शाहरूख खान भारतीय महिलांना ईतका का आवडतो?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 November, 2022 - 13:45

हो,
शाहरूख खान भारतीय महिलांना आवडतो.

आणि हे मी म्हणत नाहीये......
तर सर्व्हेचा निकालच तसा आहे.

त्याच निकालावर आधारीत हा सुंदर लेख आज सकाळीच त्याच्या वाढदिवसानिमित्त वाचण्यात आला.

https://www.bbc.com/marathi/india-59472935

या लेखाला केवळ शाहरूखच्या चाहत्या महिलांनीच नाही तर भारतातल्या प्रत्येक पुरुषाने वाचावे आणि यावर विचार करावा अशी मनापासून ईच्छा म्हणून हा लिखाणप्रपंच !

-------------------------------------------------

आमच्याकडे माझ्या आईला शाहरूख आवडतो. "कभी खुशी कभी गम" आम्ही जोडीने तब्बल पंधरा ते सोळा वेळा बघितला आहे.

आमच्याकडे माझ्या बायकोला शाहरूख आवडतो. थेट कबूल करणार नाही ती.. पण ते कळते. माझ्या शाहरूखप्रेमाचेही तिला तितकेच कौतुक आहे.

आमच्याकडे माझ्या आठ वर्षांच्या मुलीलाही ती सहा वर्षांची असल्यापासून शाहरूख आवडतो. टीव्हीचा रिमोट हातात घेते आणि शाहरूख खान मूवीज असे सर्च करून त्याचा जो चित्रपट दिसेल तो बघून घेते. आम्ही जोडीने कैक शाहरूख मूवी नाईट मारल्या आहेत. अगदी त्याच्या उतरत्या काळातले झिरो, दिलवाले, हॅपी न्यू ईयर हे चित्रपट देखील तिच्यामुळेच बघून झालेत.

मला सख्खी बहिण तर नाही, पण माझ्या चुलत-मामे-मावस सर्वच बहिणींना शाहरूख आवडायचा. आम्ही जवळपास सारे एकाच वयोगटातले. तो आम्हाला डीडीएलजेच्या काळापासून आवडायचा.

माझ्या सर्वच सख्या मैत्रीणींनाही शाहरूख आवडतो. किंबहुना असेही म्हणू शकतो की शाहरूख आवडणार्‍या मुलींशी माझी छान गट्टी जमते. शाहरूखप्रेम हा आमच्यातला कॉमन फॅक्टर असतो.

हो, पण आपल्याकडे मागच्या पिढीपर्यंत महिलांनी एखादा हिरो आवडतो हे उघड सांगायची जरा चोरीच होती. कारण हिरो वा हिरोईन आवडतो/आवडते असे म्हटले की आपल्या डोक्यात आधी शारीरीक आकर्षणच येते. पण शाहरूखबाबत गणिते बदलली. शाहरूख आवडणे हे बरेचदा कुठल्या शारीरीक आकर्षणातून आले नसते.. तो बस्स आवडतो!

हो, तो तसा क्यूट आहे. गालावर छान खळीही पडते. पण भारतीय मर्दानी सौंदर्याचे निकष लावता, त्यात तो कधी फिट झाला नव्हता.
तो आमीर सारखा चॉकलेट हिरो नव्हता, ना तो सलमानसारखा शरीरसौष्टव मिरवायचा.
तो अक्षय कुमारसारखा अ‍ॅक्शन हिरो नव्हता, ना सनी देओलसारखा त्याचा ढाई किलो का हाथ होता.
पण तरीही त्याने आबालवृद्धांना भुरळ पाडली.

का?

एक छान कारण वरच्या लेखातच दिले आहे ..
त्याची एक चाहती म्हणते,

"मी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर असा हिरो पाहिला जो घरातल्या बायकांबरोबर स्वयंपाक घरात गाजर सोलत होता, स्वयंपाक घरात इतका वेळ देत होता." (चित्रपट - डीडीएलजे)

तिच्यामते हे तेव्हा फार रोमँटीक द्रुश्य होते.

