गोकर्ण चहा

Submitted by मनीमोहोर on 17 December, 2021 - 10:38
अपराजिता , ब्लु टी
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आमच्या लहानपणी घरं स्वतःची किंवा भाड्याची कशी ही असली तरी सभोवती चार तरी फुल झाडं असतंच . तगर, जास्वंद , गुलबक्षी अनंत, गोकर्ण ही सहज जगणारी फारश्या निगराणीची गरज नसलेली आणि कायम फुलणारी झाडं असतच असत. देवांसाठी फुलं कधी विकत आणावी लागत नसत.
काळ बदलला . घरं लहान झाली. अंगण जवळ जवळ कल्पनेतच उरलं. पण माणसाची झाडं लावण्याची हौस कमी नाही झालीय. बाल्कनीत, गॅलरीत ,गच्चीत छोटी छोटी झाडं लावून लोक त्याचा आनन्द घेऊ लागले.
माझ्याकडे ही सध्या एक गोकर्णीचा वेल बहरला आहे. गायीच्या कानाच्या आकाराची, एक पाकळीची निळी जर्द फुलं गॅलरीची शोभा वाढवतायत.
त्या फुलांचा चहा किंवा काढा म्हणा हल्ली खूप फेमस झालाय म्हणून मी ही करून बघितला. आता कृतीकडे वळू या.
जिन्नस

गोकर्णीची सहा सात फुले
पाणी
लिंबू .

क्रमवार पाककृती: 

गोकर्णीच्या फुलांच डेख आणि मधला भाग काढून टाकून फक्त पाकळ्या एक कप पाण्यात बारीक गॅस वर पाच मिनिटं उकळवाव्यात.
नंतर गाळून घेऊन त्यात आवडेल एवढा लिंबाचा रस घालावा , आवडत असेल तर साखर घालावी आणि गरम गरम घ्यावा.

लिंबू पिळायच्या आधी असा होता रंग मग वरच्या फोटो मध्ये दिसतोय तसा जांभळा झाला.

20211231_173842~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एक कप
अधिक टिपा: 

1) ह्याची चव न्यूट्रल च होती. लिंबाची चवच लागत होती. पण मला आवडला.
2) हवा असेल तर पातीचा चहा किंवा थोडं आलं ही घालू शकता.
3 ) लिंबू पिळायच्या आधी रंग चिंतामणी होता , नंतर निळा / जांभळा झाला.
4) रंग पूर्ण नैसर्गिक आणि अतिशय सुंदर दिसत होता.
5) गोकर्ण ताप दमा , सर्दी खोकला , बुद्धी ह्यावर गुणकारी आहे म्हणे त्यामुळे त्या दृष्टीने हा चहा औषधी आहे.
6) फुलं मिळाली तर नक्की करून बघा , बाकी कशासाठी नाही तरी रंगासाठी तरी.
7) फुलं ताजी किंवा सुकलेली कशी ही चालतात. त्यामुळे मी जनरली शेंगेच्या टोकाला जे सुकलेलं फुल असतं तेच वापरतेय.

माहितीचा स्रोत: 
नेट वरून
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पतझड का पीला सा चांद हे अगदी यथातथ्य वर्णन आहे. कारण शरद ऋतूत आश्विनकार्तिक आणि अर्ध्या मार्गशीर्षामध्ये आकाश निरभ्र असते. चांदणे लख्ख असते. कोजागिरी - त्रिपुरारी पुनवेच्या रात्री चंद्र पूर्ण तेजाने झळाळत असतो आणि तेव्हा तो मंद सूर्यासारखा किंचित पिवळसर दिसतो.

थॅंक्यु सगळ्याना.

पण मला प्यायला खरा चहाच आवडतो. Happy वावे, नेहमीच्या चहाला हा substitute नाही होऊ शकत. हल्ली सगळ्या काढ्याना चहा म्हणतात म्हणून हा चहा इतकंच. मला असले फॅन्सी चहा सगळे आवडतात पण त्यात साखर , दूध न घालता. आपला नेहमीचा ग्रीन टी, ऑरेंज पिको जाडी पत्ती घालून केलेला कोरा चहा , पळसाच्या फुलांचा चहा किंवा मुलीकडे अर्ल ग्रे नावाचा एक असतो orange फ्लेवरचा तो , कधी कधी आपली नेहमीची चिमुटभर पूड एक सेकंद गरम पाण्यात घालून केलेला सोनेरी रंगाचा एकदम लाईट टी लिंबू पिळून असा कोणताही...

बशी पण गोकर्णाची मिळाली! सि थॅंक्यु नोटीस केलंस म्हणून. फोटो काढताना पटकन आठवली ही बशी म्हणून मुद्दाम घेतली.

फोटोतला चहा लिंबू पिळल्यानंतरचा आहे ना? जांभळा मॅझेंटा रंग दिसतोय कारण. चिंतामणी पण छान दिसला असेल होय, तो ही छान दिसत होता रंग , दाखवते तो ही.

