हो,
शाहरूख खान भारतीय महिलांना आवडतो.
आणि हे मी म्हणत नाहीये......
तर सर्व्हेचा निकालच तसा आहे.
त्याच निकालावर आधारीत हा सुंदर लेख आज सकाळीच त्याच्या वाढदिवसानिमित्त वाचण्यात आला.
https://www.bbc.com/marathi/india-59472935
या लेखाला केवळ शाहरूखच्या चाहत्या महिलांनीच नाही तर भारतातल्या प्रत्येक पुरुषाने वाचावे आणि यावर विचार करावा अशी मनापासून ईच्छा म्हणून हा लिखाणप्रपंच !
-------------------------------------------------
आमच्याकडे माझ्या आईला शाहरूख आवडतो. "कभी खुशी कभी गम" आम्ही जोडीने तब्बल पंधरा ते सोळा वेळा बघितला आहे.
आमच्याकडे माझ्या बायकोला शाहरूख आवडतो. थेट कबूल करणार नाही ती.. पण ते कळते. माझ्या शाहरूखप्रेमाचेही तिला तितकेच कौतुक आहे.
आमच्याकडे माझ्या आठ वर्षांच्या मुलीलाही ती सहा वर्षांची असल्यापासून शाहरूख आवडतो. टीव्हीचा रिमोट हातात घेते आणि शाहरूख खान मूवीज असे सर्च करून त्याचा जो चित्रपट दिसेल तो बघून घेते. आम्ही जोडीने कैक शाहरूख मूवी नाईट मारल्या आहेत. अगदी त्याच्या उतरत्या काळातले झिरो, दिलवाले, हॅपी न्यू ईयर हे चित्रपट देखील तिच्यामुळेच बघून झालेत.
मला सख्खी बहिण तर नाही, पण माझ्या चुलत-मामे-मावस सर्वच बहिणींना शाहरूख आवडायचा. आम्ही जवळपास सारे एकाच वयोगटातले. तो आम्हाला डीडीएलजेच्या काळापासून आवडायचा.
माझ्या सर्वच सख्या मैत्रीणींनाही शाहरूख आवडतो. किंबहुना असेही म्हणू शकतो की शाहरूख आवडणार्या मुलींशी माझी छान गट्टी जमते. शाहरूखप्रेम हा आमच्यातला कॉमन फॅक्टर असतो.
हो, पण आपल्याकडे मागच्या पिढीपर्यंत महिलांनी एखादा हिरो आवडतो हे उघड सांगायची जरा चोरीच होती. कारण हिरो वा हिरोईन आवडतो/आवडते असे म्हटले की आपल्या डोक्यात आधी शारीरीक आकर्षणच येते. पण शाहरूखबाबत गणिते बदलली. शाहरूख आवडणे हे बरेचदा कुठल्या शारीरीक आकर्षणातून आले नसते.. तो बस्स आवडतो!
हो, तो तसा क्यूट आहे. गालावर छान खळीही पडते. पण भारतीय मर्दानी सौंदर्याचे निकष लावता, त्यात तो कधी फिट झाला नव्हता.
तो आमीर सारखा चॉकलेट हिरो नव्हता, ना तो सलमानसारखा शरीरसौष्टव मिरवायचा.
तो अक्षय कुमारसारखा अॅक्शन हिरो नव्हता, ना सनी देओलसारखा त्याचा ढाई किलो का हाथ होता.
पण तरीही त्याने आबालवृद्धांना भुरळ पाडली.
का?
एक छान कारण वरच्या लेखातच दिले आहे ..
त्याची एक चाहती म्हणते,
"मी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर असा हिरो पाहिला जो घरातल्या बायकांबरोबर स्वयंपाक घरात गाजर सोलत होता, स्वयंपाक घरात इतका वेळ देत होता." (चित्रपट - डीडीएलजे)
तिच्यामते हे तेव्हा फार रोमँटीक द्रुश्य होते.
