स्त्री-लैंगिकतेचे गूढ

Submitted by हेमंतकुमार on 4 April, 2022 - 00:44

(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शरीरशास्त्रीय ( anatomical) विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्तीबाहेरचे आहेत).
.........................................................................................................

स्त्री-पुरुष समागमाचे दोन हेतू असतात : वैयक्तिक शरीरसुख आणि पुनरुत्पादन. यापैकी फक्त पहिल्याच हेतूचा या लेखात विचार केलेला आहे - त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या दृष्टिकोनातून. संभोगातून स्त्री व पुरुष या दोघांना मिळणारे शरीरसुख हे वेगळ्या पातळीवरचे आहे. पुरुषाच्या बाबतीत ही प्रक्रिया अशी सहजसुलभ आहे :

उद्दीपन >> संभोगक्रिया >> वीर्यपतन >> समाधान.

बहुसंख्य पुरुषांत हा सर्व खेळ काही मिनिटात आटोपतो. स्त्रीसुखाच्या बाबतीत मात्र परिस्थिती इतकी सरळसोट नाही. कित्येक जोडप्यात संभोगांती पुरुष समाधान पावतो तर स्त्रीला मात्र ‘त्या’ सुखाची जाणीवही होत नाही. स्त्रीदेहाच्या बाबतीत लैंगिक ‘कळसबिंदू’ (climax) म्हणजे नक्की काय, त्याचे सुख अनुभवण्यासाठी करावा लागणारा खटाटोप आणि त्याचे यशापयश या सर्वांचा आढावा या लेखात घेतो.

सुरुवातीस निसर्ग व उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहू. एक प्रश्न मनात उद्भवणे अगदी स्वाभाविक आहे. निसर्गाने संभोगातील पुरुषाच्या कळसबिंदूची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे, मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का? याचे एक उत्तर असे आहे : पुरुषाचे वीर्यपतन हे पुनरुत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. याउलट, स्त्रीच्या कळसबिंदूचा पुनरुत्पादनाशी थेट संबंध नाही. त्यामुळे सजीवांच्या उत्पत्ती दरम्यान ती प्रक्रिया फारशी विकसित झाली नसण्याची शक्यता आहे. किंबहुना निव्वळ संभोगातून कळसबिंदूची अनुभूती सर्व प्राण्यांमध्ये फक्त मानवी मादीलाच येते; अन्य प्राण्यांमध्ये तसे पुरावे नाहीत.

पुरुषाचा कळसबिंदू हा अगदी उघड असून त्याचा परिणाम दृश्यमान आहे. परंतु स्त्रीचा बिंदू ही संबंधित स्त्रीनेच ‘आतून’ अनुभवण्याची गोष्ट आहे. या बिंदूच्या क्षणी शरीरात खालील घटना घडतात :

1. अल्पकाळ टिकणारी अत्युच्च आनंदाची अनुभूती. इथे स्त्री क्षणभर जागृतावस्थेतच्या काहीशी पलीकडे जाते. म्हणूनच हे परमसुख ठरते.
2. योनीचा भवताल, गर्भाशय आणि गुदद्वारा जवळील विविध स्नायूंचे तालबद्ध आकुंचन पावणे. यावर स्वनियंत्रण नसते.
3. वरील दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून स्त्रीला तृप्ती आणि समाधान लाभते.

हा कळसबिंदू सरासरी ३० सेकंद टिकतो. पण अपवादात्मक परिस्थितीत तो १ मिनिटाहून जास्त काळ टिकल्याचे काही स्त्रियांत आढळले आहे. ज्यांना या बिंदूचा अनुभव उत्तम येतो त्या स्त्रियांना तो अल्पकाळात संपल्याची रूखरूखही लागते.

वरील वर्णन हे शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण आहे खरे. परंतु वास्तवात काय दिसते ? निरनिराळ्या स्त्रियांच्या या अनुभूतीमध्ये लक्षणीय फरक दिसून येतात. अशा अनुभवांचे वर्गीकरण असे करता येईल :

