स्त्री-लैंगिकतेचे गूढ

Submitted by कुमार१ on 4 April, 2022 - 00:44

(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शरीरशास्त्रीय ( anatomical) विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्तीबाहेरचे आहेत).
.........................................................................................................

स्त्री-पुरुष समागमाचे दोन हेतू असतात : वैयक्तिक शरीरसुख आणि पुनरुत्पादन. यापैकी फक्त पहिल्याच हेतूचा या लेखात विचार केलेला आहे - त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या दृष्टिकोनातून. संभोगातून स्त्री व पुरुष या दोघांना मिळणारे शरीरसुख हे वेगळ्या पातळीवरचे आहे. पुरुषाच्या बाबतीत ही प्रक्रिया अशी सहजसुलभ आहे :

उद्दीपन >> संभोगक्रिया >> वीर्यपतन >> समाधान.

बहुसंख्य पुरुषांत हा सर्व खेळ काही मिनिटात आटोपतो. स्त्रीसुखाच्या बाबतीत मात्र परिस्थिती इतकी सरळसोट नाही. कित्येक जोडप्यात संभोगांती पुरुष समाधान पावतो तर स्त्रीला मात्र ‘त्या’ सुखाची जाणीवही होत नाही. स्त्रीदेहाच्या बाबतीत लैंगिक ‘कळसबिंदू’ (climax) म्हणजे नक्की काय, त्याचे सुख अनुभवण्यासाठी करावा लागणारा खटाटोप आणि त्याचे यशापयश या सर्वांचा आढावा या लेखात घेतो.

सुरुवातीस निसर्ग व उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहू. एक प्रश्न मनात उद्भवणे अगदी स्वाभाविक आहे. निसर्गाने संभोगातील पुरुषाच्या कळसबिंदूची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे, मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का? याचे एक उत्तर असे आहे : पुरुषाचे वीर्यपतन हे पुनरुत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. याउलट, स्त्रीच्या कळसबिंदूचा पुनरुत्पादनाशी थेट संबंध नाही. त्यामुळे सजीवांच्या उत्पत्ती दरम्यान ती प्रक्रिया फारशी विकसित झाली नसण्याची शक्यता आहे. किंबहुना निव्वळ संभोगातून कळसबिंदूची अनुभूती सर्व प्राण्यांमध्ये फक्त मानवी मादीलाच येते; अन्य प्राण्यांमध्ये तसे पुरावे नाहीत.

पुरुषाचा कळसबिंदू हा अगदी उघड असून त्याचा परिणाम दृश्यमान आहे. परंतु स्त्रीचा बिंदू ही संबंधित स्त्रीनेच ‘आतून’ अनुभवण्याची गोष्ट आहे. या बिंदूच्या क्षणी शरीरात खालील घटना घडतात :

1. अल्पकाळ टिकणारी अत्युच्च आनंदाची अनुभूती. इथे स्त्री क्षणभर जागृतावस्थेतच्या काहीशी पलीकडे जाते. म्हणूनच हे परमसुख ठरते.
2. योनीचा भवताल, गर्भाशय आणि गुदद्वारा जवळील विविध स्नायूंचे तालबद्ध आकुंचन पावणे. यावर स्वनियंत्रण नसते.
3. वरील दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून स्त्रीला तृप्ती आणि समाधान लाभते.

हा कळसबिंदू सरासरी ३० सेकंद टिकतो. पण अपवादात्मक परिस्थितीत तो १ मिनिटाहून जास्त काळ टिकल्याचे काही स्त्रियांत आढळले आहे. ज्यांना या बिंदूचा अनुभव उत्तम येतो त्या स्त्रियांना तो अल्पकाळात संपल्याची रूखरूखही लागते.

वरील वर्णन हे शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण आहे खरे. परंतु वास्तवात काय दिसते ? निरनिराळ्या स्त्रियांच्या या अनुभूतीमध्ये लक्षणीय फरक दिसून येतात. अशा अनुभवांचे वर्गीकरण असे करता येईल :

1. काही स्त्रिया निव्वळ संभोगक्रियेतूनच कळसाला पोचतात पण यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तसेच ज्या स्त्रियांना ही अनुभूती येते ती ‘नेहमीच’ येईल असे नसते. या गटातील मोजक्या स्त्रियांत एकाच क्रियेतून ही अनुभूती अनेक वेळाही आल्याचे आढळले आहे.
2. काही स्त्रियांच्या बाबतीत संभोगाच्या जोडीनेच जननेंद्रियातील शिस्निकेला (clitoris) अन्य प्रकारे चेतवावे लागते (हस्तमैथुन). जननेंद्रियातील हा अवयव भरपूर चेतातंतूयुक्त असतो. त्यामुळे तो सर्वात संवेदनक्षम राहतो. तर काहींच्या बाबतीत शरीराचे अन्य अवयव देखील निकट स्पर्शातून चेतवावे लागतात.
3. पण काही स्त्रियांच्या बाबतीत वरील दोन्ही उपाय जोडीने अमलात आणून सुद्धा कळसबिंदू येतच नाही.

