हल्लीचे साऊथ इंडियन चित्रपट आणि बॉक्स ऑफिस

Submitted by च्रप्स on 16 April, 2022 - 22:49

काही आकडे देतोय- साभार इंटरनेट.
बॉक्स ऑफिस कलेक्शन्स cr -
पुष्पा - 365
ररर - 1050
केजीफ 2 - 300 (रिलीज होऊन पहिले दोन दिवस)

केजीफ पुष्पा ला ओव्हरटेक करेलच आणि कदाचित ररर पेक्षाही पुढे जाईल...

आता तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे कलेक्शन बघाल तर ते 100 आकडाही गाठू शकले नाहीयत... अपवाद आलिया चा गंगुबाई आणि काश्मीर फाईल्स... बच्चन पांडे , अट्याक तर फ्लॉप आहेत..
बधाई दो आणि झुंड चे आकडे तर डिसपॉईंटिंग आहेत...

असेही नाही कि साऊथ चित्रपटांचे कलेक्शन फक्त साऊथ मधून आहे.. हिंदी बेल्ट मधूनही शंभर दोनशे कमवतायत...

सलमान भाई चे चित्रपट दोनशे करतील पण बाकीचे चित्रपट लोक का बघायला जात नसावेत? आणि हेच साऊथ चित्रपट कडे इतके का आकर्षित होत असावेत? मी केजीफ पाहायला सुरुवात केली- बघू शकलो नाही.. काहीच खास नव्हते... व्हायोलन्स तर प्रचंड होता.. पी जी - हा फॅमिली चित्रपट नाहीय...
लोक रिपीट बघत आहेत...

हिंदी इंडस्ट्री ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार महत्वाची इंडस्ट्री आहे... हि इंडस्ट्री यशस्वी होणे फार गरजेचे आहे.. आमिर खान अजूनही हायस्ट बॉलिवूड बॉक्स ऑफिस वर एक क्रमांकावर आहे( दंगल - 2024 cr ) पण बाकीचे काय??

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी. माझा तो प्रतिसाद क्लास वन आयड्यांसाठी नव्हता. जनरल लोकांच्यात चाललेली चर्चा आहे ती. क्लास वन आयड्यांनी आपल्या क्लासशी चर्चा करावी.

आता जर कोणाला मराठी चित्रपटसृष्टीची काय अवस्था आहे त्याची चिंता न वाटता साऊथ ईंडस्ट्रीमध्ये किती मराठी माणसे काम करताहेत यातच धन्यता आणि अभिमान वाटत असेल तर तो विचारसरणीचा फरक झाला. मी तसा विचार करून आनंदी होत नाही ईतकेच Happy

चर्चेपूरती लाईन मारली असली म्हणून ती खऱ्या आयुष्यात येत नसते, हाच तर मुद्दा आहे. साऊथ इंडस्ट्री चांगली चालली म्हणून हिंदी इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांचे काही नुकसान होत नाही, हे चर्चिले जातंय.

साऊथ इंडस्ट्री चांगली चालली म्हणून हिंदी इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांचे काही नुकसान होत नाही >>> छे छे, त्यांचे दुकान चांगले चालले आहे तर कश्याला कोण त्यांच्यावर जळेल. त्यामुळे ईथली निर्मिती ठप्प होत असेल वा ईकडच्या धंद्यावर फरक पडत असेल तर त्यावर चर्चा चालू आहे असे मला वाटते.

इथे मराठी इंडस्ट्रीची चर्चा चालू होती तर बॉलीवूडची इंडस्ट्री टिकायला पाहीजे हे कोणत्या **** ने म्हटलेय ?
नेमकी कशावर चर्चा आहे ? बॉलीवूड इंडस्ट्री टिकली पाहीजे, कलाकारांना काम मिळाले पाहीजे तर इंडस्ट्री टिकेल हे खरं की मराठी इंडस्ट्रीला काम मिळत नाही हे ? कशाचा कशाला संबंध आहे का ?

***** बघून भोकाड पसरायला दुसरा धागा काढायला धावण्याआधी जरा थांबा.
स्टार आयडी असा त्याचा अर्थ आहे.

जिज्ञासा ताई आणि इतर गळेकाढू गँग, हे गोल गोल फिरणे आणि भरकटवणे तुम्हाला गोड वाटते का ?
प्रत्येक प्रतिसादानंतर रिमांईंडर देत राहू.

