितेत गेयताही नाही, गोडवाही नाही. लहान मुलांच्या कवितेत असणारी लयही नाही. अशा कविता गुणगुणता येत नाहीत आणि पाठही होत नाहीत.

'आवाज आवाज ओरडला ससा' काये... Lol
यापेक्षा 'कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा' वगैरे किती गोड आहेत. अशा कविता पुन्हा आणाव्यात.

ती कविता वाचल्यापासून 'का वाचली' असं झालंय.
आणि लोक या कवितेची बाजू घेतायत हेही विनोदी आहे. >>>> +१०००

फक्त भाषाच खटकणारी नव्हे तर कवितेत गेयताही नाही, गोडवाही नाही. लहान मुलांच्या कवितेत असणारी लयही नाही. अशा कविता गुणगुणता येत नाहीत आणि पाठही होत नाहीत. >>> अगदी हाच विचार आला डोक्यात कविता वाचताना. वन्समोअर, शोर, माऊस हे मराठी शब्द आहेत?

आताची पहिलीतली मुलं फारच हुषार झालेली दिसतात. 'कमल नमन कर' वगैरे जाम बाळबोध वाटत असणार त्यांना, नाही? आणि 'नाही ना बात' म्हणजे काय? हत्तीची अक्कल काय? काय चाललंय काय? ( सां कसा लावतात याबद्दल अभ्यास चालू आहे Proud )

पुढच्या पीढीला जे मराठी ऐकावे लागणार आहे त्याची पहिल्या वर्गापासूनच तयारी असा उदात्त हेतू असावा Lol

नाहीतर बालभारतीकडे जुन्या कविता होत्याच आणि बरे लिहिणारे नवीन कवी-लेखक कमी नाहीत.

अच्छा या कवितेवरून ट्रोलिंग चालू आहे तर.
फेबु एक व्यक्ती चालू घडामोडीवर काही विनोदी पोस्टस टाकते पण त्याला काही आगापिछा नसतो बर्‍याचदा. तुम्ही अपडेडेट असाल तर संदर्भाने कळते पण सोशल मिडीया आऊटडेटेड असाल तर काही कळत नाही कशाबद्दल आहे. असो आता मी अपडेट झाले आहे Happy

भयंकर कविता.. एकूणच मराठी भाषेचं कसं होणार काळजीच आहे. आजकाल मराठी शाळेतले शिक्षक कसे असतात कल्पना नाही. माझ्या
परिचयातले कोणीही पूर्ण मराठी शाळेत असल्याचे ऐकले नाही.

वरची कविता वाचुन झालेला अत्याचार पुरे नसेल तर क्यू आर कोड स्कॅन करा. आणि बघा गंमत! Wink
बैठकीची लावणी + आनंद शिंदे लोकगीत ते पण मारवा तोडीच्या कोमल दर्दभर्‍या (बेसुर) स्वरांत! कानांना मेजवानीच आहे.
विंदांच्या प्राण्यांच्या कविता होत्या की!

तिसरीतल्या मुलीला प्रोत्साहन हवं तर अर्रे व्वा! शाब्बास! इतकं पुरे की!
ती कविता पहिलीतल्यांना शिकवायला कशाला हवी आहे!

तिने तिसरीत असताना लिहीलेली कविता 2018 मधे बालभारती मधे कशी पोचली?
आणि 2024 मधे 5 वर्षांनी कोणाला तरी जाग आलीये अशी कविता अभ्यासक्रमात आहे म्हणून.

अगदी तिसरीत लिहिली असेल.त्यावेळी नसतो व्याकरण किंवा अर्थाचा सेन्स.पण बालभारती म्हणजे सोसायटीतलं गॅदरिंग नाहीये प्रत्येक तिसरी च्या सुंदर मुलाने लिहिलेलं काहीही कौतुकाने छापून वर्षानुवर्षे जगवायला. भावेबाईचे कौतुक तिच्या आईबाबांनी करावे .

>>> माझ्या
परिचयातले कोणीही पूर्ण मराठी शाळेत असल्याचे ऐकले नाही.

याबद्दल कोणी आक्षेप घेत नाही. घेऊ शकत नाही, हे मान्यच! मात्र, जर पूर्ण मराठी शाळेत एक बराच मोठा घटक जातच नसेल, तो घटक शुद्ध मराठी (officially) शिकतच नसेल, पूर्ण मराठी बोलतही नसेल तर तो घटक 'परत एकदा, पुन्हा एकदा' असे म्हणेल की 'वन्स मोर' म्हणेल?

या विषयाबाबत मी अगदी पूर्णपणे त्या कवयित्री पूर्वी भावे यांच्या कवितेच्या ठाम विरोधातच आहे.

मात्र ती कविता ज्यांच्यासाठी लिहिली गेल्याचा दावा आहे त्यांना असलीच (असंबद्ध, सां वगैरे असलेली, नाही ना बात, हत्तीची अक्कल, वन्स मोर वाली) मराठी ही मराठी वाटते.

"तुला ही ग्रेड मिळायला हवी" - पालक

'मी कोशिष करतीय ना" - पाल्य

या परिस्थितीत निव्वळ त्या कवितेला दोष देणे योग्य नसून एकूणच मराठीबाबतची अनास्था, उदासीनता हे सगळे विषय चर्चेत यायला हवेत. प्रत्यक्षात होते असे, की 'कोणालातरी धोपटायला मिळत आहे व त्या धोपटण्याला टाळ्या मिळणार हे नक्की आहे' हे कळले की प्रत्येकजण धोपटायला पुढे होतो. क्षणिक मनोरंजन व त्यासाठी धोपटा-धोपटी हे आता जणू ध्येय झाले आहे.

■ ग्रामीण भागातील 'पूर्ण मराठी' शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांचे मराठी काय पातळीचे असते याचा गेल्या सात आठ वर्षातील थोडाफार अनुभव गाठीशी आहे

■ पूर्वी भावे यांची ही कविता निवडली जायलाच नको होती हे माझे ठाम मत आहे

■ अनेक मराठी कवी उत्तम बालकविता लिहितात आणि बालकविता व बडबडगीते यातील फरक जाणतात

■ जुन्याच कविता जर अजूनही योग्य ठरत असतील तर त्या बदलायची गरज काय हाही एक विषय आहे

"तुला ही ग्रेड मिळायला हवी" - पालक
'मी कोशिष करतीय ना" - पाल्य
>>>
हे असं बोलतायत सध्या? Uhoh अवघड आहे एकूण परिस्थिती. ( वर पुन्हा कोशिष पण चुकतंय )

Pages