अनेक दिवसांपासून मला असलेला प्रश्न इथे मांडायचे धाडस करतो आहे. 'मराठी बाणा', 'मराठमोळा/ळी', ‘मराठीपणा’ (हो, हा शब्द अनेकदा ऐकतो), मराठी संस्कृती हे शब्द अनेकदा कानावर पडतात. प्रत्येकवेळी वेगवेगळा अर्थ / अर्थछटा असल्याचे लक्षात येते, अर्थ संदर्भाप्रमाणे बदलतो हे ही. पण मुळात 'मराठी बाणा' म्हणजे काय, त्याचा अर्थ मराठी आणि अ-मराठी व्यक्ती काय घेतात असा प्रश्न मला आहे.
थोडे संशोधन म्हणून आधी 'बाणा' या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ बघितला. "ठराविक वर्तनक्रम" अशी एका शब्दात बोळवण केलीन त्यांनी. धिस इज नॉट फेयर, चालबे ना, चालणार नाही, खपवून घेतले जाणार नाही
आणखी काही दुसरे शब्दकोश बघितले मग, त्यातले अर्थ :-
- स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.
- अभिमान; शेखी; आढ्यता; डौल (एखाद्या विशेष गुणाचा, अधिकाराचा इ॰).
- लाकडी मूठ व जाड धारेचे पान असलेला पट्टा; एक हत्यार.
- जन्म-स्वभाव; मनःस्थिती
- वस्त्राच्या विणीतील आडवा धागा
एवढे सगळे अर्थ असूनही 'मराठी बाणा' किंवा 'मराठीपण' त्यात सामावत नाही असे वाटले. काय बघून आपण / इतरजण आपले 'मराठीपण' ओळखत असतील ? मराठी भाषा तर आहेच. आपले खानपान? कपडेपट? सण समारंभ, लग्न सोहळे? गणेशोत्सव? मंगळागौर, दहीहंडी? कोळी नृत्य, भावगीते? लावणी अन तमाशा ? पंढरीची वारी? शिवरायांचा गौरवशाली इतिहास, गडकिल्ले? ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग?
मराठीजन महाराष्ट्रात आहेत तसे देशभर-जगभर विखुरले आहेत. इतर मराठी आणि अमराठी बांधवांशी त्यांचा भरपूर संपर्क आहे / असावा. तर मंडळी, तुमच्या मते 'मराठी बाणा' म्हणजे काय ? ‘मराठीपणा’ची खास अशी लक्षणे कोणती ? अन्य मराठी -अमराठी लोकं 'मराठी' म्हणून आपल्यात काय बघतात / नोटीस करतात असे तुम्हाला वाटते? तुमचे निरीक्षण, विचार आणि अनुभव जाणून घ्यायला उत्सुक !
on lighter note:
on lighter note:
मराठी मध्ये चांगले दिसणारे/ हिरोछाप अभिनेते नाहीत (अंकुश चौधरी वगळता -आतातरी तोच आठवतोय ). बरेचसे जाडे, बुटके काका-मामा छाप, कधीही जिम किंवा व्यायामातला व माहित नसलेले वाटतात.
हे खरे असले तरी काही पालक
हे खरे असले तरी काही पालक प्रयत्नपूर्वक मुलांना मराठी वाचन, लिखाण, बोलणे शिकवतात, म्हणूनच मराठी शाळा चालतात. >>
अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना दामटून मराठी शिकवण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा स्पॅनिश शिकवले तर जास्त उपयोगी आहे.
...मुसद्देगिरी आणि मर्दुमकी..
...मुसद्देगिरी आणि मर्दुमकी...
इतिहासात असेलही, आता मराठी माणसे विशेष मुत्सद्दी -चतुर म्हणून ओळखली जात असतील असे वाटत नाही. उलट सरळमार्गी, काहीशी इमोशनल, भोळी, युद्धात जिंकून तहात हरणारी वगैरे.
..साधी राहणी...
..साधी राहणी...