हो, शाहरूखने हिरोईजमची व्याख्या बदलली. जेव्हा नव्वदीच्या दशकात सनी देओल, जॅकी श्रॉफ, संजय दत्त असे अॅक्शन हिरो अमिताभचा वारसा पुढे चालवायला तयार होते तेव्हा असे एखादे कॅरेक्टर पडद्यावर साकारायची हिंमत त्याने दाखवली. आणि ही शाहरूखचीच जादू की ते चक्क लोकांना आवडले. खास करून मुलींना आणि महिलांना आवडले. असाही हिरो असू शकतो हे त्यांना नव्याने कळले. आणि आपल्यालाही असा पुरुष जोडीदार असावा हे त्यांना वाटू लागले. असा म्हणजे कसा. तर आपल्या जोडीदाराची कदर करणारा, तिचे बोलणे तिचे विचार संपुर्णपणे ऐकणारा, तिला आणि तिच्या भावनांंना समजून घेणारा, तिला हसवणारा, तिला वेळ देणारा, तिला आपल्या आयुष्यात तितकेच महत्वाचे स्थान देणारा...
केवळ गुंडांशी चार हात करून हिरोईनचे रक्षण करणार्या हिरोमध्ये प्रत्यक्ष आयुष्यात कोणाला तितका रस नव्हता.
आपल्याकडे हिरोईन म्हणजे केवळ शोभेची बाहुली हा ओरडा खूप असतो. शाहरूखच्या चित्रपटात ते कधी आढळले नाही. म्हणून त्यातला हिरोही मुलींना आपला हिरो वाटायचा. हे प्रेम आपल्या आयुष्यात यावे असे वाटायचे. पण शाहरूखची ही ईमेज केवळ पडद्यापुरतीच मर्यादीत नाहीये. तो प्रत्यक्ष जीवनातही स्त्रियांना तितकाच सन्मान देणारा म्हणून ओळखला जातो. आजही त्याच्या हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहाचा आदर्श ठेवला जातो. त्याच्या सहकलाकार नायिकांशी असलेल्या त्याच्या निखळ मैत्रीचे उदाहरण दिले जाते. चित्रपटाच्या नामावलीत हिरोच्या आधी हिरोईनचे नाव यावे ही पद्धत त्याने सुरू केली, जे ईतक्या वर्षात कोणाला सुचले नव्हते.
त्याचे पडद्यावरच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही कुटुंबवत्सल असणे लोकांना आवडते. मध्यंतरी बातमी ऐकली. शाहरूखच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक झाली. अशी वेळ आपल्यापैकी कोणावरही येऊ शकते. पण सेलिब्रेटींच्या मुलावर आली की आपण आपला हक्क समजून तोंडसुख घेतो. पण ती बातमी ऐकल्यावर आमच्या घरी सर्वांना शाहरूख खान "या बापाबद्दल" वाईट वाटले.
त्या लेखात अजूनही काही कारणे दिली आहे. जसे त्याचा सेन्स ऑफ ह्युमर. त्याचे चटपटीत बोलणे, त्याचे हजरजबाबी असणे... पुर्णपणे सहमत!
पण या सर्वात तो विनम्रही कधीच नव्हता. किंबहुना त्याने विनम्रतेचा आव कधीच आणला नाही.
जेव्हा सुरुवातीच्या यशानंतर त्याच्या डोक्यात हलकीशी हवा गेली तेव्हा अमिताभ आणि दिलीपकुमार बेस्ट असले तरी आपण थोडे बेटर आहोत असे विधान त्याने बिनधास्त केले होते. पण पुढे तो आपला वेडेपणा होता हे प्रामाणिकपणे कबूल करायलाही त्याचे जीभ कचरली नाही. तर आज पुन्हा यशाच्या शिखरावर असताना स्वतःला किंग खान देखील तो तितक्याच आत्मविश्वासाने म्हणवून घेतो.
आपल्याकडे मुले रडत नाहीत असा एक समज आढळायचा. तसेच मुलांच्या मनावर बिंबवले जायचे. त्यामुळे अश्या मुलांना पुढे जाऊन मुलींच्या भावना कळणे अवघड व्हायचे.
पण शाहरूखने पडद्यावर रडणारा हिरो यशस्वीपणे साकारला. बायकांच्या भावनांना समजून घेणे हा देखील एक गुण असतो आणि तो प्रत्येक पुरुषाकडे असायला हवा हा विचार प्रेक्षकांमध्ये रुजवला.
आता तुम्ही म्हणाल की चित्रपट दिग्दर्शकाचा असतो, लेखकाचा असतो. त्यात काम करणारे कलाकार तर केवळ त्यांचे विचार वाहून नेणारे माध्यम असतात. त्यामुळे हे सारे काही शाहरूखने केले नाही.