यावरून एक गोष्ट लक्षात येईल. पुरुषाचा कळसबिंदू हा सर्वांसाठी एकसमान आहे. परंतु स्त्रीच्या बिंदूबाबत मात्र खूप अनुभवभिन्नता आहे.

या भिन्नतेतूनच अनेक संशोधकांचे कुतूहल चाळवले गेले. आधुनिक वैद्यकात या महत्त्वाच्या विषयावर गेली शंभर वर्षे संशोधन चालू आहे. त्याचा संक्षिप्त आढावा घेणे रोचक ठरेल. मेरी बोनापार्ट या संशोधिकेने या संदर्भात काही मूलभूत अभ्यास केला, जो पुढील संशोधकांसाठी पथदर्शक ठरला. या विदुषीना लैंगिक क्रियेत खूप गोडी होती परंतु त्यांना निव्वळ संभोगातूनच कळसबिंदू कधीच अनुभवता आला नव्हता. म्हणून त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी अनेक स्त्रियांच्या जननेंद्रियांची बारकाईने तपासणी केली. त्यातून जो विदा हाती आला तो त्यांनी 1924 मध्ये टोपणनावाने प्रसिद्ध केला. या संशोधनाचे सार समजण्यासाठी स्त्रीच्या जननेंद्रियाची काही मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.

जननेंद्रियांचे वरून खाली निरीक्षण केले असता त्यात प्रामुख्याने तीन गोष्टी ठळक दिसतात : सर्वात वर असते ती शिस्निका. त्याच्याखाली काही अंतरावर मूत्रछिद्र आणि त्याच्या खाली योनीमुख. मेरीबाईंना त्यांच्या अभ्यासात एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे या तिन्ही गोष्टींमधील अंतर हे सर्व स्त्रियांमध्ये समान नाही. किंबहुना त्या अंतरात बर्‍यापैकी फरक आढळतो. या अंतरासंदर्भात त्यांनी एक थिअरी मांडली.
stree laingik.jpg

ज्या स्त्रियांमध्ये शिस्नीका ते मूत्रछिद्र हे अंतर ३.५ सेंटीमीटरपेक्षा कमी असते त्या स्त्रियांमध्ये निव्वळ संभोगातून कळसबिंदूस पोचण्याचे प्रमाण चांगल्यापैकी असते. याचे स्पष्टीकरण सोपे आहे. शिस्निका जितकी योनिमुखाच्या जवळ राहते तितके पुरुष लिंगाचे तिच्याशी सहज घर्षण होते. या थिअरीवर पुढे बराच काथ्याकूट झाला. काही अभ्यासांतून तिला पुष्टी देणारे निष्कर्ष मिळाले तर अन्य काही अभ्यासातून तसे मिळाले नाहीत. खुद्द मेरीबाईंनी स्वतःवर तीनदा शस्त्रक्रिया करवून घेऊन ते अंतर कमी करून घेतले. तरीसुद्धा पुढे त्यांना त्याचा अपेक्षित परिणाम जाणवला नाही !

यानंतरच्या ३ दशकांमध्ये अन्य काही संशोधकांनीही या मूळ संशोधनात भर घातली. विविध स्त्रियांमध्ये ते ‘ठराविक अंतर’ कमी किंवा जास्त का असते याचा सखोल अभ्यास झाला. त्यातून एक रोचक गोष्ट पुढे आली. प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःच्या गर्भावस्थेतील जीवनात असते तेव्हा त्या गर्भावर स्त्री आणि पुरुष हार्मोन्स अशा दोन्हींचा प्रभाव पडत असतो. ज्या गर्भांच्या बाबतीत पुरुष हार्मोनचा तुलनात्मक प्रभाव जास्त राहतो त्या स्त्रीत मोठेपणी ते ठराविक अंतर जास्त राहते. याउलट, ज्या गर्भावर स्त्री हार्मोन्सचा प्रभाव तुलनेने खूप राहतो त्या जननेंद्रियामध्ये संबंधित अंतर बऱ्यापैकी कमी राहते. मेरीबाईंची थिअरी पूर्णपणे सिद्ध झाली नाही पण ती निकालातही काढली गेली नाही हे विशेष.

