
पेज / खिमाट या नावाने ओळखल जाणारा हा कोकणचा स्टेपल फूड म्हणता येईल असा पदार्थ . आईच्या म्हणण्यानुसार तिच्या लहानपणी कोकणातील गावात न्याहारीला सर्रास पेज असायची . एक / दोन वाडगाभर पेज पिऊन माणसं शेतावर जायची. कधी मधी बदल म्हणून भाकरी आणि त्याच्या जोडीला सुक्या बांगड्याचा तुकडा .
मला मात्र पेज /खिमाट हे नेहमी आजारी असताना खायचा पदार्थ वाटत आलाय . आजारी पडल्यावर तोंडाची चव गेली की आई /आजी हमखास पेज करायच्या . त्या बरोबर किंचित लोणच्याच्या खार . गेलेली चव परत यायची गॅरेटी. कधी कधी तर खास पेज पिण्यासाठी आजारी पडावं अस वाटत . करायलाही अगदी सोपा असं . मात्र पेजेची खास चव येण्यासाठी तांदूळ मात्र गावचेच हवेत . एक वाटी तांदळासाठी 5 ते 7 वाट्या पाणी आणि त्यात चिमूटभर मीठ . ते आटून आटून एका पातळीला आलं की झाली पेज तयार .खिमाटसाठी अजून थोडं पाणी आटवायचं . एवढं सगळं झालं की वाडगाभर पेज ओरपायची . हो !ओरपायचीच .पेज /खिमाट काही नुसतं खायचा पदार्थ नाही . तो ओरपायचाच असतो .. वाडगा भरून पेज /खिमाट खाल्लं की दुपारपर्यतच्या वेळेची निश्चिती .
कारण नक्की काय ते माहीत नाही पण पेज /खिमाट शनिवारी करायची नाही असा दंडक आहे म्हणे आणि आई तो पाळयची. .त्यामुळे शनिवारी पेजेच नाव देखील काढायचं नाही . घरी आम्ही आळशीपणा करत असलो आणि आजी कधी वैतागली तर तिच्या तोंडून 'वेळेला पेज आणि निजेला शेज ' असा शेरा हमखास बाहेर पडायचा . गंमत वाटायची तेव्हा ..
पेजेच थोडं नकारात्मक वर्णनही ऐकलं आहे . नुसत्या पेजेवर एखाद्याने दिवस काढले अस आजी कधी कधी जुन्या आठवणी सांगताना म्हणायची. ते सांगताना गळा दाटून आलेला असायचा तिचा . मधु मंगेश कर्णिकांच्या पुस्तकातही पेजेचा उल्लेख वाचलाय. एकंदरीतच पेज /खिमाट आणि कोकण यांचं नातं अतूट आहे .
तर आता वरील पेज/खिमाट पुराण वाचल्यावर हा फोटो !
आम्हाला पण लहानपणी न्याहरी
आम्हाला पण लहानपणी न्याहरी म्हणून खिमट दिलं जायचं. सोबत मस्तपैकी तिळकूट आणि दही. आजी सकाळी उठली की चुलीवर मोठा टोप भरून खिमट शिजायला ठेवायची. घरातली ४ आणि शेजारची ३ पोरं अशी ७ जणांची पंगत रोज सकाळी पडवीत बसायची. मज्जा यायची. आजारी असल्यावर आजपण हाच बेत असतो.
खिमट गावठी तांदळाचंच छान होतं, बाजारच्या तांदळाला तशी चव आणि texture येतच नाही.
म्हणजे नेमके कोणते तांदूळ ?
म्हणजे नेमके कोणते तांदूळ ?
धान्य गावठी , बाजारू म्हणजे कसे असते ? सगळे धान्य गावठीच ना ?मग तेच बाजारात येते
गव्हाचेही तसेच , खपली गहू वापरा म्हणे , जगातील सगळे गहू खपलीतूनच तयार होतात ना ?
तुकडा तांदूळ किंवा मिळेल तो तांदूळ मिक्सर मधून काढून चालेल का
चिन्मयी, बरोबर
चिन्मयी, बरोबर
ब्लॅककॅट , कोणी कोकणात राहणार असेल तर त्यांच्याकडून गावाकडचे तांदूळ मागवून घ्या . त्याची पेज करा.