हो, शाहरूखने हिरोईजमची व्याख्या बदलली. जेव्हा नव्वदीच्या दशकात सनी देओल, जॅकी श्रॉफ, संजय दत्त असे अ‍ॅक्शन हिरो अमिताभचा वारसा पुढे चालवायला तयार होते तेव्हा असे एखादे कॅरेक्टर पडद्यावर साकारायची हिंमत त्याने दाखवली. आणि ही शाहरूखचीच जादू की ते चक्क लोकांना आवडले. खास करून मुलींना आणि महिलांना आवडले. असाही हिरो असू शकतो हे त्यांना नव्याने कळले. आणि आपल्यालाही असा पुरुष जोडीदार असावा हे त्यांना वाटू लागले. असा म्हणजे कसा. तर आपल्या जोडीदाराची कदर करणारा, तिचे बोलणे तिचे विचार संपुर्णपणे ऐकणारा, तिला आणि तिच्या भावनांंना समजून घेणारा, तिला हसवणारा, तिला वेळ देणारा, तिला आपल्या आयुष्यात तितकेच महत्वाचे स्थान देणारा...
केवळ गुंडांशी चार हात करून हिरोईनचे रक्षण करणार्‍या हिरोमध्ये प्रत्यक्ष आयुष्यात कोणाला तितका रस नव्हता.

आपल्याकडे हिरोईन म्हणजे केवळ शोभेची बाहुली हा ओरडा खूप असतो. शाहरूखच्या चित्रपटात ते कधी आढळले नाही. म्हणून त्यातला हिरोही मुलींना आपला हिरो वाटायचा. हे प्रेम आपल्या आयुष्यात यावे असे वाटायचे. पण शाहरूखची ही ईमेज केवळ पडद्यापुरतीच मर्यादीत नाहीये. तो प्रत्यक्ष जीवनातही स्त्रियांना तितकाच सन्मान देणारा म्हणून ओळखला जातो. आजही त्याच्या हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहाचा आदर्श ठेवला जातो. त्याच्या सहकलाकार नायिकांशी असलेल्या त्याच्या निखळ मैत्रीचे उदाहरण दिले जाते. चित्रपटाच्या नामावलीत हिरोच्या आधी हिरोईनचे नाव यावे ही पद्धत त्याने सुरू केली, जे ईतक्या वर्षात कोणाला सुचले नव्हते.

त्याचे पडद्यावरच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही कुटुंबवत्सल असणे लोकांना आवडते. मध्यंतरी बातमी ऐकली. शाहरूखच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक झाली. अशी वेळ आपल्यापैकी कोणावरही येऊ शकते. पण सेलिब्रेटींच्या मुलावर आली की आपण आपला हक्क समजून तोंडसुख घेतो. पण ती बातमी ऐकल्यावर आमच्या घरी सर्वांना शाहरूख खान "या बापाबद्दल" वाईट वाटले.

त्या लेखात अजूनही काही कारणे दिली आहे. जसे त्याचा सेन्स ऑफ ह्युमर. त्याचे चटपटीत बोलणे, त्याचे हजरजबाबी असणे... पुर्णपणे सहमत!
पण या सर्वात तो विनम्रही कधीच नव्हता. किंबहुना त्याने विनम्रतेचा आव कधीच आणला नाही.
जेव्हा सुरुवातीच्या यशानंतर त्याच्या डोक्यात हलकीशी हवा गेली तेव्हा अमिताभ आणि दिलीपकुमार बेस्ट असले तरी आपण थोडे बेटर आहोत असे विधान त्याने बिनधास्त केले होते. पण पुढे तो आपला वेडेपणा होता हे प्रामाणिकपणे कबूल करायलाही त्याचे जीभ कचरली नाही. तर आज पुन्हा यशाच्या शिखरावर असताना स्वतःला किंग खान देखील तो तितक्याच आत्मविश्वासाने म्हणवून घेतो.

