हल्लीचे साऊथ इंडियन चित्रपट आणि बॉक्स ऑफिस

Submitted by च्रप्स on 16 April, 2022 - 22:49

काही आकडे देतोय- साभार इंटरनेट.
बॉक्स ऑफिस कलेक्शन्स cr -
पुष्पा - 365
ररर - 1050
केजीफ 2 - 300 (रिलीज होऊन पहिले दोन दिवस)

केजीफ पुष्पा ला ओव्हरटेक करेलच आणि कदाचित ररर पेक्षाही पुढे जाईल...

आता तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे कलेक्शन बघाल तर ते 100 आकडाही गाठू शकले नाहीयत... अपवाद आलिया चा गंगुबाई आणि काश्मीर फाईल्स... बच्चन पांडे , अट्याक तर फ्लॉप आहेत..
बधाई दो आणि झुंड चे आकडे तर डिसपॉईंटिंग आहेत...

असेही नाही कि साऊथ चित्रपटांचे कलेक्शन फक्त साऊथ मधून आहे.. हिंदी बेल्ट मधूनही शंभर दोनशे कमवतायत...

सलमान भाई चे चित्रपट दोनशे करतील पण बाकीचे चित्रपट लोक का बघायला जात नसावेत? आणि हेच साऊथ चित्रपट कडे इतके का आकर्षित होत असावेत? मी केजीफ पाहायला सुरुवात केली- बघू शकलो नाही.. काहीच खास नव्हते... व्हायोलन्स तर प्रचंड होता.. पी जी - हा फॅमिली चित्रपट नाहीय...
लोक रिपीट बघत आहेत...

हिंदी इंडस्ट्री ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार महत्वाची इंडस्ट्री आहे... हि इंडस्ट्री यशस्वी होणे फार गरजेचे आहे.. आमिर खान अजूनही हायस्ट बॉलिवूड बॉक्स ऑफिस वर एक क्रमांकावर आहे( दंगल - 2024 cr ) पण बाकीचे काय??

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेव्हा शाहरूखला घेत बॉलीवूडचे चोप्रा जोहर मंडळी बॉक्स ऑफिस हिट चित्रपट देत होते तेव्हा लोकं त्यांना गल्लाभरू चित्रपट म्हणत होते.
मग सलमान हा भाई बनला आणि ३००-४०० करोडचे चित्रपट ईदच्या मुहुर्तावर देऊ लागला. ते सुद्धा याच कॅटेगरीत टाकले गेले.
वरील दोन्ही खानांना सुमार अभिनेता आणि प्रत्येक चित्रपटात तेच तेच करणारे म्हणून हिणवले गेले.
काही राजकीय मॅटर तापले की आमीर वा शाहरूख खानांच्या चित्रपटावर बहिष्कार टाका म्हणून कांगावे केले गेले.
तर मग आता साऊथच्या गल्लाभरू चित्रपटांना डिमांड आलाय त्यावर रडण्यात काही अर्थ नाही.
आपल्यालाच आपल्या हिरोंची कदर नाही.
कारण आपण ते आपले समजलेच नाही. बॉलीवूड, हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजे उत्तर भारतीय समजणारे आपण, आता आपल्याला ती महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे हे जाणवतेय. कारण त्यामुळे ईथल्या कैक लोकांना रोजगार मिळत होता. जर बॉलीवूडचा बाजार उठला तर त्याचा फटका स्थानिकांना देखील बसणार हे साहजिक आहे.

काळजी येत्या काळाची आहे.
गेले तीन दशक तीन खानांनी ईंडस्ट्री आपल्या तीन मजबूत खांद्यांवर तोलून धरली.
आता पुढे काय हा प्रश्न आहे..
श्रीलंकन क्रिकेट संघातील जयसुर्या, मुरलीधरन, संगकारा वगैरे सिनिअर एकेक करत गेले आणि नवीन पिढीत तितके कोण प्रॉमिसिंग नसल्याने अचानक साधारण संघ भासू लागलाय तसे बॉलीवूडचे बॉक्स ऑफिसवर झालेय.

