Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
तीन अक्षरं कळल्यानंतरसुद्धा ४
तीन अक्षरं कळल्यानंतरसुद्धा ४ कॉम्बिनेशन्स झाली!
<
जरा जास्तच इंग्रजी येत असलं की असं होतं.
(No subject)
तोवर न वापरलेल्या अक्षरांतून
तोवर न वापरलेल्या अक्षरांतून तिसरा शब्द बनवला.
आज शब्दाचं अमेरिकन स्पेलिंग आहे. ब्रिटिश शब्दकोशातलं स्पेलिंग वेगळं आहे.
(No subject)
235 - 3
235 - 3
(No subject)
सगळ्यांनी खेळातून विराम
सगळ्यांनी खेळातून विराम घेतला का?

(No subject)
जावेद, उत्तरापेक्षा तुमच्या
जावेद, उत्तरापेक्षा तुमच्या पहिल्या पायरीचा शब्द क्वचित वापरला जाणारा असावा.
(No subject)
236: 2/6
236: 2/6
-----
जावेद यांचा पहिला शब्द सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नेहमीचा असावा.
फक्त ३
२३६/३
236 - 3
236 - 3
मानव +१
मानव +१
Wordle 236 2/6
Wordle 236 2/6
Wordle 236... 2/6
Wordle 236... 2/6
सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नेहमीचा असावा.>>>> याचा फायदा घेतला.
Wordle वरून स्फूर्ती घेऊन
Wordle वरून स्फूर्ती घेऊन पुण्यातल्या काही मराठी आणि संगणक प्रेमी मित्रांनी "शब्दक" नावाचे मराठी कोडे बनवले आहे.
१० फेब्रुवारी ला release झालेल्या या कोड्याच्या पहिल्या version मधे, ३ अक्षरी काना/मात्रा/वेलांटी/उकार/जोडाक्षरे नसलेले सोपे आणि सरळ शब्द ओळखायचे आहेत.
नियम wordle चेच आहेत, जे स्क्रीनवरील "?" चिन्हाला स्पर्श केला की बघता येतात.
रोज सर्वांना एक नवा शब्द ओळखायला मिळतो, आणि ५-१० मिनिटे खेळून रिफ्रेश झाल्यावर रिझल्ट Whatsapp/फेसबुक/ट्विटर वर "शेअर" करता येतो.
www.shabdak.com
बघा प्रयत्न करून, इतरांनाही दाखवा!
आजचा शब्द जरा थांबून ओळखा.
आजचा शब्द जरा थांबून ओळखा.
हर्पेन , ८ प्रयत्न लागले.
हर्पेन , ८ प्रयत्न लागले.
शेअर करावं म्हणून परत गेलो तर आधीचा शब्द पुसला होता. वर्डल मध्ये असं होत नाही.
पुन्हा आधीच्याच अक्षरांनी सुरुवात केली तर कळलं की शब्द बदललाय.
शब्दक फारच उत्तम खेळ आहे. चार
शब्दक फारच उत्तम खेळ आहे. चार प्रयत्नांत सुटला.
शब्दक सुटला पण हा शब्द
शब्दक सुटला पण हा शब्द मोलस्वर्थ कँडी मधे आणि मराठी विश्वकोशात वेगळा आहे. मधले अक्षर वेगळे आहे. शब्दकचा शब्द मोल्सवर्थशी जुळतो.
शेअर करावं म्हणून परत गेलो तर
शेअर करावं म्हणून परत गेलो तर आधीचा शब्द पुसला होता. >>>
होय रोज एक नवा शब्द लिहिलं असलं तरी ह्यात एकादिवशी पाहिजे तितक्या वेळा खेळता येते आहे असे दिसतेय.
मराठीत खेळायला जास्त मजा येत्ये .
शब्दक, ७ प्रयत्न लागले ३
शब्दक, ७ प्रयत्न लागले ३ अक्षरी असूनही.
(No subject)
(No subject)
(No subject)
मराठी वर्डल - शब्दक पाहिलंत
मराठी वर्डल - शब्दक पाहिलंत का?
(No subject)
मी लिहिलेल्या चार शब्दांतून एक कथा तयार होऊ शकेल.
आज पहिल्या शब्दाला लॉटरी
आज पहिल्या शब्दाला लॉटरी लागली
दररोज वेगवेगळा शब्द घेऊन सुरुवात केल्याचा आज फायदा झाला
आज खुप दिवसांनी खेळलो
आज खुप दिवसांनी खेळलो
रच्याकने ६००वा प्रतिसाद
Pages