1. काही स्त्रिया निव्वळ संभोगक्रियेतूनच कळसाला पोचतात पण यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तसेच ज्या स्त्रियांना ही अनुभूती येते ती ‘नेहमीच’ येईल असे नसते. या गटातील मोजक्या स्त्रियांत एकाच क्रियेतून ही अनुभूती अनेक वेळाही आल्याचे आढळले आहे.
2. काही स्त्रियांच्या बाबतीत संभोगाच्या जोडीनेच जननेंद्रियातील शिस्निकेला (clitoris) अन्य प्रकारे चेतवावे लागते (हस्तमैथुन). जननेंद्रियातील हा अवयव भरपूर चेतातंतूयुक्त असतो. त्यामुळे तो सर्वात संवेदनक्षम राहतो. तर काहींच्या बाबतीत शरीराचे अन्य अवयव देखील निकट स्पर्शातून चेतवावे लागतात.
3. पण काही स्त्रियांच्या बाबतीत वरील दोन्ही उपाय जोडीने अमलात आणून सुद्धा कळसबिंदू येतच नाही.

यावरून एक गोष्ट लक्षात येईल. पुरुषाचा कळसबिंदू हा सर्वांसाठी एकसमान आहे. परंतु स्त्रीच्या बिंदूबाबत मात्र खूप अनुभवभिन्नता आहे.

या भिन्नतेतूनच अनेक संशोधकांचे कुतूहल चाळवले गेले. आधुनिक वैद्यकात या महत्त्वाच्या विषयावर गेली शंभर वर्षे संशोधन चालू आहे. त्याचा संक्षिप्त आढावा घेणे रोचक ठरेल. मेरी बोनापार्ट या संशोधिकेने या संदर्भात काही मूलभूत अभ्यास केला, जो पुढील संशोधकांसाठी पथदर्शक ठरला. या विदुषीना लैंगिक क्रियेत खूप गोडी होती परंतु त्यांना निव्वळ संभोगातूनच कळसबिंदू कधीच अनुभवता आला नव्हता. म्हणून त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी अनेक स्त्रियांच्या जननेंद्रियांची बारकाईने तपासणी केली. त्यातून जो विदा हाती आला तो त्यांनी 1924 मध्ये टोपणनावाने प्रसिद्ध केला. या संशोधनाचे सार समजण्यासाठी स्त्रीच्या जननेंद्रियाची काही मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.

जननेंद्रियांचे वरून खाली निरीक्षण केले असता त्यात प्रामुख्याने तीन गोष्टी ठळक दिसतात : सर्वात वर असते ती शिस्निका. त्याच्याखाली काही अंतरावर मूत्रछिद्र आणि त्याच्या खाली योनीमुख. मेरीबाईंना त्यांच्या अभ्यासात एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे या तिन्ही गोष्टींमधील अंतर हे सर्व स्त्रियांमध्ये समान नाही. किंबहुना त्या अंतरात बर्‍यापैकी फरक आढळतो. या अंतरासंदर्भात त्यांनी एक थिअरी मांडली.
stree laingik.jpg

ज्या स्त्रियांमध्ये शिस्नीका ते मूत्रछिद्र हे अंतर ३.५ सेंटीमीटरपेक्षा कमी असते त्या स्त्रियांमध्ये निव्वळ संभोगातून कळसबिंदूस पोचण्याचे प्रमाण चांगल्यापैकी असते. याचे स्पष्टीकरण सोपे आहे. शिस्निका जितकी योनिमुखाच्या जवळ राहते तितके पुरुष लिंगाचे तिच्याशी सहज घर्षण होते. या थिअरीवर पुढे बराच काथ्याकूट झाला. काही अभ्यासांतून तिला पुष्टी देणारे निष्कर्ष मिळाले तर अन्य काही अभ्यासातून तसे मिळाले नाहीत. खुद्द मेरीबाईंनी स्वतःवर तीनदा शस्त्रक्रिया करवून घेऊन ते अंतर कमी करून घेतले. तरीसुद्धा पुढे त्यांना त्याचा अपेक्षित परिणाम जाणवला नाही !

यानंतरच्या ३ दशकांमध्ये अन्य काही संशोधकांनीही या मूळ संशोधनात भर घातली. विविध स्त्रियांमध्ये ते ‘ठराविक अंतर’ कमी किंवा जास्त का असते याचा सखोल अभ्यास झाला. त्यातून एक रोचक गोष्ट पुढे आली. प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःच्या गर्भावस्थेतील जीवनात असते तेव्हा त्या गर्भावर स्त्री आणि पुरुष हार्मोन्स अशा दोन्हींचा प्रभाव पडत असतो. ज्या गर्भांच्या बाबतीत पुरुष हार्मोनचा तुलनात्मक प्रभाव जास्त राहतो त्या स्त्रीत मोठेपणी ते ठराविक अंतर जास्त राहते. याउलट, ज्या गर्भावर स्त्री हार्मोन्सचा प्रभाव तुलनेने खूप राहतो त्या जननेंद्रियामध्ये संबंधित अंतर बऱ्यापैकी कमी राहते. मेरीबाईंची थिअरी पूर्णपणे सिद्ध झाली नाही पण ती निकालातही काढली गेली नाही हे विशेष.