काळजी करू नका सर. बर्फी , रंग दे बसंती, थ्री इडीयटस, मुन्नाभाई १/२, ओह माय गॉड , पिंक, ब्लॅक , बदला , तारे जमीं पर , दंगल असे अस्सल चित्रपट काढत रहा. भाईजान नी साऊथच्या चित्रपटांचे रीमेक केले, राऊडी राठोड, सिंघम सुद्धा रीमेक होते. साऊथचा मसाला याच मंडळींनी सवयीचा केला. आता रडण्यात अर्थ नाही. त्यातच बॉलीवूड मूव्हीजचे टीव्ही हक्क कितीला द्यायचे यावरून झालेल्या वादातून टीव्हीवर साऊथचे चित्रपट स्वस्तात घेऊन डब करून लावल्याने लोकांना तिकडचे हिरोज सवयीचे झाले त्याचा हा परिणाम आहे.

या आधीही जितेंद्र श्रीदेवी सिरीजमुळे बॉलीवूडवर मद्रासचे आक्रमण झाले होते. पण तात्पुरते असते ते. लोकांना चेंज पाहिजे असतो. रीमेक पाहण्यापेक्षा ओरोजिनल का पाहू नयेत म्हणून आता ते चालताहेत. साऊथने पण बाहुबली नंतर मार्केट ओळखले.
खान मंडळी, अजय देवगण नवीन असताना त्यांचे मूव्हीज चांगले होते म्हणून त्यांना स्विकारले. शाहरूख खान कुंदन शाह, अजीज मिर्जा , सईद मिर्जा या तिकडीमुळे एस्टॅब्लिश झाला. शाखा म्हणजे वेगळा आणि चांगला चित्रपट अशी त्याची ओळख झाली. करण जोहर , यशराज फिल्म्समुळे ती गेली.
आमीर खानने आता निव्वळ निर्माता किंवा दिग्दर्शक बनावे. नव्यांना संधी द्यावी. यांची वयं लपत नाहीत.

सिनेमा पाहू नका अशी मोहीम चालवल्याने तो पडत नाही. झुंड वेगळ्या टायमिंगला रिलीज झाला असता आणि राजामौलीं प्रमाणे सिरीयस मार्केटिंग केले आसते तर बर्‍यापैकी चालला असता. बच्चन पांडे पण थोडा जास्त चालला असता. वेळ काळ पण बघावीच की.

चांगले चित्रपट बनवता येतात. चांगले अभिनेते शोधले तर सापडतात. मार्केटींगलाही महत्व देऊन ती करता येते.
पण स्टारडम पैदा करता येत नाही.
स्टार कैक असतात पण ज्यात एक्स फॅक्टर असतो तोच सुपरस्टार बनतो. आणि हा ऊपजत असतो. तो डेव्हलप करता येत नाही. एखाद्याला ठरवून सुपर्रस्टार बनवू शकत नाही. निव्वळ मार्केटींगने लोकांमध्ये त्याची क्रेझ पैदा करू शकत नाही. शाहरूख खान जन्मालाच यावा लागतो.

Submitted by शान्त माणूस on 17 April, 2022 - 01:10

सहमत.
हिंदी सिनेमा काही साऊथचे सिनेमे हिट झाले म्हणून संपणार नाही. चांगले हिंदी सिनेमे येतात तोपर्यंत हिंदी सिनेमे टिकणार. गेल्या चार पाच वर्षांत सुद्धा पहिले तर कितीतरी उत्तम हिंदी सिनेमे येऊन गेलेत. OTT Exclusive release वर हिंदी सिनेमे चांगला पाय रोवून आहेत.

आणि कितीतरी शे करोडचा धंदा झाला तरच सिनेमा पैसा मिळवतो असे कुठे असते ? अंधाधुन हा सिनेमा उदाहरणादाखल घ्या. ७४ कोटी रुपये विक्री झाली, तर निर्मितिखर्च ३२ कोटी रुपये होता. म्हणजे घसघशीत कमाई झालीच कि !

