युक्रेनवरून तणाव

Submitted by पराग१२२६३ on 11 February, 2022 - 22:56

सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे.

युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही.

नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा
युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली.

नॉर्मंडी आराखडा
जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हाइटहॅट यांचे रूपांतर हळूहळू वटवृक्षात होत आहे. Happy
व्हॉटअबौट्री, ऍड होमिनेम, कैच्या काय स्विपिंग बोलणे (शिवसेना वामपंथी वैगेरे)....

तिवारी प्रवक्ता आहे पण त्याची मतं अधिकृत नाहीत. बॉरं!!! बाकी हे दोन तोंडांनी बोलणं>>>>>

खिक्क,
मातृसंस्थेचे सरचालक काहीतरी बोलतात ते वैयक्तिक मत असते मातृसंस्था तशी नसतेच,
नरेंद्र मोदी नावाचा माणूस ट्रोलसना फॉलो करतो तेव्हा ती भारत सरकार ची भूमिका नसते,
पण मनीष तिवारी च्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द काँग्रेस ची अधिकृत भूमिका असते

असोच

आणि मुदलात तिवारी बिचारा बोललाय तरी किती सौम्य आणि "कंटेम्पलेशन" टाईप भाषेत !

यांचे प्रवक्ते जे बकतात ती भाजपची अधिकृत भूमिका मानली तर काय काय निघेल.

मोदीविरोधी म्हमजे वामपंथी? वाह, काय व्याख्या आहे. व्याख्या, विख्यि, वुख्यु..
नवीन Submitted by सुनिती.

सध्या तसंच चित्र आहे. देशात सध्या एका बाजूला भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूला जे वामपंथी विचारवंतांचं टोळकं आहे त्यात शिवसेना लाडकी झालेली आहे. म्हणजे २०१९ नंतर ती फ्याशिष्ट राहिलेली नाही.
असो. तुम्हाला मोदीविरोधी रोजचं निगेटिव्ह उत्सर्जन का काय ते करायला दुसरं पेज आहे ना. तिथे जा. इथे युक्रेनबद्दल बोलू या. बाकी या पेजवरही बरंच कन्फ्युजन दिसत आहे. कुलकर्णी सर तर मोदीविरोध करण्याच्या नादात आपणच युक्रेनची दुसरी बाजू मांडणारी लिंक दिली होती हेही विसरून गेले असावे. रशिया neonazi विचारांचा उल्लेख करते, इस्त्राईल युक्रेनच्या बाजूने उभा राहत नाही- that fits in together.

सगळीकडे सामान्य नागरिक मरतात किंवा suffer करतात.

पुरोगामी, मोदी हे शब्द कोणाच्या प्रतिसादात पहिल्यांदा आले ते मागे जाऊन पाहिलं.
चोराच्या उलट्या बोंबा

इस्त्राईल युक्रेनच्या बाजूने नाही म्हणून युक्रेन नाझी, खुद्द युक्रेनचा पंत ज्यू आहे हे बघायचे नाही. एखादी फ्रिन्ज मायनोरीटी पोलिटिकल चळवळ बघून पूर्ण देशाला नाझी म्हणायचे... छान. त्यामुळे रशिया निओ नाझींशी लढायला युक्रेनमध्ये घुसलीये असे वाटत असेल तर तुमच्यासारखे तुम्हीच. युक्रेनचे प्रमुख राबाय काय म्हणतात ते वाचा.

रशिया स्वतः आपल्या देशात LGBTQ लोकांना हाणत असते. कोणत्या तोंडाने ते दुसऱ्या देशांच्या लोकशाह्या पाडू शकतात ? रशियन इन्व्हेजन आणि सामान्य माणसांच्या कत्तलीच समर्थन होऊ शकत नाही.