आपल्याकडे मुले रडत नाहीत असा एक समज आढळायचा. तसेच मुलांच्या मनावर बिंबवले जायचे. त्यामुळे अश्या मुलांना पुढे जाऊन मुलींच्या भावना कळणे अवघड व्हायचे.
पण शाहरूखने पडद्यावर रडणारा हिरो यशस्वीपणे साकारला. बायकांच्या भावनांना समजून घेणे हा देखील एक गुण असतो आणि तो प्रत्येक पुरुषाकडे असायला हवा हा विचार प्रेक्षकांमध्ये रुजवला.

आता तुम्ही म्हणाल की चित्रपट दिग्दर्शकाचा असतो, लेखकाचा असतो. त्यात काम करणारे कलाकार तर केवळ त्यांचे विचार वाहून नेणारे माध्यम असतात. त्यामुळे हे सारे काही शाहरूखने केले नाही.
पण प्रत्यक्षात असे नसते. तो चेहरा असतो, त्याला स्टारडम असते म्हणून ते विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. म्हणून तसे चित्रपट बनतात. म्हणून ते प्रभाव पाडतात.
शाहरूख नसता तर यातले काहीच झाले नसते.
आणि म्हणून आपल्याला शाहरूख च आवडतो Happy

-------------------------------

उलट सुलट मनात आलेले विचार कसेही लिहून काढलेत.
तुर्तास थांबतो पण लिहायचे अजून संपले नाही.
प्रतिसाद ईथे मी आयुष्यभर देऊ शकतो.
कारण भारतातच काय, जगात अशी महिला नाही... जी माझ्यापेक्षा मोठी शाहरूखची चाहती असेल Happy

-------------------------------

अरे हो, हॅपी बड्डे शाहरूख. हे राहिलेच. किती वर्षांचा झालास हे माहीत नाही. जाणून घेण्यत ईंटरेस्टही नाही. तुझे वय कधी मोजावेसे वाटलेच नाही. कारण आजही शाहरूख म्हटले की डोळ्यासमोर तुझा हाच चेहरा येतो

srk.jpg

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅवार्ड शो वगैरे फिल्मी कार्यक्रम वा रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात हे समजू शकतो
पण जिथे रँडमली सामान्य लोकं भाग घेतात ते कसे स्क्रिप्टेड असेल? आजवर ईतकी जनता गेलीय त्या कौबक कार्यक्रमात. तो कार्यक्रम स्क्रिप्टेड असता तर हे त्या भोळ्या जनतेलाच नसते का समजले?
जेव्हा त्यात सेलेब्रेटी येतात तेव्हा तो स्क्रिप्टेड असतो. आधीच त्यांना प्रश्नोत्तरे ठाऊक असतात. पण केवळ शाहरूखने जे केलेय ते अमान्य करायला स्क्रिप्टेड बोलण्यात काही अर्थ नाही.

सगळे विश्वच स्क्रिप्टेड आहे. एकही क्षण आपण त्या स्क्रिप्ट शिवाय वेगळे काही करू शकत नाही की एकही अक्षर वेगळे काही बोलू आणि लिहू शकत नाही.
वरच्या सगळ्या पोस्ट्स आता माझी ही पोस्ट स्क्रीप्टेडच आहे.

यावर येणाऱ्या स्क्रीप्टेड प्रतिक्रियात्मक पोस्टच्या अथवा स्क्रीप्टेड दुर्लक्ष करणाऱ्या प्रतिक्रियेच्या स्क्रीप्टेड प्रतीक्षेत.

भगवान श्रीकृष्ण महाराजांनी देखील पट्ट शिष्य अर्जुनापासून लपवून ठेवलेले हे रहस्य आज तुम्ही उघड केले. आता मात्र विश्वाची खैर नाही.

मानव बरोबर आहे पण माइल्ड परफेक्श्निझम व माइल्ड इटिंग डिसॉर्डर गोइंग हॅन्ड इन हॅन्ड पाहीलेली आहे.