कोकणात पेज ही उकड्या तांदळाची
कोकणात पेज ही उकड्या तांदळाची केली जाते. न्याहारी म्हणून 'एकेकाळी' कोकणात (विशेषतः तळकोकणात) पेजेचे स्थान अबाधित होते. सोबत भाजी किंवा खोबरे! माजघरात बसून वाडगाभर पेज रिचवायची आणि नंतर अंगणात धुडगूस घालायचा हा कोकणातील सुट्टीचा रिवाज असे. आता क्वचित कुणाकडे पेज बनत असावी. असो
ब्लॅककॅट , चेंबूर मध्ये हॉटेल
ब्लॅककॅट , चेंबूर मध्ये हॉटेल वैशालीच्या खाली जो मसालेवला आहे त्याच्याकडे किंवा समोर पाटील मसालेवाले यांच्याकडे गावठी तांदूळ मिळतील.नाहीतर ब्रिजखालचा मद्रासी,त्यांच्याकडेही लालसर तांदूळ पाहिले आहेत.
लहानपणी गावी गेल्यावर फणसाची / वालीचीभाजी आणि लाल तांदळाची पेज न्याहारीला असायची.मला पेज आवडायची नाही.पण बाकी काही नसायचे.त्यामुळे झक्कत खावे लागत असे.
Ok
Ok
आम्ही मऊभात म्हणतो!
आम्ही मऊभात म्हणतो!
मी कॉलेज ला जाताना रोज सकाळी खाऊन जायचे. नुसता तूप मीठ घालून. लोणचं मेतकूट पापड काही नाही. आवडायचंच नाही. आजारी पडलं तरी असंच. ती सात वर्षं सगळ्यात हेल्दी होती.
आता सासरी रोज वेगळा नाश्ता लागतो मग माझ्या एकटीसाठी वेगळं नको म्हणून सवय मोडली.
पोटात शांत वाटतं.
मऊ भात वेगळा असतो , तो खातात
मऊ भात वेगळा असतो , तो खातात , पेज पितात
ती सात वर्षे हेल्दी होती
आताच हा तात्या अभ्यंकर यांचा लेख वाचला.
https://m.facebook.com/groups/mumbaimajhi1/permalink/4741152965996457/
दालचावल के अलावा इनसान को जिंदगी मे और क्या लगता है ?
तात्या गेले आणि मिसळपावची चव बिघडली
छान !
छान !
वेळेला पेज आणि निजेला शेज>>>
आवडले.
धन्यवाद डॉ कुमार
धन्यवाद डॉ कुमार
मऊ भात वेगळा असतो , तो खातात , पेज पितात >>> + १
छान लेख.
छान लेख.
ब्लॅक कॅट यांनी विचारल्यापासून माझ्याही पेजेबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या
कोकणातली न्याहारी , वालीची भाजी , उकडा तांदूळ, ताप आलेला असतानाचा आहार , सोबत लोणच्याचा खार या अनेक गोष्टींसाठी +१.
पेज नुसती उचलून प्यायची आणि भात कंटाळत खायचा.
मला कैरीच्या लोणच्याच्या फोडी पेजेत घालून खायला आवडायच्या. सोबत ओल्या खोबर्याचे काप आणि खरपूस भाजलेले, करपवलेले म्हणाना - काजू.
खिमाट हा शब्द आणि प्रकार मात्र ऐकला नव्हता.
बिग बास्केटवर पार बॉइल्ड राइस, तामिळ रेड राइस मिळतो, त्याचीही पेज चांगली होईल. आईच्या तोंडीही सुरे तांदूळ हा शब्द असे.
गावी चुलत भावंडांकडे मात्र आता पेज बंद झाली. तिथेपण चहा बिस्किटे इ. आहे. चपात्याही सवयीच्या झाल्यात.
खूप छान धागा जाई..!!
खूप छान धागा जाई..!!
गावच्या आठवणी जाग्या झाल्या ह्या धाग्याने..!
आमच्याकडे आजही आजारी माणसाला पचनाला हलका आहार म्हणून पेज देतात. गावठी तांदूळ ( घरच्या शेतात पिकवून , भात गिरणीत स्वतः जाऊन भरडून , तांदळांना जास्त पॉलिश न घेता आणलेले) घरचेच असतात. त्यामुळे त्या पेजेला चवही छान लागते.
एखाद्याला आवडत असेल तर तांदळाच्या पेजेत तूप, गुळ, दूध टाकून ही तांदळाची पेज शिजवली जाते.
भात शिजवताना निघणारी पेज आणि भाजलेला सुका बोंबिल म्हणजे सकाळपासून काम करून थकलेल्या स्त्रियांसाठी energy food आहे.
मस्त लिहिलं आहेस जाइ
मस्त लिहिलं आहेस जाई
आमच्याकडे पेज किंवा मौ भात नसे न्याहारीला. कु पि आणि भात असे. पण हल्ली भात कोकणात ही कमीच झालाय त्यामुळे हल्ली कु पि आणि पोळी ही असते. ज्याला जे हवं ते खा , भात किंवा पोळी . कु पि मात्र हवंच.