+१
हे अनेकांनी प्रत्यक्ष सांगितले आहे.
राहणी आपल्याकडे खूप साधी, विशेषतः पुरुषांची. अनेकदा गबाळेपणाकडे झुकणारी. आजच्या टापटीप राहण्याच्या- छाप पाडण्याच्या जगात हा सद्गुण आहे का याबद्दल साशंक आहे.
आता विशी-पंचविशीतली पिढी मात्र तशी नाही, सर्व एकदम स्मार्ट, झकपक
....मराठी मध्ये चांगले
....मराठी मध्ये चांगले दिसणारे अभिनेते नाहीत. बरेचसे जाडे, बुटके काका-मामा छाप, कधीही जिम किंवा व्यायामातला 'व' माहित नसलेले वाटतात....
आजच मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्याबद्दलच्या बातमीत त्यांचा उल्लेख 'मराठीतील विनोद खन्ना', 'मराठी हंक' आणि 'मराठी चित्रपट सृष्टीचा एकमेव देखणा स्टार' असा केलाय
अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना
अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना दामटून मराठी शिकवण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा स्पॅनिश शिकवले तर जास्त उपयोगी आहे.
>>> + 1
आम्ही तर हिंदी शिकवतो... मराठी अजिबात नाही... भारतात मोस्टली हिंदी चालते .. या वर्षी इंडिया ट्रिप केली तेंव्हा समजले योग्य केले ते... आग्रा , दिल्ली , हैदराबाद आणि महाराष्ट्र सगळीकडे हिंदी चालते...
>>>>उलट सरळमार्गी, काहीशी
>>>>उलट सरळमार्गी, काहीशी इमोशनल, भोळी>>>
माणसातलं माणूसपण जपायला सहायक आहेत या गोष्टी.
मुसद्देगिरी, मर्दुमकी हे नेतृत्व जसं घडवेल तसं घडतं....नेतृत्वातल्या उणिवा पुढे चालत राहतात...ज्या पिढीला सगळं सहज मिळतं त्यांच्यात एकप्रकारची बेपर्वा वृत्ती असते.
माणसातलं माणूसपण जपायला सहायक
माणसातलं माणूसपण जपायला सहायक आहेत या गोष्टी...
+ १
- अमेरिकेत पालक प्रयत्नपूर्वक
- अमेरिकेत पालक प्रयत्नपूर्वक मुलांना मराठी वाचन, लिखाण, बोलणे शिकवतात
- अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना दामटून मराठी शिकवण्यात काय अर्थ आहे?
- मराठी शिकण्यापेक्षा स्पॅनिश / हिंदी जास्त उपयोगी
भारताबाहेर राहणाऱ्या मराठीजनांच्या या प्रतिक्रिया विषयाच्या दोन्ही बाजू दाखवत आहेत. 'मराठी भाषेची उपयोगिता' आणि 'भाषेबद्दलची भावना'. दोन्ही आपापल्या जागी योग्य.
इथे माबोवर कोलकात्यातील चीनी लोकांबद्दलचा एक लेख आहे माझा, त्यात त्यांची भाषा शिकायला पुरेसे उत्सुक विद्यार्थी नसल्यामुळे आधी शाळा, नंतर भाषा आणि तदनंतर त्यांची सांस्कृतिक ओळख कशी पुसट होत गेली याबद्दल लिहिले आहे. एखादी भाषा मरणे म्हणजे त्या संस्कृतीचा क्षय-लय होणे.
'मराठीपणा' आणि मराठी भाषा यांचे जुळेपण उघड आहे. मराठी बोलता-वाचता-लिहिता येणे ही सुपरपॉवर / रेअर स्किल होऊ नये अशी इच्छा मात्र आहे.