या रंगाचे सरबतही मस्तच दिसेल. sonalisl , गार दिलं की सरबत गरम दिला की चहा Happy

नवरा करतो गोकर्ण चहा पण फक्त साखर घालतो. सांगते त्याला लिंबू घालून बघ. अंजू, लिंबू छान लागत कारण त्याला स्वतःची अशी कोणती ही चव नाहीये.

मग काय घरातल्या नागवेलीचे छोटे पान घातले नेहमीच्या चहात... कधीतरी ठिकाय! >> तेजो मस्त आयडिया , करून बघेन मी ही.

बाजारात मिळतो. गोकर्णाची फुलं सुकवलेली असतात. Butterfly pea flower tea नावाचा. >> मामी हे नव्हतं माहित मला. कळलं ते छानच झालं.

गोकर्ण भात खरोखरच करतात >> blackcat हो मी ही बघितला आहे व्हिडीओ मध्ये. Volcano rice केलात तर फोटो दाखवा.

भाताच्या ढिगाऱ्याखाली फुग्यात गरमागरम सांबार टच्च भरून ठेवायचा अन् ते पाहुण्यांसमोर ठेवायचं. पाहुण्यांनी भातात हात/चमचा घातला की फुगा फुटून सांबार उसळून बाहेर निघेल. वाफाळता सांबार भात बघून हात भाजलेला पाहुणा भयभीत होईल. हाच तो व्होलक्यानो राईस..!! DJ हा हा हा ..भारीच हो

वर तुम्ही निळी जर्द असं म्हटलंय, ते मजेशीर वाटलं. जर्द ह्या शब्दाचा अर्थच पिवळा असा होतो. मराठीत जोडशब्द पिवळी-जर्द आणि निळी-शार असे आहेत. ह पा अगदी बरोबर आहे , निळी शार च हवं पिवळा जर्द, हिरवागार, काळा भोर, लाल भडक तसं निळा शार ... तुम्ही अगदी मन लावून वाचलत आणि सांगितलंत म्हणून आभार आणि छान ही वाटलं. जर्द वरची सगळी चर्चा ही छानच. आता बदलत नाही निळी जर्द. ते तसच ठेवते ...

निलाक्षी मस्त आलाय रंग लिंबू न पिळता ही .. फोटो हो छान आलाय.

जमेल त्यानी करून बघा . कुठल्याही चवीची अपेक्षा न ठेवता. Happy

याचे मॅजिकल लेमोनेड माझ्या मुलीसाठी बनवलं होतं
पाण्यात साखर घालून उकळा यचं
मग त्यात फुलं टाकून परत उकळू द्यायचं
थंड झालं की एक काचेच्या ग्लासात बर्फ टाकून हे निळं सिरप टाकायचं
आता वरून लिंबू पिळायच
आणि राणी कलर हलकेच निळ्या रंगात उतरताना पाहायचा

ममो, काल केलेला ह चहा. मस्त रंग आलेला. आधी गरम प्यायले मग थंड करुन प्यायले. पण रंग बघून डोळे निवतात खरच......

रोज इथे येऊन विचार करायचे प्रतीसाद द्यावा की नाही. म्हणलं एकेकाचे प्रती बघु. कारण कुठेतरी कायप्पावर मागे वाचले होते पण प्रत्यक्षात वाचुन फोटो पाहुन खूप मजा वाटली. ममो खूप उत्साही आहेस, सगळे कसे छान निगुतीने करुन फोटो व सविस्तर माहिती देतेस याचेच कौतुक वाटत्ते.

निलाक्षी, क्या बात है. सारा माहौल निले रंग में समेट लिया.

निलाक्षी, गुलबकावली अशी नावे पाहुन कुठेतरी पर्‍यांच्या राज्यात गेलोत असे वाटायला लागलेय.

थॅंक्यु गुलबकावली ,रश्मी.

नैसर्गिक रित्या एवढा सुंदर रंग येतो ह्यावर विश्वास च बसत नाही प्रत्यक्ष पाहून ही Happy

निलाक्षी, गुलबकावली अशी नावे पाहुन कुठेतरी पर्‍यांच्या राज्यात गेलोत असे वाटायला लागलेय. >> रश्मी Happy

करून पाहिला
कमाल रंग आला
Photo देईन थोड्या वेळात

IMG-20220113-WA0029.jpg
लिंबू पिळून
IMG-20220113-WA0030.jpg
अजून सुंदर photo काढता येतील
माझे खूप घाईत क्लीकलेत
देखणा रंग आहे खूप

निळ्या रंगाला साडीच्या दुकानात चिंतामणी कलर म्हणतात म्हणे.

(तो चिंतामणी म्हणजे एक खडा की रत्न की कायसा असतो. मुळात चिंतामणीच बघितला नसल्यामुळे त्याचा रंग कुठला हे कसं कळणार?)

Pages