बॉलिवूड ची अवस्था हळूहळू मराठी फिल्म इंडस्ट्री सारखी होत आहे का ?
प्रयोगशीलता शिल्लक राहिली नाही , कमरेच्या खालच्या आणि वरच्या विनोदावर पोट भरणारे पण गल्ला न भरणारे सिनेम्यावर या दोन्ही इंडस्ट्री अजून किती दिवस तग धरणार ?
भारताची मुख्य भाषा हिंदी असून त्यामध्ये भव्यदिव्य सिनेमे बनवणारे निर्माते दिग्दर्शक नाहीत तर कन्नड तामिळ तेलगू मध्ये मात्र शे दोनशे कोटीच्या बजेट मध्ये भव्य सिनेमा बनवून किमान दुप्पट कोटी वसूल करणारी प्रयोगशील मंडळी भरपूर आहेत .
आपल्याला तर साऊथचेच सिनेमे आवडतात बुवा !!

चिंता गल्लेभरू सिनेमाची आहे तर मग हिंदी इंडस्ट्री खतरे मैं चा धोशा का लावलाय
चांगलंच आहे ना रददड सिनेमे चालत नसतील तर
लोकांना नावीन्य हवे असते तेच ते खप्पड शरूख, इंजेक्शन देऊन सुजलेला सलमान, आणि प्रयोगांच्या नावाखाली चांगले सिनेमे ढापुन त्यांची माती करणारा अमीर
हे लोकं आता डब्यातच जायला हवेत
एकंदर योग्यतेपेक्षा खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आहे त्यांना आजवर
सो जे होतंय ते बेस्ट आहे म्हणा

खूप लोकांना सध्या दक्षिण सिनेमांनी वेड लावले आहे .
बजेट सोडता , ते लोक ज्या पद्धतीने सिनेमा उभा करतात - ते हिंदी किंवा मराठी लोक का करत नाहीयेत ?
आजच्या लोकसत्तामध्ये यावर लेख आहे .
कोणी त्याची लिंक - असल्यास इथे द्यावी .

KGF , RRR म्हंजे साऊथ सिनेमा नव्हे. त्याव्यतरिक्तही साऊथच्चे सिनेमे आहेत.
साऊथ इंडियन सिनेमात मल्याळी चित्रपट येत नाहीत का? ते चित्रपटही आशयघन असतात. गेल्या वर्षी आलेला ग्रेट इंडियन किचन पण मल्याळी होता

जाई त्यांना आशयघन सिनेमे अपेक्षित नाहीयेत
चर्चा फक्त सलमान शरूख आणि गललेभिरु सिनेमाची आहे
त्यांच्यापेक्षा जास्त या सिनेमा ना मिळत आहेत हे दुखणे आहे

वर येऊन गेलेले मुद्दे चांगले आहेत. यात आणखी भर .

१. बॉलीवूडवर काही लोकांचे साम्राज्य आहे ही फॅक्ट आहे. आता इथे शिरकाव करण्यासाठी गुणवान लोकांना संधी नाही. तीच गोष्ट तेलगू इंडस्ट्रीची पण आहे. चिरंजीवी, पवन कल्याण, चिरंजीवीचा भाचा अल्लू अर्जुन आणि अजून एक जण अशा चारच घरात तेलगू इंडस्ट्रीचा पैसा जातो. हे चौघेही एकमेकांच्या नाते- सोयर्‍यात आहेत. बॉलीवूडच्या सुरूवातीला ज्या घराण्यांनी मेहनत घेतली त्यांचे वारसदार आता त्याचा फायदा घेताना दिसतात. सुरूवातीच्या काळात जेव्हां चित्रपटकला, गाणे बदनाम होते तेव्हां तवायफ गायच्या, अभिनय करायच्या. अशा वेळी घरदार सोडून येऊन यशस्वी झालेले लोक आहेत ते सहजासहजी व्यवसायातला आपला वाटा सोडतील हे होणार नाही.