ऋनमेष
नको कोणाची पूजा करू ,ये दुनिया बहोत कतील हैं.
शारुख पेक्षा जे मित्र आहेत, नातेवाईक आहेत त्यांचा आदर कर ते उपयोगी पडतील.
कुठे त्या शारुखं च्या नादाला लागून वेडा होत आहेस

शारुख पेक्षा जे मित्र आहेत, नातेवाईक आहेत त्यांचा आदर कर ते उपयोगी पडतील.
कुठे त्या शारुखं च्या नादाला लागून वेडा होत आहेस
>>>>>>>>

हो, शाहरूख वेड लावतो हे खरे आहे.
हे कलाकार आपल्याला आनंद देतात. त्याची किंमत पैश्यात करता येत नाही. पण त्याच पैश्यासाठी प्रॉपर्टीवरून भावंडामध्ये भांडणे होताना पाहिली आहेत. आईबाप पोरांसाठी रक्त आठवतात, तीच पोरे त्यांना वेळ भरल्यावर वृद्धाश्रमात ढकलतात. त्यामुळे रक्ताची नातीही साथ देतातच असे नाही. ईतर नातेवाईकांचे बोलूच नका. मित्रही आपल्याला वाटतात हजारो आहेत. संकटात साथ देणारे मोजकेच असतात. त्यामुळे या तुलनेला असा अर्थ नाही.

पूजा म्हणाल तर शाहरूखसारख्या मेहनती आणि आपल्या अंगभूत कलागुणांवर यशाचे शिखर गाठलेल्या कलाकारापासून प्रेरणा घेण्यात, त्याचा आदर्श ठेवण्यात काही वावगे नाही. शाहरूखने मला एक काय दिले यावर खरे तर एक वेगळा लेख बनेल. किंबहुना आपले कुठलेही आवडते कलाकार आपल्या आयुष्यात काय घेऊन येतात हे आपल्याला बरेचदा कळतच नाही. त्याची आपण तितकी किंमत करत नाही ती या निमित्ताने चर्चेत येईल.

बिलकुल कठीण नाही
उलट मी आयुष्य सिंपल करून जगण्यावर विश्वास ठेवतो

कठीण आहे
ज्या लोकांशी रोज संबंध येतो....
ज्या लोकांची रोज गरज लागते
जी लोक शेवटच्या प्रवासात पण असणार आहे.
त्यांना टाळून कोण कुठला शाहरुख ह्या वर प्रेम.
खूप कठीण आहे
पहिली आपली लोक नंतर आभासी लोक .
असे समीकरण असावे
आजारी पडलो,कोणी मारायला आले,पैसे संपलेत, अशा अनेक संकटात..
शाहरुख नाही येणार.
आपलीच लोक हजर असतील..

त्यांना टाळून असे का म्हटले..
तुम्हीच का ठरवत आहात की मी सारे प्रेम शाहरूखलाच देतोय आणि ईतर कोणाला नाही..
आय मीन मी त्यांच्यावर कोणावर धागा काढला नाही तर माझे त्या कोणावर प्रेम नाही का?
ओके.. तसे असेल तर काढतो प्रत्येकावर प्रेम व्यक्त करणारा धागा... चालेल तुम्हाला?

त्याच पैश्यासाठी प्रॉपर्टीवरून भावंडामध्ये भांडणे होताना पाहिली आहेत. आईबाप पोरांसाठी रक्त आठवतात, तीच पोरे त्यांना वेळ भरल्यावर वृद्धाश्रमात ढकलतात. त्यामुळे रक्ताची नातीही साथ देतातच असे नाही. ईतर नातेवाईकांचे बोलूच नका. > मुलाबाळांना सोडून शाहरूख खानच्या भरवशावर जगणार का ?

