या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.
तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :
१. एकट्याने सुरुवात करणे :-
हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.
२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.
३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.
४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.
५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.
६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.
७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.
आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!
सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?
इस्पितळात काही दिवस घालवून
इस्पितळात काही दिवस घालवून घरी परतलेल्या एका जेष्ठ नातेवाईकांना (त्यांच्या विनंतीवरून, स्वत:हून नाही) त्यांचे घर declutter करायला मदत केली.
तोंडाला मास्क, हातात ग्लव्हज् असा जामानिमा केला होताच.
काही अनुभव, अपडेटस्:
♦ एका दशकापूर्वी काढलेले X Rays, ECG, ब्लड टेस्ट रिपोर्टस्, डॉक्टरांचे प्रिसक्रिप्शन, फी आणि औषधांची बिले. हे एखाद्या संपत्तीसारखे जपून लोखंडी कपाटाच्या लॉकरमधे ठेवलेले होते. गेल्या तिमाहीच्या रिपोर्टस् मात्र “कुठेतरी” होत्या. राहत्या घराची कागदपत्रेही सापडली नाहीत, “बंगलोरला मुलाकडे असावीत” असा मोघम अंदाज.
♦ “महत्वाचे कागद” is a much abused term. सर्वच कागद “महत्वाचे” असले की खरेखुरे “कामाचे” पटकन सापडत नाहीत.
♦ जुन्या प्लास्टिकच्या तुटक्या खुर्च्या आणि टी पॉय. हे त्यांना “विकायचे” होते, अपेक्षित किंमत = ₹ २००० ! हे कुणी १०० रुपयात सुद्धा घेणार नाही हे त्यांना सांगायचे जिवावर आले, फक्त शुभेच्छा देऊ शकलो. या खुर्च्या वापरू नका, पडाल असा भोचक सल्ला मात्र दिला, out of concern.
♦ बिसलेरीच्या दोन मोठ्या आणि सहा-सात लहान रिकाम्या बाटल्या - दोन वर्षापूर्वी १-२ दिवस पाणीटंचाई होती तेव्हां वापरल्या होत्या. त्या टाकून दिल्या.
♦ दोन लोखंडी शेगड्या. गंजलेल्या आणि अस्वच्छ. टाकून दिल्या.
♦ ६ जुन्या चादरी- विटलेल्या. त्यासोबत पिलोकव्हर्स मात्र नव्हते. Trash मधे टाकल्या.
♦ एक दशकापासून वारेही न लागलेल्या, वापराविना पडून असलेल्या दुलया- मुंबईत थंडी फार असते म्हणून नाशिकहून खास मागवलेल्या 😀 कस्टम मेड. तो खण उघडला आणि कुबट वासाने गुदमरून मरू असे काही क्षण आले… पण जगलो वाचलो आम्ही. टाकून दिल्या.
♦ नाशिकच्या (१० वर्षांपूर्वी विकलेल्या) घराच्या वीज बिल, पाणी पट्टी आणि मनपा tax वगैरेच्या सुमारे २५ वर्षांच्या पावत्या. ते घर ज्यांना विकले होते ते कुटुंबसुद्धा सर्व विकून त्यांच्या मुलाकडे परदेशी स्थायिक झाले आहे. After much thought, हे कागद नष्ट केले.
♦ दिवंगत पत्नीच्या चांदीच्या तोरड्या, पैजंणं- जोडवे आणि चांदीचेच काही वाटी, पेले, चमचे. हे ज्या वस्तूंसोबत ठेवले होते ते कुणाला जराही संशय न येता तसेच कचरा टोपलीत गेले असते. Truly well camouflaged. याचे काय करायचे हे त्यांनी “नंतर बघू” category त टाकले आहे.
♦ मुलाच्या वीसेक वर्षापूर्वी झालेल्या लग्नाच्या पत्रिका. त्या जास्त संख्येत छापल्या होत्या, न वाटलेल्या पडून होत्या. आठवण म्हणून १० ठेवल्या, उरलेल्या टाकून दिल्या.
