हो,
शाहरूख खान भारतीय महिलांना आवडतो.
आणि हे मी म्हणत नाहीये......
तर सर्व्हेचा निकालच तसा आहे.
त्याच निकालावर आधारीत हा सुंदर लेख आज सकाळीच त्याच्या वाढदिवसानिमित्त वाचण्यात आला.
https://www.bbc.com/marathi/india-59472935
या लेखाला केवळ शाहरूखच्या चाहत्या महिलांनीच नाही तर भारतातल्या प्रत्येक पुरुषाने वाचावे आणि यावर विचार करावा अशी मनापासून ईच्छा म्हणून हा लिखाणप्रपंच !
-------------------------------------------------
आमच्याकडे माझ्या आईला शाहरूख आवडतो. "कभी खुशी कभी गम" आम्ही जोडीने तब्बल पंधरा ते सोळा वेळा बघितला आहे.
आमच्याकडे माझ्या बायकोला शाहरूख आवडतो. थेट कबूल करणार नाही ती.. पण ते कळते. माझ्या शाहरूखप्रेमाचेही तिला तितकेच कौतुक आहे.
आमच्याकडे माझ्या आठ वर्षांच्या मुलीलाही ती सहा वर्षांची असल्यापासून शाहरूख आवडतो. टीव्हीचा रिमोट हातात घेते आणि शाहरूख खान मूवीज असे सर्च करून त्याचा जो चित्रपट दिसेल तो बघून घेते. आम्ही जोडीने कैक शाहरूख मूवी नाईट मारल्या आहेत. अगदी त्याच्या उतरत्या काळातले झिरो, दिलवाले, हॅपी न्यू ईयर हे चित्रपट देखील तिच्यामुळेच बघून झालेत.
मला सख्खी बहिण तर नाही, पण माझ्या चुलत-मामे-मावस सर्वच बहिणींना शाहरूख आवडायचा. आम्ही जवळपास सारे एकाच वयोगटातले. तो आम्हाला डीडीएलजेच्या काळापासून आवडायचा.
माझ्या सर्वच सख्या मैत्रीणींनाही शाहरूख आवडतो. किंबहुना असेही म्हणू शकतो की शाहरूख आवडणार्या मुलींशी माझी छान गट्टी जमते. शाहरूखप्रेम हा आमच्यातला कॉमन फॅक्टर असतो.
हो, पण आपल्याकडे मागच्या पिढीपर्यंत महिलांनी एखादा हिरो आवडतो हे उघड सांगायची जरा चोरीच होती. कारण हिरो वा हिरोईन आवडतो/आवडते असे म्हटले की आपल्या डोक्यात आधी शारीरीक आकर्षणच येते. पण शाहरूखबाबत गणिते बदलली. शाहरूख आवडणे हे बरेचदा कुठल्या शारीरीक आकर्षणातून आले नसते.. तो बस्स आवडतो!
हो, तो तसा क्यूट आहे. गालावर छान खळीही पडते. पण भारतीय मर्दानी सौंदर्याचे निकष लावता, त्यात तो कधी फिट झाला नव्हता.
तो आमीर सारखा चॉकलेट हिरो नव्हता, ना तो सलमानसारखा शरीरसौष्टव मिरवायचा.
तो अक्षय कुमारसारखा अॅक्शन हिरो नव्हता, ना सनी देओलसारखा त्याचा ढाई किलो का हाथ होता.
पण तरीही त्याने आबालवृद्धांना भुरळ पाडली.
का?
एक छान कारण वरच्या लेखातच दिले आहे ..
त्याची एक चाहती म्हणते,
"मी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर असा हिरो पाहिला जो घरातल्या बायकांबरोबर स्वयंपाक घरात गाजर सोलत होता, स्वयंपाक घरात इतका वेळ देत होता." (चित्रपट - डीडीएलजे)
तिच्यामते हे तेव्हा फार रोमँटीक द्रुश्य होते.