कु पी म्हणजे ?
कु पी म्हणजे ?
भाताची पेज माहिती आहे. खिमाट
भाताची पेज माहिती आहे. खिमाट नव्हतं माहिती. चांगला लेख.
कुळथाचे पिठले असावे
कुळथाचे पिठले असावे
कुळथाचे पिठले असावे >> हो ,
कुळथाचे पिठले असावे >> हो , तेच ते .
आमच्याकडेही मे महिन्याच्या
आमच्याकडेही मे महिन्याच्या सुट्टीत रोज आणि एरवीही अनेक वेळा मऊभात. पेजेइतका पातळ नसेल, पण पातळच असतो. त्याच्यासोबत तूप, लोणचं/टक्कू, मेतकूट, भाजलेला पोह्यांचा पापड वगैरे वगैरेपैकी जे जे हवं असेल ते.
मी आणि माझी एक बहीण आधी पापड ताटात ठेवायचो आणि वर मऊभात घ्यायचो, सोबत लोणचं वगैरे. मग सगळा भात संपला, की शेवटी तो मऊ झालेला पापड खायला मस्त लागायचा!! आहाहा..
मस्त !
मस्त !
मी सुद्धा पेज म्हटले की आजारपण. तापाने तोंडाला चव नसली, खायची ईच्छा नसली की पेज जिंदाबाद.
पण निव्वळ जंकफूड खात जगणारी माझी पोरगी मात्र आश्चर्यकारकरीत्या पेज आवडीने पिते त्यामुळे घरी वरचेवर बनवली जाते आणि तिला भाताचा ज्यूस म्हटले जाते.
पेजेसाठी गावचा उकडा तांदूळच वापरला जातो. पण मध्यंतरी घरी ईंद्रायणी तांदूळाची गोण येऊन पडली. त्याची पेज बनवायला सुरुवात केली. ती सुद्धा छान गोड लागू लागली. सध्या तीच हिट आहे घरात. हा तांदूळ बहुधा देशावरचा आहे ना. तिथल्या लोकांनी ट्राय करायला हरकत नाही.
वर कुळीथ पिठल्याचा उल्लेख आहे. घरी पिठले म्हटले की कुळीथ पिठलेच. सोबत भाकरीच केली जाते. आणि असल्यास भाजलेला सुका बोंबील.
लहानपणी जेव्हा बाहेर मित्राकडे त्यांच्या घरचे पिठले खाल्ले तेव्हा हा काय मिळमिळीत चवीचा पदार्थ आहे असे वाटले. नंतर कळले की ते बेसन पिठले असते. आणि ते आवडीने खाणाऱ्यांना बरेचदा कुळीथ पिठले फार ऊग्र वाटते. झेपत नाही. शेवटी लहानपणापासून तुमच्या टेस्टबडस कश्या डेव्हलप होतात यावर हे अवलंबून असावे. सध्या मी दोन्ही पिठले आवडीने खातो. पण भारी मात्र कुळीथ पिठलेच वाटते. शिमला मिरची आणि बेसनच्या भाजीतही कुळीथ पीठ वापरलेलेच जास्त आवडते.
ओके कुळीथ पीठ वापरले जाईल
ओके
कुळीथ पीठ वापरले जाईल
आमच्या लहानपणी पण बरेचदा पेज
आमच्या लहानपणी पण बरेचदा पेज असायची डिनरला. आमचा कोकणाशी काही संबंध नाही. पण घरी गरम पेज, त्यावर तूप, लिंबाचं लोणचं, भाजलेला पापड असा बेत असायचा. गरम गरम पेज प्यायला फार आवडायचे.
वाह!
वाह!
आम्ही उकडा व सुरsय दोन्ही प्रकारचे तांदूळ वापरून पेज बनवणारे .
गावी लोकं शेतावर जाण्यापूर्वी पेज व भाजी ( ही बहुतेक वेळा खोबरं घातलेली पालेभाजी इत्यादी असे) खात असे आई सांगते.
दोन महिन्यांपूर्वी रेमा १००० मधून पार बोईल्ड राईस असे वाचून आणलेला तांदूळ ची पेज बनवलेली - पण कायतरी अजबच बनले होते हलवा सदृश
त्यामुळे parboiled rice पेज च्य आ विरोधात आहे मी
आम्हीही याला मऊभातच म्हणतो.