♦ शेकडो प्लास्टिक पिशव्या (अर्थातच !) आणि झोमेटो-स्विगी ची प्लास्टिक डबडी- तीच ती black is sexy वाली. याचं ऑबसेशन फार कॉमन आहे. National household treasure. का ते समजत नाही. दोन महीने दररोज एक जरी वापरली तरी ६० लागतील असे गणित त्यांना पटवून दिले आणि उरलेल्या टाकून दिल्या. Swiggy containers stayed. Couldn’t help.
♦ भेट म्हणून आलेले आणि कपाटात पडून असलेले household items, wall clocks, मिल्टन फ्लास्क्स्, काचेचे पेले - आइसक्रीम पॉटस्, मेलेमाइनच्या बटबटीत डिझाइनच्या प्लेटस्- थाळ्या आणि काही अहेरात आलेले शर्ट पीस-पँट पीस आता दिवाळीत ते वॉचमन आणि मदतनीसांना देणार आहेत (म्हणे). होईल तरच खरे.
आता दीपावली नजिकच आहे,
आता दीपावली नजिकच आहे, हक्काचा साफसफाईचा सण. ती करतांना जितके विनावापर घरात पडून असलेले, बिनकामी सामान कमी करता येईल ते करावे आणि खरोखरीची गरज असेल आणि वापर होईल ते आणि तेव्हढेच नवीन सामान घरात आणावे असा आग्रह.
सर्वांना हे करण्यासाठी, जमण्यासाठी भरघोस शुभेच्छा.
अनिंद्य
अनिंद्य,
या धाग्यावरील पोस्ट्स नेहमी वाचतोच
वरील पोस्ट्स मधील तुमचे अनुभव, अपडेटस् खूप आवडले.
पुढच्या वेळी अशा कामात तुम्हाला मदतनीसाची गरज पडल्यास मला निःशंक हाक मारा. मला आवडतात असली साफसफाईची कामे करायला.
हक्काचा साफसफाईचा सण.>>>>> दिवाळीपेक्षा मला ह्याचीच जास्त उत्सुकता.
मेलेमाइनच्या बटबटीत डिझाइनच्या प्लेटस्- थाळ्या>>>> I just hate that...
इथे जरा विचित्र वाटेल पण मला ते खंडर, अडगळ झालेली घरे चायनिज लोक साफसफाई, रंगरंगोटी करून नवी कोरी करतात ते व्हिडिओ बघायला भारी आवडते.
… मला निःशंक हाक मारा….
… मला निःशंक हाक मारा….
So kind of you ! 🙏
विचित्र कसले? मला सुद्धा ते before - आफ्टर क्लीनिंग व्हिडीयो, water gun नी घरे-पायऱ्या- वॉकवे pressure clean करण्याचे व्हिडियो येतात, बघायला आवडतात. Therapeutic for my mind.
^^^उत्तम साडया, पर्सेस, कपडे
^^^उत्तम साडया, पर्सेस, कपडे इ ला कोणीही कवडीची किंमत देत नाही.^^^^
हेच मी सोसायटी मधल्या बायकाना सांगितले होते.
त्यातल्या ८०% बायका माझ्याशी बोलतच नाहीत आता..
कित्ती छान ना

आहेरातल्या देण्याचे घेण्याचे
आहेरातल्या देण्याचे घेण्याचे कपडे कपाटात जागा अडवून पडून असतात.
अश्या नवीन साड्या ज्या वापरल्या नाहीत आणि तुम्हाला नको आहेत, त्या आम्हाला द्या, आम्ही आदिवासी वस्तीवर पोहचवतो असे एक आवाहन केले होते.
फक्त व्हाट्सअप स्टेटस ला ठेवलेले.