>>>>इथे माबोवर कोलकात्यातील
>>>>इथे माबोवर कोलकात्यातील चीनी लोकांबद्दलचा एक लेख आहे माझा, त्यात त्यांची भाषा शिकायला पुरेसे उत्सुक विद्यार्थी नसल्यामुळे आधी शाळा, नंतर भाषा आणि तदनंतर त्यांची सांस्कृतिक ओळख कशी पुसट होत गेली याबद्दल लिहिले आहे. एखादी भाषा मरणे म्हणजे त्या संस्कृतीचा क्षय-लय होणे.>>>>
खूप महत्वाचा मुद्दा आहे हा... मराठी माध्यमाच्या सरकारी शाळा आचके देतायेत....एका शाळेची दयनीयता...
वर्गखोल्या सहा...पट ७५...वर्गशिक्षक एक....सगळे वर्ग एका खोलीत....
माझ्या दोन नातेवाईकांनी मुलांना तालुक्याच्या गावी इंग्रजी शाळेत घातले...दोघेही शेतकरी ....मुलं नापास होताहेत बालवर्गातच तरी अट्टाहास....
सरकारी शाळेत जाणारी मुलं खूप कमी मिळकत असलेल्यांची. खाजगी शाळात त्यांना २०-२५००० फी परवडत नाही.
इंग्रजी माध्यमात मराठी विषय असला तरी खूप कमी मुलं पुढं मराठी जोपासतात.
एकीकडे मराठी/ सरकारी शाळांची
एकीकडे मराठी/ सरकारी शाळांची ढासळती गुणवत्ता आणि दुसरीकडे खाजगी इंग्रजी शाळांची फी परवडत नाही....
हा इशू आहे खरा. मराठी / सरकारी शाळा बंदच पडाव्या असेच एकूण धोरण आहे की काय अशी शंका आहे.
इंग्रजी माध्यमात मराठी विषय असला तरी खूप कमी मुलं पुढं मराठी जोपासतात ...
खरंय.
गश्मीर आहे की देखणा!
गश्मीर आहे की देखणा!
अनिन्द्य, तुमच्या post ला जोडून अजून एक सांगते.
माझी मैत्रीण म्हणाली होती तुम्ही लग्नात ज्या साड्या घेता त्या नंतर वपारू शकता आम्ही लेहेंगा एकतर rent ने घेतो नाहीतर लाखात किंमत असलेला तो कपाटात पडून राहतो. दुसऱ्यांच्या लग्नात नाही वापरता येत म्हणे
>>>>मराठी / सरकारी शाळा बंदच
>>>>मराठी / सरकारी शाळा बंदच पडाव्या असेच एकूण धोरण आहे की काय अशी शंका आहे.>>>>
शिक्षक परिषदेत दिलेल्या भाषणाचा नितीन गडकरीचा हा व्हिडिओ जरुर पहा.
https://youtu.be/FI1lWJYxQM8
राजकीय लोक आधी MLA/MP निवडणूक तिकीट मागतात ते नाही जमलं तर medical/ engineering college द्या म्हणतात ते नाही जमलं तर एखादी शाळा द्या म्हणजे शिक्षकांचा अर्धा पगार आम्ही आणि आपल्या दोघांची रोजगारहमी.
@ किल्ली,
@ किल्ली,
.. लाखात किंमत असलेला कपाटात पडून राहतो.. ....
लग्नसोहळ्यामधला प्रचंड शो ऑफ हा दुर्गुण साथीच्या रोगासारखा देशभर पसरतोच आहे. मराठीजन अजूनतरी सरसकट बळी पडलेले वाटत नाहीत पण दे आर गेटिंग देयर, अलबिट स्लोली
@ दत्तात्रय साळुंके,
@ दत्तात्रय साळुंके,
मराठी शाळा एकदाच्या बंद झाल्या की मग हे सर्वजण मराठी भाषेची चिंता वाहायला मोकळे होतील
मराठीपणा- हे मीही कुठे कुठे
मराठीपणा- हे मीही कुठे कुठे ऐकलंय. फारच ओढून ताणून आहे, केविलवाणं आहे. बाणा- हे स्वतःचंच स्वतःबद्दल मत असावं तसं आहे. बायकोला / नवर्याला फेसबुकवर जाहीर शुभेच्छा देण्यासारखं आहे जरा. त्यात चांगलं वाईट कोण ठरवणार? बंगाली-पंजाबी-तामिळी यांचेही ताणेबाणे असतीलच, शब्द वेगळे असतील, इतकंच. स्व्तःबद्दलचं पर्सेप्शन कसं आहे, यावर सारा खेळ. "I am because I think" इथपासून ते चार्ल्स कुलीच्या "I am not what I think I am, and I am not what you think I am. I am what I think you think I am." या स्केलवर आपण कुठे बसतो, यावर सारं. खरं तर एवढं मोठं स्केल ओळांडूनही हे दोन्ही जवळजवळ एकच आहे असं नीट बघितल्यावर लक्षात येतं.