यापुढील कालखंडात अनेक संशोधकांनी अधिक अभ्यास करून आपापली मते मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने मनोचिकित्सक डॉ. Sigmund Freud यांची दखल घ्यावी लागेल. त्यांच्या मते संभोगातून कळसबिंदूस पोचणे हे मुळातच स्त्रीच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून आहे. मुली वयात येत असताना प्रथम त्या मुलांप्रमाणेच शिस्निकेच्या हस्तमैथुनातून हे सुख अनुभवतात. पुढे जर त्यांची मानसिक वाढ उत्तम झाली तरच त्या हे सुख निव्वळ संभोगाद्वारे अनुभवू शकतात. त्यांच्या मते अशा प्रकारचे सुख अनुभवता येणे ही लैंगिकतेतील निरोगी आणि विकसित अवस्था असते. या थिअरीवर बरेच चर्वितचर्वण झाले. त्या विचारांचा एक दुष्परिणामही दिसून आला. आधीच बर्‍याच स्त्रियांना निव्वळ संभोगातून कळसबिंदूचे सुख मिळत नाही. त्यामुळे या माहितीतून अशा स्त्रियांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला. आज शंभर वर्षे उलटून गेल्यानंतर ही थिअरी पूर्णपणे मान्य केली गेलेली नसली तरी अजूनही काही प्रमाणात ती विचाराधीन आहे.

१९६०-७० च्या दशकापर्यंत या संशोधनामध्ये अजून काही भर पडली. तत्कालीन संशोधकांमध्ये डॉ. विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन या जोडप्याचे महत्वाचे योगदान आहे. ते आणि अन्य काही संशोधकांच्या अभ्यासानंतर एका मुद्द्यावर बऱ्यापैकी एकमत झाले. तो म्हणजे, समागमादरम्यान जर स्त्रीची शिस्निका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या चेतविली गेली तरच स्त्रीला कळसबिंदू येतो; अन्यथा नाही.
या द्वयीच्या भरीव संशोधनानंतर या विषयाचे असे प्रारूप तयार झाले :

लैंगिक सुखाची इच्छा >> उत्तेजित अवस्था>> कळसबिंदू >>> समाधान आणि पूर्वावस्था.

स्त्रीला पुरेशी उत्तेजित करण्यासाठी संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व आहे. परंतु त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्या क्रीडांतून उत्तेजना वाढते आणि परिणामी कळसबिंदूस पोहोचण्याची शक्यता वाढते. परंतु या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. इथेही विविध स्त्रियांमध्ये यशापयशाचे वेगवेगळे अनुभव आलेले आढळतात. अलीकडील संशोधनातून वरील परंपरागत प्रारूप हे अतिसुलभीकरण असल्याचे तज्ञांचे मत झाले आहे. ज्या स्त्रियांमध्ये अन्य घटकांमुळे कळसबिंदू येण्याची शक्यता कमीच असते (किंवा नसते), त्यांच्या बाबतीत संभोगपूर्व क्रीडांमुळे दरवेळी यश येईलच असे नाही. अशा क्रीडांसाठी द्यावा लागणारा बराच वेळ हा देखील महत्त्वाचा घटक आहे. हे सर्वच जोडप्यांना शक्य होत नाही. त्यामुळे या क्रीडा म्हणजे कळसबिंदूस पोहोचण्याचा खात्रीशीर उपाय म्हणता येत नाही.