जवळपास 250 माता भगिनीना प्रत्येकी 1 साडी देउ इतके जमलंय. त्याचे पॅकिंग वै सुरू आहे.
उद्याच वाटप करणार आहे.
अर्थात हे टीम वर्क आहे. आणि ह्यात माझ्यासहित बरेच लोकं आहेत. आमचीही एक संस्था आहे मित्रानी मिळून सुरू केलेली. आपापले जॉब , नोकरी, उद्योग धंदे सांभाळत करतो थोडेसे काम.
अश्या बऱ्याच संस्था आहेत.
थोडेसे विचार करून असे सामान कुणी नेत असेल तर गरजू लोकांना उपयोगी पडेल आपल्या घरात धूळ खात पडण्यापेक्षा.
झकासराव, हे बेस्ट.
झकासराव, हे बेस्ट. विन विन फॉर ऑल.
Power to you and your friends 👍
… ८०% बायका माझ्याशी बोलतच नाहीत आता….
हे राम ! 😁
पुढच्या वेळी अशा कामात
पुढच्या वेळी अशा कामात तुम्हाला मदतनीसाची गरज पडल्यास मला निःशंक हाक मारा. मला आवडतात असली साफसफाईची कामे करायला. +१२३
आमाला बी डिक्लटरिंग करायचे
आमाला बी डिक्लटरिंग करायचे हाये पन आमाला पावर नाई!
पियू, ऋतुराज
प्रघा, समजले 😀
पियू, ऋतुराज
अशा श्रमाच्या+ कटकटीच्या कामासाठी मदत करणारे कमी असतात, त्यात ज्येना involved असले तर कुरकुर जास्त असते (सहसा). त्यांची मते ठाम असतात आणि आपले पेशन्स कमी. तरी तुम्ही तयारी दाखवलीत त्याबद्दल कौतुक आणि आभार.
विषय निघाला म्हणून सांगतो की मी स्वत:हून कधीही या कामासाठी volunteer करत नाही. कारण आपण आपली मतं समोरच्यावर लादतो आहे असे त्यांना (आणि आपल्यालाही) वाटता नये. पण वरील किश्श्यातल्या व्यक्तीने आधी तसे आडून सुचवले आणि मग डायरेक्टच विचारले की तू आज येऊन मदत करशील का - मला शक्य होते म्हणून गेलो आणि केले थोडे काम 🙂
प्रकाश घाटपांडे, तुम्हांला
प्रकाश घाटपांडे, तुम्हांला डिजिटल डोस्टांडिंग करता येईल .
अनिंद्य, प्रोफेशनल डिक्लटरिंग, डोस्टांडिग सर्व्हिसेस ना भरपूर वाव आहे , असं तुमच्या आताच्या किश्श्यावरून वाटलं.
… प्रोफेशनल डिक्लटरिंग,
… प्रोफेशनल डिक्लटरिंग, डोस्टांडिग सर्व्हिसेस ना भरपूर वाव आहे…
मग सुरु करू या 👍
इथेच आपण ३-४ जण तयार आहोत कामं करायला. धाग्यावर माबोकरांचे ६००+ प्रतिसाद आहेत म्हणजे idea marketing सुद्धा जमावं ब्रॉडर ऑडियन्स साठी
आपले आयुष्य कसे वळण घेईल
आपले आयुष्य कसे वळण घेईल माहित नाही. न जाणो कदाचित तुम्ही जमवलेला कचर्यातील एखादी गोष्ट,कागदपत्र तुम्हाला संकटातून वाचवेल. आमच्या घरी तर आजोबांची जमीन जुमला सावकारी गावकी व भावकी संबंधी कागदपत्रे भिंतीतल्या कपाटे भरुन शिवाय माळ्यावर वाळवी लागलेल्या अवस्थेत पडून होती. कालांतराने ते जुने घर मेंटेन होईना म्हणून विकले व गावाकडचा शेवटचा दुवाही निखळला
इन्स्टाग्रामवर Respun
इन्स्टाग्रामवर Respun संस्थेची जाहिरात पाहिली. ते लोक कोणत्याही अवस्थेतले कसलेली कपडे घेतात व त्यांचा लगदा करुन नव्या वस्तु बनवतात.