यापुढील कालखंडात अनेक संशोधकांनी अधिक अभ्यास करून आपापली मते मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने मनोचिकित्सक डॉ. Sigmund Freud यांची दखल घ्यावी लागेल. त्यांच्या मते संभोगातून कळसबिंदूस पोचणे हे मुळातच स्त्रीच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून आहे. मुली वयात येत असताना प्रथम त्या मुलांप्रमाणेच शिस्निकेच्या हस्तमैथुनातून हे सुख अनुभवतात. पुढे जर त्यांची मानसिक वाढ उत्तम झाली तरच त्या हे सुख निव्वळ संभोगाद्वारे अनुभवू शकतात. त्यांच्या मते अशा प्रकारचे सुख अनुभवता येणे ही लैंगिकतेतील निरोगी आणि विकसित अवस्था असते. या थिअरीवर बरेच चर्वितचर्वण झाले. त्या विचारांचा एक दुष्परिणामही दिसून आला. आधीच बर्‍याच स्त्रियांना निव्वळ संभोगातून कळसबिंदूचे सुख मिळत नाही. त्यामुळे या माहितीतून अशा स्त्रियांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला. आज शंभर वर्षे उलटून गेल्यानंतर ही थिअरी पूर्णपणे मान्य केली गेलेली नसली तरी अजूनही काही प्रमाणात ती विचाराधीन आहे.

१९६०-७० च्या दशकापर्यंत या संशोधनामध्ये अजून काही भर पडली. तत्कालीन संशोधकांमध्ये डॉ. विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन या जोडप्याचे महत्वाचे योगदान आहे. ते आणि अन्य काही संशोधकांच्या अभ्यासानंतर एका मुद्द्यावर बऱ्यापैकी एकमत झाले. तो म्हणजे, समागमादरम्यान जर स्त्रीची शिस्निका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या चेतविली गेली तरच स्त्रीला कळसबिंदू येतो; अन्यथा नाही.
या द्वयीच्या भरीव संशोधनानंतर या विषयाचे असे प्रारूप तयार झाले :

लैंगिक सुखाची इच्छा >> उत्तेजित अवस्था>> कळसबिंदू >>> समाधान आणि पूर्वावस्था.

स्त्रीला पुरेशी उत्तेजित करण्यासाठी संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व आहे. परंतु त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्या क्रीडांतून उत्तेजना वाढते आणि परिणामी कळसबिंदूस पोहोचण्याची शक्यता वाढते. परंतु या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. इथेही विविध स्त्रियांमध्ये यशापयशाचे वेगवेगळे अनुभव आलेले आढळतात. अलीकडील संशोधनातून वरील परंपरागत प्रारूप हे अतिसुलभीकरण असल्याचे तज्ञांचे मत झाले आहे. ज्या स्त्रियांमध्ये अन्य घटकांमुळे कळसबिंदू येण्याची शक्यता कमीच असते (किंवा नसते), त्यांच्या बाबतीत संभोगपूर्व क्रीडांमुळे दरवेळी यश येईलच असे नाही. अशा क्रीडांसाठी द्यावा लागणारा बराच वेळ हा देखील महत्त्वाचा घटक आहे. हे सर्वच जोडप्यांना शक्य होत नाही. त्यामुळे या क्रीडा म्हणजे कळसबिंदूस पोहोचण्याचा खात्रीशीर उपाय म्हणता येत नाही.

इथपर्यंतच्या संशोधनामध्ये मुख्यत्वे स्त्रियांच्या शारीरिक तपासणीवर भर दिला गेला होता. 1980 नंतर मानवी शरीराचा आतून सखोल अभ्यास करण्यासाठी विविध वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाली. सुरुवातीस अल्ट्रासाउंड आणि पुढे एमआरआय स्कॅन यांचा यापुढील संशोधनात चांगला उपयोग झाला. ज्या स्त्रियांना निव्वळ संभोगातून हे शरीरसुख मिळत होते त्यांच्या योनिमार्गाचा बारकाईने अभ्यास झाला. त्यातून योनीमार्गामधील एका अतिसंवेदनक्षम बिंदूची कल्पना मांडली गेली. या बिंदूला G असे नाव देण्यात आले. यापुढील संशोधनात मात्र अशा विशिष्ट बिंदूचे तिथले अस्तित्व थेट सिद्ध करता आलेले नाही. काहींनी असे मत व्यक्त केले आहे की हा बिंदू म्हणजे वेगळे असे काही नसून ते शिस्निकेचेच एक विस्तारित मूळ असावे.

संभोगादरम्यानचे स्त्री-पुरुषांचे स्थान हाही एक कुतूहलाचा विषय आहे. बहुसंख्य जोडप्यांमध्ये स्त्री खाली आणि पुरुष वर ही पद्धत वापरली जाते. या प्रकारे ज्या स्त्रियांना कळसबिंदू येत नाही अशांच्या बाबतीत वेगळे प्रयोग करून पाहण्यात आले आहेत. परंपरागत पद्धतीच्या बरोबर उलट पद्धत (म्हणजे स्त्री वर आणि पुरुष खाली) आचरल्यास काही जोडप्यांना या बाबतीत यश येते. या उलट प्रकारच्या पद्धतीत शिस्निकेचे घर्षण तुलनेने सुलभ होते. अर्थात याही मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. त्यात वैयक्तिक कौशल्यानुसार अनुभवभिन्नता राहते.