इथपर्यंतच्या संशोधनामध्ये मुख्यत्वे स्त्रियांच्या शारीरिक तपासणीवर भर दिला गेला होता. 1980 नंतर मानवी शरीराचा आतून सखोल अभ्यास करण्यासाठी विविध वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाली. सुरुवातीस अल्ट्रासाउंड आणि पुढे एमआरआय स्कॅन यांचा यापुढील संशोधनात चांगला उपयोग झाला. ज्या स्त्रियांना निव्वळ संभोगातून हे शरीरसुख मिळत होते त्यांच्या योनिमार्गाचा बारकाईने अभ्यास झाला. त्यातून योनीमार्गामधील एका अतिसंवेदनक्षम बिंदूची कल्पना मांडली गेली. या बिंदूला G असे नाव देण्यात आले. यापुढील संशोधनात मात्र अशा विशिष्ट बिंदूचे तिथले अस्तित्व थेट सिद्ध करता आलेले नाही. काहींनी असे मत व्यक्त केले आहे की हा बिंदू म्हणजे वेगळे असे काही नसून ते शिस्निकेचेच एक विस्तारित मूळ असावे.

संभोगादरम्यानचे स्त्री-पुरुषांचे स्थान हाही एक कुतूहलाचा विषय आहे. बहुसंख्य जोडप्यांमध्ये स्त्री खाली आणि पुरुष वर ही पद्धत वापरली जाते. या प्रकारे ज्या स्त्रियांना कळसबिंदू येत नाही अशांच्या बाबतीत वेगळे प्रयोग करून पाहण्यात आले आहेत. परंपरागत पद्धतीच्या बरोबर उलट पद्धत (म्हणजे स्त्री वर आणि पुरुष खाली) आचरल्यास काही जोडप्यांना या बाबतीत यश येते. या उलट प्रकारच्या पद्धतीत शिस्निकेचे घर्षण तुलनेने सुलभ होते. अर्थात याही मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. त्यात वैयक्तिक कौशल्यानुसार अनुभवभिन्नता राहते.

सरतेशेवटी एक रंजक मुद्दा. काही स्त्रियांमध्ये त्या झोपेत असताना सुद्धा त्यांना कळसबिंदूचा अनुभव आलेला आहे. या स्थितीत त्या नक्की कुठल्या प्रकारे चेतविल्या गेल्या हे अजून स्पष्ट झालेले नाही.
स्त्रीचे शरीरसुख या विषयावर एक शतकाहून अधिक काळ संशोधन होऊनही आज त्या विषयाचे काही कंगोरे धूसरच आहेत; त्यावरील गूढतेचे वलय अद्यापही कायम आहे.

सामाजिक दृष्टीकोन
परिपूर्ण लैंगिक ज्ञान हा शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात समाजातील विविध स्तरांचे निरीक्षण केले असता वेगवेगळे अनुभव येतात. एकूणच स्त्री-लैंगिकता हा विषय अजूनही काहीसा निषिद्ध मानला जातो. त्यावर खुली चर्चा करणे शिष्टसंमत नसते; बरेचदा दबक्या आवाजातच यावर बोलणे होते. अलीकडे विविध वृत्तमाध्यमे आणि दृश्यपटांमधून या विषयाची चांगली हाताळणी केलेली दिसते. २०१८च्या ‘लस्ट स्टोरीज’ या हिंदी चित्रपटातील शेवटची कथा हे या संदर्भात पटकन आठवणारे एक उदाहरण (https://en.wikipedia.org/wiki/Lust_Stories). कामक्रीडेदरम्यान पुरुषाने त्याचा कार्यभार उरकला तरीही स्त्रीच्या शरीरसुखाला गृहीत धरता येणार नाही, हा मुद्दा त्यात अधोरेखित झाला आहे. ज्या स्त्रिया ( व त्यांचे जोडीदार) अशा साहित्यांत रस घेतात त्यांच्या माहितीत यामुळे नक्कीच भर पडते आणि त्याचा त्यांना वैयक्तिक लैंगिक आयुष्यात फायदा होतो.

मात्र समाजाच्या काही स्तरांमध्ये हा विषय पूर्णपणे निषिद्ध आहे. किंबहुना समागम म्हणजे पुनरुत्पादनासाठी केलेली आवश्यक क्रिया इतकेच त्याचे स्थान मनात असते. पुरेशा लैंगिक शिक्षणाअभावी या स्तरातील स्त्रियांना कळसबिंदूच्या मूलभूत सुखाची जाणीवही करून दिली जात नाही. अशा स्त्रियांच्या बाबतीत एकदा का अपेक्षित पुनरुत्पादन उरकले, की मग हळूहळू त्या क्रियेतील गोडी कमी होऊ लागते. ते स्वाभाविक आहे.

