युक्रेनवरून तणाव

Submitted by पराग१२२६३ on 11 February, 2022 - 22:56

सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे.

युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही.

नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा
युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली.

नॉर्मंडी आराखडा
जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्डिया टुडे, वरती कंवल सिबल काय मस्त बोललेत. आपल्याला (भारत) , रशियाला समजवण्याची काहीही गरज नाहीये. आपल्याला यु एस ए बरोबर उत्तम संबंध हवेत पण नॉट अ‍ॅट द कॉस्ट ऑफ करंट अलाईज = रशिया

तुम्ही कधी युक्रेनला गेला आहात का? जाणार आहात का? तुम्हाला युक्रेनमधला एक तरी माणूस माहित आहे क? नाही ना? मग
<<<आपण फक्त बघायचे की पुढे काय होते ते आणि स्वत:चा जीव वाचेल ना, इतकेच बघायचे असते.>>>

मलाही काही डीप मिनिंग वगैरे असेल तर समजले नाही Happy वरकरणी तारेवरची कसरत, रशियाशी संबंधांचे ओझे वगैरे समजले.

यात काही डीप किंवा मजेदार मला ही दिसलं नाही.
या ऐवजी मोदी हातात अनेक शस्त्र धारण करून ( पण सगळी म्यान करुन) नुसता तोंडाचा पट्टाच वाजवत व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड करत आहेत. किंवा शस्त्र फक्त व्हॉट्सअ‍ॅपवरच वापरत आहेत. नेहेरुंना शिव्या देत आहेत. पण ते सध्या ज्या रस्त्यावर उभे आहेत त्याचं नाव 'नेहरू मार्ग' आहे. असं काढता आलं असतं. मोदींचं बोट माईकच्या वायर मध्ये चेपलेलं दाखवायचं.

अमितव तुम्हीच काढा हे चित्र, :).
माझा अंदाज होता की भारताचा काही तरी वाणिज्य करार झालाय की ज्यामुळे हात अडकले आहेत आणि मुस्कटदाबी होत असावी. पण तस काही नसावे.

युक्रेन ने कसा कसा आणि कधी कधी भारताविरुद्ध स्टँड घेतला, याची यादी आणि तरीही भारताने युक्रेन च्या बाजूने उभे का राहावे विचारणारे WA फॉरवर्ड/ इंस्टा पोस्ट अलीकडे वाचनात यायला लागलेत

रशिया नी कधी भारता विरुद्ध भूमिका घेतलेली आठवत नाही.
मग तो संयुक्त राष्ट्र संघटनेच्या प्लॅटफॉर्म असू किंवा सुरक्ष परिषदेचा.
नेहमीच भारताला पाठिंबा देत आला आहे .
तंत्र ज्ञान पुरवणे असू किंवा heavy इंडस्ट्रीज .
रशिया नी नेहमीच मदत केली आहे.
अगदी महाराष्ट्रात जे जुने साखर कारखाने आहेत त्यांचे तंत्रज्ञान पण रशिया नीच पुरवले आहे.

ग्रिझली ऐवजी पूह बेअर असता तरी मजेदार वाटलं असतं. चायना पण आपल्या सारखीच मतदानाच्या वेळी अनुपस्थित होती. सो शी च्या कडेवर बसून कडेलोट! Proud

मी मुस्लिमांना अजूनहि परकीयच समजतो)
नंध्या, भारतात शिक्षण घेऊन परक्या देशात जाऊन चाकरी करणाऱ्यांना काय म्हणशील? नुसती चाकरीच नाही तिकडे बसून भारतीयांना नावे ठेवणे पण चालू असते. अशा लोकांना धोबी का #### ना घर ना घाट का असे का म्हणू नये?
बाकी अंकल सॅमचे नमक खाल्लेले त्यांची बाजू हिरीरीने मांडणाऱ्यांचे विशेष कौतुक वाटते. मायबोलीवर बाजू मांडून लिहून ग्रीन कार्ड चा मार्ग सुखकर नाही होणार.

टीप: #### च्या जागी सुअर असे वाचावे

इथे जे अती शहाणे पण किरकोळ बुद्धी मत्तेचे पुरोगामी आयडी आहेत
बकवास भाषा वापरणे हीच ह्या लोकांची ओळख आहे.
ओळख उघड केली की समाजात कुत्र पण विचारात नाही अशी लोक.
उद्या भारताचे कोणत्या ही मुस्लिम राष्ट्र शी युद्ध झाले तर .
पुरोगामी लोकांच्या idealogy ला घोडा लावून सर्व मुस्लिम देश आणि भारतीय मुस्लिम पण भारताचा विध्वंस करण्यात आघाडीवर असतील
जागतिक संबंध राखताना ह्या मुस्लिम फॅक्टर वर लक्ष केंद्रित करावाच लागते.
क

पुरोगाम्यांची एकंदरीत पंचाईत झाली आहे. मोदींनी रशियाला विरोध केला असता तर जुन्या बलाढ्य मित्राला(all weather friend) अमेरिकेसाठी सोडून देऊन मोदी चूक करत आहेत असा थयथयाट यांनी केला असता.
युक्रेनला विरोध केला असता तर एका हुकूमशहासाठी मोदी बिचाऱ्या चिमुकल्या युक्रेनवर अन्याय करत आहेत असं मानवतावादी रडू काढलं असतं.
पण तटस्थ भूमिका घेतल्यावर आता पुरोगाम्यांना confuse व्हायला झालं.
मग तटस्थ राहणं कसं चूक यावरून फुसफूस सुरू. मोदी जे करतील त्याच्या विरोधी निगेटिव्ह बोलत राहणं इतकंच आपल्या वामपंथीना कळतं.

