नासी केराबू (Nasi Kerabu)

Submitted by pltambe@yahoo.co.in on 1 September, 2022 - 09:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी तांदुळाचा भात, १० निळ्या पांच पाकळी गोकर्णीची फुले,फोडणीसाठी तेल,तूप ,आले-लसणाची पेस्ट, जिरे,हिरवी मिरची,कढी पत्त्यांची पाने,कोथिंबीर,पुदिना व चवीनुसार मीठ

क्रमवार पाककृती: 

भात शिजवतांनाच त्यात तांदूळ व पाण्या सोबत निळ्या गोकर्णीच्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. निळ्या गोकर्णीच्या पाकळ्यांमुळे भाताला उत्तम निळारंग व स्वाद येतो.
नंतर हा शिजवलेला निळ्या रंगाचा भात एका परातीत काढून घेऊन हाताने मोकळा करून ठेवतात. दुसरीकडे गॅसवर एका पॅन मध्ये फोडणीसाठी तेल+तुप गरम करून घेऊन त्यात आले-लसुणाची पेस्ट,जिरे,हिरवी मिरची,कढी पत्त्यांची पाने,कोथिंबीर,पुदिना व मीठ यांचे मिक्सरवर केलेले वाटण घालून थोडेसे परतून घेऊन नंतर त्यात तो मोकळा केलेला भात घालून चांगले परतून घेतात.

वाढणी/प्रमाण: 
चार व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

नासी केराबू ही एक मलेशियन पारंपरिक निळ्या रंगाच्या फ्राइड-राईसची (भाताची) लोकप्रिय डिश आहे.मलेशियातल्या हॉटेल्स मध्ये हा राईस मच्छी सोबत सर्व्ह करतात.

माहितीचा स्रोत: 
माझा मलेशियात असलेला मुलगा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हटके आहे .. >> +१००
प्रमोद सर, अ‍ॅडमिन टीमला प्रादेशिक शब्दखूण "मलेशियन" देण्याची विनंती करू शकता. भरपूर पाककृती असतील तर मिळेलही. नुकतीच मनिम्याऊ यांनी शब्दखूण मिळवली आहे. (ते होममिनीस्टर कार्यक्रमात पैठणी मिळते, तसं इथे पदार्थांसाठी शब्दखूण मिळते Happy )

मास्टरशेफ ऑस्ट्रेलियात हा शब्द कानावर पडल्याचं आठवतंय. रेसिपी अशीच केली होती की काही ट्विस्ट देऊन ते आठवत नाही.
तुम्ही केलेली छान दिसते आहे. फोडणीचं साहित्य मूळ कृतीबरहुकूम आहे की त्याला भारतीय वळसे दिले?