हो, शाहरूखने हिरोईजमची व्याख्या बदलली. जेव्हा नव्वदीच्या दशकात सनी देओल, जॅकी श्रॉफ, संजय दत्त असे अॅक्शन हिरो अमिताभचा वारसा पुढे चालवायला तयार होते तेव्हा असे एखादे कॅरेक्टर पडद्यावर साकारायची हिंमत त्याने दाखवली. आणि ही शाहरूखचीच जादू की ते चक्क लोकांना आवडले. खास करून मुलींना आणि महिलांना आवडले. असाही हिरो असू शकतो हे त्यांना नव्याने कळले. आणि आपल्यालाही असा पुरुष जोडीदार असावा हे त्यांना वाटू लागले. असा म्हणजे कसा. तर आपल्या जोडीदाराची कदर करणारा, तिचे बोलणे तिचे विचार संपुर्णपणे ऐकणारा, तिला आणि तिच्या भावनांंना समजून घेणारा, तिला हसवणारा, तिला वेळ देणारा, तिला आपल्या आयुष्यात तितकेच महत्वाचे स्थान देणारा...
केवळ गुंडांशी चार हात करून हिरोईनचे रक्षण करणार्या हिरोमध्ये प्रत्यक्ष आयुष्यात कोणाला तितका रस नव्हता.
आपल्याकडे हिरोईन म्हणजे केवळ शोभेची बाहुली हा ओरडा खूप असतो. शाहरूखच्या चित्रपटात ते कधी आढळले नाही. म्हणून त्यातला हिरोही मुलींना आपला हिरो वाटायचा. हे प्रेम आपल्या आयुष्यात यावे असे वाटायचे. पण शाहरूखची ही ईमेज केवळ पडद्यापुरतीच मर्यादीत नाहीये. तो प्रत्यक्ष जीवनातही स्त्रियांना तितकाच सन्मान देणारा म्हणून ओळखला जातो. आजही त्याच्या हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहाचा आदर्श ठेवला जातो. त्याच्या सहकलाकार नायिकांशी असलेल्या त्याच्या निखळ मैत्रीचे उदाहरण दिले जाते. चित्रपटाच्या नामावलीत हिरोच्या आधी हिरोईनचे नाव यावे ही पद्धत त्याने सुरू केली, जे ईतक्या वर्षात कोणाला सुचले नव्हते.
त्याचे पडद्यावरच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही कुटुंबवत्सल असणे लोकांना आवडते. मध्यंतरी बातमी ऐकली. शाहरूखच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक झाली. अशी वेळ आपल्यापैकी कोणावरही येऊ शकते. पण सेलिब्रेटींच्या मुलावर आली की आपण आपला हक्क समजून तोंडसुख घेतो. पण ती बातमी ऐकल्यावर आमच्या घरी सर्वांना शाहरूख खान "या बापाबद्दल" वाईट वाटले.
त्या लेखात अजूनही काही कारणे दिली आहे. जसे त्याचा सेन्स ऑफ ह्युमर. त्याचे चटपटीत बोलणे, त्याचे हजरजबाबी असणे... पुर्णपणे सहमत!
पण या सर्वात तो विनम्रही कधीच नव्हता. किंबहुना त्याने विनम्रतेचा आव कधीच आणला नाही.
जेव्हा सुरुवातीच्या यशानंतर त्याच्या डोक्यात हलकीशी हवा गेली तेव्हा अमिताभ आणि दिलीपकुमार बेस्ट असले तरी आपण थोडे बेटर आहोत असे विधान त्याने बिनधास्त केले होते. पण पुढे तो आपला वेडेपणा होता हे प्रामाणिकपणे कबूल करायलाही त्याचे जीभ कचरली नाही. तर आज पुन्हा यशाच्या शिखरावर असताना स्वतःला किंग खान देखील तो तितक्याच आत्मविश्वासाने म्हणवून घेतो.
आपल्याकडे मुले रडत नाहीत असा एक समज आढळायचा. तसेच मुलांच्या मनावर बिंबवले जायचे. त्यामुळे अश्या मुलांना पुढे जाऊन मुलींच्या भावना कळणे अवघड व्हायचे.