सरतेशेवटी एक रंजक मुद्दा. काही स्त्रियांमध्ये त्या झोपेत असताना सुद्धा त्यांना कळसबिंदूचा अनुभव आलेला आहे. या स्थितीत त्या नक्की कुठल्या प्रकारे चेतविल्या गेल्या हे अजून स्पष्ट झालेले नाही.
स्त्रीचे शरीरसुख या विषयावर एक शतकाहून अधिक काळ संशोधन होऊनही आज त्या विषयाचे काही कंगोरे धूसरच आहेत; त्यावरील गूढतेचे वलय अद्यापही कायम आहे.

सामाजिक दृष्टीकोन
परिपूर्ण लैंगिक ज्ञान हा शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात समाजातील विविध स्तरांचे निरीक्षण केले असता वेगवेगळे अनुभव येतात. एकूणच स्त्री-लैंगिकता हा विषय अजूनही काहीसा निषिद्ध मानला जातो. त्यावर खुली चर्चा करणे शिष्टसंमत नसते; बरेचदा दबक्या आवाजातच यावर बोलणे होते. अलीकडे विविध वृत्तमाध्यमे आणि दृश्यपटांमधून या विषयाची चांगली हाताळणी केलेली दिसते. २०१८च्या ‘लस्ट स्टोरीज’ या हिंदी चित्रपटातील शेवटची कथा हे या संदर्भात पटकन आठवणारे एक उदाहरण (https://en.wikipedia.org/wiki/Lust_Stories). कामक्रीडेदरम्यान पुरुषाने त्याचा कार्यभार उरकला तरीही स्त्रीच्या शरीरसुखाला गृहीत धरता येणार नाही, हा मुद्दा त्यात अधोरेखित झाला आहे. ज्या स्त्रिया ( व त्यांचे जोडीदार) अशा साहित्यांत रस घेतात त्यांच्या माहितीत यामुळे नक्कीच भर पडते आणि त्याचा त्यांना वैयक्तिक लैंगिक आयुष्यात फायदा होतो.

मात्र समाजाच्या काही स्तरांमध्ये हा विषय पूर्णपणे निषिद्ध आहे. किंबहुना समागम म्हणजे पुनरुत्पादनासाठी केलेली आवश्यक क्रिया इतकेच त्याचे स्थान मनात असते. पुरेशा लैंगिक शिक्षणाअभावी या स्तरातील स्त्रियांना कळसबिंदूच्या मूलभूत सुखाची जाणीवही करून दिली जात नाही. अशा स्त्रियांच्या बाबतीत एकदा का अपेक्षित पुनरुत्पादन उरकले, की मग हळूहळू त्या क्रियेतील गोडी कमी होऊ लागते. ते स्वाभाविक आहे.

त्या क्रियेतून मिळणारे अत्त्युच्च सुख जर एखाद्या स्त्रीने कधीच अनुभवले नसेल, तर तिच्या दृष्टीने समागम म्हणजे पुरुषी वर्चस्व असलेली आणि आपल्यावर लादलेली गचाळ क्रिया आहे असे मत होऊ शकते. ही भावना अर्थातच सुदृढ मनासाठी मारक आहे. त्यातून लैंगिक जोडीदारांमध्ये विसंवादही होतात. त्यादृष्टीने विविध माध्यमे आणि शिबिरांमधून या नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर जोडप्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. अलीकडे स्त्रियांची मासिक पाळी या विषयावर मुक्त चर्चा सार्वजनिक मंचांवर होताना दिसतात. तद्वतच स्त्रीच्या या अत्युच्च सुखाबाबतही पुरेशी जागृती होणे आवश्यक आहे.
.........................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>डॉक्टर : तुला गिऱ्हाईकांशी संबंधातून कळसबिंदूचे सुख मिळते का?

वेश्या : मला त्या संबंधातून पैसा मिळतो आणि पैसा हेच माझ्यासाठी सुख आहे !>>>>>>>
पण यातून डॉक्टरांनी संशोधन हेतुने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष मिळत नाही.

रजनीश ह्यांनी योग्य आणि सामान्य लोकांस समजेल अशा भाषेत सांगितले आहे.
संभोग मधून संतुष्टी म्हणजेच चरण सीमा.
त्यालाच बोलले जाईल.
की संभोग केल्यानंतर इतकी सांतुष्टी मिळेल की काही तास काही दिवस तुम्हाला सेक्स ची ईच्छा होणार नाही.
हे सशक्त ,कोणतीच विकृती नसणाऱ्या स्त्री पुरुषाला लागू आहे.
अशक्त,विकृत स्त्री पुरुषांना नाही.
आपण आपल्या आवडीचे जेवण केल्या नंतर काही तास भूक लागत नाही .कारण आपण संतुष्ट झालेलो असतो.
तसेच संभोग आणि सेक्स चे पण आहे
वेशे कडे जाणारे पुरुष फक्त संभोग करतात पण संभोगतून जे स्वर्ग सुख मिळते त्याची अनुभती त्यांना कधीच मिळत नाही.
स्त्री आणि पुरुष जे संभोग क्रियेत सहभागी असतात त्यांच्यात खरे प्रेम असणे खूप गरजेचे असते.
जिथे संभोग करतात ती जागा अतिशय सुरक्षित असली पाहिजे
कोणत्याही पश्चिमात्य कथित संशोधक पेक्षा रजनीश ह्यांचा ह्या विषयावर दांडगा अभ्यास आहे.
कामसूत्र सारखे ग्रंथ भारतात खूप वर्ष पूर्वी लिहल गेले आहेत.
त्या मध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहेत.
अमेझॉन वरील वेब सीरिज ज्ञान देतात त्या बघा हे खरेच खूप हास्यास्पद आहे.

