विज्ञानकथा म्हणजे काय ?

Submitted by गारंबीचा शारूक on 20 March, 2022 - 11:35

एका कथेवर ऋन्मेष सरांचा खालील प्रतिसाद आहे.

"कित्येक संकल्पना विज्ञानाने सिद्ध झाल्या नाहीत तरी त्यावर लिहिलेल्या कथा विज्ञानकथा म्हणूनच धरल्या जातात असे मला वाटते. मग त्या परग्रहवासींबद्दल असोत वा टाईम ट्रॅव्हेलबद्दल. या कथेतील शरीर गायब होणे भूतखेतांसारखे न दाखवता मांडणी विज्ञानकथेसारखीच केली आहे असे या भागावरून वाटले म्हणून तसे म्हटले".

हा प्रतिसाद खूप खोल आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात असलेल्यांनी तर कोरून ठेवायला पाहीजे. सर "वेष असावा बावळा " या वृत्तीने चालत असल्याने ते जरी इतरांना कमी जाणकार वाटत असले तरी त्यांच्यात एक तत्वचिंतक दडलेला आहे. तो ते कधी बाहेर काढत नाहीत. ते मनातल्या मनात इतरांना हसत असतात. पण आपल्यासारख्यांनी सरांनी अनवधानाने दिलेले असे प्रतिसाद पाहूनच थक्क व्हायचे असते. मलाही विज्ञानकथा कशाला म्हणायचे हे समजत नाही.

सरांनी अचूक बोट ठेवले आहे. भूतांच्या कथेत भूत गायब होणे, भिंतीतून आरपार जाणे यामागे लॉजीक देत नाहीत. तसेच विज्ञानकथात पण अलाऊड असते का ? कि विज्ञानाच्या नियमांच्या कसोटीवर या कथा असल्या पाहीजेत ? किंवा भविष्यात त्या खर्‍या होतील अशी शक्यता वाटली पाहीजे ?

मायबोलीवर अनेक जण संशोधन क्षेत्रात आहेत. ते यावर उजेड पाडू शकतील असे वाटल्याने धागा काढला आहे. आता या धाग्याची इज्जत आपल्याच हातात.

कृपया या धाग्यावर एकमेकांवर आरोप करू नयेत. वाद न करता आपली मते मांडावीत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो वैयक्तिक टिका टाळा
गुद्दागुद्दी नको मुद्दामुद्दी करा Happy
आज मी भारतीय प्रमाणवेळेनुसार किमान रात्री तीन पर्यंत ऑनलाईन आहे.

ऋप्स ??? म्हणजे काय ?
ऋन्मेष आणि च्रप्स एकच आहेत असे म्हणायचे आहे का ? काय ते स्पष्ट म्हणावे. उगीच जीव टांगणीला लागतो.

ऋ सर, गेले वाटते सगळे. लवकर झोपा आज. मलाही जागरण होईल नाहीतर.
अजून कुठला धागा काढायचा होता ? मी विसरलो म्हणून विचारतोय.

धमाल सुरु आहे इथे.
<<सर "वेष असावा बावळा " या वृत्तीने चालत असल्याने ते जरी इतरांना कमी जाणकार वाटत असले तरी त्यांच्यात एक तत्वचिंतक दडलेला आहे. >> किती विचार करता तुम्ही सरांचा. आजकाल दुसऱ्यासाठी कोण करतं हो इतकं.

मला Jules Verne च्या कथा विज्ञानकथा वाटतात. >>> १०००% सहमत.
अंतराळातून एलियन्सचा हल्ला असल्या कल्पनांवर हजारो हॉलीवूड मूव्हीज निघालेत. चोथा करून टाकला आहे त्यांनी. अवतार, मार्शियन, ग्रॅव्हिटी सारखा एखादा अपवाद असतो. या सुद्धा विज्ञान कथा आहेत.
बाकी घाऊक फालतू मूवीज आणि घाऊक फालतू सायन्स फिक्शन पुस्तके आणि झोंबी मूवीज यात काय फरक नाही.

कालचा धामाधामीवाला पळऊन गेलेल्या शरीराचा धागा पळआला का आयमीन उडाला का?

मला कालपासुन शांत माणुस ओळखीचे वाटु लागलेत.
कही ये वो तो नही......

कालचा धामाधामीवाला पळऊन गेलेल्या शरीराचा धागा पळआला का आयमीन उडाला का?
>>>>>>

तो उडणारच होता. कारण आधीच तिथले शरीर हलवलेले Happy

प्रिया पाळंदे आणि
(प्रश्नांसाठी साहाय्य) - अस्चिग ह्यांनी सुप्रसिद्ध विज्ञान कथा लेखक श्री सुबोध जावडेकरांची मायबोलीसाठी मुलाखत घेतली होती. माझ्याकडे ती फाईल आहे. पण माझ्याकडे लिंक नाहीये.
जर वेमाची परवानगी असेल ती इथे पोस्ट करू शकेन. ह्या मुलाखतीत विज्ञान कथा म्हणजे काय ह्यावर बराच उहापोह केला आहे.