साऊथ इतकी क्रेझ मराठी प्रेक्षकांना आहे का?
ते लोकं जसे वेड्यासारखे अभिनेत्यांना डोक्यावर घेतात, मंदिरे बांधतात तसे काही आपल्याकडे होते का?
मग जर जनसामान्यांना इतकी अफाट क्रेझ असेल तर तिथले धनवान पैसा मोठया प्रमाणावर गुंतवणारच
त्यामुळे मराठीची तुलना बॉलिवूड किंवा साऊथ इंडस्ट्री शी करणेच चूक आहे

बॉलिवूड देखील मोठी झाली ती मोठ्या प्रमाणावर गॅंगस्टर नी हिरे व्यापारी यांनी गुंतवलेले पैसे होती म्हणून

शेवटी हा धंदा आहे
आणि त्यामुळे जर मराठी लोकं इथं काम मिळवत असतील आणि आपलं नाणे खणखणीत वाजवत असतील तर त्यात वाईट काय

मराठी कधीच साऊथ इतकी मोठी होणार नाही हे उघड आहे त्यामुळे उगाच दिवास्वप्न बघण्यापेक्षा वस्तुस्थिती स्वीकारूया

साऊथ चालली म्हणून आपल्या धंद्यावर का परिणाम होईल ?
>>> चांगला प्रश्न... आता उदाहरण देतो- आता समजा एक मराठी चित्रपट निर्माता आहे- चित्रपटाचे नाव आहे बोलघेवडा...
आता केजीफ चित्रपट जोरात चालू आहे... त्याच्यामुळे तामिळ बिस्ट चा धंदा बसलाय... तुम्ही बोलघेवडा बघायला या म्हणताय पण थेटर वाले त्याच्यासाठी केजीफ चे शो कमी करतील का?
तुमचा चित्रपट पडला- पुढच्या चित्रपटासाठी फायनान्स मिळण्याची शक्यता कमी- पर्यायाने टीम ला काम मिळणार होते ते गेले...

मराठी कधीच साऊथ इतकी मोठी होणार नाही हे उघड आहे त्यामुळे उगाच दिवास्वप्न बघण्यापेक्षा वस्तुस्थिती स्वीकारूया
->>>कन्नडा आपल्यापेक्षा लहान इंडस्ट्री होती... आपला सैराट 100 cr तरी होता.. कन्नडा कडे एकही 100 cr चित्रपट नव्हता...
पण तरी त्यानी केजीफ स्वप्न पाहिले आणि आता करून दाखवले...
दादा कोंडकेंनी बॉलिवूड ला पळता भुई थोडी केली होती...
आजही मराठी नक्कीच मोठी होऊ शकते- गरज आहे एका चांगल्या मास चित्रपटाची...

प्रश्न आपली क्षमता आहे का नसून मराठी प्रेक्षक तेवढा आहे का हा आहे. कंटेट आणि क्वालीटीच्या बाबतीत मराठी खूपच सरस आहे. वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हलला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेही जात आहेत. पण तरीही मराठी प्रेक्षक खूप चोखंदळ आहे आणि उगाच कुठल्याही सिनेमाला डोक्यावर घेऊन नाचत नाही.

दादा कोंडकेंच्या चित्रपटात कलामुल्य किती होते हे एकदा सांगाच

झाले का सुरू परत च्रप्स ? परत तेच ?
साऊथला एकमेकांची भाषा येणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. संस्कृती सारखी आहे. या चार राज्यात नेहमी एकमेकांच्या पिचर्सचे रीमेक बनत असतात. गाजलेले सगळे पिक्चर्स कन्नड, तेलगू, मल्याळम , तमिळ मधे बनतात. कधी कधी डब होतात. त्यामुळे हे चार राज्यांचे मिळून मार्केट आहे. मराठीला महाराष्ट्र हे एकच मार्केट आहे.

