
(१) अर्धा किलो खवा
(२) पाऊण किलो पिठीसाखर
(३) दीडशे ते दोनशे ग्रॅम बारीक रवा (अगदी प्रमाणात घ्यायचा असेल तर पावणेदोनशे ग्रॅम)
(४) सव्वाशे ग्रॅम तूप (त्यापेक्षा थोडे जास्तच घेऊन ठेवावे)
(५) दूध (कृतीत सांगितल्यानुसार; एखादा कप पुरेसा व्हावा)
(६) दोन-तीन ग्रॅम केशर
(७) सव्वाशे ग्रॅम बदाम (तोडलेले)
(८) सव्वाशे ग्रॅम बेदाणे
(९) पाच ग्रॅम वेलदोड्याची पूड
'सूपशास्त्र' हे रामचंद्र सखाराम गुप्ते यांनी लिहिलेलं आणि रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी छापलेलं मराठीतलं आद्य पाकपुस्तक. 'किताबकल्हई' ह्या उपक्रमांतर्गत गेल्या वर्षी त्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. त्यात प्रस्तावना, टिपा, विश्लेषण, अशी बरीच मजा नव्याने घातलेली आहे. ती वाचायला मजा आली. परंतु पाकपुस्तक ते पाकपुस्तक. मग त्यातलं काहीतरी करून बघायला हवं. पण हा योग काही येत नव्हता. शेवटी काल 'किचन कल्लाकार' ह्या झीवरच्या कार्यक्रमात अभिजीत सावंतला नारायणदास लाडू करायला लावले, आणि मला हे राघवदास लाडू आठवले. मग लगेच आज करून टाकले. ती ही कृती.
(१) सगळा रवा घेऊन त्यात रव्याचे मुटकुळे होतील, इतपत तूप चोळावे.
(२) खललेले केशर निम्मे घेऊन ते दुधात मिसळून त्या दुधात वरील रवा कालवावा. घट्ट भगरा होईल इतपतच दूध घ्यावे. पातळ करू नये. (चमच्या-चमच्याने घालावे.)
दूध रव्यास लावत असतानाचा फोटो. केशराचा रंग रव्यास छान लागतो.
(३) सव्वाशे ग्रॅम तूप घेऊन त्यात वरील रवा तळावा / भाजावा. (प्रमाणात घेतल्यास मस्त होतो, तरीही कोणाला तूप कमी करायचे असल्यास आधी कमी घेऊन, नंतर कोरडे वाटल्यास लाडू वळताना थोडे वरून घालता येते. ह्यासाठी तूप घरचे घेतल्यास उत्तम.)
तुपात रवा भाजतानाचा फोटो.
(४) चांगला खरपूस रंग आणि वास आल्यावर त्यात सर्व खवा घालावा. पुन्हा ५-१० मिनिटे भाजून चुलीवरून उतरवावा. थंड झाल्यावर त्यात सगळी पिठीसाखर घालावी. (ह्यातही चवीनुसार, आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. माझ्या मते एकदम परफेक्ट प्रमाण कृतीत आहे.)
खवा घालून भाजतानाचा फोटो.
(५) ह्यात सगळे बदाम, बेदाणे, वेलदोड्याची पूड घालून एकजीव करावे. उरलेले केशर त्यात घालून लाडू वळायला घ्यावेत.
राघवदास लाडू तयार!
(१) हे खव्याचे लाडू आहेत, असं म्हणायला हरकत नाही. (रव्याचे नव्हेत!) त्यामुळे खवा जास्त हवा. घरच्यांना ह्याचं फार आश्चर्य वाटलं. पण फायनल प्रॉडक्ट खाऊन सर्वांना फार आवडलं. पण तरी तुम्हाला आवडत असल्या-नसल्यास रवा जास्त घेऊ शकता. पण मग तूपही तसं जास्त लागेल, अन्यथा लाडू कोरडे होतील. खव्याची आफ्टरटेस्ट जिभेवर मस्त राहते.
(२) केशर मस्ट आहे. फार सुंदर वास आणि चव आली. वेलदोडाही.
(३) मूळ कृतीमध्ये काजू नव्हते. पण तेही छान लागतील. पुढच्या वेळेस घालून बघणार आहे.
(४) हे बिनपाकाचे लाडू आहेत. हा प्लस पॉईंट असावा.
(५) फिल्टरमुळे फोटोंमधले रंग वगैरे थोडे बदललेले आहेत. साधारण कल्पना यावी.
छान रेसिपी. मस्त झाले असणार
छान रेसिपी. मस्त झाले असणार लाडु.