पण शाहरूखने पडद्यावर रडणारा हिरो यशस्वीपणे साकारला. बायकांच्या भावनांना समजून घेणे हा देखील एक गुण असतो आणि तो प्रत्येक पुरुषाकडे असायला हवा हा विचार प्रेक्षकांमध्ये रुजवला.
आता तुम्ही म्हणाल की चित्रपट दिग्दर्शकाचा असतो, लेखकाचा असतो. त्यात काम करणारे कलाकार तर केवळ त्यांचे विचार वाहून नेणारे माध्यम असतात. त्यामुळे हे सारे काही शाहरूखने केले नाही.
पण प्रत्यक्षात असे नसते. तो चेहरा असतो, त्याला स्टारडम असते म्हणून ते विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. म्हणून तसे चित्रपट बनतात. म्हणून ते प्रभाव पाडतात.
शाहरूख नसता तर यातले काहीच झाले नसते.
आणि म्हणून आपल्याला शाहरूख च आवडतो
-------------------------------
उलट सुलट मनात आलेले विचार कसेही लिहून काढलेत.
तुर्तास थांबतो पण लिहायचे अजून संपले नाही.
प्रतिसाद ईथे मी आयुष्यभर देऊ शकतो.
कारण भारतातच काय, जगात अशी महिला नाही... जी माझ्यापेक्षा मोठी शाहरूखची चाहती असेल
-------------------------------
अरे हो, हॅपी बड्डे शाहरूख. हे राहिलेच. किती वर्षांचा झालास हे माहीत नाही. जाणून घेण्यत ईंटरेस्टही नाही. तुझे वय कधी मोजावेसे वाटलेच नाही. कारण आजही शाहरूख म्हटले की डोळ्यासमोर तुझा हाच चेहरा येतो
धन्यवाद,
ऋन्मेष
देशात सर्व प्रकारची पिकनिक
देशात सर्व प्रकारची पिकनिक साठी योग्य ठिकाणे असताना.
काहीच वर्गातील लोक विदेशी जातात पर्यटन साठी.
सामान्य नोकर पेशा सभ्य वर्ग फालतू मोठे पना साठी जातात
पण मुरलेले फक्त आर्थिक फायद्या साठी च जातात.
शाखा नी काही तरी बेकायदेशीर वस्तू नक्कीच आणली असणारं
पूजा म्हणाल तर शाहरूखसारख्या
पूजा म्हणाल तर शाहरूखसारख्या मेहनती आणि आपल्या अंगभूत कलागुणांवर यशाचे शिखर गाठलेल्या कलाकारापासून प्रेरणा घेण्यात, त्याचा आदर्श ठेवण्यात काही वावगे नाही. शाहरूखने मला एक काय दिले यावर खरे तर एक वेगळा लेख बनेल. किंबहुना आपले कुठलेही आवडते कलाकार आपल्या आयुष्यात काय घेऊन येतात हे आपल्याला बरेचदा कळतच नाही. त्याची आपण तितकी किंमत करत नाही ती या निमित्ताने चर्चेत येईल.>> डोळे पाणावले. कंठ दाटून आला. हात पाय थर थ राय ला लागले. >> बरोबर!
शाखा सरांना काल परवा
शाखा सरांना काल परवा विमानतळावर अडवुन ठेवलं अशी बातमी होती. शाखा सरांनी काय भानगड केली? कुणाला माहित आहे का?
>>>
बातमीची लिंक द्या
शाहरूख म्हटले की अफवाच फार
देशात सर्व प्रकारची पिकनिक
देशात सर्व प्रकारची पिकनिक साठी योग्य ठिकाणे असताना.
काहीच वर्गातील लोक विदेशी जातात पर्यटन साठी.
>>>>>
शाहरूखच्या चित्रपटांचे ओवरसीज मार्केट जबरदस्त आहे
युके युएस मध्ये त्याच्यासारखी क्रेझ आजवर कुठल्याही बॉलीवूड अभिनेत्याची पाहिली नाही.