पूजा म्हणाल तर शाहरूखसारख्या मेहनती आणि आपल्या अंगभूत कलागुणांवर यशाचे शिखर गाठलेल्या कलाकारापासून प्रेरणा घेण्यात, त्याचा आदर्श ठेवण्यात काही वावगे नाही. शाहरूखने मला एक काय दिले यावर खरे तर एक वेगळा लेख बनेल. किंबहुना आपले कुठलेही आवडते कलाकार आपल्या आयुष्यात काय घेऊन येतात हे आपल्याला बरेचदा कळतच नाही. त्याची आपण तितकी किंमत करत नाही ती या निमित्ताने चर्चेत येईल.>> डोळे पाणावले. कंठ दाटून आला. हात पाय थर थ राय ला लागले.
सर तुम्ही धन्य आहात.

मुलाबाळांना सोडून शाहरूख खानच्या भरवशावर जगणार का ?
>>>>

छे हो,
शाहरूखवर प्रेम करणे म्हणजे जर मुलाबाळांना सोडणे असते तर आज करोडो मुले रस्त्यावर असती.

एखाद्यावर प्रेम करताना तुम्ही ईतर प्रेमाच्या व्यक्तींना विसरत नाही. कारण मुळात तुम्हाला तेव्हा प्रेमाची कदर असते.
हो, पण जर मी एखाद्याचा द्वेष करत असतो तर मात्र मुलाबाळांचा विसर पडला असता.

शाहरूख स्वत: आज ईतका मोठा सुपर्रस्टार असूनही एक कुटुंबवत्सल माणूस म्हणून ओळखला जातो. तर त्याचा आदर्श ठेवणाऱ्या चाहत्यांना ते का जमू नये..

फालतू पोस्ट करू नकोस
तुला काय माहित शाहरुख किंवा बाकी hero heroin ह्यांचे पर्सनल लाईफ.
लाखो रुपये पगार देवून लोक आहेत .
फक्त इमेज चांगली निर्माण होईल अशाच
बातम्या मीडिया मध्ये पेराय साठी
नीट बोलता येत नाही, ना नीट चालता येत.
असे असतात हे सर्व रात्री chya वेळी.

त्यांची आर्थिक फायदा करून देणारी व्यक्ती सोडून बाकी सर्व जनता महा मूर्ख आहे असा ह्यांचा तोरा असतो.
तुझ्या सारखे तर हिशोब मध्ये पण नसतात.
दुरून च डोंगर चांगले वाटतात

शाहरुख च नाही तर कोणत्याच सेलेब्रिटी ची पूजा करण्याची काही गरज नाही.
200 रुपये सिनेमाचे तिकीट आणि तीन तास सिनेमा बघणे .
इतकाच संबंध हवा.......

फॅन होण्याच्या लायकीचे हे नसतात.

एखाद्यावर प्रेम करताना तुम्ही ईतर प्रेमाच्या व्यक्तींना विसरत नाही >>> याला व्यभिचार म्हणत असले तरीही ही गोष्ट मान्य करायलाच हवी,

कारण या जगात जात, धर्म, प्रांत, भाषा, गरीब श्रीमंत असा कोणताही भेद न करता जे प्रेमाचं एकमेव निर्मळ नातं असतं .... तेच विबासं असं थोरामोठ्या मायबोलीकरांनी सांगितलेले आहे.

निखळ प्रेम हे खऱ्या जगात कधीच अस्तित्वात नसते..
मुल आई बाप वर करत नाही
ज्यांनी गांड पण धुतलेली असते .
ते बाकी लोकांवर काय निखळ ,स्वार्थ हिन प्रेम करणार..
ही फक्त कल्पना आहे

तुला काय माहित शाहरुख किंवा बाकी hero heroin ह्यांचे पर्सनल लाईफ.
>>>>>
उलट सामान्य लोकांची पर्सनल लाईफ कोणाला माहीत नसते. बिचार्‍या सेलेब्रेटींचे तर हल्ली काहीच लपत नाही लोकांपासून ईतका सोशल मिडीया फोफावलाय..

..

नीट बोलता येत नाही, ना नीट चालता येत.
असे असतात हे सर्व रात्री chya वेळी.