* पण यातून डॉक्टरांनी संशोधन हेतुने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष मिळत नाही.

ठीक. निष्कर्ष अप्रत्यक्षरित्या काढावा लागेल.
त्या संशोधनातील टप्पे असे होते :

गट १ : आवडीच्या जोडीदाराबरोबर संभोग करणे
गट २ : संशोधकांनी नेमून दिलेल्या जोडीने संभोग करणे. यात एकमेकाची ओळख किंवा आवड हा भाग अजिबात येत नाही.
गट ३ : वेश्यांचे अनुभव.

आता वरील ३ प्रकारांमधून कळसबिंदू संबंधी साधारण खालील उत्तरे संभाव्य असतात :

गट १ : बऱ्याच वेळा स्त्रीबिंदूचे सुख मिळते ( इथे ठरवून प्रयत्न केला जातो)
२ : ते मिळणे अवघड जाते पण काही जोड्यांमध्ये मिळू शकते.
गट ३ : इथे स्त्री समोरील पुरुष फक्त ‘गिर्‍हाईक’ आहे. त्यामुळे इथे या जोडीतील कुणाकडूनच स्त्री बिंदूस पोहोचण्यासाठी प्रयत्न केला जात नसावा.

एकदम खरे सांगायचे झाले तर dr कुमार तुमच्या कडे ह्या विषयातील कोणतेच ठाम उत्तर नाही.
हे तुमचे वाक्य
गट ३ : इथे स्त्री समोरील पुरुष फक्त ‘गिर्‍हाईक’ आहे. त्यामुळे इथे या जोडीतील कुणाकडूनच स्त्री बिंदूस पोहोचण्यासाठी प्रयत्न केला जात नसावा.

हे वाक्य म्हणजे अज्ञान पणाच कळस आहे.
दोन जोडीदार मधील एक जोडीदार लं पार्टनर बरोबर सेक्स करण्याची बिलकुल इच्छा नसेल तिरस्कार असेल तर किती ही कसले ही प्रयत्न केले तरी तो जोडीदार sexually उत्तेजीत होणार नाही.
उलट त्याला उत्तेजीत करण्याचा जितका प्रयत्न कराल तितका त्याचा तिरस्कार वाढत जाईल.

हेमंत सर, कुमार सरांची मते पटत नसतील तर तसे म्हणण्याचे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. (का पटत नाही याची कारणे देणे न देणे तुमच्यावर). पण असा अपमान नको करायला मसे मला मनापासून वाटते. ते आपला वेळ घालवून छान माहिती देत आहेत. ते स्वतः डॉक्टर आहेत. ते देताहेत ती माहिती योग्य आहे. सूज्ञास अधिक सांगणे न लगे. कृपया आपला प्रतिसाद थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मांडावा ही नम्र विनंती. आपणास दुखावण्याचा हेतू नसून सरांचा मान राखला जावा या हेतूने केलेली सूचना आहे.

शांत माणूस
Dr कुमार ह्यांचा अपमान करण्याचा कोणताच हेतू नाही
ते सामान्य व्यक्ती नाहीत dr आहेत
त्यांच्या लेखात एकाकी पना आला नाही पाहिजे
1) सेक्स आणि पुनरुत्पादन ह्यांचा अतूट संबंध

आहे.
तो नाकारून सेक्शुअल भावनेवर लिहणे हेच अशास्त्रीय आहे.
२) स्त्री एका वेळेस एकच बीज निर्माण करू ३शकते पण पुरुष असंख्य शुक्राणू एका वेळेस निर्माण करू शकतात
ह्याला नैसर्गिक कारण आहे त्याच्या कडे दुर्लक्ष करून फक्त सेक्शुअल भावनेवर बोलणं चूक च.
३) स्त्री सेक्स मध्ये भावनिक गुंतते पुरुष गुंतत नाहीत हे टाळ्या घेणारे अशास्त्रीय वाक्य आहे.
कारण स्त्री एकदाच गर्भ वती राहते पुरुष अनेक स्त्रियांना गर्भ वती करू शकतात.
एकच स्त्री ला एकच वेळेस अनेक पुरुष अनेक वेळा गर्भ वती करू शकत नाही.
पण एक पुरुष अनेक स्त्रिया ना एकच वेळी गर्भ वती करू शकतो.
म्हणून पुरुष भावनिक guntat नाही.
नैसर्गिक आहे हे .
ह्या वर काहीच मत नाही
पुनरुत्पादन योग्य रीती नी झाले पाहिजे म्हणून ती नैसगिर्क प्रेरणा आहे.
हे आणि असे अनंत शास्त्रीय विषय सोडून उथळ पने सेक्स वर लिहणे मला तरी पटत नाही