>>>>पुरोगामी, मोदी हे शब्द कोणाच्या प्रतिसादात पहिल्यांदा आले ते मागे जाऊन पाहिलं.
चोराच्या उलट्या बोंबा

+१०००

आता रशियाचा मानहानीकारक पराभव पक्का !
कारण सामनाच्या हग्रलेखातून राऊतनी युक्रेनच्या अध्यक्षांचे कौतुक केले आहे.
काँग्रेस सह इतर सगळे पक्ष सध्या केंद्रसरकार च्या पाठीशी भक्कम उभे आहेत , राऊत सोडून !
मग वेगळी भूमिका घेणारा राऊत नक्की कोणत्या प्रकारच्या रोगामी वर्गात मोडतो ?
हा ! आता ते रशियन लोक राऊत सारख्यांना खिजगणतीतही जमा करत नसतील नाही तर अडकलेल्या विद्यार्थ्यांना अजून त्रास व्हायचा !

कॉपी पेस्ट
A soverign country like Ukraine has the right to decide its alliance, but that doesnt give an excuse to Russia to invade Ukraine on a preconceived notion that Ukarine will attack them in the future. Russia cannot use an event which never happened as an excuse to kill the innocent civilians. If it was so concerned about security, then Russia could have used all its diplomatic might to bring NATO for the dialogue and if that failed they should have increased their military strength at the border and deployed nukes as a deterrent and be ready for the attack. Russia could have declared direct war on the US if it had so much problem with the NATO. Ukarine is just a scapegoat here

Trevor Noah show बघितला का?
त्यात दाखवलं की युक्रेनियन लोक, अधिकारी, बॉर्डर गार्ड स्वतःच रेसिस्ट वागत आहेत. युक्रेनमधील आफ्रिकन लोकांना रेफ्युजी बसमध्ये प्रवेश दिला जात नाहीये. फक्त युक्रेनियन लोकांसाठी बस आहेत असं सांगितलं जातंय. एका काळ्या माणसाला युक्रेनबाहेर जाणाऱ्या ट्रेनमध्ये शिरू दिलं नाही. हाईट म्हणजे आम्ही तुम्हाला गन देणार आणि तुम्ही युक्रेनसाठी लढा असंही सांगितलं गेलं. तो युक्रेनियन नागरिक नाही. काँगोचा नागरिक आहे. ट्रेवरने जोक केला की जेव्हा रशिया फायनली युक्रेन ताब्यात घेईल तेव्हा तिथे सगळे काळे लोक दिसतील(गोरे पळालेले असतील) मग रशिया कन्फ्युज होईल की गल्ली चुकली का काय!
एखादा गोरा ब्रिटिश माणूस जर टुरिस्ट/व्हिजिटर असेल तर तो युक्रेन सोडून जाऊ शकतोय पण काळ्या/ब्राऊन माणसांना तेही टुरिस्ट/व्हिजिटर असले तरी बॉर्डरवर अडवत आहेत. हे करणारे सर्व युक्रेनियन नागरिक आहेत.
ट्रेवर म्हणाला की आता नॉन व्हाईट लोक युक्रेन-पुतीन युद्धाकडे तटस्थपणे बघू लागतील.

एखाद्या प्रश्नाची दुसरी बाजू दाखविणारी लिंक दिली याचा अर्थ त्या लिंक मधले सारेच मान्य आहे असा होत नाही. यूक्रेन मधील कट्टर लोकांचा उदय चिंताजनक आहेच पण रशिया जे करत आहे ते १००% चूक आहे.
असो ,
भारतीय मुले युक्रेन मध्ये जाऊन मेडिकल शिक्षण घेतात, मग भारतातच मेडिकल कॉलेजेस ची संख्या का वाढवू नये? इंजिनियरिंग मध्ये डिप्लोमा असतो तसा मेडिकल मध्ये सुरू करता येइल का?

म्हणूनच भारत तटस्थ आहे. परिस्थिती observe करत आहे. आता बायडन भारतावरपण sanction लावणार म्हणे. त्याचेही डिटेल येतीलच.

या पेजवर आणि इतरत्रही युक्रेनबद्दल माजी गो चंदी टाइप चाललेली रडारड आणि भारताने युक्रेनला साथ द्यावी अशी पुरोगाम्यांचे सुप्रीम लीडर माननीय संजय राउत यांची मागणी हे सगळं एक विशिष्ट narrative सेट करतंय. त्यात युक्रेनचा पीएम म्हणजे तर पुरोगाम्यांचा नवा प्रेषित बनला आहे.
पण दुसरीकडे ट्रेवरचा शो व आफ्रिकन मीडियातील बातम्या यातून समोर येणारं वास्तव वेगळंच आहे.

