युक्ती सुचवा युक्ती सांगा -भाग ४

Submitted by मेधा on 1 December, 2021 - 09:24

आधीच्या धाग्यावर २००० पेक्षा जास्त पोस्टी आल्या म्हणून हा नवा धागा

आधीच्या धाग्यांचे दुवे :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा -३ https://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

blackcat +२००
भाज्यांच्या मूळ चवी पण माहीत असाव्यात...

बीटरूट हलवा- मागच्या महिन्यात इस्कॉन मंदिरात ( जवळ तेच एक मंदिर आहे म्हणून) गेले होते, तेव्हा मी पहिल्यांदाच खाल्ला, त्यांच्या प्रसादम् मध्ये होता. गाजर हलव्याचीच पाककृती. घरात एक किलो बीट होते, मग घरी बनवून पण खाल्ला. मुलं गोड खात असतील तर सहज खातील. बीटच्या मूळ चव पेक्षा गोड चव जास्त जाणवते.

पण त्याना बीट आवडत नसेल तर जाऊद्या, तुम्ही च खा.
अनू म्हणतात ते पटलंय. ॠन्मेषच्या बिर्याणी च्या धाग्यावर बराच ऊहापोह झालेला आठवतोय.
मला व माझ्या आईला ही बीट आवडत नसे ;एकदा अर्धं कच्च उकडलेले खाल्लं होतं तेव्हापासून, नंतर काही वर्षांनी कसं काय खाऊ लागलो आठवत नाही, पण आता खातो.

आजच मी गोड ताज्या दह्यात उकडलेल्या बीट आणि बटाट्याच्या फोडी, थोडासा बारीक चिरलेला कांदा , थोडी हि मि, कोथिंबीर, मीठ आणि कणभर साखर घालून मस्त गुलाबी रंगाची कोशिंबीर केली होती. भारीच लागते. दही छान हवं आणि भरपूर हवं हे सिक्रेट आहे ह्याच.

बीट आणि हिरवे मूग कॉम्बिनेशन रंगाच्या दृष्टीने विचित्र दिसेल असे वाटते . हिरव्या मुगाच्या वाटलेल्या पिठाला बऱ्यापैकी हिरवाच रंग येतो आणि बीट लाल रंग , त्यामुळे प्रथमदर्शनी रंग कदाचित चांगला येणार नाही. त्यापेक्षा हिरव्या मुगात कोथिंबीर वगैरे घालून हिरवेगार डोसे नारळाच्या चटणी बरोबर चांगले लागतील. बिटाचे कोशिंबीर , सॅलड , सूप वगैरे पर्याय चांगले वाटतात. रंगेबिरंगी दिसेल .

बीट उकडून किसायचं त्यात नारळाचा चव लिंबू मि. फोडणी घालून कोशिंबीर चांगली लागते.
पराठ्यात बीट व ला. भोपळा घालून केले तर उग्र लागत नाही.

चालेल. हिरवे मूग आणि बीट सध्या कॅन्सल. बाकी सगळ्या गोष्टी ट्राय करेन.
बीटाच्या पराठ्यात लाल भोपळा आणि नारळ घालून बघेन.
उग्रपणा कमी होणे आणि पोटात जाणे हे टार्गेट आहे. इथे छान टिप्स मिळाल्या. सूप, केचप/ चटणी, दह्यातली कोशिंबीर वगैरे पण करून बघेन.

It is good source of iron but is also a source of commercial sugar. Halwa will be very high calorie. Good for kids .

Bit उकडून चांगले लागते.त्याच्या चकत्या करून खायच्या.
माबोकर समोची रेसिपी: उकडलेले बीट कुस्करून त्यात शेंगदाण्याचे कूट, हि.मि.,साखर घालायची.

ओले खोबरं, बीट वड्या.

मी बीट कमी आणते, मला फक्त कोशिंबीर आवडते, उरलेलं नवऱ्याला उकडून देते, मला शिजवलेलं बीट आवडत नाही.

आज बीट उकडून प्युरी करून थोडे तांदूळ पीठ, मूग आणि ह डाळीचे पीठ घालून धिरडे केले. कच्चे बीट किसून घालण्यापेक्षा हे जास्त चांगले लागले. बीट मिक्सर मधून काढताना दोन तीन चमचे नारळाचा चव पण घातला.
आता काही दिवसांनी बीट पराठे आणि अजून वर सुचवलेले इतर पदार्थ करेन.
आजचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे माझाही उत्साह वाढला आणि घरच्यांचा पण बीट चांगलं लागू शकतं यावर विश्वास बसलाय. सगळ्यांचे आभार.

करी किन्वा भाजीचा तिखटपणा कसा कमी करावा ?
गेल्या आठवड्यात रेडीमेड थाई करी केली होती , ती मुळातच तिख्ट होती की एक हिरवी मिरची टाकली त्यामुळे ईतकी तिखट झाली माहीत नाही .
कॉर्नफ्लॉअर घातलं , गूळ घातलं , थोडी थोडी करून सुपात घातली पण तरेही तिख्ट ती ति़खटच Sad

कणकेचे गोळे करून ते भाजीत शिजवायचे . ते गोळे तिखटपणा शोषून घेतात. नंतर काढून टाकायचे खाताना . असं कुठेतरी वाचलं आहे

खूप तिखट काही हातून झालं तर मी पटकन बटाटे मावेत उकडून मिक्स करते. दूसरा उपाय प्लेन टोमॅटो केचप मिक्स करते.