त्या क्रियेतून मिळणारे अत्त्युच्च सुख जर एखाद्या स्त्रीने कधीच अनुभवले नसेल, तर तिच्या दृष्टीने समागम म्हणजे पुरुषी वर्चस्व असलेली आणि आपल्यावर लादलेली गचाळ क्रिया आहे असे मत होऊ शकते. ही भावना अर्थातच सुदृढ मनासाठी मारक आहे. त्यातून लैंगिक जोडीदारांमध्ये विसंवादही होतात. त्यादृष्टीने विविध माध्यमे आणि शिबिरांमधून या नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर जोडप्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. अलीकडे स्त्रियांची मासिक पाळी या विषयावर मुक्त चर्चा सार्वजनिक मंचांवर होताना दिसतात. तद्वतच स्त्रीच्या या अत्युच्च सुखाबाबतही पुरेशी जागृती होणे आवश्यक आहे.
.........................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहीला प्रश्न हा -
स्त्री ला मानसिक/वैचारीक दृष्ट्या मीलन झाल्याशिवाय ऑर्गॅझमचा अनुभव येउ शकतो का. व्यक्ती तितक्या प्रकृती असतीलही. म्हणुनच प्रश्न पडला आहे.
दुसरा हा की राणीकडे ३ संधी आहेत, पहील्या वेळी राणी अत्यंत विमनस्क आणि नाईलाजाने ते वास्तव स्वीकारताना दाखवलेली एका अनुभवांती आमूलाग्र बदलेल का?
अर्थात सिनेमा प्रगल्भतेने हाताळला आहे. दिग्दर्शक अमोल पालेकर म्हणजे दर्ज्याचा प्रश्नच नाही.

प्रेम असल्या शिवाय संभोगाचा सर्वोच्य क्षण दोघे ही कधीच अनुभवू शकत नाहीत.
एकतरभी प्रेम असेल तर एकच पार्टनर सुख अनुभवले पण साथ न मिळाल्या मुळे सर्वोच्य क्षण अनुभवू शकणार नाही.
हे सत्य आहे.
खुप लोकांच्या पूर्ण आयुष्यात सर्वोच्य क्षण अनुभवायला मिळत नाही.
कारण खरे प्रेम त्या साठी आवशक्या असते ते खूप कपल मध्ये नसते.

सामो +१
बरोबर प्रश्न तर्कशुद्ध आहेत.
मला पडलेला अजून एक प्रश्न.
राणी आधी जवळपास पंधरा मिनिटे त्या सर्व सुखाचे वर्णन करते. नंतर राजाशी बोलताना शेवटी मात्र, "तेव्हाही माझा तोल गेला नव्हता" असे का म्हणते ते कळले नाही .

आता ती एकूण तीन वेळेस परपुरुषाकडे जाणार आहे तरीसुद्धा राजाच्या चेहऱ्यावर शेवटी हास्य का आले ?

मी अनाहत बघितला नाही पण प्रेमाशिवाय संभोग सुख पुरूषांना मिळू शकतं तर स्त्रीलाही मिळू शकत असेल असं वाटायला लागलं आहे. नाही तर वन नाईट स्टँड वगैरे का झाले असते. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात तसेच सोशल कंडिशनिंग सुद्धा असेल यात, त्याचा अडथळा मन निर्माण करत असेल. जसं आपल्याला एखादी व्यक्ती आवडली नाही की तिचं काहीच आवडत नाही किंवा आवडली की क्षुल्लक गोष्टींचं पण कौतुक वाटतं तसं काहीतरी.

प्रत्येक जण काही sapiosexual नसते म्हणजे बुद्धीमुळे शारिरीक आकर्षण वाटणं. Sexual attraction चे प्रकार असावेत. ज्याला जे आवडतं ते समोरच्या व्यक्तीमधे असणं. मग ते व्यक्ती, स्थान, सामाजिक संस्कार, ताणरहित एकांत , मोकळेपणा व त्या व्यक्तीची मानसिकता ह्यापरत्वे ते बदलत असावे. काही नाती सरळ प्लेटॉनिकही असू शकतात, काही नाती फ्रेन्ड्स विथ बेनेफिट्स तरी दोन्हीचाही आधार लैंगिक आकर्षण असूच शकतो !!

राधिका आपटे, सुरविन चावला यांचा पार्चड (Parched) सिनेमा बघायला सुचवेन. अतिशय गंभीर व विचारप्रवर्तक वाटला होता.