सगळीकडे रेसिस्ट लोकांसोबत लहान मुलं आणि निरपराध नागरिक, स्थलांतरित हेही भरडले जातात इतकाच मुद्दा राहतो.

Whitehat, युक्रेनची बाजु घेणार्या अमेरीकेतुन ताबडतोब भारतात रहायला या व मोदींना राऊतपासून वाचवा.

युद्धपरिस्थितीत युक्रेनियन्स मधले रेसिस्ट anecdotes रशियाच्या चुकीच्या वागण्याला बरोबर करत नाहीत. हे सगळे post facto झाले- घुसखोरी नंतर. त्यामुळे रशियाच्या घुसखोरीला रेसिझम विरोध किंवा नाझी विरोध हा मुलामा साफ चुकीचा आणि खोटा आहे. त्याला काही आधार नाही.

भारतीय मुले युक्रेन मध्ये जाऊन मेडिकल शिक्षण घेतात, मग भारतातच मेडिकल कॉलेजेस ची संख्या का वाढवू नये? इंजिनियरिंग मध्ये डिप्लोमा असतो तसा मेडिकल मध्ये सुरू करता येइल का? >>> हे मी काय वाचत आहे? चक्क विकु आणि मोदींमधे एकमत? Happy

बाकी या विद्यार्थ्यांना भारतात एमबीबीएसला प्रवेश द्यावा अशी इण्डियन मेडिकल असो. ची मागणी आहे त्याबद्दल काय मत लोकहो? जे भारतातील कॉलेजांच्या प्रवेशाला पात्र होउ शकतात त्यांना जरूर द्यावा प्रवेश. बाकीच्यांबद्दल ठाम मत नाही.

भारतीय विद्यार्थी युक्रेन मध्ये शिक्षण घ्यायला जाताहेत हा प्रश्न कसा काय??? आणि तो सोडवायला वैद्यकीय शिक्षणाचा कोर्स बदलायचा! आणि त्याने ज्यांना डॉक्टर बनायचं आहे त्यांना कंपाऊंडर बनवणार. त्यांना इच्छा आहे का बनायची? त्यांना बाहेर जाऊन शिक्षण घ्यायचं आहे तर ही कसली जबरदस्ती!

बरं, भारतीय विद्यार्थी जगातील इतर कुठल्या कुठल्या देशांत शिक्षण घ्यायला जातात? त्यांनाही काय बनवता येईल याचं उत्तर शोधल असेलच. दिवस्वप्न बघून पॉलिसी करायला काय जातंय!

नुस्ता युक्रेन कशाला, अख्खा युरोप, अमेरिका इतकंच काय भारतीय सुद्धा रेसिस्ट आहेत.
इथे एक कम्पायलेशन आहे.

सिरिया, अफगाणिस्तान , म्यानमार , पॅलिस्टाइनमधल्या नरसंहाराबाबत शांत असणारं जग निळ्या डोळ्यांच्या आणि सोनेरी केसांच्या लोकांची परवड पाहून हळहळतंय.

युक्रेनच्या विरोधात असणारे लोक रशियाने युक्रेनवर कशासाठी हल्ला केलाय आणि तो कसा बरोबर आहे ते सांगतील का?

ते विद्यार्थी राजीखुषीने जात नाहियेत. भारतातील मेडिकल सीट्स ची कमतरता आणी प्रचंड स्पर्धा हे मुख्य कारण आहे. कुणालाही मारून मुटकून कंपाउंडर बनवा असेही मी सुचवत नाहीये, पण पूर्वी परिस्थितीने गरीब मुले डिप्लोमा करून नोकरी करत असत तसा पर्याय असावा का असे सुचवत आहे. शिवाय ती मुले परत आल्यावरही जेमतेम २० टक्के मुलेच एग्झिट परिक्षा पास होतात.

> सिरिया, अफगाणिस्तान , म्यानमार , पॅलिस्टाइनमधल्या नरसंहाराबाबत शांत असणारं जग निळ्या डोळ्यांच्या आणि सोनेरी केसांच्या लोकांची परवड पाहून हळहळतंय.