पण प्रत्यक्षात असे नसते. तो चेहरा असतो, त्याला स्टारडम असते म्हणून ते विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. म्हणून तसे चित्रपट बनतात. म्हणून ते प्रभाव पाडतात.
शाहरूख नसता तर यातले काहीच झाले नसते.
आणि म्हणून आपल्याला शाहरूख च आवडतो
-------------------------------
उलट सुलट मनात आलेले विचार कसेही लिहून काढलेत.
तुर्तास थांबतो पण लिहायचे अजून संपले नाही.
प्रतिसाद ईथे मी आयुष्यभर देऊ शकतो.
कारण भारतातच काय, जगात अशी महिला नाही... जी माझ्यापेक्षा मोठी शाहरूखची चाहती असेल
-------------------------------
अरे हो, हॅपी बड्डे शाहरूख. हे राहिलेच. किती वर्षांचा झालास हे माहीत नाही. जाणून घेण्यत ईंटरेस्टही नाही. तुझे वय कधी मोजावेसे वाटलेच नाही. कारण आजही शाहरूख म्हटले की डोळ्यासमोर तुझा हाच चेहरा येतो
धन्यवाद,
ऋन्मेष
रुपाली किती छान.. पोस्टची
रुपाली किती छान.. पोस्टची लांबी बघूनच तबियत खुश झाली... आता वाचतो
डर चित्रपटाचा खरा नायक सनी
डर चित्रपटाचा खरा नायक सनी देओल आहे हे लक्षातच न येऊ देता
>>>>>>
जो धक्का अमिताभच्या एंट्रीने राजेश खन्नाला दिला तसाच धक्का तेव्हा शाहरूखने डर मधून सनी देओलला दिला.
तो ही ईतका की डर म्हटले की शाहरूखच आठवतो. सनी देओल त्यात आहे हे लक्षातच येत नाही. जो तेव्हाचा मोठा स्टार होता.
.
' येस बॉस' मधलं ' मैं कोई ऐसा गीत गाऊँ के आरजू जगाऊँ.. अगर तुम कहो.. ' कित्ती ती प्रेयसीची गोड प्रेम आराधना... !! त्या गाण्यातला शाहरूख पाहून त्याच्यासारखाच आपला प्रियकर असावा असं एखाद्या प्रेमात पडू पाहणाऱ्या नवतरुणीला न वाटणे म्हणजे नवलच..!
>>>>>>>>
अगदी अगदी +७८६
ते गाणे नुसते ऐकायलाच नाही तर बघायलाही किती छान वाटायचे. एका श्रीमंताच्या प्रेमात पडलेल्या मुलीला हे असे वागून पटवणे अगदीच विश्वासार्ह वाटले ते फक्त शाहरूखमुळेच.
बाजीगर मधला ' किताबे बहुतसी
बाजीगर मधला ' किताबे बहुतसी पढी होगी तुमने ' मधला शिल्पा शेट्टी सोबत नाचणारा भोळ्या- भाबड्या चेहऱ्याचाच शाहरूख
>>>>>>
तुमची शाहरूख गाण्यांची चॉईस सेम माझ्यासारखी आहे.
तुम्हाला ते अंजाम मधील "बडी मुश्कील है, खोया मेरा दिल है, कोई ऊसे ढूंड के लाये ना" हे गाणे आवडते का.... तुमच्या गाण्यांची लिस्ट पाहून तसे वाटले
शाळेत असताना आठवते की, एका स्त्रीने शाहरूख खान हा माझा हरवलेला मुलगा आहे असा दावा केला होता. >>> हो, हे मलाही आठवतेय
रूपाली विशे - पाटील
रूपाली विशे - पाटील
च्रप्स पहा. मी सांगत नव्हतो. रूपाली विशे - पाटील ह्यांनी शाहरूखच्या फिमोग्रफिचा रेट्रो केला. पण "बादशहा" चा उल्लेख कुठे केला? नाही.
रूपाली विशे - पाटील "बादशहा" अजून youtube वर फुकट बघू शकाल. त्वरा करा केव्हाही OTT वर जाईल.
