विज्ञानकथा म्हणजे काय ?

Submitted by गारंबीचा शारूक on 20 March, 2022 - 11:35

एका कथेवर ऋन्मेष सरांचा खालील प्रतिसाद आहे.

"कित्येक संकल्पना विज्ञानाने सिद्ध झाल्या नाहीत तरी त्यावर लिहिलेल्या कथा विज्ञानकथा म्हणूनच धरल्या जातात असे मला वाटते. मग त्या परग्रहवासींबद्दल असोत वा टाईम ट्रॅव्हेलबद्दल. या कथेतील शरीर गायब होणे भूतखेतांसारखे न दाखवता मांडणी विज्ञानकथेसारखीच केली आहे असे या भागावरून वाटले म्हणून तसे म्हटले".

हा प्रतिसाद खूप खोल आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात असलेल्यांनी तर कोरून ठेवायला पाहीजे. सर "वेष असावा बावळा " या वृत्तीने चालत असल्याने ते जरी इतरांना कमी जाणकार वाटत असले तरी त्यांच्यात एक तत्वचिंतक दडलेला आहे. तो ते कधी बाहेर काढत नाहीत. ते मनातल्या मनात इतरांना हसत असतात. पण आपल्यासारख्यांनी सरांनी अनवधानाने दिलेले असे प्रतिसाद पाहूनच थक्क व्हायचे असते. मलाही विज्ञानकथा कशाला म्हणायचे हे समजत नाही.

सरांनी अचूक बोट ठेवले आहे. भूतांच्या कथेत भूत गायब होणे, भिंतीतून आरपार जाणे यामागे लॉजीक देत नाहीत. तसेच विज्ञानकथात पण अलाऊड असते का ? कि विज्ञानाच्या नियमांच्या कसोटीवर या कथा असल्या पाहीजेत ? किंवा भविष्यात त्या खर्‍या होतील अशी शक्यता वाटली पाहीजे ?

मायबोलीवर अनेक जण संशोधन क्षेत्रात आहेत. ते यावर उजेड पाडू शकतील असे वाटल्याने धागा काढला आहे. आता या धाग्याची इज्जत आपल्याच हातात.

कृपया या धाग्यावर एकमेकांवर आरोप करू नयेत. वाद न करता आपली मते मांडावीत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांत माणूस माझा प्रतिसाद परत वाचा... कळेल न्यूटन आणि आईन्स्टाईन चा संबंध...
नाही समजला तर मी थोड्या वेळाने समजावून सांगेन...

नाही समजला. म्हणूनच विचारले आहे. प्लीजच समजावून सांगा.
याचा टाईम ट्रॅव्हलशी काय संबंध ? आणि टाईम ट्रॅव्हल म्हणजे काय ?
मला एकदा टाईम ट्रॅव्हल म्हणजे काय हे समजले म्हणजे प्रतिसाद मागे घेता येतील. सध्या जितके माहिती आहे तितके सांगा. डिटेल नंतर सावकाश कळवले तरी चालेल.

तुम्हाला टाईम ट्रॅव्हल माहित नाही मग इतके प्रतिसाद, दाखले कशाला दिलेत Happy टाईम ट्रॅव्हल पॉसिबल नाही वगैरे वगैरे...

च्रप्स, उगीच संताप करून घेऊ नका. तोल जाऊ देऊ नका.
तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत त्यावरून तुम्हाला नक्की टाईम ट्रॅव्हल माहिती आहे असे मला वाटतेय. त्यामुळे उगीच पुढे जाण्या ऐवजी तुमच्याकडून मी शिकावे या मतापर्यंत आलो. माझे चुकले का ? Happy

Time travel is the concept of movement between certain points in time, analogous to movement between different points in space by an object or a person, typically with the use of a hypothetical device known as a time machine.

घ्या मी सांगितले
आता चर्चा पुढे न्या

टाईम ट्रॅव्हल कसा पॉसिबल आहे हे प्लीज प्लीज प्लीज मला कळवा. मी जे प्रतिसाद दिले आहेत त्याच्या समर्थनार्थ लिंका पण दिल्या आहेत. कि तुम्ही ऋन्मेषप्रमाणे माहिती नसताना उगीचच प्रतिसाद देताय ? तसे असेल तरी हरकत नाही. फक्त कळवा म्हणजे काय इग्नोर करायचे हे मला समजेल.

त्यात हायपोथेटिकल असा उल्लेख आहे. टाईम मशीनचा. टाईम मशीन आणि टाईम ट्रॅव्ह्लल यात फरक नाही.
हे कसे शक्य होईल इतकाच प्रश्न आहे.
त्यासाठी काही तर्क दिले असतील. ते जाणून घ्यायचे आहे.
च्रप्स यांनी आईनस्टाईनचे पण नाव घेतले आहे. म्हणजेच त्याचा काहीतरी संबंध असेल ना ?

टाईम ट्रॅव्हल कसा पॉसिबल आहे हे प्लीज प्लीज प्लीज मला कळवा.
>>>

मी स्वत: टाईम ट्रॅव्हेल करतो.
मायबोलीवर एखादा अमेरीकेतला आयडी घेऊनही चोवीस तास मी उपल्ब्ध असतो ते याचमुळे Happy

Nahin, Paul J. (1999). Time Machines: Time Travel in Physics, Metaphysics, and Science Fiction
हे वाचा.