काहीही धागे काढायचे, काहीही प्रतिसाद द्यायचे , भोकाड पसरायचं हे धंदे शक्य झालं तर बंद करा च्रप्स. हा धागा चिकवा चा नवा धागा सरांना काढता आला नाही म्हणून काढला असेल तर धन्य आहे. Lol
आणि इथेही सरांनी पहिल्याच पानावर धागा डीरेल केलाय. जे काही या धाग्यावर प्रतिसाद येऊ शकत होते ते पहिल्या पानात येऊन गेल्यावर तुम्ही आणि सरांनी जबरदस्ती धागा चालू ठेवलाय. ज्यांनी धाग्याशी संबंधित प्रतिसाद दिलाय त्यांना धागा डीरेल झाल्यावर तुम्ही म्हणताय विषयाशी संबंधित प्रतिसाद द्या. कसं काय जमतं च्रप्स एव्हढं करून स्वतःच भोकाड पसरायला आणि अंगाशी आल्यावर डिलीट करून पळायला ?
उद्या दुसरा धागा काढा, पण इतका निर्लज्ज आयडी पाहण्यात नाही दुसरा.

च्रप्स दोन्ही पोस्टना अनुमोदन Happy

पहिल्या पोस्टमध्ये थिएटरसोबत ग्राहकवर्गाचाही मुद्दा जोडा. कुठल्याही कुटुंबात महिन्याला वा वर्षाला किती चित्रपट बघायचे हे साधारण कमी जास्त प्रमाणात फिक्स असते. त्यामुळे धंद्यात वाटेकरी आला की ग्राहकवर्गही विभागला जाणारच. साऊथचे पिक्चर हिंदीत डब होऊन मार्केटमध्ये उतरले की स्पर्धा करावी लागणारच. तुमच्या मनात असो वा नसो.

तुमच्या दुसर्‍या पोस्टबद्दल म्हणायचे झाल्यास जर मराठी चित्रपटांनाही या स्पर्धेत उतरायचे असेल तर त्यांना असे चित्रपट बनवावे लागतील की जे डब होऊन ईतर भाषात गेले की तिथेही धंदा करतील. जर हे करू शकलो तर मराठी बोलणारा समजणारा प्रेक्षवर्गच कमी आहे असे रडगाणे गायची वेळ येणार नाही Happy

अवघड आहे, पण अशक्य नाही Happy

नक्कीच शक्य आहे... 25 करोड दुनियादारी हाच माईलस्टोन वाटत असताना सैराट ने 100 केलेच ना...
उद्या 200 करणाराही येईल.. आणि एक दिवस 1000 करणारा...

प्रश्न आपली क्षमता आहे का नसून मराठी प्रेक्षक तेवढा आहे का हा आहे. कंटेट आणि क्वालीटीच्या बाबतीत मराठी खूपच सरस आहे. वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हलला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेही जात आहेत. पण तरीही मराठी प्रेक्षक खूप चोखंदळ आहे आणि उगाच कुठल्याही सिनेमाला डोक्यावर घेऊन नाचत नाही.
>> योग्य मुद्दा... पण हाच मराठी प्रेक्षक पुष्पा, rrr आणि केजीफ ला डोक्यावर घेतोयच की ... हाच तर पॉईंट आहे...

पण हाच मराठी प्रेक्षक पुष्पा, rrr आणि केजीफ ला डोक्यावर घेतोयच की
>>>>

एक्झॅक्टली.
त्यामुळे मराठी प्रेक्षकवर्ग फार क्लास आहे असा खोटा आव आणण्यात अर्थ नाही.
दुनियादारीने त्या काळात बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमावलाच ना. भले कित्येकांनी पुस्तकच छान होते वा नायक थोराड वाटत होते म्हणत नाकं मुरडली तरी अमराठी लोकांनीही तो एंजॉय केला. बॉक्स ऑफिस कलेक्शन काही खोटे बोलत नाही.
आणि चांगले दर्जेदार म्हणावे तरी असे किती चित्रपट मराठीत वर्षाला येतात जे ईतर भाषांत येत नाहीत..

फिनिक्स इथं विषयांतर नको प्लिज- त्या दुसऱ्या धाग्यावर टाईप करा- तो मी उघडत नाहीय.. >>> पहिल्याच पानावर लोकांनी सीरीयस प्रतिसाद दिलेत तेव्हां सरांनी कॉमेडी करून धागा डीरेल केला आहे. तिथे वेळच्या वेळी असे इशारे देत जा च्रप्स. तुमचा धागा तर उडाला आहे. आता आम्ही टाकू तुम्हा दोघांच्या वर. स्क्रीनशॉट्स सहीत.

या धाग्यावर फारएण्ड, सिनेमा सिनेमा आणि शांमा यांचे उत्तम प्रतिसाद आले आहेत. च्रप्स आणि सर यांना काहीही माहिती नसताना उगीचच काहीच्या काही प्रतिसाद (नेहमीप्रमाणे) देत आहेत. याबद्दल कुणाला आक्षेप नसेल तर आम्ही घेऊ समाचार. त्याबद्दल कुणी वात आणला म्हणून गळे काढायला येऊ नका.