This is THE BEST of Shahrukh!
https://www.youtube.com/watch?v=KLucs7B8JDA&ab_channel=Goldmines
King of romance
King of romance
King of Comedy
King of acting
King of Dance
-Is there anything he can't do...
Masterpiece movie!!
बादशाह वर एका प्रेक्षकाचा प्रतिसाद!!
तुम्हाला ते अंजाम मधील "बडी
तुम्हाला ते अंजाम मधील "बडी मुश्कील है, खोया मेरा दिल है, कोई ऊसे ढूंड के लाये ना" हे गाणे आवडते का.... तुमच्या गाण्यांची लिस्ट पाहून तसे वाटले >>>>>>>
मला असली गाणी असलेले त्याचे सगळे मूव्ही खूप आवडले होते ,हे सगळे आम्ही त्या वेळी थेट्रात जावून बघितलेले ....
पण रावन आणि इतर मूव्ही आल्या पासून त्याच्यावर डोके फिरायला लागले , त्यात आय पी एल मध्ये तो सिगरेट ओढण्याचा वादग्रस्त प्रसंग !
त्याच्या स्टारडम ला त्यानेच उतरती कळा लावली असे वाटायला लागले आहे .
रूपाली, छान लिहीलंय. बरंचसं
रूपाली, छान लिहीलंय. बरंचसं पटलं.
बादशाह पिक्चर माझा ऑटाफे आहे. अनंत वेळा पाहिलेला आणि अजूनही कितीही वेळा पाहू शकते.
असाच चक दे इंडिया पण आवडतो. त्यात तो खरंच कबीर खानच वाटतो. शाहरूख वाटत नाही.
त्याच्या स्टारडम ला त्यानेच
त्याच्या स्टारडम ला त्यानेच उतरती कळा लावली असे वाटायला लागले आहे .
>>>>>>
अजून तरी ती लागली नाहीये
त्याचे स्टारडम चित्रपटांच्या पलीकडे पोहोचले आहे. त्याच्या आताच्या पडेल चित्रपटांनी त्याला धक्का बसणार नाही. ब्रम्हास्त्रमध्ये तो दहा मिनिटांसाठी येतो आणि तोच लक्षात राहतो यातच सारे आले.
बाकी नो वन ईझ पर्रफेक्ट, त्यात सुपर्रस्टार म्हटले कि किस्से कहाण्या गॉसिप येणारच. लोकं एकमेकांना चवीने मीठमसाला लाऊन सांगणारच. चालायचंच.
पण त्याचे एक आवडते. त्याच्यासारखा सेल्फमार्केटींग करणारा कलाकार नाही. पण तरीही त्याच्या दानधर्माचे किस्से कधी मार्केटींग केले जात नाहीत. तो बस्स करतो. नेकी कर और दर्या मे डाल हे पाळतो.
केशवकूल लिंकसाठी धन्यवाद..!
केशवकूल लिंकसाठी धन्यवाद..! चित्रपट बघण्याचा प्रयत्न करीन.
' बादशहा' चित्रपट बहिणीने पाहिल्यानंतर चित्रपटाचं तिने खूप कौतुक केलं होतं , पण Twinkle खन्नाचा अभिनय कधी आवडला नाही त्यामुळे शाहरुख खान असून सुद्धा हा चित्रपट कधी पहावासा वाटला नाही. पण रविवारी दुपारी सह्याद्री चॅनलवर छायागीत मध्ये ' हम तो दिवाने हुए यार.. तेरे दिवाने हुए यार..' हे गाणं बघायला आवडायचं.
तुमची शाहरूख गाण्यांची चॉईस सेम माझ्यासारखी आहे.
तुम्हाला ते अंजाम मधील "बडी मुश्कील है, खोया मेरा दिल है, कोई ऊसे ढूंड के लाये ना" हे गाणे आवडते का.... तुमच्या गाण्यांची लिस्ट पाहून तसे वाटले>>> हो.. विसरले लिहायला... खूपच सुपरहिट होतं ते गाणं कोणे एके काळी..!! त्यानंतर ते त्याचं 'त्रिमूर्ती' मधलं ' दुनिया रे दुनिया .. वेरी गुड वेरी गुड.. दुनियावाले वेरी बॅड बॅड ..' हे सुद्धा..!!
त्याचा ' कोयला' चित्रपट सुद्धा आवडला होता.