ज्याला विज्ञान म्हणजे काय माहित नाही, तो विचारतोय ते काय आहे, त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून तावातावाने पोस्ट्स टाकत रहाणे, हे एक विज्ञान माहीत असण्याचे लक्षण समजावे का?

एकेकाळी लोकांना वाटायचे सुर्य पृथ्वीभोवती फिरतो..
यात त्या लोकांची चूक नव्हती. आपण एका फिरणाऱ्या गोळ्यावर न हलता न पडता घरदारासह राहतोय हे पचवणेच अवघड होते.

च्रप्स आभार.
थोडक्यात तुम्ही ऋन्मेष प्रमाणे काहीच माहिती नसताना फक्त प्रश्न विचारत आहात. Lol

तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो.
टाईम ट्रॅव्हल दोन प्रकारे मांडतात
१. प्रकाशाच्या गती पेक्षा जास्त गती मिळाली तर आणि दुसरा
२. मोबाईल मधल्या जीपीएस च्या तत्त्वाने

कथेत जो टाईम ट्रॅव्हल अपेक्षित असतो तो या दोन्ही प्रकाराने शक्य नाही असे काही लोकांचे मत आहे. त्याच्या लिंक्स मी दिल्या आहेत.
तिसरी शक्यता वॉर्म होलची.
ती अजून फेटाळता आलेली नाही. पण त्याने टाईम ट्रॅव्हल माणसाला करता येईल हे कसे याचे स्पष्टीकरण नाही.

बाकी मला इग्नोर केल्याने तुम्हाला आनंद होत असेल तर मला त्यातच आनंद आहे. आभार आपले.

नाही.. मी ते मागे घेतो.. तुमच्याशी चर्चा चांगली वाटते.. खोटे कशाला बोलू...
मी समजावतो न्यूटन आणि आईन्स्टाईन मी का लिहिले ते सोप्या शब्दात..

च्रप्स तुम्हाला इग्नोर केले तर चालेल ना ?
कारण माझा प्रश्न न्यूटन आणि आईनस्टाईन या तुमच्या प्रतिसादाचा टाईम ट्रॅव्हलशी काय संबंध आहे असा थेट होता. तुमची भरकटणारी उत्तरे मला वाचायची नाहीत. धाग्यातला तुमचा प्रतिसाद क्र २, ४ आणि ५ हे सर्व टाईम ट्र्व्हलशी संबंधित आहेत. तुम्ही ती कल्पना कधी निकालात निघाली असे विचारल्याने मी लिंका दिल्या.
आता तुम्ही न्यूटन आईनस्टाईन आणि टाईमटृअ‍ॅव्हलचा यात काय संबंध आहे हे कळवले नाहीत. बाकीच्या जगजाहीर गोष्टींचा टाईम त्रॅव्हल संबंधाने तुम्ही जे प्रतिसाद दिले आहेत त्याच्याशी संबंध दिसत नाही.
याउप्पर तुम्ही का चिडून बोलत आहात कळत नाही. Lol
धन्यवाद.

टाईम ट्रॅव्हल ही काही काळापूर्वी अशी भूल पडलेली होती. ती कल्पना अशक्य आहे हे आता सिद्ध झाले असल्याने त्या कल्पनेवरच्या कथांना फक्त काल्पनिका म्हणता येईल. >>>
ती कल्पना अशक्य आहे हे आता सिद्ध झाले असे ठामपणे सांगितले होते.
मग आता?

च्रप्स तुम्हाला इग्नोर केले तर चालेल ना ?
>> परफेक्ट... चालेल कि...मोठा प्रतिसाद टाईपला होता न्यूटन आणि आईन्स्टाईन संदर्भ बद्धल.. .. अजून एडिट करण्याचा वेळ वाचला...

ती कल्पना अशक्य आहे हे आता सिद्ध झाले असल्याने त्या कल्पनेवरच्या कथांना फक्त काल्पनिका म्हणता येईल
>>> हे कधी सिद्ध झाले?
Submitted by च्रप्स on 20 March, 2022 - 10:54

याचे उत्तर नाहीय त्यांच्याकडे...

मस्त मजा येत होती. >> Lol
राजेश कुलकर्णीं असताना पण आख्ख्या मायबोलीने मजा घेतली. आता तुम्ही आहात तर काळजी नाही उडेपर्यंत. Happy

टाईम ट्रॅव्हल ही काही काळापूर्वी अशी भूल पडलेली होती. ती कल्पना अशक्य आहे हे आता सिद्ध झाले असल्याने
>>>>

त्यांनी हे विधान बहुधा मागे घेतले आहे.
कारण नंतर त्यांनी असे लिहिले आहे.

....
कथेत जो टाईम ट्रॅव्हल अपेक्षित असतो तो या दोन्ही प्रकाराने शक्य नाही असे काही लोकांचे मत आहे. त्याच्या लिंक्स मी दिल्या आहेत.
तिसरी शक्यता वॉर्म होलची.
ती अजून फेटाळता आलेली नाही.

>>>

दोन शक्यतांबाबत मत आहे ते ही काही लोकांचे तर तिसरी शक्यता फेटाळता आली नाही. एकंदरीत सिद्ध काही झाले नाहीये.

तरी कोणाला टाईम ट्रॅव्हेलवर कथा लिहायची असल्यास लिहू शकतात. असे म्हणून सर्वसंमतीने हा विषय थांबवू शकतो.

Pages