उत्तम लेख आणि प्रतिसाद. एका अचर्चित विषयावर चर्चा घडवुन आणल्याबद्दल कुमारसरांचे अभिनंदन.
हेमंतसरही या विषयाची दुसरी बाजु मांडत आहेत त्यांचेही अभिनंदन.
ही चर्चा वैयक्तिक टीकाटिपण्णी न होता पुढे जावी हीच इच्छा.

हेमंत सर,

1) सेक्स आणि पुनरुत्पादन ह्यांचा अतूट संबंध

आहे.
तो नाकारून सेक्शुअल भावनेवर लिहणे हेच अशास्त्रीय आहे. >>> आनंदासाठी लैंगिक जीवन नसते हे कशाच्या आधारावर म्हणत आहात ? पशू आणि मनुष्य यांच्यात कोणत्या गोष्टीचा फरक आहे हे तर मान्य असेल ना ? याबाबतीत तुमचा काय अभ्यास आहे त्याचा संदर्भ दिल्यास वादावर पडदा पडेल असे मला वाटते. वैयक्तिक मतं प्रत्येकाची असतात. त्याला आधार असायला हवा.

मनुष्यप्राण्यात कामजीवन आणि आनंद यांचा संबंध नसता तर ..

आती का खंडाला ऐवजी चल बच्चे पैदा करने को
किंवा
कुठं कुठं जायाचं हनीमूनला ऐवजी
कुठं जाऊयात पुरूत्पादनाला

अशी गाणी चित्रपटात असती.
मूल नको फक्त लैंगिक आनंदासाठी एकत्र राहणारी जोडपी आहेत. ज्यांना पुढची पिढी नकोच आहे अशी बरीच जोडपी आहेत.

मी काय आपल्यासारखा हुषार नाही. आधी माझा वडापावचा धंदा होता. पण तो काही लोकांनी बंद पाडला.
आटा फटफट्या दुरूस्त करतो. माझ्याकडे सगळ्या प्रकारचे ग्राहक येतात. ते सांगतात ते मी ऐकत असतो. ऐकल्याने नुकसान होत नाही असं मला पाटील साहेब म्हणाले होते. ते आमच्या ग्यारेजचे मालक होते.

एकदा एक बॉटनीचे प्रोफेसर आले होते, एकदा झूलॉजीचे प्रोफेसर आले होते. दोघांचं ऐकून घेतलं आणि त्याचा लसावि काढल्यावर मला असं वाटतंय की...

झाडं वनस्पती झुडपं, शेवाळं यांचा पुनरूत्पादनाचा काळ असतो. त्याचप्रमाणे प्राण्यांचाही पुनरूत्पादनाचा काळ असतो. त्या काळातच त्यांच्यात पुनरूत्पादन होत असते. हे निसर्गाने ठरवले आहे. पण माणसाला बारा महीने चोवीस तास कधीही लैंगिक जीवनाचा आनंद घेता येतो. त्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. याचाच अर्थ मनुष्य स्वतः ते ठरवतो. त्यामुळे निसर्गाशी केलेली तुलना अनावश्यक आहे. प्राण्यात सुद्धा आता आपण पवित्र विधी करत आहोत कारण आपला वंश वाढवायचा आहे या भावनेने काम होत नसतं.

असं या थोर लोकांचं ऐकून मत झालं आहे आणि पटलंसुद्धा आहे.

अगदीच सामान्य उत्तर द्यायचे झाले तर जगात रंग हा काही प्रकार अस्तित्वात च नाही.तो आपला भास आहे आपण प्रतेक वस्तू रंगात बघतो
पण रंग अस्तित्वात च नाहीत.
शेवटी आनंद म्हणजे तरी काय असते

सर्व भास असतात .
फुलात गंध असतो कारण परागीकरण होवून संतती निर्माण व्हावी .कीटक आकर्षित व्हावेत.
बाकी फुलात गंध असण्याचे दुसरे कोणतेच कारण नाही.
गंध म्हणजे तरी काय एका प्राण्याला आकर्षित करणारा गंध दुसऱ्या प्राण्या साठी दुर्गंध असतो.