'इतरांचं मत काय आहे आपल्याबद्दल' हा विचार करतो तेव्हा एक अनुभव आठवतो. नॉर्थमध्ये गेलो होतो तेव्हा एक मित्र म्हणाला होता- साऊथ अँड वेस्ट आर मोर रिलायेबल तॅन नॉर्थ अँड इस्ट. क्रम लाव बघू, असं बोललो, तेव्हा तो म्हणाला, 'सर्वात छान साऊथवाले. मग वेस्ट, मग इस्ट. सगळ्यात नालाय्क आम्हीच- नॉर्थवाले.'
त्यानं स्वत:लाच असं क्रिटिसाईज केल्याने हे माझ्या कायमचं लक्षात राहिलं. पण याच्या अगदीच विरुद्ध अशी मतंही मी मराठी माणसांबद्दल ऐकली आहेत. गंमत म्हणजे ते लोक त्यांच्या स्वतःच्या भाषे(म्हणजेच संस्कृती)बद्दल अभिमानी असल्याने बहुतेक वेळा असं म्हणत होते, तर वरच्या प्रसंगातला माझा बरेलीचा मित्रही एक्झॅक्टली जवळजवळ त्याच कारणामुळे, म्हणजे स्वतःच्या भाषा-संस्कृतीबद्दल प्रेम असल्याने स्वभाषिकांना कोसत होता.
---
दोन गोष्टी आहेत- ही अशी उदाहरणं किंवा दाखले प्रातिनिधिक म्हणता येतील का; आणि नसतील तर सँपलिंग कुठून कसं करणार.
ग्रोस पद्धतीने तीन वर्ग करता येतील. एक- परदेशात राहणारा मराठी वर्ग. दोन- देशातल्या महानगरांतला मराठी वर्ग. तीन- ग्रामीण भागातली मराठी माणसं. हे फार म्हणजे फारच ग्रोस आहे. यांच्या अधल्या मधल्या, किंवा या कशातच फारसा न येणाराही वर्ग आहेच आहे, शिवाय या सार्या सीमारेषांवर वसणारेही आहेतच. शिवाय छोट्या शहरांत राहणार्या लोकांची एक वेगळीच दुनिया आहे. आणि हे लोक गावातल्या आपल्या शेताच्या बांधावरून ज्या सहजतने चालतात आणि बोलतात, ऑलमोस्ट तितक्याच सहजतेने मेट्रो शहरांत आणि परदेशातही सवयीने वावरतात.
आपल्या नक्की गरजा काय आहेत यावर बरचसं अवलंबून आहे. बाकी संस्कृती हे 'भाषे'वरचं बांडगुळ आहे, आणि अस्मिता, बाणा, परंपरा ही तर बर्यापैकी भुतंच आहेत. मनुष्यप्राण्याचं 'पोट भरल्यावर' तत्त्वज्ञानाचा शोध लागला- अशातली गोष्ट. या सार्या आयुष्यातल्या व्हॅल्यू अॅडिशनवाल्या गोष्टी डोक्यात येण्याआधी पोट तर भरलं पाहिजे ना. खेड्यांत जाऊन 'मराठी अस्मिता' वगैरे गोष्टी कराल तर कुणीही फिरकून बघणार नाही. ते मराठी किंवा मराठीचं बोलीभाषेतलं कुठचं तरी व्हर्जन आधीच बोलत आहेत, जगत आहेत. ही अशी 'भाषा जगायची' गरज आणि नैसर्गिकता ही इतर दोन्ही वर्गांना कितपत आहे, हे तपासून बघितलं पाहिजे. गंमत म्हणजे हाच खेड्यातला माणूस शहरात, महानगरात किंवा परदेशात जातो तेव्हा त्याचीही गरज आणि नैसर्गिकता आपसूक बदलते.