>>>>>
आता हे तुम्हाला कसे माहीत? वर तुम्हीच म्हणालात की यांचे पर्सनल लाईफ आपल्याला माहीत नसते.
असो, पण रात्रीच्या वेळी असे का म्हणालात? रात्रीत काय असे विशेष असते जे नीट बोलता चालता येत नाही.

..

त्यांची आर्थिक फायदा करून देणारी व्यक्ती सोडून बाकी सर्व जनता महा मूर्ख आहे असा ह्यांचा तोरा असतो.
>>>>>
सरसकटीकरण का करत आहात? शाहरूख वेगळा आहे. म्हणून तर आवडतो.

..

शाहरुख च नाही तर कोणत्याच सेलेब्रिटी ची पूजा करण्याची काही गरज नाही.
200 रुपये सिनेमाचे तिकीट आणि तीन तास सिनेमा बघणे .
इतकाच संबंध हवा.......
फॅन होण्याच्या लायकीचे हे नसतात.

>>>>
दर डोई २०० रुपयांचे तिकीट खर्च करून आपण सहकुटुंब यांचा सिनेमा बघत असाल तर आणखी वेगळी पूजा ती काय Happy

दर डोई २०० रुपयांचे तिकीट खर्च करून आपण सहकुटुंब यांचा सिनेमा बघत असाल तर आणखी वेगळी पूजा ती काय> > अर्रर्र !! काय हे !! २०० रुपड्या च्या तिकटाला तुम्ही पुजा म्हणता??? अशे काळजाला घरं पाडू नका ना सर...

पूज्यचा एक अर्थ शून्य असा सुद्धा आहे.
कुणीतरी मागे शाहरुख खानचा झिरो नावाचा चित्रपट काढला. याचे कारण म्हणजे लोक त्याचा शून्य म्हणजेच पूज्य म्हणजेच पूजनीय असा अर्थ काढून त्याची पूजा करतील असे ऐकीवात आहे. खखोदेजा.

२०० रुपड्या च्या तिकटाला तुम्ही पुजा म्हणता???
>>>>
मी स्वतः चेन्नई एक्सप्रेसनंतर तिकीट काढून त्याचा पिक्चर बघायला गेलो नाही.
तरी मी त्याची पूजा करतो असा निष्कर्श असेल
तर मग जे तिकीट काढून आजवर त्याच्या कुठल्याही पिक्चरला गेले असतील ते माझ्यापेक्षाही ग्रेट नाहीत का या निकषावर..

कुणीतरी मागे शाहरुख खानचा झिरो नावाचा चित्रपट काढला.
>>>>
बरा होता हा तसा पिक्चर.. पण कतरीनाच्या ट्रॅकने फार बोअर केले
पुन्हा बघायला हवा पळवत एकदा.. शेवट बघायचा आहे एकदा पुन्हा.. आणि अधले मधले काही सीन्स

भारतीय महिलांना उदय चोप्रा आवडतो. शाखाची मीडीयात चालते त्यामुळे तो स्वतः जरी चोप्रा कँपचा असला तरी हुषारीने उदय चोप्रावर कमी छापून येईल, कमी बोललं जाईल याची काळजी घेतो. त्याला उदय चोप्रामुळे मोठा कॉम्प्लेक्स आला आहे.

उदय चोप्राकडे काय नाही ? त्याची बॉडी शाहरूखसारखी फायबरची नाही. ओरिजिनल आहे. अ‍ॅक्टींग मधे तो तिन्ही खानांना कच्चा खातो. मुहब्बते उदय चोप्रामुळे सुपरहिट झाला. त्याचा फायदा घसरणीला लागलेली करीअर सावरण्यासाठी शाखा, ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन या तिघांनाही झाला. कुणी कुणी कुजकट लोक म्हणतात कि अमिताभ, ऐश्वर्या आणि शाखा मुळे पिक्चर चालला. तसं असतं तर धूम - १ मधे हे तिघेही नसताना त्या पिक्चरने साड्डेतीनशे कोटींचा धंदा केला. ही तीच वेळ होती जेव्हां सलमान आणि आमीर १०० कोटीत पोहोचले तरी त्यांचं कौतुक होत होतं आणि शाखा अद्याप १०० कोटीपर्यंत पोहोचला नव्हता. धूम १ चा फायदा जॉन अब्राहमला झाला आणि डब्यात गेलेली त्याची करीअर चालायला लागली.