पुनरुत्पादना व्यतिरिक्त माणूस लैंगिक क्रिया का करतो याची चार कारणे खालील पाठ्यपुस्तकातील संदर्भात दिलेली आहेत. मूळ संदर्भ जसाच्या तसा लिहितो :

Other than the need to procreate, there are many other reasons people have sex. According to one study conducted on college students (Meston & Buss, 2007), the four main reasons for sexual activities are :

physical attraction,
as a means to an end,
to increase emotional connection, and
to alleviate insecurity.
[69]
https://en.wikipedia.org/wiki/Human_sexuality#Psychological_aspects
https://archive.org/details/psychology0000scha/page/336/mode/2up

* झाडं वनस्पती झुडपं, शेवाळं यांचा पुनरूत्पादनाचा काळ असतो. त्याचप्रमाणे प्राण्यांचाही पुनरूत्पादनाचा काळ असतो. त्या काळातच त्यांच्यात पुनरूत्पादन होत असते. हे निसर्गाने ठरवले आहे. पण माणसाला बारा महीने चोवीस तास कधीही लैंगिक जीवनाचा आनंद घेता येतो. त्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. याचाच अर्थ मनुष्य स्वतः ते ठरवतो. त्यामुळे निसर्गाशी केलेली तुलना अनावश्यक आहे. प्राण्यात सुद्धा आता आपण पवित्र विधी करत आहोत कारण आपला वंश वाढवायचा आहे या भावनेने काम होत नसतं.

>> शत प्रतिशत +१११

धन्यवाद कुमार सर.

माझ्याकडे ओशो पण त्यांची फटफटी घेऊन आले होते. त्यांच्याकडून काही ऐकले ते आता इथे सरांचा धागा वाचल्यावर आठवायला लागले आहे.

निसर्ग हा एक जबरदस्त उद्योजक आहे. त्याने प्रत्येक प्राण्याला मेंदू नावाचं हार्डवेअर दिलंय आणि भावभावना नावाचं सॉफ्टवेअर दिलं आहे. निसर्ग स्वतःच स्वतःचे नियम बनवतो आणि त्याप्रमाणे जीव जन्माला घालतो. त्याच क्लिष्ट नियम त्याने ज्याच्या त्याच्या बेसिक चीप मधे भरून ठेवलेले आहेत. त्याचा मृत्यूचा आणि जन्माचा प्रोग्रॅम अखंड चालत रहावा यासाठी प्राण्यांनी स्वतःहून इनिटिएटिव्ह घेऊन तो कार्यक्रम पुढे न्यायला हवा. फटफट्यात पण अनेक मेल फिमेल जॉईण्ट्स असतात. ते इंजिनीयरने डिझाईन केलेले असतात. निसर्गाने प्राण्यांच्यात केलेत. यांच्यात इंटरअ‍ॅक्शन होण्यासाठी आनंद, लालसा, इच्छा असे सॉफ्टवेअर्स काम करतात.
मात्र माणसाचा मेंदू हे सुद्धा जगातले आश्चर्यच असल्याने या गोष्टीही तो जाणतो. निसर्गाचे नियम समजून घेण्याची खोड आणि क्षमता त्याच्यात निसर्गतःच आहे. विकसित माणसाचा मेंदू काय करू शकतो हे अविकसित मेंदू जाणू शकत नाही.

पाटील साहेबांनी मला ओशोंचे पाय धुवायला सांगितले होते. . पाटील साब बहोत महान इन्सान थे

धाग्याचा विषय स्त्रीचा कळसबिंदू हा आहे
लैंगिकता आणि पुनरुत्पादन ही उपचर्चा प्रमाणाबाहेर इथे न केल्यास बरे होईल.
त्यासाठी स्वतंत्र धागा काढण्याचे स्वातंत्र्य इच्छुकांना आहेच.
पुनरुत्पादन या उप- विषयावरील हा माझा शेवटचा प्रतिसाद

>>>आती का खंडाला ऐवजी चल बच्चे पैदा करने को
किंवा
कुठं कुठं जायाचं हनीमूनला ऐवजी
कुठं जाऊयात पुरूत्पादनाला
अशी गाणी चित्रपटात असती.>>>
भारीच Happy
स्त्रियांचे वय वाढत जाते तसे कळसबिंदूच्या अनुभूती वर काही परिणाम होतो का?

चांगला लेख.
काही प्रतिसादही आवडले. 'द सेशन्स' खूप पूर्वी बघितलेला आणि खूपच इंप्रेस झालेलो. विषय आणि मांडणी फार उत्तम होती. असं काही असतं याचा शॉक ... आणि असं असणं किती महत्त्वाचं आहे हे विचार तेव्हा केलेले आठवतात.

स्त्रियांचे वय वाढत जाते तसे कळसबिंदूच्या अनुभूती वर काही परिणाम होतो का? >> आणि याचे उत्तर कोणी देणार असेल तर मेनोपॉजच्या संदर्भानेही द्या..

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
......
स्त्रियांचे वय वाढत जाते तसे कळसबिंदूच्या अनुभूती वर काही परिणाम होतो का?

