नारळाची डबलडेकर वडी

Submitted by Srd on 12 June, 2022 - 00:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नारळाची डबलडेकर वडी
( कृत्रिम रंग, वास नसलेला पदार्थ. )

साहित्य
खोवलेला ओला नारळ एक, अर्धा किलो जांभळांचा गर आटवून,थोडा खवा आणि साखर चार मोठे चमचे.
फोटो १

क्रमवार पाककृती: 

जांभळाचा हंगाम जवळपास संपलाच आहे. बाजारात थोडीच शिल्लक होती ती आणली. नारळाच्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या आपण करतोच. त्यात थोडा बदल करून.

फोटो २
जांभळांचा गर/ रस आटवणे. घट्ट होत आल्यावर त्याप्रमाणात थोडी साखर घातली.

फोटो ३
खोबरे साखर शिजवले. अर्धा भाग वेगळा ठेवला.

फोटो ४
शिजवलेल्या अर्ध्या खोबऱ्याच्या भागात आटवलेला जांभूळ गर मिळवून किंचित शिजवले.

फोटो ५
शिजवलेले खोबऱ्याचे पांढरे /जांभळे थर एकावर एक थापले.

फोटो ६
वाळल्यावर कापून वर्ख लावला.

फोटो ७
अशा दिसतात डबलडेकर वड्या.

वाढणी/प्रमाण: 
उपमा,पोहे याबरोबर एक दोन वड्या ठेवता येतील.
अधिक टिपा: 

खोबरे साखर शिजवताना खूप कोरडे करून नये. थोडे ओलसर असावे.

माहितीचा स्रोत: 
सहज सुचलं म्हणून. प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Va सुरेख वड्या!
आता नारळ कातायला नको वाटते.आयाती वडी मिळाल्यास अधिक मस्त.

वेळ पडल्यास खिचडी,कांदेपोहे,फोडणीचा भात एवढे तीन प्रयोग माझे असतात. बाकीचे तिकडचे.
खिचडीत वांगी/तोंडली/बटाटे फोडी घालतो कधीकधी.
बाकी सूपचे प्रकार मात्र करतो. त्याचे टेम्प्लेट तयार केले आहे.

खुपच सुंदर दिसतायत वड्या.. आजच् एका व्हॉटस् अप ग्रुपवर चर्चा करत होतो.. आणि लगेच क्र्ती पण हातात आली. शेअर करते तिकडे चालेल ना ?

आयडिया चांगली आहे. जांभळ अशी वडी करायला कशी राहू शकतात हा मात्र प्रश्न पडला आहे. गर काढू पर्यंतच संपतीलल माझ्याकडून.
खुप वर्ष झाली ताजी जांभळ खाऊन. इथे फ्रोजन मिळतात ती मात्र आणते.