२. मुस्लीम वर्चस्व हा संघपरिवाराचा आवडता मुद्दा आहे. गुजरात दंगलींच्या आधीच राजस्थानात मी तीनही खानांचे चित्रपट पाहणार नाही अशा शपथा घ्यायला लावत. गुजरात मधेही ते सुरू झाले. तरीही त्यांचे सिनेमे गुजरात मधे सुद्धा चालत.

३. आता बॉलीवूड मधे मनसे, शिवसेना, भाजप यांच्या चित्रपट सेना, संघ आहेत. पूर्वी दाऊदचे नियंत्रण होते. आता या लोकांचे आहे.

४. मल्टीप्लेक्स ओनर्स असोसिएशन वर काल आणि आज चोप्राज, भन्साळी, खान्स यांचे वर्चस्व आहे. ते संघपरीवाराने संपवत आणले आहे. कोणत्या चित्रपटाला किती स्क्रीन द्यायचे याचे राजकारण चालते. जर कमी स्क्रीन्स मिळाल्या आणि त्यावरचे प्राईम टाईमचे शोज नाही मिळाले तर तो चित्रपट व्यवसाय मंद गतीने करतो. तोपर्यंत त्याच्यावर फ्लॉपचा शिक्का बसतो.

५. प्रती बॉलीवूड साठी नोईडा येथे केलेले प्रयत्न सध्या तरी अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे बॉलीवूडला शह देण्यासाठी साऊथच्या सिनेमांना मोठ्या प्रमाणात स्क्रीन्स मिळतात. केजीएफ हा दहा हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. गंगूबाई अडीच हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. पावनखिंड ला ४५०० स्क्रीन्स मिळाल्या होत्या. त्यात ६३% शोज नाईट शोज होते.

६. साऊथ चे सिनेमे हे भव्यतेमुळे चालतात. तसेच सामान्य माणसाचे जीवन त्यात दिसते. करण जोहर, आदीत्य चोप्रा यांनी मल्टीप्लेक्सच्या आगमनानंतर फक्त एनआरआय आणि एलिट क्लासला डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनवले. त्यावेळी त्यांची धंद्याची गणिते वेगळी होती. त्यांना स्पर्धाही नव्हती. यांच्या सिनेमातून बच्चनच्या काळातला सामान्य माणूस हद्दपारच झाला. चकचकीत सिनेमे, नेत्रसुखद चित्रण, महागडी लाईफस्टाईल हे बघायचे तर बघा असा अ‍ॅटीट्यूड होता. दक्षिणेच्या चित्रपटात आजही पुष्पासारखे कॅरेक्टर येते. बॉलीवूड बड्या बॅनर्स मधे रईस, मुन्नाभाई सारखा अपवादच. उद्ध्वस्त व्हायची भीती यांना आहे. ते बदलले नाहीत तर संपतील.

७. राजकुमार राव, आयुष्यमान खुराणा , पंकज त्रिवेदी यांचे काही सिनेमे किंवा गँग्ज ऑफ वासेपूर, स्त्री असे उत्तर भारतातील छोट्या शहरातले चित्रपट लो बजेटचे होते पण ते हटके आणि चांगले होते. तसेच यात सामान्य माणूस सुद्धा होता. लोकांना ते आवडले. एकच एक खूप काळ चालणार नाही.

दक्षिणेचे पण खूप खर्चिक पण बिनडोक चित्रपट जास्त काळ या भागात चालणार नाहीत. इथलं पब्लीक साऊथ इतकं खुळं नाही.
अभिनय, दिग्दर्शन, स्टारडम, कथा, सिनेमॅटोग्राफी, ड्रामा , धक्के, शोमनशिप असे अनेक युएसपी असतात. यातल्या एका किंवा अनेक गोष्टींनी चित्रपट चालतो. पण नंतर एखादा चित्रपट चालला म्हणून त्याची लोकप्रियता त्या टीमला, कलाकाराला खूप काळ भिकारडे चित्रपट देऊन एनकॅश करता येत नाही. राजेश खन्ना, अमिताभ सहीत सर्वांनी याचा अनुभव घेतलेला आहे.