>>>
चांगला प्रश्न.
एकदा का स्त्रीला कळसबिंदूची अनुभूती येऊ लागली आणि संभोगतंत्राचाही चांगला सराव झाला, की मग पुढे ऋतुसमाप्ती होईपर्यंत त्यात फरक पडत नाही. ऋतूसमाप्तीनंतर मात्र बऱ्याच स्त्रियांमध्ये बाह्य जननेंद्रियाची atrophy सुरू होते. ही वयाच्या कितव्या वर्षी सुरू होईल आणि किती प्रमाणात होईल यात बरीच व्यक्तीभिन्नता राहणार. जेव्हा त्याचे प्रमाण बर्‍यापैकी असेल, तेव्हा मग त्याचा लैंगिक आयुष्यावर परिणाम काही प्रमाणात होणार. इच्छा होण्यापासून ते कळसबिंदूस पोचेपर्यंत अशा अनेक घटकांवर त्याचा परिणाम होईल.

या संदर्भात अनेक अभ्यास झालेले आहेत आणि प्रत्येक अभ्यासाचे निष्कर्ष थोडेफार वेगळे आहेत.
......

कळसबिंदूची पहीली अनुभूती येण्याचं जे वय आहे त्या बाबतीत काही संशोधन रोचक आहे. त्याबद्दल जरा वेळाने लिहीन.

जसे मुलामुलींचे लैंगिक आयुष्य सुरू होते तसे वयाच्या विविध टप्प्यावर वीर्यपतन अथवा कळसबिंदूचा अनुभव येऊ लागतो. यासंदर्भात स्त्री व पुरुष यांची तुलना करणारा अभ्यास रोचक आहे. अशा अनेक अभ्यासांचा एकत्रित आढावा घेऊन साधारण असा निष्कर्ष निघाला आहे :

१. वय १०-१५ या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने वाढत सर्व मुलांमध्ये (१००%) वीर्यपतन झालेले आढळते.

२. आता स्त्रियांची परिस्थिती पहा कशी वेगळी आहे. वयात आल्यानंतरच्या पुढील टप्प्यांमध्ये कळसबिंदू अनुभवणार्‍या स्त्रियांचे प्रमाण हळू वाढत राहते. जवळपास २५ वर्षांचे निरीक्षण केल्यास असे दिसते की, कळसबिंदूची अनुभूती येणाऱ्या स्त्रियांचे एकूण प्रमाण जास्तीत जास्त 90 टक्‍क्‍यांपर्यंत पोचते; हे पुरुषांप्रमाणे 100% होत नाही.

orgasm and age.jpg

वरील आलेखाचा सोप्या भाषेत अर्थ असा :

स्त्रियांनी त्यांचे संपूर्ण लैंगिक आयुष्य खर्ची घातल्यानंतर सुद्धा काही टक्के स्त्रिया बिंदूच्या सुखापासून वंचित राहतात.

दृष्यमाध्यमातील हाताळणी - हिंदी सिनेमे: १. लिपस्टीक अंडर माय बुरखा - रत्ना पाठक वयस्कर अविवाहीता असते. फोन से* चा सीन कुठेही ओंगळवाणा किंवा हास्यास्पद होत नाही. २. मार्गारिटा विथ स्ट्रॉ- नॅरेटीव्हला बरेच पदर आहेत. ३. देढ इष्कीया - हुमा खानचे कॅरेक्टर ठराविक मुशीतील नायिकेपेक्षा वेगळे आहे. मन आणि शरीराची गरज यात गल्लत करत नाही. अशाच पद्धतीने अनअटॅच्ड से* करणारे पात्र तब्बूने दे दे प्यार दे मध्ये रंगवले आहे. पण सिनेमा फार खास नाही म्हणून तो सुचवत नाही. स्त्रीला संबंधात प्रत्येक वेळी भावनिक गरज असतेच ह्या समजाला छेद देणारी पात्रे आहेत.

यावर्षी ऑस्कर नॉमिनेटेड लॉस्ट डॉटर पण वेगळा आहे. तारुण्यात आलेलं मातृत्व, करिअरशी तडजोड नाही, हार्मोन्सशी ही तडजोड नाही आणि या सगळ्या भूतकाळाकडे आता पन्नाशीला आलेली भाषेची प्रोफेसर लेडा (ऑलिव्हिआ कोलमन) अनअपॉलजेटिक नजरेने एका बीच व्हेकेशनवर एका अशाच लवकर आई बनलेल्या (डकोटा जॉन्सन) आकर्षक स्त्री कडे बघत आठवत जाते. ती आजही प्रामाणिक आहे आणि तेव्हा ही होती. फार मस्त दाखवलं आहे.

कुमार सर,
माझी काही चूक होत नसेल तर दिलेला आलेख हा एक्स आणि वाय अ‍ॅक्सिज पाहिल्यावर पुरूषांमधला परमोच्चबिंदू वयाच्या कुठल्या टप्प्यावर कित्पत ( वाय अक्षाच्या टक्क्यात) साध्य होतो आणि स्त्रियांमधे कितपत (टक्केवारी) साध्य होतो असे सांगतोय का ?

पुरूषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या व त्यांची टक्केवारी असे मला आढळत नाहीये. माझे चुकत असेल तर कृपया सांगाल का ?

Pages