रेसिझम फार दिसतय बाबा, युक्रेनमधे Sad अडकलेल्या, भारतियांचे हाल आहेत. आईवडीलांचा जीव त्यांच्या मुलांकरता कसा तीळ तीळ तुटत असेल, कल्पना न केलेलीच बरी.

Whitehat, again false narrative.
काॅन्ग्रेसच नाही तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचाही भारत सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे.

पाठिंबा वगैरे हे आजची जयशंकर सरांनी बोलवलेल्या मिटिंगनंतरची सुधारित भूमिका आहे कारण पब्लिक सेंटिमेंट नेहमीप्रमाणे मोदींच्या बाजूने आहे आणि लोक आपल्याला मूर्खात काढत आहेत हे लक्षात आलं आहे. आधी भरपूर बडबड करून झाली आहे.
मनीष तिवारीने तर विरोध केला होता. तो काँग्रेसी आहे. सध्याचे वामपंथींचे आशास्थान आंखो के तारे राजदुलारे शिवसेना आणि ममता तृणमूल यांनी abstain राहण्याला विरोध केला होता.

काहीही.. ही वामपंथींची अधिकृत भुमिका:
https://www.google.com/amp/s/www.newindianexpress.com/nation/2022/feb/26...

ही काॅग्रैसची:
https://www.google.com/amp/s/m.timesofindia.com/india/ukraine-crisis-con...

ही तीन दिवसापुर्वीची काॅग्रेसची भुमिका:

https://www.google.com/amp/s/www.ndtv.com/india-news/ukraine-russia-cris...

असो..

खरे तर मोदीमित्रांनाही ह्यात आनंद मानण्यासारखे फारसे काही नाही. पाच सहा वर्षांपूर्वीची ती दैदिप्यमान अमेरिका भेट, तो जल्लोष जयजयकार, अब की बार ट्रंप सरकार, हलो कसं काय बराक इ. मिठ्या वगैरे आचरट/ पोरकटपणा पासून दिशा बदलावी लागली आहे. पूर्वीचं ' टाकाऊ आणि देशविरोधी धोरण ' च स्वीकारावं लागतं आहे. हा कदाचित कालगत न्याय असू शकतो किंवा नव्याची सात आठ वर्षे संपल्यावर झालेली वास्तवाची जाण असू शकते.

There comes a time when nations need to stand up and not stand aside. I sincerely wish India had voted in solidarity with the people of Ukraine at the UNSC who are facing unprecedented and unjustified aggression. A friend needs to be told when they are wrong.

हे मनीष तिवारीचं ट्विट. हा नॅशनल स्पोक्सपर्सन आहे काँग्रेसचा.

आणि हे काँग्रेसेतर वामपंथी.
Trinamool, Shiv Sena Criticise Government After India Abstains From UN Vote On Ukraine

https://www.ndtv.com/india-news/trinamool-congress-shiv-sena-leaders-cri...

माजी विदेश सचिव आणि भारताच्या अमे रिकेतल्या माजी राजदूत निरुपमा मेनन राव Moral principles in world affairs. After all, all law is based on right over wrong and on moral principles that safeguard humankind. Following our dharma is the right way.
उद्या चीनसुद्धा रशियाचा आदर्श ठेवत शेजारी राष्ट्रांवर असंच आक्रमण करेल, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिलाय.

सुनिती यांनी व्हाईटहॅट यांचे योग्य खंडन केले आहे. मनीष तिवारी यांचे ट्विट नैतिक दृष्टीने बरोबरच आहे. जिओपोलिटिकल दृष्टीतून मोदींनी केलं ते योग्यच असलं, तरीही. इतक्या माईल्ड शब्दांमध्ये भूमिका मंडलीये तिवारींनी, तरी अधोगाम्यांचे रडगाणे चालूच आहे.

तृणमुल आणि शिवसेना वामपंथी?? LOL.
तृणमुलचा जन्मच वामपंथींविरोधात झालाय आणि शिवसेना तर आधीपासुनच उजवी आहे. शिवसेना वामपंथी असेल तर भाजपाने इतकी वर्षं वामपंथीसोबत सरकार चालवलं का? हाहाहाहा.. काय राव, खोटं बोला, रेटून बोला, वाक्यावाक्याला खोटं बोला असं चाललंय..