त्यामुळेच त्याला माय नेम ईज खान सारखा चित्रपट करता येतो, त्याच्या मार्केटींगसाठी त्याला विमानतळावर अडवल्याचे स्टंट करता येतात. स्वदेशसाठी तो थेट नासात जातो.
लंडनला तर तो आपले दुसरे घर समजतो. तिथे त्याचे कैक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
तो युएईचा लाडका युवराज आहे. त्याच्या वाढदिवसाला बुर्ज खलिफाला स्पेशल लाईट शो असतो. दुबई टूरीजमचा तो ब्रांड ब्रांड ब्रांड आंबासेडर आहे.. आता बोला
उदय चोप्राच्या यशराज
उदय चोप्राच्या यशराज फिल्म्सच्या कोणत्या चित्रपटाने ओव्हरसीज धंदा केलेला नाही ? धूम मुळेच बॉलीवूडला बाहेर पहचान मिळाली.
उदय चोप्राच्या यशराज
उदय चोप्राच्या यशराज फिल्म्सच्या कोणत्या चित्रपटाने ओव्हरसीज धंदा केलेला नाही
>>> निल n निक्की
स्वदेशसाठी तो थेट नासात जातो.
स्वदेशसाठी तो थेट नासात जातो.
>>> नुसता जात नाही पूर्ण तयारीने जातो... तिथे जाऊन एक लेक्चरही देतो आणि सोलर एनर्जी ने लुनार गेटवे बांधायची कल्पनाही मांडतो.... उगाच नाही तो ग्रेट !!!
स्वदेश सारखा सोलर प्रोजेक्ट
स्वदेश सारखा hydroelectric प्रोजेक्ट भारतात एका पण गावात नसावा.
गावपातळीवर स्वतःचे युनिट उभे करून गावामध्ये वीजवितरण केले आहे. असे एक गाव दाखवा आणि लाख रुपये मिळवा असे बक्षीस जाहीर केले तर एक पण गाव सापडणार नाही
असे एक गाव दाखवा आणि लाख
असे एक गाव दाखवा आणि लाख रुपये मिळवा >>> गुगल पे कोड पाठवतो. एक लाख रूपये पाठवा त्यावर.
स्वतः गुगल केले तरी सापडेल गाव.
इथे कुणी माया मेमसाहब
इथे कुणी माया मेमसाहब पिक्चरचे फॅन्स आहेत का? (मी त्यातल्या गाण्यांचा आहे, पण इषय शाहरुखचा असल्यामुळे इचारलं.)
माया मेमसाब बघायचा राहिला आहे
माया मेमसाब बघायचा राहिला आहे.
त्यात शाहरूखचे मायासोबत विवाहबाह्य अफेअर दाखवले आहे ना. ते तेव्हाच्या बालमनाला पटणारे नसावे किंवा शाहरूखची अशी भुमिका असलेला चित्रपट घरी कसा बघायचा म्हणून बघणे झाले नसावे. पण आता बघायला हरकत नाही.
असो. धन्यवाद. बरी आठवण केलीत. छान आहे असे ऐकून आहे. बघतो लवकरच....
इथे कुणी माया मेमसाहब
इथे कुणी माया मेमसाहब पिक्चरचे फॅन्स आहेत का? (मी त्यातल्या गाण्यांचा आहे, पण इषय शाहरुखचा असल्यामुळे इचारलं.)>> मी आहे. दीपा साही नावाची कला कार ह्यात होती. हिचा पतीच/ पती सुद्धा दिग्दर्शक प्रोडुसर टाइप होता. ही आली तेव्हाच जरा प्रौढ होती. चित्रप टाचा विषय जरा सेन्सिटिव्ह आहे . स्त्रीच्या पूर्ण न झालेल्या कामेच्छा, फँटसीज व अश्या नाजूक वेळी तिच्या जीवनात एक तरूण हसरा मुलगा येतो.( आता सगळे मुलगेच वाट तात. साठी आली.) तो म्हणजे शाहरूख. मी घरी व्हीएच एस टेप आणून बघितला आहे. ही फार छान दिसते. म्हणजे
तारूण्य गेलेले आहे पण कसे ही करून छान दिसायचे आहे. गावाकडे राहते. भले मोठे घर पण पैशाची चण चण. नवरा आहे एक कोणतरी
टेलर कडून फॅन्सी ब्लाउज वगिअरे शिवून घेते.