रमड धन्यवाद..!!
शाहरुख बद्दल माझ्या मनात एकाच
शाहरुख बद्दल माझ्या मनात एकच अढी आहे.
१९९५- १९९६
रंगिला हि फिल्म १९९५ मध्ये रिलीज झाली. त्यात आमिरखान आणि उर्मिला मातोंडकर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राम गोपाल वर्मा डायरेक्टर. ए॰ आर॰ रहमानचे संगीत!
रसिक आणि समिक्षक ह्यांच्या मताने ही फिल्म हिंदी सिनेमाविश्व ची माईलस्टोन आणि ट्रेंड सेटर आहे.
१९९६ मध्ये फिल्मफेअर अवार्डसाठी रंगीलाची स्पर्धा होती शाहरुखच्या एका सामान्य (हेमावैम) फिल्म बरोबर . तो काळ असा होता कि शाहरुखचा रुमाल जरी खाली पडला तरी त्याला ताबडतोब अवार्ड देण्यासाठी लोक पळापळ करत!
अर्थात आमिरला बेस्ट अभिनेत्याचे अवार्ड नाकारले गेले. हे त्याने खूप मनाला लावून घेतले. आणि तो कधीही अवार्ड घ्यायला गेला नाही.
रंगीला तुम्ही बघितला आहे का? नसेल बघितला असेल तर इथे आहे. हिंदी क्लासिक!!
https://www.youtube.com/watch?v=HGQemnr9-nM&ab_channel=DRJRecordsMovies
तुम्हीच पहा आणि ठरावा.
रंगीला मधील आमिर चा अभिनय
रंगीला मधील आमिर चा अभिनय उत्तम आहेच पण ddlj समोर त्याला संधीच नव्हती...
Aamir Khan's unforgetable
Aamir Khan's unforgetable visit to a hotel | Rangeela
https://www.youtube.com/watch?v=OG7TcnBclk4&ab_channel=ErosNowMusic
Mili On A Movie Date With
Mili On A Movie Date With Munna - Rangeela
https://www.youtube.com/watch?v=CCTq9c7KdOM&ab_channel=ErosNowMusic
तो हिरोईन पोरींना घाबरतो (चे
तो हिरोईन पोरींना घाबरतो (चे.एक्सप्रेस) म्हणून.
- आमिर बद्धल खरेच वेगळा धागा
- आमिर बद्धल खरेच वेगळा धागा पाहिजे...
- आमिर बद्धल खरेच वेगळा धागा
- आमिर बद्धल खरेच वेगळा धागा पाहिजे...
Submitted by च्रप्स on 5 November, 2022 - 11:2
अगदी!
आमीर खान परफेक्शनिस्ट आहे.
आमीर खान परफेक्शनिस्ट आहे.
शाहरूख खान भारतीय महिलांना
शाहरूख खान भारतीय महिलांना ईतका का आवडतो? कारण तो पेरी पेरी सॉस वीथ चिकन खातो म्हणून!
https://www.ndtv.com/entertainment/shah-rukh-khans-hilarious-response-to...
- आमिर बद्धल खरेच वेगळा धागा
- आमिर बद्धल खरेच वेगळा धागा पाहिजे... >> चूक.
जो धक्का अमिताभच्या एंट्रीने राजेश खन्नाला दिला तसाच धक्का तेव्हा शाहरूखने डर मधून सनी देओलला दिला. >> चूक
रंगीला मधील आमिर चा अभिनय
रंगीला मधील आमिर चा अभिनय उत्तम आहेच पण ddlj समोर त्याला संधीच नव्हती...
>>>>
+७८६
आमीर खानने साकारलेला टपोरी प्रेमीचा रोल अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, मिथुन वगैरेंनी आधी साकारून झालेले..
शाहरूखने साकारलेली भुमिका मात्र एक नवा ट्रेंड घेऊन येणारी ठरली. तिला अनेक पैलू होते. पुर्वार्धातला शाहरूख आणि नंतरचा शाहरूख यात मूळ कॅरेक्टर न सोडता प्रेमात पडल्याने झालेले बदल त्याने अचूक दाखवले.
आमीर खान परफेक्शनिस्ट आहे.
आमीर खान परफेक्शनिस्ट आहे.