जिऑग्रफी आणि डॅमॉग्राफिक्स बदलल्यावर हा लोचा होतो का- असा यावर कुणी कळीचा प्रश्न विचारला, तर अवघड आहे. भाषा एक अनुभवांची आणि भावनांचीही असते. कुठच्याही इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला जाऊन बघा. भाषा वेगळ्या, संस्कृती वेगळी, देश वेगळे, इतिहास-भुगोल-नागरिकशास्त्र सारं सारं वेगळं. मात्र पडद्यावरच्या त्या हृदयीचे या हृदयी असं झालं होतं की नाही? रडायची हसायची पद्धत,
रडाय-हसायची आणि सुख-दु:खाची कारणं सारखीच. म्हणजे भाषा एकच. वैश्विक भाषा म्हणा.
-----
बदलती असो, प्रवाही असो, शेकडो उपभाषा नि बोलीभाषांचं जंजाळ आणि इतर भाषांतल्या शब्दांची भेळ सोबत घेऊन चाललेली असो; भाषा महत्त्वाची आहे. संस्कृती नव्हे. अस्मिता नि बाणा तर नव्हेच. धर्माच्या आधारावर जगभारात वाटण्या झाल्या, पण त्या भाषेच्याच आधारावर टिकल्या, किंवा फुटल्या. सगळ्या भाषकंना अभिमान असतात, तसे तसे गंडही असतात. खरंतर गंड लपवण्यासाठीच अभिमन असतात. त्यात चुकीचंही काही नाही असं समजू. भारताच्याच काय, जगातल्या कुठच्याही भाषेतल्या मायबोलीवर हे असेच संवाद चाललेले असतील. हे असे स्वतःवरचे आणि स्वतःच्या भाषा-संस्कृतीवरचे कुत्सित शेरे प्रेमापोटीच आलेले असतात.
-----
अजून काही मुद्दे लिहायचं विसरतोय, पण लिहिलं ते वाचून बघितल्यावर वाटलं की पुरेसा गोंधळ झालाय, मला नीट बहुतेक मांडता आलं नाही. असो.
'भाषा' या विषयावर प्रेम करणार्या (बघितलं नसेल त्याने) प्रत्येकाने हे बघा. (त्यात 'हिंदीभाषिकोंको आखिर इतका काँप्लेक्स क्यू है'- असं स्वतःच आणि साक्षात हिंदीभाषक म्हणतोय. म्हणलं ना, भोपळे चौकातच जग आहे.)
https://www.youtube.com/watch?v=O0CkOYxlGjg&t=7s
(पहिली ३-४ मिनिटं टाळून बघा. ते नेहेमीप्रमाणे, म्हणजे आपल्या संस्कृतीप्रमाणे 'आप आये इस बगिया मे, फूल खिले है गुलशन..' वगैरे आहे.)
… सगळ्यात नालाय्क आम्हीच-
… सगळ्यात नालाय्क आम्हीच- नॉर्थवाले….
गायपट्टयातल्या प्रबुद्ध वर्गाला त्यांच्या भाषा-संस्कृतीच्या ह्रासाबद्दल नीट कल्पना आहे, काही बोलून दाखवतात काही नाही. दक्षिण भारत याही बाबतीत सरस ठरतो.