गाणी छान होती. चित्रपट काळाच्या पुढे होता. मांडणी पण फँटसी स्वरूपाचीच होती.
दीपा साहीला त्या आधी तमस या
दीपा साहीला त्या आधी तमस या मालिकेत पाहिले.
व्हीएच एस चा किस्सा म्हणजे.
व्हीएच एस चा किस्सा म्हणजे. त्याकाळी, आम्ही नुकतेच रोड नंबर बारा बंजारा हिल्स ह्या फँन्सी पत्त्यावर शिफ्ट झालेलो होतो. हे एका हिलवर होते. बंजारा यु नो. व रोडच्या खाली - पायथ्याला - भाजीवाला व्हिएचेस टेप वाला प्रियदर्शिनी व्हिडेओ वाल्याचे दुकान होते. माझी चेतक स्कूटर होती. व काम झाल्यावर घरी जाताना मी तिथे थांबून भाजीवाल्याशेजारी गाडी लावायची व भाजी घेउन वीएच एस घेउन यायची. व मग वर जायची.
प्रियदर्शिनीवाला सर्व बंजारा हिल्स ला सर्विस करे. व त्याच्याकडे एक खास कलेक्षन होते. ह्याला मी विचारले होते माया मेमसाब आहे का आर्ट मुव्ही आहे तर त्याला आर्ट मुव्ही हे समजलेच नाही तीन दा सांगून . मग त्या खास कलेक्षन मधून गुपचुप ती टेप आणून दिली.
दीपा साही व तिचा नवरा ह्या जोडीने एक ओ डार्लिन्ग ये है इंडिया नावाचा पण पिक्चर काढलेला व त्यातही शाहरूख होता बहुतेक. लैच चाप्टर मुव्ही.
अमा, मामे (माया मेमसाब)
अमा, मामे (माया मेमसाब) बद्दलच्या पूर्ण पोस्टीशी सहमत.
ऋन्मेऽऽष, नक्की पहा.
इथे कुणी माया मेमसाहब
इथे कुणी माया मेमसाहब पिक्चरचे फॅन्स आहेत का? (मी त्यातल्या गाण्यांचा आहे, पण इषय शाहरुखचा असल्यामुळे इचारलं.)>> मीही आहे.
माझ्या शाळकरी वयात हा चित्रपट आला होता. त्यामुळे पालकांनी कधी बघायला नेले नाही. किंबहुना आताही कधी बघावसा वाटला नाही. पण अहाहा! काय गाणी आहेत. चित्रपट प्रदर्शीत झाला त्याकाळात घरी टेपरेकॉर्डर नव्हता. त्यामुळे रेडीओवर ऐकलेल्या विशेषतः 'एक हसीन निगाहका दिलपे साया है, जादु है जुनून है कैसी माया है' ह्या गाण्याचे अजूनही मनावर गारूड आहे. पुढे हाती मोबाईल आल्यावर हे गाणे डाऊनलोड करून ऐकत असे. हल्लीही युट्यूबवर लावतोच. दिदींचा स्वर, गुलजारांचे शब्द व हृदयनाथांचे संगीत, केवळ स्वर्गच.
तमस मुळे ती सर्व टीम मिले
तमस मुळे ती सर्व टीम मिले सुर मेरा तुम्हारा तो मध्ये होती. बदलांदा रूप लैके बरसन हौले हौले लाइनला.
तमस ऑसम सिरीअल.
ओ डार्लिन्ग ये है इंडिया
ओ डार्लिन्ग ये है इंडिया नावाचा पण पिक्चर काढलेला व त्यातही शाहरूख होता बहुतेक. लैच चाप्टर मुव्ही.