आम्हीही याला मऊभातच म्हणतो. तूप मीठ मेतकूट आणि असेल तर पापड. आता वरचं वाचून लहानपणी लिंबाचं लोणचं असायचं त्याची आठवण झाली. ती चव कित्येक वर्षांत न घेता ही बरोबर लक्षात आहे.
उकडा तांदूळच हवा असं नाही.
उकडा तांदूळच हवा असं नाही. कुठलाही आखूड शिताचा पचायला हलका तांदूळ पेजेसाठी चालेल. चिनी लोकांची congee म्हणजे पेजच. बासमती तांदळाची पेज करायला जाऊ नये. सोना मसुरीची पण उत्तम होते.
असाच एक आजारी असतानाचा लाईफ saver आणि बरं वाटल्यावर नकोसा वाटणारा पदार्थ म्हणजे फो. फंडा सेम. भरपूर लिक्वीड आणि सहज पचणाऱ्या तांदळाच्या शेवया. बरे वाटत नसताना घरी असलो तर पेज आणि ऑफिसात जायला लागलं तर फो हे आता स्टँडर्ड रूटीन झालं आहे.
आज केलीच.
आज केलीच.
तुकडा तांदूळ , गावठी तांदूळ नव्हता. लांबडा तांदूळ होता, तोच भिजवला व फुलल्यावर शिजायला टाकला, थोडा शिजल्यावर त्यावरचे पाणी काढून नुसती शीते होती ती ग्लासने रगडली, मग पुन्हा तेच पाणी घातले.
तांदूळ भिजवला तेंव्हाच दोन दोन चमचे तूर व मूग डाळ भिजवली होती , ती मात्र कच्चीच रगडून भातात घातली व भरपूर पाणी घालून सगळे शिजवले.
सतत ढवळावे लागते.
शेवटी मीठ घातले.
फोटू काढायचा म्हणून चिमूटभर हळद घातली आहे.
युट्युबवर लांब तांदूळ असतील तर ते भाजून मिक्सरवर भरडून साठवण्यास सांगितले आहे, म्हणजे आयत्या वेळी पेज बनवता येते.
काही लोकांनी कुकरमध्ये बेसिक मिश्रण शिजवून मग पुन्हा पातेल्यात घेऊन अजून पाणी घालून शिजवले आहे.
तांदूळ , मेथी , गूळ अशी गोड पेजही युट्युबवर आहे. पण त्यात नंतर दूध तूप घातले आहे.
चुलीवरच्या पेजेला हलकी धुराची
चुलीवरच्या पेजेला हलकी धुराची पण चव असते. आणि सुके बांगडे भाजण्याचा वास तर विचारूच नका. आता लिहिताना पण तोंडाला पाणी सुटलंय
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
ब्लॅककॅट , तांदळाची खीर केलीत की काय ? एवढा जामानिमा नसतोय पेजेत
ब्लॅककॅट,पेज आणि खिमट दोन
ब्लॅककॅट,पेज आणि खिमट दोन वेगळ्या गोष्टी आहेत.पेज ही निव्वळ तांदळाची असते त्यात फक्त मीठ घातले जाते.डाळी वगैरे घालून करतात ते khiमट होय.
वर तुम्ही गूळ, मेथी छा उल्लेख केला आहे तो प्रकार खिरीचा आहे.2 लहान चमचे तांदूळ,1 -१/२ चमचा मेथीदाणे कुकर मध्ये शिजवावे.शिजल्यावर डावाने जरासे घोटून घ्यावे.त्यात गूळ, थोडेसे मीठ घालावे.ओल्या नारळाचा जाड रस/दूध घालून मंद गॅसवर शिजवावे.उकळी येऊ devu naye.खोबऱ्याचा रस गूळ virghallyavr घालावा.छान लागते.
खास बाळंतिणीला ही खीर दिली जाते. पौष्टिक असून बाळासाठी दूध पण जास्त येते म्हणे.
जाई छान लेख आणि आठवणी,
जाई छान लेख आणि आठवणी, मुलीसाठी अशी पेज बनवली आहे बरेचदा (तिला कायम सर्दी अन ताप येत असे ऋतू बदलताना). लहानपणी आठवत नाही अशी पेज घरी बनल्याचे. कुळीथ पण 6-7 वर्षांपूर्वी पहिल्यांदा टेस्ट केले
छान लेख नि चांगले प्रतिसाद.
छान लेख नि चांगले प्रतिसाद. पेजेत थोडे मीठ नि तूप इतकेच असले तरी छान लागते. अर्थात वैयक्तिक आवडीनुसार घराघरात पेजेची "टॉपिंग्ज" बदलतात.
Pages