जिऑग्रफी आणि डॅमॉग्राफिक्स बदलल्यावर लोचा होतो तसेच भावनेची भाषा वैश्विक आहे याबद्दल सहमती
तुमच्या प्रतिसादाने नव्याने चिंतन झाले, आभार !
किती ही उदार मत ठेवा,भाषा
किती ही उदार मत ठेवा,भाषा फक्त संवाद चे साधन आहे बाकी तिला काही अर्थ नाही असली वाक्य फेका,देशातील सर्व भाषा bola, भारत एक देश आहे सर्व भाषेचा सन्मान करा असली अवॉर्ड winig वाक्य फेका.
पण भारतात भाषे वरून भेदभाव होतो.
भाषेवरून कंपुगिरी होते..
भाषेवरून तुम्हाला घर द्यायचे की नाही हे ठरवले जाते.
भाषेवरून तुमच्या शी कोणत्या लेव्हल पर्यंत संबंध ठेवले पाहिजेत हे ठरवले जाते.
भाषे वरून तुम्हाला नोकरी धायची की नाही हे ठरवले जाते.
भाषे वरून मतदान पण होते .आणि प्रतिनिधी कोण स्व भाषिक असावा हीच सर्व भाषिक लोकांच्या मनात असते.
जात आणि धर्म आणि भाषा ह्यांचं उपद्रवी मूल्य एकच आहे.
मराठी लोकांची आडनावे वेगळी असतात.तुम्ही किती ही वर्ष कोणत्या ही राज्यात राहिला ,अगदी मराठी कधी बोलला पण नाहीत तरी तुमची ओळख मराठी व्यक्ती अशीच असते .
सर्वच राज्यात असे घडते.
त्या मुळे मराठी म्हणून मराठी भाषिक लोकांनी स्वतःचे अधिकार,स्वतःची अस्मिता नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे.
कळपात नाही राहिलात तर शिकार बनाल दुसऱ्या भाषिक लोकांचे
जात आणि धर्म आणि भाषा ह्यांचं
जात आणि धर्म आणि भाषा ह्यांचं उपद्रवी मूल्य एकच आहे. >> बरोबर बोललात. सहमत.
माझं मराठी भाषेवर आत्यंतिक
माझं मराठी भाषेवर आत्यंतिक प्रेम आहे, तो 'बाणा' किंवा 'पणा' नाही. जसं माझं नाक आहे- जसे माझे डोळे आहेत तसंच ते योगायोगाने मिळालेलं आहे. मला निवडायची संधी मिळाली तर मी पुन्हापुन्हा महाराष्ट्रातच जन्म घेईन. अभिमान नाही, कारण यात काही माझं कर्तृत्व नाही पण कृतज्ञता आहे. अभिमान आणि अहंकार म्हणून समोरच्याला रद्दबातल करणं खूप सोपं-सोयीचं असतं.
माझ्या लिहिता -वाचता -बोलताना अनेक चुका होतात, पण ते कायम सुधारत राहण्याचा प्रयत्न असतो. कारण मला त्यात आनंद मिळतो. माझी बोलीभाषा प्रमाण मराठी नाही, पण मला मराठी भाषेचे सगळे प्रवाह माझ्यापासून निघून माझ्याकडेच परत येणारे वाटतात. मी पालक म्हणून अजिबात आग्रही नसते पण मुलांना अस्खलित मराठी बोलता यावे म्हणून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रयत्न केले व सुदैवाने त्यात यश मिळाल्याचे अपार समाधान आहे. काही गोष्टी ह्या आपल्या आत्म्याशी निगडित असतात, अहंकाराशी नाही. त्या कसेही करून तडीस न्यायच्या व आपल्या परीने टिकवायच्या ही आपल्या अस्तित्वाची गरज होऊन बसते. माझ्यासाठी मराठी भाषा ही नेहमीच अभिव्यक्तीचा भाग असणार आहे. काही गोष्टी तुम्ही शेवटपर्यंत वहावून नेता, कारण त्या तुमच्याच गाभ्याचा भाग असतात , गाभा हरवून कुणी आयुष्याच्या प्रवासात पुढे कसं जाणार ..! अशा फार कमी गोष्टी असतात. इतरांसाठी अदृश्य असलेतरी कुठलेच जाज्वल्य, कुठलीच निष्ठा, कुठलाच कणा नसलेले अप्रामाणिक 'माणूसपण' मला हेतुपुरस्सर नको आहे. मी हे फक्त स्वतःसाठी करतेय, मला काहीच सिद्ध करायचं नाहीये, काहीच दाखवायचं नाही, कुणाच्याच चुकाही काढायच्या नाहीत.