>>>
अमा चाप्टर कुठल्या अर्थाने म्हटले?
मला आवडलेला तो मूवी. काही भाग बालिश वाटलेला. पण प्रयोग हटके होता.
त्यातले ते जावेद जाफरीचे बाप वाले गाणेही धमाल होते.
थांबा लिंक शोधतो.
https://youtu.be/QbDjUd7MWgU
ईथे ऑडिओ आहे.. कोणाला विडिओ सापडला तर सांगा..
नवरा आहे एक कोणतरी >>> फारूख
नवरा आहे एक कोणतरी >>> फारूख शेख आहे
छान आहे हा पिक्चर. Madame Bovary नावाच्या नॉव्हेलवर आधारित आहे. सगळी गाणी अप्रतिम आहेत. हृदयनाथ _/\_
दीपा साही आणि केतन मेहता(?)
दीपा साही आणि केतन मेहता(?)
मलाही 'माया मेमसाब'ची गाणी आवडलेली. शाहरुख काय चार्मिंग दिसलाय यात. तो मंद वाहणाऱ्या वाऱ्यासारखा आहे, कुणाचाच कुणीच नाही, तरीही माया तिच्या स्वभावामुळे इतकी एकाकी आहे की तिलाही त्याच्यासोबत उडत जायचंय.
फारूख शेखचे काम मला नेहमीच अप्रतिम वाटते. त्याची बायको रात्रभर या नव्या मित्रासोबत असते, तो सकाळी शोधताना ह्याच्याही घराखालून जातो , वरून खिडकीतून शाखाला विचारतो 'माया दिसली का' , हा नाही म्हणतो, तो याचे मोठ्या प्रेमाने आभार मानून निघून जातो. इतकी मोठी फसवणूक होत असते तेव्हा हा साधेपणा फार रुतत जातो. त्याची व्यक्तिरेखा स्थिर व खोल वाटते. त्याला आपण मायाला समजू शकत नाहीत याची पूर्ण कल्पना असते तरीही तिच्यावर पूर्ण विश्वासही असतो. श्रीराम लागू हे मायाचे बाबा असतात, ते त्यांच्या डॉक्टर मित्राला सांगतात 'आईविना पोर आहे त्यात सुंदर त्यामुळे इतर मुलींच्या मानाने चार स्वप्नं अधिक बघणं साहजिकच आहे.' सुरेख सीन आहे तोही.
मला अपुऱ्या कामेच्छापूर्तींपेक्षा माया पूर्ण डिल्यूजनल वाटली, अनरिअल. स्वप्नांच्या जगात रहाणारी. हा हसरा तरूण नाही तर दुसरा कुठलाही हसरा-चार्मिंग तरूण चालला असता. She just wanted to escape the reality, live in dreams, where it is all about her desires . Sexual attraction was also a small part of the whole delusion. शेवटी ती गायब होते , ते मात्र मला काही कळलं नाही.
Madame Bovary नावाच्या नॉव्हेलवर आधारित आहे. +१
दीपा साही आणि केतन मेहता(?)
मीही ते एक गूढ/ स्वप्न आहे , असंच समजले रमड. कारण ती एकदा म्हणते 'क्या पता सब माया है', illusion किंवा भ्रम या अर्थाने!
बघितला तेव्हा फार लहान होते , त्यामुळे नीट कळालाय की नाही माहिती नाही पण काहीतरी वेगळाचं वाटला होता.
मस्त लिहीलंयस, अस्मि.
मस्त लिहीलंयस, अस्मि.
मला वाटतं शेवटचं तिचं गायब होणं हे 'जादू है जुनून है' शी रिलेटेड असावं. तिचं आयुष्यच एखाद्या भासासारखं, स्वप्नासारखं आहे. त्यामुळे तिचा शेवट पण अनुत्तरित आहे. ती काय होती हेच माहिती नाही तर ती संपली कशी हे कसं समजावं?
लोकं पिक्चरबद्दल ईतके छान
लोकं पिक्चरबद्दल ईतके छान लिहीत आहेत आणि त्यात शाहरूख आहे. पण तरीही मी पाहिला नाही.