हरचंद पालव
ही ऑडीओ/व्हिडिओ फाईल नाही. डॉक फाईल आहे, मी अस्चिग ह्यांना विपू केला आहे. उत्तरासाठी वाट बघतो आहे,

टाईम ट्रावल विषयावर विज्ञानकथा - दोन वस्तू एकाच वेळी एकाच ठिकाणी असू शकत नाहीत या तत्वाला चुकीचं ठरवून कथा लिहिणे अवघड आहे. किंवा हे तत्व प्रथम खोटं ठरलं पाहिजे.

विज्ञानकथेत वैज्ञानिक तत्वे ही सर्व खरीच असायला हवीत का? एखादे तत्व खोटे अस्युम केले तर ती विज्ञानकथा म्हणता येणार नाही का?

हरचंद पालव
सुबोध जावडेकरांंची मुलाखत मी पोस्ट केली आहे. तिथे आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.
सुबोध जावडेकर सुप्रसिद्ध विज्ञान कथा लेखक आहेत,

या धाग्यावर आशुचँप यांचा पहिला प्रतिसाद आहे त्या तयारीने सिनेमा पाहिला किंवा कथा वाचली तर आपण नक्की आनंद घेऊ शकतो.
अन्यत्र सुबोध जावडेकर यांची मुलाखत वाचली. त्यात वेगवेगळी मतं आहेत. इथल्या माझ्या पहिल्या प्रतिसादाशी सहमती असलेले मत त्यांनी मांडले आहे. त्यामुळे थांबतो. (त्यांच्या कथा वाचलेल्या नाहीत. नवल मधे अनेक वर्षे विज्ञान काल्पनिक यायच्या. नारायण धारप यांनी पण अनेक विज्ञान काल्पनिक लिहिल्या आहेत. हे सर्व आठवले. )

केकू, धन्यवाद. मी ती मुलाखत वाचली, पण त्यांची मतं अजिबात पटली नाहीत. कारणं तिकडे प्रतिसादात लिहिली आहेत.

विज्ञान कथेची नेमकी व्याख्या काय यात रस नाही.
मुलांना विज्ञानात रस निमार्ण करणे, त्यादृष्टीने त्यांच्यासाठी विज्ञान कथा कशा असाव्यात अथवा अस्तित्वात असलेल्या पैकी कोणत्या निवडाव्यात वगैरे तज्ज्ञ लोक ठरवतीलच.

बाकी कथा लिहा, ती विज्ञान कथा व्याख्येत मोडते की नाही यापेक्षा कथा कशी आहे यावर भाष्य करायला आवडेल.

सर्वाच्या मुळाशी पदार्थविज्ञान ( physics) आणि गणित आहे. ते मोडता येणार नाही. जीव कसा निर्माण होतो, जगतो आणि मरतो हे मात्र सत्य ठरले आहे पण त्याच्या नाड्या कुणाच्या हाताता हे कळलं नाही अजून. यामध्ये कथा रचायची असते. मनोरंजक हवीच.

प्रत्येकाने आपल्याला जो जाणवेल तो फरक स्पष्ट करणारी छोटी कथा द्या पाहू. मी सुरवात करतो...

कथा:
...सुरवातीपासूनच त्या खोली मधले वातावरण मला जरा विचित्र वाटत होते. रात्री झोपलो पण मध्यरात्री अचानक जाग आली. स्वयंपाकघरातून भांड्यांचे आवाज ऐकायला येत होते. जरा सावध होऊन कानोसा घेतला. तेंव्हा स्वयंपाकघरातून येणारे पावलांचे आवाज हळू हळू माझ्या बेडच्या दिशेने येत आहेत असे जाणवले...
<इथे अजून बराच मसाला>
...सकाळी उठून वॉचमन पाशी चौकशी केली तेंव्हा त्याने सांगितले:

भूतकथा:
"तिथे पूर्वी एक कुटुंब राहत होते. त्यातल्या स्त्रीने जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे काही जणांनी सांगितले आहे. तिचाच आत्मा तिथे अजूनही वावरतोय असे म्हणतात"

विज्ञानकथा:
"या जागेच्या वर अवकाशात कित्येक हजार फुटांवर रात्री तेज:पुंज तबकडी दिसल्याचे काही जणांनी सांगितले आहे. काही परग्रहवासी येतात आणि अज्ञात किरणांच्या सहाय्याने मानवी मेंदूवर प्रयोग करतात त्यामुळे विविध आभास निर्माण होतात असे त्यांचे म्हणणे आहे"

काही परग्रहवासी येतात आणि
रिकाम्या ब्लॉकमध्ये घुसतात. त्यांना एनर्जी सारखी लागते ती वापरून बाटऱ्या भरतात. त्या महिन्याचे वीज बील खूप भयानक येते. ते वीजमंडळास तक्रार केल्यास अगोदर पैसे भरा सांगितले. मी वाद घातला की एवढी वीज मी वापरेनच कशी? तरी अर्धे बील करून हप्त्याने भरा म्हणाले. एवढी मोठी तबकडी सोसायटीत आली आणि कुणाला दिसली कशी नाही?

विज्ञान कथेच्या उलट एक वैज्ञानिक पचका नावाचा सुद्धा प्रकार असतो.
त्यावर नविन धागा काढेन उद्या परवा.

Pages