नारळाची डबलडेकर वडी
( कृत्रिम रंग, वास नसलेला पदार्थ. )
साहित्य
खोवलेला ओला नारळ एक, अर्धा किलो जांभळांचा गर आटवून,थोडा खवा आणि साखर चार मोठे चमचे.
फोटो १
जांभळाचा हंगाम जवळपास संपलाच आहे. बाजारात थोडीच शिल्लक होती ती आणली. नारळाच्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या आपण करतोच. त्यात थोडा बदल करून.
फोटो २
जांभळांचा गर/ रस आटवणे. घट्ट होत आल्यावर त्याप्रमाणात थोडी साखर घातली.
फोटो ३
खोबरे साखर शिजवले. अर्धा भाग वेगळा ठेवला.
फोटो ४
शिजवलेल्या अर्ध्या खोबऱ्याच्या भागात आटवलेला जांभूळ गर मिळवून किंचित शिजवले.
फोटो ५
शिजवलेले खोबऱ्याचे पांढरे /जांभळे थर एकावर एक थापले.
फोटो ६
वाळल्यावर कापून वर्ख लावला.
फोटो ७
अशा दिसतात डबलडेकर वड्या.
खोबरे साखर शिजवताना खूप कोरडे करून नये. थोडे ओलसर असावे.
वाह कंका. छान प्रयोग. चव कशी
वाह कंका. छान प्रयोग. चव कशी होती?
मस्तच. छान दिसतायत वड्या!
मस्तच. छान दिसतायत वड्या!
छान
छान
छान दिसतायत वड्या, जाभळ खावुन
छान दिसतायत वड्या, जाभळ खावुन य्य्य्य वर्श झाली.
नाव "नारळाची डबलडेकर वडी " अस जास्त ऑप्ट वाटेल.
छान दिसत आहेत
छान दिसत आहेत
चव कशी होती? by कुंतल
चव कशी होती? by कुंतल
जांभळाचा तुरटपणा थोडा अधिक हवा होता.
Va सुरेख वड्या!
Va सुरेख वड्या!
आता नारळ कातायला नको वाटते.आयाती वडी मिळाल्यास अधिक मस्त.
कसल्या मस्त दिसताहेत वड्या.
कसल्या मस्त दिसताहेत वड्या.
छान कल्पना, वड्या पण छान
छान कल्पना, वड्या पण छान दिसतायत
छान आहे
छान आहे
मस्त . ..
मस्त . ..
आहाह्ह्ह्हा
आहाह्ह्ह्हा
छान दिसताहेत वड्या!
छान दिसताहेत वड्या!
छान !
छान !
सुंदर दिसतायत. प्रयोगशील आहात
सुंदर दिसतायत. प्रयोगशील आहात.
वेळ पडल्यास खिचडी,कांदेपोहे
वेळ पडल्यास खिचडी,कांदेपोहे,फोडणीचा भात एवढे तीन प्रयोग माझे असतात. बाकीचे तिकडचे.
खिचडीत वांगी/तोंडली/बटाटे फोडी घालतो कधीकधी.
बाकी सूपचे प्रकार मात्र करतो. त्याचे टेम्प्लेट तयार केले आहे.
वाह सुरेख, दुरंगी.
वाह सुरेख, दुरंगी.
जांभूळ वापरण्याच्या कल्पनेचे
जांभूळ वापरण्याच्या कल्पनेचे कौतुक वाटले.
खुपच सुंदर दिसतायत वड्या..
खुपच सुंदर दिसतायत वड्या.. आजच् एका व्हॉटस् अप ग्रुपवर चर्चा करत होतो.. आणि लगेच क्र्ती पण हातात आली. शेअर करते तिकडे चालेल ना ?
शेअर करा. सगळ्यांना धन्यवाद.
शेअर करा.
सगळ्यांना धन्यवाद.
खूपच भारी srd.
खूपच भारी srd.
आयडिया चांगली आहे. जांभळ अशी
आयडिया चांगली आहे. जांभळ अशी वडी करायला कशी राहू शकतात हा मात्र प्रश्न पडला आहे. गर काढू पर्यंतच संपतीलल माझ्याकडून.
खुप वर्ष झाली ताजी जांभळ खाऊन. इथे फ्रोजन मिळतात ती मात्र आणते.