हा एक कलंक आहे. आणि तो मिटवायला लवकरच माया मेमसाब बघावा लागणार असे दिसतेय
एक कलंक तो तो मिटा लोगे
एक कलंक तो मिटा लोगे बाबूजी, लेकिन नया कहांसे ढूंढोगे? रहनेही दिजिए
तमस मुळे ती सर्व टीम मिले सुर
तमस मुळे ती सर्व टीम मिले सुर मेरा तुम्हारा तो मध्ये होती. बदलांदा रूप लैके बरसन हौले हौले लाइनला. >> आईला! ती टीम आहे होय ही! भारीच. बरसन हौले हौले म्हणणारी माया मेमसाब आहे हे लक्षात नव्हतं आलं.
माया मेमसाब बघायला पाहीजे.
माया मेमसाब बघायला पाहीजे. कुठे बघता येईल? त्याच्या बद्दल एकलेला तेव्हा शाहरुख असुनही चांगला आर्ट फिल्म टाईप्स मुव्ही आहे असे वाटलेलं. पण तेव्हा पाहाता आला नाही..
शाहरूख खान आणि फारूक शेखला
शाहरूख खान आणि फारूक शेखला तुम्ही ईथेही एकत्र बघू शकता.
किंबहुना जरूर बघा ही शाहरूखची मुलाखत
जीना ईसी का नाम है मध्ये शाहरूख आला असताना..
https://youtu.be/QKTrS5oT8To
काल हपिसातून माया वर अजुन एक
काल हपिसातून माया वर अजुन एक पोस्ट टाकायचे होती पण तो लॅपटॉप जरा फनी आहे. लिहिलेली पोस्ट सारखी उडत होती मग कामच आले.
माया एक स्वप्नाळू व्यक्तिमत्व चुकीच्या जागी अडकून पडलेली सोनेरी मैना. ते मोठ्ठे पण जुनाट घर, ते आजारी वडील, शामळू नवरा ह्यांनी त्या तुरुंगाची एक एक भिंत पक्की होत जाते. ज्या बरोबर जीवन अनुभवायचे तो सहचरच असा पंक्चरलेला. मग ती साहस करते . पहिले राज बब्बर बरोबर अफेअर. बट दँट ड्झंट वर्क इदर. मग तिच्या जीवनात अजून एक फ्रेश व्यक्तिमत्व येते पण ते काही रिले शन शिप लेव्हलला जात नाही.
दिग्दर्शक व लेख क सुद्धा हेच दाखवायचा प्रयत्न करतो आहे की प्रत्येक स्त्रीच्या जीवनात एक शोध हा सतत चालू अस्तो. एखादा सिक्युरिटी देतो एखादा सोशल स्टेटस व आर्थिक सिक्युरिटी एखादाच सर्व पैलुं वर तिला सुखी समाधानी करू शकतो. त्यात परत आपल्याला हेच जेंडर हवे आहे का हा ही एक सर्च चालू आहे. ह्यात काही अर्थ नाही सर्व नाती विरळ विरळ होत जातात हे लक्षात आल्यावर माया नाहिशी होते. प्रत्येक स्त्री साठी हा शोध रिलेव्हंट आहे. काही तडजोड करून सुखाने जगतात तर काही अपूर्णतेचेच लेणे बनवतात. म्हणूनच त्यांच्या जीव्नात हा शाहरुख एक रुपक म्हणून येत असावा व एखादे गुलाबी वस्त्र काही वेळा पुरते भयानक अस्वीकरणीय रिअॅलिटी वर पसरतो.
ही त्याची फक्त इमेज आहे खरी व्यक्ती वेगळी आहे व त्याचे स्वतःचे जीवन आहे.
सुंदर पोस्ट अमा.
सुंदर पोस्ट अमा.
छान पोस्ट
छान पोस्ट
लेखाचे शीर्षकही अलगद उलगडले
कदाचित याचसाठी माया मेमसाब चित्रपट या धाग्यावर आला असावा
Pages