मी सध्या पुष्पा आणि rrr हे दोन साऊथ इंडियन चित्रपट पाहिले.
पुष्पा अजिबात आवडला नाही.rrr खूप आवडला.कथा मूळ पात्रांच्या खूप लिबर्टी घेऊन केलेली असली तरी आवडली.ही कथा खरी नाही, मूळ कोराराम भीम आणि दुसरा माणूस यांचे कार्य अगदी वेगळे होते हे मी तरी लक्षात ठेवेन.(जसं भन्साळी बाजीराव मस्तानी मध्ये बाजीराव ने मस्तानी ची लमाझ डिलिव्हरी खरोखर केली नाही, आणि मस्तानी आणि काशीबाई खरोखर एकत्र नाचल्या नाहीत आणि बाजीराव युद्ध झाल्यावर 'वाट लावली' म्हणत खरोखर नाचत नाही हे आपण समजावून घेऊन लक्षात ठेवलं तसंच ) kgf2 मध्ये खूप मारहाण आहे हे ऐकल्याने बघणार नाही.rrr मध्ये पण खूप होती.kgf1 पण झेपला नव्हता.त्यात काहीही चालू होतं.

बरेच हेवी (आमच्या आजीच्या भाषेत 2 माणसांचे बाप दिसणारे) दिसणारे साऊथ चे हिरो अतिशय वेगवान डान्स स्टेप उत्तम करतात हे बघून कौतुक वाटतं.

मला साऊथ,नॉर्थ, आसामी बंगाली सर्व पिक्चर हिंदी
आवाजात आलेले चालतील.जे चांगले असतील ते टिकतील.
गुलाबो सिताबो ची इतकी हवा झाली तो 10 मिनिटात कंटाळून बंद केला.

साऊथ चे पिक्चर हिट होण्याची फार चिंता करू नये.त्यात लोकांना तोचतोपणा दिसायला लागला की ते बघणं पण कमी होईल.

गल्लाभरू चित्रपटांना नावे ठेवणे सोपे असते. पण ईंडस्ट्रीमध्ये पैसे तेच चित्रपट आणतात. त्या जीवावर ईंडस्ट्री तग धरते. त्यामुळे मग नंतर आशयघन वगैरे चित्रपट निघू शकतात. कारण पैश्याचे सोंग घेता येत नाही. आणि फिल्म ईंडस्ट्री म्हणजे निव्वळ हे स्टार सुपर्रस्टार कलाकार नाही तर स्पॉटबॉयपासून मेकअपमन, कॅमेरा टीम, साऊंडवाले, एक्स्ट्रा गर्दीतले कलाकार, ते छोटे मोठे डिस्ट्रीब्यूटर, म्युजिक ईंडस्ट्री सारेच आले. गल्लाभरू चित्रपटांना वजा करता हा डोलारा ऊभा राहू शकत नाही.

आणि हा पैसा तरी का येतो हा विचार केलाय?
हे चित्रपट लोकांना आवडते ते देतात म्हणून पैसा येतो. कोणाच्या खिश्यात हात घालून काढत नाहीत.

हे म्हणजे क्रिकेटपटू खूप पैसे कमावतात म्हणून असूया बाळगण्यासारखे आहे. तो खेळ सर्वाधिक लोकांना बघायला आवडतो म्हणून तिथे पैसा आहे. पण त्यामुळे देशभरातील खेळाची आवड असणार्‍या मुलांसाठी काही करता येते.

पण तिथे पैसा आहे हे पाहता क्रिकेटर बनायला स्पर्धाही तितकीच आहे. तुम्ही म्हणाल पैसा आहे तर चला पोराला क्रिकेटच खेळायला लाऊया, चार पैसे कमावेल, तर ते सोपेही नाही. हेच बॉलीवूडलाही लागू. या ईंडस्ट्रीत शिरकाव करणे हे सुद्धा तितकेच अवघड आहे. सर्वोच स्थानावर पोहोचणे त्याहून अवघड आणि तिथे टिकून राहणे अशक्याच्या एक घर आधी.. आणि हे जर कोणी आऊटसायडर करत असेल, तर त्यासमोर खरेच नतमस्तक व्हावेसे वाटते. म्हणून मी होतो Happy

