Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा 
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
(No subject)
Wordle 230 2/6
Wordle 230 2/6
रा रा हि हि रा
हि हि हि हि हि
https://www.wordleunlimited
https://www.wordleunlimited.com/
इथे कितीही खेळू शकता.
(No subject)
पहिलं, तिसरं, पाचवं अक्षर तेच
पहिलं, तिसरं, पाचवं अक्षर तेच ठेवून आणखी किती शब्द बनतात पहायला हवं.
(No subject)
पहिलं, तिसरं, पाचवं अक्षर तेच
पहिलं, तिसरं, पाचवं अक्षर तेच ठेवून आणखी किती शब्द बनतात पहायला हवं.
<<
पट्कन ३ डोक्यात आले.
(No subject)
(No subject)
मामी, ते रा रा रा काय आहे?
मामी, ते रा रा रा काय आहे? पुष्पा इफेक्ट का?
रा म्हणजे राखाडी असणार
रा म्हणजे राखाडी असणार
(No subject)
२३१ - ३
२३१ - ३
१, ३, ५ हि लेटर्स तशीच ठेवली
१, ३, ५ हि लेटर्स तशीच ठेवली तर कमीत कमी ५ शब्द होतात. आज नशीब चांगले होते.
(No subject)
(No subject)
९ बुक्के घातले तेव्हा
२३१ -
९ बुक्के घातले तेव्हा गुन्हेगाराने गुन्हा कबूल केला.
(No subject)
(No subject)
232 चे 6 ही चान्स गेले.
232 चे 6 ही चान्स गेले.
(No subject)
37 नंबर मजा आली.
दुसर्या ओळीत सर्व अक्षरं बरोबर आली पण शब्द (क्रम) त्यांचा नव्हता.
हे असं माझ्या बाबतीत पहिल्यांदाच घडलंय.
(No subject)
९ बुक्के घातले तेव्हा
९ बुक्के घातले तेव्हा गुन्हेगाराने गुन्हा कबूल केला >> एवढं बदडू नका हो! एक-दोन ठोसे मारल्यावर कबूल होत नसेल तर गुड कॉप बॅड कॉप रुटीन वापरू शकता.
(No subject)
आता आकडे लावा.
आता आकडे लावा.
हा माझा पैला प्रयत्न:

(No subject)
(No subject)
एक अक्षर दोन वेळा असू शकते
एक अक्षर दोन वेळा असू शकते
रांगोळी पेस्ट, स्क्रीनशॉट,
रांगोळी पेस्ट, स्क्रीनशॉट, अपलोड याचा कंटाळा आला, खाजगी जागाही भरत चाललीय.
232 4/6.
२३२ ९ / १२
२३२
या वेळेस कोव्हिड बरा होण्यास ९ दिवस लागले
Pages