बदाम बेदाण्यांचं गणित चुकलंय का?
बदाम आणि बेदाणे पुस्तकातल्या
बदाम आणि बेदाणे पुस्तकातल्या मापाने खव्याच्या एक चतुर्थांश आहेत. अर्धा किलो खवा म्हणजे बदाम आणि बेदाणे सव्वाशे ग्रॅम प्रत्येकी.
(भास्कराचार्यांचा भागाकार चुकला?)
It's a mistake in the right
It's a mistake in the right direction
वा मस्त दिसतायत लाडू !
वा मस्त दिसतायत लाडू !
आमच्याकडे राघवदास लाडू, जाडा
आमच्याकडे राघवदास लाडू, जाडा रवा दूधात भिजवून भगरीसारख करून तूपात परतून, खवा करून मग पाकात करायची. हे सुद्धा चच छान असते. ते रोजच्या लाडूसारखे.
मुखविलास लाडू, चणाडाळ भिजवून वाटून, खवा घालून पाकात घालून. हे तर अगदी उच्च अप्रतिम लाडू. वाटतच नाही चणाडाळीचे आहेत. चव तर भन्नाट. हे मला राघवदास पेक्षा आवडतात.
छान दिसताय. करुन बघायला हवेत.
छान दिसताय. करुन बघायला हवेत.
पण यांना "राघवदास" च कां म्हणतात. या मागे काय कारण आहे? (घनशामदास शामलदास चांचड वगैरे मनातल्या शंका नुसत्या)
यशवंत दाते यांच्या महाराष्ट्र
यशवंत दाते यांच्या महाराष्ट्र शब्दकोशातून
राघवदास लाडू
रवा, साखर व खवा यांचा केलेला लाडू; यास चुरमा अथवा राधाविलास असेंहि म्हणतात
राघवदास लाडू
राघवदास लाडू
रवा, साखर व खवा यांचा केलेला लाडू; यास चुरमा अथवा राधाविलास असेंहि म्हणतात.
धन्यवाद भरतजी.
पण राघवदासच का म्हणतात हे
पण राघवदासच का म्हणतात हे यातुन कळत नाही.
हनुमंतासाठी केलेला लाडू किंवा अशी काही आख्यायिका असेल का किंवा राघवदास नावाच्या बल्लवाचार्यांनी बनवलेले लाडू वगैरे काही.
राखवादास लाडू
राखवादास लाडू
त्याचा अपभ्रंश राघवदास
भास्कराचार्यांनी प्रत्येकी
भास्कराचार्यांनी प्रत्येकी सव्वाशे ग्राम बदाम, बेदाणे काढून घेतले.
याचसाठी त्या पुस्तकातून पाहून रेसिपी करायचं राहून जात़य. नीट प्रमाण दिलं असल्याशिवाय हात लावायची माझी हिंमत नाही. त्यात रुपया, शेर अशी काय काय मापं आणि वजनं आहेत.
होय. मी ते करताना कागदावर
होय. मी ते करताना कागदावर लिहून घेऊन तो कागद बाजूला ठेवला होता. जेवायच्या आधी पटकन टाईप करू म्हणून घाईघाईत आठवणीतून लिहिताना घोळ झाला. आताचं प्रमाण व्यवस्थित आहे.
राघवदास लाडू नावाची कथा मलाही
राघवदास लाडू नावाची कथा मलाही माहिती नाही. बल्लव/मिठाईवाल्याचं नाव असेल, असा माझा अंदाज होता. नारायणदास लाडू असतात, त्यात तर काही वेगळी व्युत्पत्ती संभवत नाही माझ्या मते.
रवा आणि नारळ लाडूला राघवदास
रवा आणि नारळ लाडूला राघवदास लाडू म्हणतात हे मी इथे माबोवरच ऐकलेलं आहे. त्यामुळे मलाही अचंबा वाटला होता. पण आमच्याकडे कशालाच ते म्हणत नाहीत आणि पुस्तकात हे लिहिलं आहे. त्यामुळे हा फैसला मी पुस्तकावर सोडला.
किचन कल्लाकार मधे नारायणदास
किचन कल्लाकार मधे नारायणदास लाडु करायला सान्गितले होते त्यात रवा, ओल खोबर ,नारळाच दुध आणी मधे सुकामेवा स्टफ अस होत.
मस्त दिसताहेत लाडू!
मस्त दिसताहेत लाडू!
तातूराम , मोहनदास वगैरे नसतात
तातूराम , मोहनदास वगैरे नसतात का लाडू???
लाडू मस्त झालेत..
लाडू मस्त झालेत..
Pages