एक तर सौथ सिनेमा जगतात प्रॉड क्षन साइडला खूपच शिस्त आहे. अ‍ॅप्रोचच वेगळा आहे. दक्षिणेतील जनतेची मानसिकता पण वेगळी असते. त्या अनुसार ते सिनेमे बनतात. जुना चंटी सिनेमा बघा. किंवा इश्वरन, वेंकटेश/ कमल हासन झालेच तर रजनी कांत हे फार मोठ मोठे हिरो पण अगदी साध्या माणसाची कामे लीलया करतात. त्यामुळे ते अगदी गरीबातील गरीब जनतेला आपले वाटतात. एका चित्रपटात रजनीकांत वयस्कर हतबल आईची सेवा करताना दाखविला आहे. किंवा चंपी कर णारा गरीब भोळसट मुलगा वेंकटेश, क्षण क्षणम मधली श्रीदेवी, शंकराभरणम मधले मास्तर, इश्वरन मधला थेवर मगन मधला कमल हसन हे रोल बघितलेत तर ते फार स्ट्रॉन्ग व ट्रू टु लाइफ कॅरेक्टर आहेत.

हे एका बाजूला दुसरे म्हणजे अशक्य प्राय बाबी करणारे सुपर हिरो. अवघ ड रोजच्या जीवनातून तीन तास सुटका. राधेशाम मधील रोमन व्हिला हे त्याचेच एक उदाहरण. बिनधास्त वाढवून दाखवणे. पब्लिकला पन माहीत अस्ते. पन मजा तेवढीच.

दलितांच्या इशूज ची मांडणी, जात विश यक जेंडर विशयक संवाद घडवून आणणे हे ही ह्या सिनेमांत होत असते. ग्रेट इंडिअन किचन, होम एंड्रॉइन्ड कुंजप्पन बघा.

बायकांचे काही रोल्स पण उत्तम लिहिलेले अस्तात. चंटी मधील त्याच्या आईचा रोल. अरुंधती मधील अनुश्काचा रोल जबरी लिहिले आहेत.

अंधाधुंद किंवा बर्फी वगैरे चित्रपट चालले हा मुद्दाच नाहीय... तो वेगळा टाईम होता...हल्लीचे साऊथ इंडियन चित्रपट बॉलिवूड ला वरचढ ठरत आहेत...
कन्नडा इंडस्ट्री तशी मराठी लेव्हल इंडस्ट्री होती... इंफाक्त्त आपल्याकडे सैराट होता 100 क्लब वाला ..
केजीफ एकाचं चित्रपटाने ती इंडस्ट्री तेलगू लेव्हल नेले आहे...
हिंदीत डब करून हिंदी बेल्ट मधेच शंभर मारतोय...
मराठी चित्रपट देखील हिंदी डब करावेत का?

मृणाली - सगळे बॅकग्राऊंड डान्सर नाचतायत तो डान्स.. स्पेशल काय त्यात... आलिया, जानव्ही किंवा श्रद्धा आरामात नाचू शकतात यापेक्षा छान ...
आलिया चा हा डान्स पहा- शेवटचा एक मिन एकाच कट मध्ये आहे...
https://youtu.be/Jh_VKJAEnUY

अमा तुम्ही जी उदाहरणे देताय ती फार जुनी आहेत... सध्याचा मुद्दा आहे... सध्या थोडा बिग बजेट दक्षिण सिनेमा केला शंभर टक्के हिंदीत हिट...

दाक्षिणात्य चित्रपट चांगला व्यवसाय करताहेत चांगले आहे की. बॉलिवुडही नवीन वाटा शोधेलंच.
>> दर्जेदार चित्रपट येतात हिंदीत पण लोक बघत नाहीत... आता बघू टायगर चा चित्रपट कसा करतो व्यवसाय ते.. त्याच्याकडून अपेक्षा आहेत...
ब्रह्मास्त्र आणि लाल चड्ढा कडून पण एक्सपेक्त आहे 300+.

Pages