मराठी पिचर्स २०० कोटीचा व्यवसाय कसा करेल हे च्रप्स यांनी नीट उलगडून सांगावे.

हिंदी पिकचर्स तिकडे तेलगू, तमिळ मधे डब करून पाहिले तरी तिथल्या पब्लीकने पाहिले नाहीत. ते मराठी का बघतील हे सांगा.

मराठी पिचर्स २०० कोटीचा व्यवसाय कसा करेल हे च्रप्स यांनी नीट उलगडून सांगावे.
हिंदी पिकचर्स तिकडे तेलगू, तमिळ मधे डब करून पाहिले तरी तिथल्या पब्लीकने पाहिले नाहीत. ते मराठी का बघतील हे सांगा.
>> चांगला मुद्दा... असे विषयाला धरून प्रतिसाद आले कि उत्तर द्यायला मजा येते...
मराठी चित्रपट 200 करोड धंदा करायला फक्त मराठी प्रेक्षक पुरेसा आहे... डब करायचीही गरज नाही... सैराट ने 100 केले तसे एखादा 200 करेलच... चित्रपट सैराट पेक्षा भारी पाहिजे ...

तुम्ही कधी विषयाला धरून प्रतिसाद देता ? तुमचे कोणते मुद्दे प्रॅक्टीकल आणि किमान त्या विषयाची माहिती असलेली असतात ? तुमच्याशी चर्चा करायला जाणकाराला मजा वाटेल अशी कोणती व्हॅल्यू अ‍ॅडीशन तुमच्या आणि सरांच्या मुद्द्यात असते ?

मराठी चित्रपट 200 करोड धंदा करायला फक्त मराठी प्रेक्षक पुरेसा आहे... डब करायचीही गरज नाही... सैराट ने 100 केले तसे एखादा 200 करेलच... चित्रपट सैराट पेक्षा भारी पाहिजे ... >>> पुन्हा तेच. साऊथचा सिनेमा एका नाही चार राज्यात चालतो. तिथे हिंदी डब करून सुद्धा कुणी बघत नाही. याची माहिती घेऊन प्रतिसाद द्यायला कधी सुरूवात कराल ? आम्हाला चीड आहे ती याच गोष्टीची. फक्त प्रतिसाद वाढवायला काहीही बरळायचं आणि कुणी बोट ठेवलं की भोकाड पसरायचे धागे काढायचे.

च्रप्स
काल जिज्ञासा ताईंनी झुरळ झटकल्यासारखं च्रप्स आणि माझा काही संबंध नाही असं सांगितलं. यावरून तुमची काय प्रसिद्धी आहे हे आधी लक्षात घ्या. आम्ही चीटांगशी संपर्क करून त्यांना पुन्हा यायला सांगतोय. तुमची असलियत बाहेर आली की या आयडीने केलेले धंदे बघता तोंड लपवायला पण जागा नसेल. तुमचा धागा उडला असला तरी पुन्हा विषयाला धरून प्रतिसाद द्या असा तुमचा प्रतिसाद आला तर इथेच स्क्रीनशॉट टाकीन.

चॉटांग तुमचे घर कोणते हे पण जाणतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लंपन यांच्या गावचे, त्यांचे लहानपणीचे एकाच शाळेतले दोस्त आहात. चीटांग यांच्याकडे डिटेल माहिती आहे. तुम्ही केशवकुल यांना उकसवून भांडणे लावायचे धंदे केले तसेच तुमची माहिती पब्लीक करायचे धंदे आम्ही करू. फिट्टंफाट. भोकाड पसरू नका.

साऊथचा सिनेमा एका नाही चार राज्यात चालतो.
>>> नाही भाऊ- हे अज्ञान दूर करा.. मल्ल्यालम सिनेमा तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र , कर्नाटक मध्ये नाही चालत...
तेच इतर भाषेबद्धल- आपापल्या राज्यात चालतात-
अपवाद बिग बजेट हिरोज- रजनी वगैरे...

बाकी तुमच्या इतर प्रतिसादांना उत्तर देणे म्हणजे विषयांतर होईल- आणि यु नो इट- मला विषयांतर आवडत नाही- धाग्याला धरून चर्चा करू...

Pages