,विवेक हरवून गेलेला राजा >> अच्छा, समजले.

ज्याला जे आवडतं ते समोरच्या व्यक्तीमधे असणं.>> चांगला आणि विचार करण्याजोगा मुद्दा.

पार्चड >> सवडीने पाहण्यात येईल ! यु-ट्युबवर आहे

अस्मिता पार्चड पहाते.
तो तोल न गेल्याचा आपला मुद्दा बरोबर आहे डॉक्टर. तिचा तोल नाही गेला हे पटत नाही.

सामो व कुमार सर Happy
खतरनाक सिनेमा आहे. दोन दिवस डोक्यात रहातो. कुटुंबासोबत बघण्यासारखा नाही. कुणासोबतच बघावा असा नाही. नालायक मुलगा असलेली कर्तृत्ववान विधवा, लग्नाचं स्वप्न बघणारी वेश्या आणि एक नपुंसक पुरूषाची वांझ ठरलेली शोषिता अशा तीन स्त्रियांच्या मैत्रीवर बेतलेली कथा आहे.‌

मी अनाहत बघेन. Happy

भावनांची जवळीक, emotional connect, commitment नसताना माणसाला सेक्स कितपत आवडतो, अशा सेक्स मधून किती सुख मिळते यावर माणसाचे sociosexual orientation ठरते. ज्यांची sociosexuality जास्त असते त्यांना असा सेक्स जास्त पसंत असतो, त्यातून त्यांना जास्त सुख मिळते. इतर असंख्य गोष्टी सारखाच इथेही spectrum असतो.

काही रिसर्च सांगतो की स्त्रियांना casual sex मधून orgasm होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा कमी आहे, पण अशक्य मुळीच नाही.
https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0191886919304106

प्रेमात असलेल्या स्त्रियांचा सेक्सचा अनुभव जास्त छान असतो पण orgasm साठी नातं, प्रेम, वगैरे पाहिजेच असे नाही.
https://www.scientificamerican.com/article/sex-is-better-for-women-in-love/

एका वर्षाच्या काळात कमिटेड नात्यात सेक्स आणि casual sex असे दोन्ही केलेल्या स्त्रियांमधे जास्त sociosexual orientation असलेल्या स्त्रियांना casual sex मध्ये orgasm जास्त मिळाला आणि कमिटेड नात्यात sexual pleasure कमी मिळाले.
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/31584292/

डोक्याला शॉट नको वाटतात >>> +११

खरंय ! म्हणजे मनाची तयारी करून बघावा लागेल तो. अनाहतमध्ये कसे सगळे छान छान व प्रसन्न होते Happy

orgasm होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा कमी आहे, पण अशक्य मुळीच नाही.
>>> हा मुद्दा चांगला आणि रंजक आहे.
इतर शास्त्रीय संदर्भ सवडीने पाहतो.

>>>>>शक्यता पुरुषांपेक्षा कमी आहे
कारण उत्क्रांतीत. मादीला पिलांचा सांभाळ करावा लागत असल्याने ती अधिक चोखंदळ व चिकित्सक असू शकते. कंपॅटिबिलिटी/अमकं हवं, ट्रस्ट म्हणजे विश्वास हवा वगैरे हमी तिला लागू शकत असतील.

प्रेमाबद्दल माहीत नाही, पण संभोग करते वेळी त्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे गरजेचे आहे काय (orgasm साठी)? वन नाईट स्टँड मध्ये प्रेम नसले तरी तात्पुरते आकर्षण असावे. अनाहत पाहिला नाहीये, पण त्यातही हे लागू व्हायला हरकत नाही.

अनाहत>> खुप प्रश्न पडले ला अनुमोदन ..मलाही.
ती एकूण तीन वेळेस परपुरुषाकडे जाणार आहे तरीसुद्धा राजाच्या चेहऱ्यावर शेवटी हास्य का आले ?>>> मला असे वाटले की आपल्या सखी ला जे सुख आपण देऊ शकत नाही त्याची पूर्वी तर कधी तिला जाणीव ही नव्हती पण एकदा तिला ती जाणीव झालिये तर आता ती परिपूर्ण झालिये ह्यात तो राजा समाधानी झालाय. असे काहिसे असावे का?

नक्की नाही सांगता येत !
....
अजून एक सवांतर मुद्दा:

चित्रपटात कुठेतरी राजाचे "नपुसकत्व" असा उल्लेख बहुतेक आला आहे. आज वैज्ञानिकदृष्ट्या तो चुकीचा आहे. अर्थात त्या 'काळात ' सामान्यजनांत असा समज असणे ठीक होते.