इच्छुक लोक, कपडे व चादरी सरळ कचर्यात टाकण्यापेक्षा त्यांना देऊ शकतात.
सुनिधी, Respun सारखेच गूंज एक
सुनिधी, Respun सारखेच गूंज एक आहेत, अजूनही काही लोक आहेत असे recycling करणारे.
देशातल्या एकूण trashed clothes पैकी फार कमी त्यांच्यापर्यंत पोहचत असावेत. But overall a good initiative 👍
… जमीन जुमला सावकारी
… जमीन जुमला सावकारी कागदपत्रे कपाटे भरुन, माळ्यावर वाळवी लागलेल्या अवस्थेत पडून होती….
गाव तर आमचेही सुटले, त्याला खूप वर्षं झाली आता. ढिगानी असलेले बिनमहत्वाचे कागद, रूटीन पत्रव्यवहार वगैरे कधीच नष्ट केले आहेत, having made some exceptions:
♣ माझ्याकडे पणजोबांच्या पश्चात सम्राट पंचम जॉर्जच्या स्टॅम्पपेपरवर १९०८ साली केलेले वाटणीपत्र आहे. 'आपसात पटत नसल्यामुळे वाटणी करत आहोत' असे रोखठोक कारण लिहितांना आजोबा बंधूनी पुतण्यांना मात्र स्वतःची इस्टेट आनंदानी लिहून दिलेली आहे 😀
♣ त्याआधीचे १८७८ चे धाकट्या आजोबांचे दत्तकपत्र आहे, ते स्वत:च्या सख्ख्या काकांच्या मांडीवर गेले होते. १९४१ चे माझ्या मोठ्या काकांचे दत्तकपत्र आहे, तेसुद्धा स्वत:च्याच काकांना दत्तक गेले आहेत (आता वय ८६+)
♣ दत्तकविधानानंतर officially बदललेली नावे, त्यानुसार जमीनीच्या मालकीहक्काच्या फेरफार नोंदी, गहाण दिले-घेतले-सोडवले त्याचे काही कागद, जमीनी विकल्याचे-विकत घेतल्याचे कागद, १९०० ते २०२३ पर्यंत कुटुंबात झालेल्या लग्नांच्या लग्नपत्रिका, आजी आणि आईचे मृत्युपत्र असे पन्नासेक कागद मी अजून ठेवले आहेत. बाबांना, मला अधून मधून बघायला, त्याबद्दल बोलायला, तारखा verify करायला आवडतात म्हणून हा खटाटोप. A glimpse into our shared history; fond memories of lovingly nurtured relationships of great antiquity 🙂
♣ तीन शहरे आणि पाच घरे बदलूनही ही कागदपत्रे टिकली आहेत. पन्नासच कागद होते म्हणून शक्य झाले, ५००० असते तर आतापर्यंत नक्कीच कुजून बुरशी-वाळवी लागली असती.
♣ मूळ लेखात मुद्दा क्र. ५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे असा आहेच. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत याचे भान आहे. बाबा आणि मी आम्ही दोघे ढगात गेलो की घरचे लोक ही कागदपत्रे कचऱ्यात टाकणार यात शंका नाही, त्याचे काही सोयरंसुतकही नाही.
♣ ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात, फक्त त्या मोजक्याच असाव्यात असा प्रयत्न असतो-आहे.
फार मस्त धागा आहे हा. उप्योगी
फार मस्त धागा आहे हा. उप्योगी आणि मजेशीर पण. अनिंद्य आणि इतर काही जणांचे प्रतिसाद फार कामाचे आहेत.