>>>
+७८६
पर्रफेक्शनिस्ट आहे
पण निव्वळ अभिनयाचा विचार करता तो नवाझ, ईरफान यांच्या कॅटेगरीतला नाही तर शाहरूखसोबतच आहे.
आमीर खान परफेक्शनिस्ट आहे.
आमीर खान परफेक्शनिस्ट आहे.
>>>
+७८६
पर्रफेक्शनिस्ट आहे
पण निव्वळ अभिनयाचा विचार करता तो नवाझ, ईरफान यांच्या कॅटेगरीतला नाही तर शाहरूखसोबतच आहे.
सर, शाहरुख प्रेमापोटी तुम्ही
सर, शाहरुख प्रेमापोटी तुम्ही काही ऐकायला तयार नाही,
रसिक आणि समिक्षक ह्यांच्या मताने ही फिल्म हिंदी सिनेमाविश्व ची माईलस्टोन आणि ट्रेंड सेटर आहे.
आमिर खानपेक्षा शाहरुखची
आमिर खानपेक्षा शाहरुखची अभिनयक्षमता जास्त आहे असं माझं तरी मत आहे...
पण, आमिर खानने जे प्रयोग केले, स्वतःला आव्हान देऊन नवनवीन प्रकारच्या भूमिका केल्या, तसं धाडस शाहरुखने केलं नाही. त्याच त्याच प्रकारचा अभिनय तो करत राहिला.
डीडीएलजे मलापण आवडतो, पण पुढे काय? त्याच अभिनयाच्या किती आवृत्त्या काढायच्या? जिथे तशा आवृत्त्या त्याने काढल्या नाहीत, ते चित्रपट आवडलेच. स्वदेस, चक दे, डिअर जिंदगी.
'झिरो'मधे अक्षरशः माती केली आहे विषयाची. अभिनयाच्या नावाने आनंदीआनंद. फक्त माधवनचं काम चांगलं आहे त्यातलं हा मी थिएटरमध्ये बघितलेला सर्वात वाईट सिनेमा. (त्याआधी तो मान अनुक्रमे कल हो ना हो आणि देवदास या शाहरूखच्याच चित्रपटांंना मी दिला होता )
वावे+१
वावे+१
रसिक आणि समिक्षक ह्यांच्या
रसिक आणि समिक्षक ह्यांच्या मताने ही फिल्म हिंदी सिनेमाविश्व ची माईलस्टोन आणि ट्रेंड सेटर आहे.
>>>>>>>
कोणती फिल्म? रंगीला?
आणि डीडीएलजे नाही?
ऐकावे ते नवलच
डीडीएलजे मलापण आवडतो, पण पुढे
डीडीएलजे मलापण आवडतो, पण पुढे काय? त्याच अभिनयाच्या किती आवृत्त्या काढायच्या?
>>>>>>
व्यवसाय आहे तो. यातून त्याला पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळाले.
जर डीडीएलजे नंतर त्याने दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, परदेस, येस बॉस, कभी खुशी कभी गम, मोहोबते, कल हो ना हो, मै हू ना........ वगैरे चित्रपट केलेच नसते तर तो सुपर्रस्टार झाला असता का?
कल हो ना हो चांगला आहे...
कल हो ना हो चांगला आहे... राजेश खन्ना च्या आनंद ला टफ आहे तो चित्रपट...
रसिक आणि समिक्षक ह्यांच्या
रसिक आणि समिक्षक ह्यांच्या मताने ही फिल्म हिंदी सिनेमाविश्व ची माईलस्टोन आणि ट्रेंड सेटर आहे.>>> येस्स हे बरोबर आहे.
@ केशवकूल, आणि मृणाली
@ केशवकूल, आणि मृणाली
माईलस्टोन आणि ट्रेंड सेटर >> हे तुम्ही कोणत्या चित्रपटाबाबत लिहिले आहे.
@ च्रप्स,
कल हो ना हो बाबत येस, सहमत. मी तो थिएटरलाच पाहिलेला. वालचंद सांगलीला असताना. पहिल्यांना नॉर्मल शाहरूखपटच वाटलेला. तो ही त्याच्या ईतर तश्या चित्रपटांपेक्षा जरा कमी .. पण नंतर पुन्हा पुन्हा बघताना आवडू लागला.
Pages