हे मात्र अगदी खरे आहे. अमेरिकेने इराक वर हल्ला केला तेव्हाचे अमेरिकन टीव्ही वरचे कव्हरेज एखाद्या जत्रेतले दारूकाम दाखवावे तसे होते. ते पहा मिसाईल, कसे डौलात उडत उडत इराक वर पडत आहे, तो पहा स्फोट ई.ई. इराक मधल्या एखाद्या प्रथमिक शाळेवर मिसाईल पडले वगैरे काहीही दाखवत नव्हते.

भारताच्या माजी परराष्ट् सचिव आणि अमेरिकेतील राजदूत निरुपमा मेनन राव यांनी म्हटलं आहे की उद्या चीनही रशियाने दाखवलेल्या मार्गावर चालणार आहे.

डिलन बर्न्स आणि स्टिव्ह बॉनेल II उर्फ डेस्टीनी हे दोघे ट्विच स्ट्रीमर आहेत. हे दोघे पोटापाण्यासाठी डिबेट करतात.

दोघांनी युक्रेनची बाजू तोडफोड मांडली आहे. रस असेल तर पूर्ण पहा, रस नसेल तर दोघांची ओपनिंग स्टेटमेंट तरी ऐका. https://youtu.be/pqktQZT5W2w

११:२२ पासून दोघांचे ओपनिंग स्टेटमेंट.

सीरिया , म्यानमार , अफगाणिस्तान मधील सत्ता संघर्षाला धार्मिक कट्टरते चा एक कंगोरा देखील आहे , त्यामुळे तेथील सामान्य लोकांच्या जीवाची परवड चालली आहे .
तर युक्रेन ला रशिया पुन्हा एकदा सामावून घ्यायला बघत आहे म्हणून रशियाने युद्ध लादले आहे . युक्रेन आणि इतर संघर्षातीलधार्मिक कट्टरतेचा फरक सवयीनुसार दुर्लक्षित केला जातोय का ?

युक्रेन ला रशिया पुन्हा एकदा सामावून घ्यायला बघत आहे म्हणून रशियाने युद्ध लादले आहे . >>>>>

सामावून घ्यायला?? स्वतंत्र राष्ट्र occupy करणे ला सामावून घेणे म्हणत नाहीत, बळकावणे म्हणतात
>>>>रशिया युक्रेन बळकवायला बघतो आहे>>> असे वाक्य हवे

ते हत्या-वध शब्दच्छल होतो तो पुरे, आता युक्रेन साठी वेगवेगळ्या छटांचे शब्द वापरू नका

तो शब्दच्छल नव्हता हो !

पण परराष्ट्र सचिवांच्या ट्विट मधील शब्दच्छल चे दाखले देऊन काही लोकं चीन ला मात्र गोंजारत आहेत .

डोक्यात शेण भरलेल्या स्त्री/पुरुषा/- , माजी परराष्ट्र सचिव रशियाप्रमाणे चीनही आपल्या शेजारी राष्टांचा घास घेईल /लचका तोडेल असं वॉर्न करताहेत. आणि तो फक्त तैवानला गिळून ढेकर देऊन बसेल असं नाही. यात गोंजारणं दिसत असेल त र डोकं तपासून घे.
युक्रेनमधून परतलेल्या मुलींसोबत मोदीचा मंत्री जे करतो त्याला गोंजारणं म्हणतात.

अरे मूर्खा ! परराष्ट्र सचिव इतकी तुझी औकात आहे का ? आणि चीन ला पंगा घेऊ द्यायचा की नाही ते सरकार आणि विरोधी पक्ष बघून घेईल !
तुझ्या सारख्या शिपूरड्या ने आपले ज्ञान पाजळून हसे करून घ्यायची काय गरज ?
गटारातील कुस्ती खेळण्याकरिता तुझ्या साठी वाहते पान आहे की !
इथे कशाला घाण करतो ?

मोदींच्या मंत्र्यांचा व्हिडिओ शोधण्याचाप्रयत्न केला असता काँग्रेसच्या टि पी रमेश चा सापडला !
सध्या फक्त फोटोच टाकतो , व्हिडिओ ब्लॉक करण्यात तुमची गॅंग सराईत आहे .Screenshot_20220305-114043_YouTube.jpg

Pages