नपुसकता आणि निर्बीजत्व (अप्रजननक्षमता) यात आज आपण अजिबात गल्लत करणार नाही.

तसेही त्या राजा राणीचा आठ वर्ष संसार झालेला आहे. याचा अर्थ राजा नपुसक नसून अप्रजननक्षम आहे असे समजता येईल.

तसेही त्या राजा राणीचा आठ वर्ष संसार झालेला आहे. याचा अर्थ राजा नपुसक नसून अप्रजननक्षम आहे असे समजता येईल.> >>> ८ वर्षे संसार झाला हा नंपुसकत्व नसल्याचा पुरावा असू शकत नाही.

पुरावा असू शकत नाही.>>
बरोबर आहे.
पण मग राणीने राजापासून विभक्त व्हायचा निर्णय लग्नानंतर अगदी पहिल्या महिन्यात किंवा वर्षीच का घेतला नाही?

...
तत्कालीन "घटनेनुसार" लग्नानंतर सात वर्षात वारस निर्माण करायला परवानगी आहे. इथे त्यावरही पुन्हा एक वर्ष उलटून गेलेले आहे.
खरे नपुसकत्व असल्यास सात वर्ष तरी थांबायची काय गरज होती?
...
असे बरेच जर.. तर ..लढवता येतील.
असो Happy

खरे नपुसकत्व असल्यास सात वर्ष तरी थांबायची काय गरज होती?>>>> त्यासकट स्वीकार राणीच्या मनात असू शकते. किंवा काही इलाज होउ शकतो ही शक्यता वा अपेक्षा.

त्या काळातील घटनेसाठी आजच्या काळाची फिलोसोफी का वापरली जाते ?
प्राचीन काळातील ग्रन्थ / त्या वेळी प्रचलित असणाऱ्या आयुर्वेदिक थेरपी ह्यानुसार सुद्धा अनेक निकष लावत विविध भाकिते होऊ शकतील.

पण मग राणीने राजापासून विभक्त व्हायचा निर्णय लग्नानंतर अगदी पहिल्या महिन्यात किंवा वर्षीच का घेतला नाही?>> काहीही. कोण विभक्त होउन राणी पद सोडून देइल? लग्नाचे इतर बरेच फायदे बायकांसाठी असतात. राणी पद, आर्थिक सुबत्ता नव्हे श्रीमंतीच, बरं काही येत नसल्याने राजा कायम दबून राहणार. नवरा मुठीत असणार. सुखद जीवन. परत नवरा कायम गिल्ट मध्ये. बरंय की. आणी राजमहालात इतर पब्लिक असतेच. ते राणीच्या इच्छा पूर्ण करु शकते. दास्या, दास इतर सरदार वगैरे. किंवा राजाही स्वतः तिला इतर मार्गाने सुखी करत असेल. पदाचे अधिकार व स्टे टस कोण सुखासुखी सोडेल. वारस नाही तर दत्तक घेता येइल ना. आपण सुखावलो हे राणी नवृयाशी डिस्कसच करेल हे मला फार रंजित वाटते. कथेत ठीक आहे.

अनाहत बघितला.
भावनांन च कल्लोळ आहे दोघांच्या मनात.
त्यांची मानसिक स्थिती नक्की किती गंभीर असेल ह्याचा विचार करूनच अशांत झाले मन.
. उथळ, अविचारी कॉमेंट ह्या सिनेमा मधील कथेवर करणारे .
उथळ विचाराचे ,भावना हिन असलेली यंत्र मानव च असावीत असे काही क्षण तरी वाटले

काहीही.
>>> हा शब्द नाही पटला.
प्रत्येकाला आपापला तर्क सांगण्याची मुभा आहेच.

*आणी राजमहालात इतर पब्लिक असतेच. ते राणीच्या इच्छा पूर्ण करु शकते. >>
याला मी 'काहीही' म्हणू शकतो ना.