विविधतेने (की विषमतेने) नटलेल्या आपल्या भारतात प्रत्येक गोष्ट दुहीच्या किंवा एकीच्या राजकारणासाठी सेलेक्टिवरित्या वापरता येऊ शकते , पण त्याच्यामुळे आपण किती मोठ्या आनंदाला मुकून जातो. शेवटी नीरक्षीरविवेकाने सगळ्या भाषा- कला- संस्कृतीचा आनंद घेणं कठीण नाही. प्रत्येकजण कलाकार नाही होऊ शकत, पण रसिक व्हायला काय हरकत आहे.
साजिरा, पोस्ट नीट वाचली.
साजिरा, पोस्ट नीट वाचली.
I am because I think हे डेकार्टचं असेल तर मूळ वाक्य 'I think therefore I am' आहे. यात जास्त प्रोफाऊन्ड अर्थ ध्वनित होतो.
'I think therefore I am
'I think therefore I am’
अनेक वर्ष डायरीच्या पहिल्या पानावर लिहित होतो
रसिक व्हायला काय हरकत आहे ?
रसिक व्हायला काय हरकत आहे ?
+ १
सुंदर पोस्ट अस्मिता.
रसिक व्हायला काय हरकत आहे ?
रसिक व्हायला काय हरकत आहे ?
>>+११
बरोबर अस्मिता. डेकार्टचं आहे,
बरोबर अस्मिता. डेकार्टचं आहे, आणि तुम्ही लिहिलं तसंच आहे. लिहिण्याच्या ओघात चुकलं.
Cogito, ergo sum !
Cogito, ergo sum !
अस्मिता छान पोस्ट.
अस्मिता छान पोस्ट.
मस्त पोस्ट, अस्मिता!
मस्त पोस्ट, अस्मिता!
>>> Cogito, ergo sum !
मजा म्हणजे ते पूर्ण वाक्य ‘Dubito, ergo cogito, ergo sum’ असं आहे.
शंका/प्रश्न पडतात म्हणून मी विचार करतो, आणि विचार करतो म्हणून मी अस्तित्वात आहे.
मला भारी आवडतं ते! ज्याला कसले प्रश्नच पडत नाहीत, त्याच्या अस्तित्वाला काय अर्थ?
मस्त पोस्ट, अस्मिता!
मस्त पोस्ट, अस्मिता!
>>> Cogito, ergo sum !
मजा म्हणजे ते पूर्ण वाक्य ‘Dubito, ergo cogito, ergo sum’ असं आहे.
शंका/प्रश्न पडतात म्हणून मी विचार करतो, आणि विचार करतो म्हणून मी अस्तित्वात आहे.
मला भारी आवडतं ते! ज्याला कसले प्रश्नच पडत नाहीत, त्याच्या अस्तित्वाला काय अर्थ?
हा देकार्त एकदा एका कॅफे
हा देकार्त एकदा एका कॅफे मध्ये कॉफी प्यायला गेला.
त्याने एक कप कॉफी पिल्यावर वेट्रेस त्याच्याकडे आली आणि तिने विचारले "मेंस्यू, वूड यु लाईक टू हॅव् वन मोअर कप?"
देकार्त उत्तरला "आय थिंक नॉट "
अँड पुफ्... तो अदृश्य झाला म्हणे !
ख खो दे आणि वे जा.
Pages