विज्ञानकथा म्हणजे काय ?

Submitted by गारंबीचा शारूक on 20 March, 2022 - 11:35

एका कथेवर ऋन्मेष सरांचा खालील प्रतिसाद आहे.

"कित्येक संकल्पना विज्ञानाने सिद्ध झाल्या नाहीत तरी त्यावर लिहिलेल्या कथा विज्ञानकथा म्हणूनच धरल्या जातात असे मला वाटते. मग त्या परग्रहवासींबद्दल असोत वा टाईम ट्रॅव्हेलबद्दल. या कथेतील शरीर गायब होणे भूतखेतांसारखे न दाखवता मांडणी विज्ञानकथेसारखीच केली आहे असे या भागावरून वाटले म्हणून तसे म्हटले".

हा प्रतिसाद खूप खोल आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात असलेल्यांनी तर कोरून ठेवायला पाहीजे. सर "वेष असावा बावळा " या वृत्तीने चालत असल्याने ते जरी इतरांना कमी जाणकार वाटत असले तरी त्यांच्यात एक तत्वचिंतक दडलेला आहे. तो ते कधी बाहेर काढत नाहीत. ते मनातल्या मनात इतरांना हसत असतात. पण आपल्यासारख्यांनी सरांनी अनवधानाने दिलेले असे प्रतिसाद पाहूनच थक्क व्हायचे असते. मलाही विज्ञानकथा कशाला म्हणायचे हे समजत नाही.

सरांनी अचूक बोट ठेवले आहे. भूतांच्या कथेत भूत गायब होणे, भिंतीतून आरपार जाणे यामागे लॉजीक देत नाहीत. तसेच विज्ञानकथात पण अलाऊड असते का ? कि विज्ञानाच्या नियमांच्या कसोटीवर या कथा असल्या पाहीजेत ? किंवा भविष्यात त्या खर्‍या होतील अशी शक्यता वाटली पाहीजे ?

मायबोलीवर अनेक जण संशोधन क्षेत्रात आहेत. ते यावर उजेड पाडू शकतील असे वाटल्याने धागा काढला आहे. आता या धाग्याची इज्जत आपल्याच हातात.

कृपया या धाग्यावर एकमेकांवर आरोप करू नयेत. वाद न करता आपली मते मांडावीत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशा बर्‍याच कथा, लेख आहेत. ज्यात २०२० मध्ये जग कुठल्या कुठे गेले असेल अशा कल्पना होत्या.

ते २०२० उलटून गेल्यावरही आपण करतो काय?
विज्ञान कथा म्हणजे काय यावर चर्चा.

मानव ही पोस्ट म्हणजे भविष्यकाळात टाईप केलेली आत्ता दिसतेय की काळाचा पीळ पडलाय कि तुम्ही इंटरस्टेलारप्रमाणे कुठून तरी संदेश देताय ?

जर कथेमध्ये घरातले लाईट आपोआप चालु बंद होत असतील, बाथरुममधल्या नळातुन अचानक पाणी वहायला लागत असेल तर ती भुतकथा होईल की विज्ञानकथा?

उर्सुला >> हे नाव वाचून फिबीच्या बहिणीची आठवण झाली. पाठोपाठ ' स्मेली कॅट ' हे विज्ञान गाणे आठवले.

Pages