Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा 
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
>> व्यत्यय, वर्डल 2 ची लिंकही
>> व्यत्यय, वर्डल 2 ची लिंकही मूळ लेखात डकवा
मूळ लेखात अजून एक तळटीप वाढवली आहे
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
थँक्स डेवकी. आता रोज बाबांना
थँक्स देवकी. आता रोज बाबांना पाठवत जाईन व्हॉटसॅपवर
काय तिरपागडा प्रकार आहे ना शेअरींगचा खरच!!!
(No subject)
व्यत्यय,धन्यवाद!
व्यत्यय,धन्यवाद!
(No subject)
(No subject)
मी सोडवला आजचा शब्द.
मी सोडवला आजचा शब्द.
मी जी यु ए एन ओ पहिले टाकते. तीन स्वर बाद होउन जातात. व नेहमी जिम कॅरी आठवतो. एस व्हेंचुरा व्हेन नेचर कॉल्स मधला
(No subject)
आजचा सहा अक्षरी शब्द सोपा नाही.
पाच अक्षरी शब्दांचा खेळ आता सोपा झाला. गेले काही दिवस तिसर्या पायरीला शब्द ओळखतो किंवा किमान चार अक्षरे ओळखतो.
(No subject)
(No subject)
(No subject)
Wordle 230 4/6
Wordle 230 4/6
२३० ६ ठोसे
२३०
६ ठोसे
Tried ELGAR & ELMAH just in case LOL
२३०..मनात शब्दच उमटत नाहीत.
२३०..मनात शब्दच उमटत नाहीत.
(No subject)
५०० वा प्रतिसाद..
Wordle2 34 3/6 #wordle2
आजच्या शब्दाचा स्त्रियांच्या
आजच्या शब्दाचा स्त्रियांच्या कपड्यांशी, विशेषतः भारतीय स्त्रीच्या कपड्यांशी विशेष संबंध आहे.
@भरत +२०
@भरत
+२०
(No subject)
(No subject)
तसल्या एक्स्ट्रा फोल्डवाल्या
तसल्या एक्स्ट्रा फोल्डवाल्या प्यांटा आता कुठे मिळत नाहीत.
230 , 4/6
230 - 5 साडी
230 - 5
साडी
सुटले बाबा एकदाचे!
सुटले बाबा एकदाचे!
देवकी
देवकी
(No subject)
Pages