तसेही त्या राजा राणीचा आठ वर्ष संसार झालेला आहे. याचा अर्थ राजा नपुसक नसून अप्रजननक्षम आहे असे समजता येईल.>>> कुमार जी तुमची बहुतेक काहितरी गल्लत होतेय. राणी ला खर्या सुखा चा अर्थ च लागलेला नसतो जो पर्यंत ती वियोग करायला जात नाही. म्हणून तिला ८ वर्ष काहीही तक्रार नसते. राजा मित्रा सारखा आहे, आपली काळजी घेतो मग का जायचे दुसर्‍या पुरूषाकडे असा विचार करून ती उद्विग्न असते. तस उल्लेख आहे चित्रपटात.
राजा तिला संततीच नव्हे तर सेक्स सुख ही देऊ शकत नसतो. म्हणुन तर वियोगा हून आलेली ती काही वेगळीच असते आणि तिला जसे काही खजिना गवसतो!
फार डीटेल लिहिले का? तर उडवते!

मला तरी राजाची समस्या निर्बीजत्व अशी वाटली. मी चूक असू शकतो.
अनेक शतके नपुसकता हा शब्द बऱ्याच सैल अर्थाने वापरला जायचा.
आपणा सर्वांच्या मतांबद्दल आदर आहे.

अहो ते काहीही हं श्री लेव्हलचे आहे. हलकेच घ्या.

माझे परोमा सिनेमाचे परीक्षण नक्की वाचा. स्त्री ला फारसे एक्स्प्लोअर करता येउ नये ही काळजी सिस्टिम थ्रूच घेतली जाते. चार बाप्यांचा पर्फॉर्मन्स बघितला परिक्षण केले त्यात कोण आपल्याला नक्की बेस्ट सुखी करतो हे तिला कळेल पण अजूनही सोशल स्टिग्मा मुळे स्त्रियां ना हे मोकळे पणी करता येत नाही. सर्सी लानिस्टर!! पती परमेश्वर वगिअरे खुळचट कल्पना भरवल्या जातात व सर्व पॅट्रार्कि ला स्त्रियांच्या अवेकनिंग ची भीती वाट्ते. चार बापे पूर्ण पणे मिस्फिट पण असू शकतात व तिचे सूख तिसरीकडॅच तिला भेटेल. पण समाज संधी देत नाही. नावे ठेवतो.
परोमा मध्ये पण स्त्रीला खरे सूख मित्रा बरोबर भेटते पण मग संसारातून हकालपट्टी. राजाची राणी स्टेटस खलास. नवरा लगेच वाइट नावेच ठेवतो. नॉट अ‍ॅक्सॅ प्टेबल मॅन.

आणी राजमहालात इतर पब्लिक असतेच. ते राणीच्या इच्छा पूर्ण करु शकते. >>
याला मी 'काहीही' म्हणू शकतो ना.>> म्हणू शकता पण तसा इतिहास आहे. अगदी किंग हॅरोड पासून हे चालत आलेले आहे. मानवत नसेल तर सोडून द्या. ऑर यु कॅन सर्च विकेड हिस्ट्री.

अनाहतमध्ये नियोगानंतर राणीच्या तोंडी मैत्रिणीशी बोलताना संवाद आहे की, पुरुष असा असतो हे तू मला कधी सांगितले का नाहीस?
यावरून कळते की पुरुषसुख तिला कधी मिळालेच नव्हते. राजाबरोबर तिचे जे मैत्रीचे नाते होते फक्त तसेच सगळ्या पती-पत्नीचे असते असा तिचा समज होता.
ती 'तोल गेला नाही' म्हणते म्हणजे 'ते कितीही हवंहवंसं वाटलं तरी राजाबरोबर असलेले नाते जास्त महत्त्वाचे आहे'. हा निर्णय ती किती विचाराने घेते आणि सांभाळू शकते का हे कथेत नाही. पण समाजाची तीच अपेक्षा आहे. अर्थात, अमा म्हणतात त्याप्रमाणे राजा आणि पर्यायाने सत्ता मुठीत राहणे हेपण कारण आहेच.
राजाच्या चेहऱ्यावर शेवटी हास्य आहे ते राणीला मी जे देऊ शकलो नाही ते मिळाले पण ती त्यात अडकून वाहवणार नाही आणि राज्याला वारस मिळेल. त्यासाठीच तर हे चालू आहे. आणि राणीला कारण मिळू नये म्हणून ३ चे लिमिट. पुरुषसत्ताक समाजात राणीला मूल होउदे अथवा नाही राजाला अनेक बायका करण्यावर आणि अंगवस्त्रे बाळगण्यावर बंधने नाहीत. तो वेगळा विषय खरं.

Pages