अस्मिताचे प्रतिसाद वाचून तर फारच करमणूक झाली.
बाकी प्रोफेशनल डीक्लटरिंग सर्विसेस ही मस्त कल्पना आहे. पुढच्या काही वर्षात भरभराटीला येईल. स्वतःच्या हाताने वस्तू फेकणे अवघड. मारी कोंदो बाई म्हणतात तसं, वस्तूला आपण हात लावला की इमोशनल होऊ शकतो. दुसर्याने लांबून दाखवलं तर प्रॅक्टिकली निर्णय घेणं त्या मानाने सोपं जातं.
माबो बंद आणि मैत्रीणींबरोबर
माबो बंद आणि मैत्रीणींबरोबर बेळगाव, कारवार,गोकर्ण व कोल्हापूर करून काल परतले. आठ दिवस डिजिटल उपास केला/घडला. माबो उघडते वेळी मनात विचार आला की अनिंद्यचा धागा वर आला असेल ... अपेक्षा भंग झाला नाही. आज सकाळी थोडी साफसफाई केली. अर्धा एक कि. वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या, जुने कपडे, जुने कप, जुन्या पर्सेस/ ब्याग वै सामान काढले.... हे सांगायला नाही आले
बेळगावात दोघी मैत्रिणींणी इरकली साड्या घेतल्या मी पण साडी खरेदीत असा इंटरेस्ट दाखवत होते जणू काही मला घ्यायची आहे. दोघींची साड्या निवड झाल्यानंतर तू कोणती घेणार ? नाही म्हटल्यावर त्यांना आश्चर्य नंतर रुसवा मग आग्रह वै नाटक / वाटाघाटीचा शेवट मला इरकलंं नेसायची इच्छा झाली की तुमच्या नेसीन आणि त्याबदल्यात माझ्याकडच्या साड्या तुम्ही घेऊन जायच्या. तर महत्वाचं सांगायचं हे की माझा निश्चय ढळला नाही 
… निश्चय ढळला नाही….
… निश्चय ढळला नाही….
मंजूताई, कौतुक तर आहेच. नवीन तर घरात आणली नाहीच वर किमान दोन साड्या घराबाहेर काढण्याची बेगमी केली !!
मान गए उस्ताद.
… आश्चर्य नंतर रुसवा मग आग्रहाचे नाटक आणि वाटाघाटीचा अंक ….
हे मला फार म्हणजे फारच बोअर होते. आपण निग्रहाने गिफ्टस् - कपडे नको, मी वापरत नाही, वापरणार नाही असे सांगितले की नातेवाईक/ मित्रगण/ परिचित सर्वांना असा चेव येतो की ज्याचे नाव ते. कसं समरसून जगावं, मौज मजा करून घ्यावी, चांगलं खावं-प्यावं- ल्यावं यावर भाषणे … आता मी काय विद्विशा संन्यास घेतलाय होय ? मला पण उत्तम सुखे हवीच आहेत पण “माझ्या” आवडीची आणि कमीत कमी पसाऱ्याची; इतकं सोपं समजवून देता देता माझ्यासारख्या high maintenance नराला लाजून चूर व्हायला होतं मनातल्या मनात 🙈
@ पारिजाता, you are welcome,
@ पारिजाता, you are welcome,
@ मंजूताई, डिजीटल उपवास फार कठीण. त्याबद्दल सेपरेट कौतुक आणि हा पुष्पगुच्छ 💐
डिजिटल उपवास प्लस इरकल विकत
डिजिटल उपवास प्लस इरकल विकत घेण्याचा मोह आवरलात त्याबद्दल शाबासकी
अनिंद्य, माझेमन कौतिकाबद्दल
अनिंद्य, माझेमन कौतिकाबद्दल मंडळ आभारी आहे. स्वयंपाक घरातील सहा महिन्यात न वापरलेलं सामान बाहेर काढलं…. उद्या कपडे निघतील …
Pages