उदय चोप्राच्या या यशामुळे नुकतेच दोन मोठ्ठे ब्रेक अप झालेल्या ऐश्वर्या रायने धूम २ मधे काम मिळवलं. ऋत्विक रोशनचे ही काकेश रोशनचे घरचे पिक्चर सोडून दुसरे चालत नव्हते. उदय चोप्रामुळे आपली भरभराट होईल म्हणून त्यानेही धूम २ मधे काम केले. नतीजा ?
पाचशे कोटींचा धंदा झाला. ऋत्विक आणि ऐश्वर्याची तर चांदीच झाली.

मग धूम ३ आला. या वेळेपर्यंत उदय चोप्रा म्हणजे भारतीय महिलांच्या गळ्यातला ताईत झाल्याने तलाश डब्यात गेलेला आमीर उचो ला शरण गेला. आणि विशेष म्हणजे या वेळी साडेसातशे कोटींचा गल्ला धूम ३ ने जमवला.
त्याचे जे पिक्चर्स अ‍ॅव्हरेज हिट झालेत त्यातला त्याचा निरागस अभिनय आजही सर्वांच्या लक्षात आहे.
म्हातारे झालेले खान आता किती काळ तग धरणार ? पुढचा सुप्परस्टार उचोच आहे.

मी स्वतः चेन्नई एक्सप्रेसनंतर तिकीट काढून त्याचा पिक्चर बघायला गेलो नाही.
>>> कसले फॅन तुम्ही... मी आजपर्यंत सलमान चा फर्स्ट डे थर्ड शो कधीच मिस नाही केला... ट्यूबलाईट देखील...

सखा, शाखा यांच्या चाहत्यांनी उचो चा फोटो देव्हार्‍यात लावायला पाहीजे. चोप्राज आहेत म्हणून या दोघांना अन्न खायला मिळतेय. आज हे दोघे जे काही दानधर्म करतात त्या लायक बनवण्याचं काम यशराज फिल्म्सचं. भूतदया म्हणून यशराजने दिलवाले मधे शाखाला संधी दिली आणि घरातल्या सुप्परस्टारने हसत हसत त्या पिक्चरसाठी तातश्रींना असिस्ट केले. कसलाही मोह - द्वेष नाही, मत्सर नाही. निव्वळ एका माणसाला अन्नाला लावणे आणि सुप्परस्टार बनवणे यासाठीच धडाधड पिक्चर्स बनवले.

सखाचे करीअर सुद्धा डामाडौल झाले तेव्हां त्याच्यासाठी टायगर सिरीज बनवली. पैशाचा विचारच केला नाही. सगळी जायदाद तारण ठेवून पिचर्स बनवले. आज सलमानचं जे बिईंग ह्युमन म्हणून फूटपाथी सामाजिक काम आहे (जमिनी - ग्राऊंड ही टर्म त्याच्याबाबत वापरता येत नाही), त्याचा पैसा हा उचो च्या घरातून आला आहे.

परोपकार हा चोप्राजचा युएसपी आहे. उचो मधे हा गुण ठासून भरलेला आहे.
https://www.youtube.com/watch?v=28DE31cgsMs

शाखा सरांना काल परवा विमानतळावर अडवुन ठेवलं अशी बातमी होती. शाखा सरांनी काय भानगड केली? कुणाला माहित आहे का?

आंधळे भक्त मिळाल्यावर भक्तांचे देव चोखुर उधळतात.

रिअल लाईफ मध्ये हे कोणीच आदर्श नाहीत..

Pages