वामपंथी म्हणजे कोण हे न समजण्याइतक्या निरागस तर वाटत नाही.. तरी सांगते communist party of india (marxist) हा एकमेव सत्ताधारी वामपंथी पक्ष आहे आणि तो रशियाला नुसता न्युट्रलच नाही तर पाठिंबा द्या म्हणत आहे. बरं अजुन माहितीसाठी-- फाॅरवर्ड ब्लाॅक हा सुभाषचंद्र बोसांनी स्थापन केलेला पक्षही वामपंथीच आहे.

आणि मनीष तिवारीचं ट्वीट ही काही कान्ग्रेस पक्षाची अधिकृत भुमिका नाही. अधिकृत भुमिका वर दिलेल्या लिंकमधे आहे. राहुलच्या पणजोबानेच भारत-रशिया मैत्री सुरू केली होती हे माहीत असेलच.. आणि त्या पणजोब्याविषयी भाजपे काय आरत्या ओवाळत असतात हेही सर्वांनाच माहीतेय..

. A friend needs to be told when they are wrong.>>>>>

अर्थातच,
द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळी निषेध नोंदवून विकर्ण व्हायचे, द्रौपदी ला वेश्या म्हणून कर्ण व्हायचे की मूक राहून द्रोण/भीष्म व्हायचे.

महाभारत/रामायण नुसते वाद तयार करायला वापरायचे..डोक्यात शिरवून घ्यायचे नाही काही

मनुष्य प्राणी कितीही सामाजिक झाला तरीही रानटीच राहणार. इतिहासाची पुस्तके वाचताना वाटायचं, का ते राजे लोकं इथे तिथे आक्रमण करून बळजबरीने राज्य काबीज करायचे, लोकांवर अन्याय करायचे. आणि इतर राजे बघ्याची भूमिका घ्यायचे. आणि मग एखादा देश कित्येक वर्ष पारतंत्र्यात जाऊन तेथील लोकांना गुलामासारखी, हीनतेची वागणुक आणि पुन्हा क्रांती वगैरे. आज २१ व्या शतकात राहणीमानात सुधारणा झाली असली तरीही, आणि विचारमानात संशोधनात प्रगल्भता असली तरीही मुळ समस्या घेऊनच पुढे जात आहे. थोडक्यात मनुष्य चंद्रावर नाहीतर मंगळावर राहिला तरीही युद्ध हि कधीच न संपणारी समस्या असेल.
पण या सर्वांमध्ये निरपराध जीव आणि सुंदर जीवसृष्टी यांची न भरून निघणारी हानी होताच राहणार....

काय मजा आहे!
युक्रेन रशिया वादात काही वैयक्तिक रित्या नावे ठेवण्याचा फोल प्रयत्न (माहित नाही न् काय नाही, उग्गीच लिहायचे, मी लक्ष पण देत नाही), भारतातले अंतर्गत राजकारण, महाभारत सगळे काही आले. शेवटी देवभुबाबा यांनी सगळ्याचा सारांश सांगितला आहे.

आता नेहेमी प्रमाणे याहि धाग्याची वाट लागणार. वैयक्तिक शिव्यागाळी, ब्राह्मण व इतर, गांधी वि. सावरकर, काँग्रेस वि. भाजपा वगैरे वगैरे!!

युक्रेनहून, काही विद्यार्थी परत आलेले आहेत. ते सांगतातन, भारताचा झेंडा लावलेल्या अगड्या रशिअन अडवत नाहीत तेव्हा काही नायजेरिअन लोकंही त्या गाड्यांतून येत आहेत. म्हणजे आपली मदत फक्त आपल्या लोकांनाच नाही तर थोड्या प्रमाणात इतरांनाही होते आहे.

> सुनिती यांनी व्हाईटहॅट यांचे योग्य खंडन केले आहे

कितव्यांदा तरी !

मनीष तिवारी यांचे ट्वीट नैतिक दृष्ट्या योग्य आहे. केवळ मोदींनी घेतेलेल्या निर्णायाला विरोध म्हणून ते ट्वीट नाही. पण हे कुणाला समजावणार ? सर्व जग मोदीजी भोवती फिरते असे मानणार्‍या भक्तांना ? खर्‍या नोटांच्या बंडलात हळूच एक खोटी नोट चालवावी (किंवा अनिल कपूर ने भावाच्या लाँच ला चातुर्याने माधुरी ला नायिका म्हणून घेतले ) तसे आलेल्या दमलेल्या मुलांना भारत माता कि जय नंतर हळूच मोदी झिंदाबाद ओरडायला लावायचा प्रयत्न फसला.

आमच्यासाठी वामपंथी विचारवंत ज्यांना डोक्यावर घेऊन नाचतात ते पक्ष वामपंथी. मोदीविरोध हा मुख्य निकष.
नावात 'कम्युनिस्ट' किंवा 'मार्क्स' असलेले ओरिजिनल वामपंथी आता फक्त केरळात शिल्लक आहेत. याउलट शिवसेना आणि तृणमूल नवे उभरते सितारे आहेत.

तिवारी प्रवक्ता आहे पण त्याची मतं अधिकृत नाहीत. बॉरं!!! बाकी हे दोन तोंडांनी बोलणं , आज एक तर उद्या दुसरं बोलणं ही वामपंथाची एक खासियत आहेच.

Pages