कणकेचे गोळे, बटाटे हे उपाय खारटपणासाठी वाचले आहेत.

नट्सची - शेंगदाणे, काजू बदाम यांची पेस्ट

आंबट चवीचा जिन्नस

दही, मलई

मी करी कसली आहे त्यानुसार बदल करते. थाई करी तिखट असल्यास नारळाचे दूध असल्यास ते किंवा वाटून खोबरे घालायचे. ओलेच खोबरे हवे असे नाही, कोरडी खोबर्‍याची पावडर जरा कोमट पाणी घालून चटणी जार मधून फिरवून घेतली तरी भागते. पिनट बटरही तिखट पणा कमी करते. अजून एक म्हणजे hoisin sauce . मराठी पद्धतीचे कालवण असल्यास तांदळाची पिठी लावते अणि/ किंवा बटाटा घालते. यातही फार तिखट असल्यास खोबरे वाटून. असेच साऊथ साईडचे असल्यास करते. मटर पनीर टाईप असल्यास दुधात कॉर्न फ्लोअर्/काजू वाटून, बटाटा, अंजूने लिहिले आहे तसे टोमॅटो सॉस, मिल्क पावडर असे काहीतरी घालते.

दही फेटून घालणे
त्याने तिखट कणावर कोटिंग होऊन तिखटपणा कमी होतो

ओक्के.
बरेच उपाय मिळाले . धन्यवाद.
ती करी कशीबशी संपवली. पण हे लक्षात ठेवेन.

मला मिठाचा अंदाजच येत नाही. त्यात सगळ्या रेसिपीत मीठ चवीप्रमाणे असे लिहिलेले असते. एखादा पदार्थ खारट (म्हणजे करी, भाजी वगैरे) झाला तर काय करायच?.

विक्रमसिंहजी, तुमचा जो अंदाज आहे म्हणजे हातात/चमच्यात घेत असाल त्याच्यापेक्षा कमी टाका. म्हणजे
मीठ कमी वाटलं तर चव घेत जायचं मीठ टाकत जायचं तुम्हाला योग्य तो खारटपणा येईपर्यंत ....हाकानाका

किसलेलं ओलं खोबरं फ्रिजशिवाय टिकवता येईल का? ..... बहुधा नाहीच.खवलेले ओ. खो फारतर भाजून ठेवा.आता थंडी असल्याने कदाचित राहील नपेक्षा वापरून टाका.

किसलेलं ओलं खोबरं फ्रिजशिवाय टिकवता येईल का? ..... बहुधा नाहीच. कवड असेल तर मिठाच्या पाण्यात घालून एखादा दिवस रहाते.
खवलेले ओ. खो फारतर भाजून ठेवा.आता थंडी असल्याने कदाचित राहील नपेक्षा वापरून टाका.

झिपलॉक बॅग बाहेर पडलेल्या स्नो मध्ये राहील. पण फुटफुट स्नो पडत राहिला तर स्प्रिंग शिवाय सापडायची नाही. ती वेळेवर मिळण्यासाठी काही करावं लागेल. गराज मध्ये बेस्ट पडेल. Wink

किसलेलं ओलं खोबरं फ्रिजशिवाय टिकवता येईल का? १-२ दिवस तरी.>> त्याचे गूळ घालून गूळ चून बनवुन ठेवता येइल मग उमो किंवा करंज्या करायच्या. दोश्याची चटणी किंवा नारळा ची बर्फी करून ठेवता येइल.

आज कुकर मध्ये डिरेक्ट थोडासा भात लावला. कपडे धूत होते त्यामुळे शिट्टी ऐकून किचन मध्ये येउन इंडक्षन बंद करेपरेन्त भात करपला व कुकरला काळा डा ग आतून लागला आहे. दोन दा घासले तरी काळे जात नाही काय करावे? स्टीलचा कुकर आहे.

मागच्या पानांवर बीटवर बरीच चर्चा झाली. मला शंका आहे की बीट आपण जेवढे समजतो तेव्हढे पौष्टिक नसावे. त्याच्या लाल रंगामुळे त्यात लोह भरपूर असेल असे आपल्याला वाटते. पण लाल भोपळा ( डांगर) गडद हिरव्या भाज्यांमध्येसुद्धा लोह असते ना? ह्या सर्वांच्या प्रत्येक serving मध्ये नक्की किती लोह असते ह्याचा खुलासा कोणी करील काय? म्हणजे उदा. दर पन्नास ग्राममागे किती लोह? त्यामुळे बीट आहारात असलेच पाहिजे हा समज दूर होऊ शकेल. अथवा बीट खातोय म्हणजे काहीतरी पौष्टिक खातोय ही समजूत ही दूर होईल.
बिटाचा मातकट वास अजिबात आवडत नाही. अनेक प्रयोग झाले घरात. त्यातल्या त्यात बीट सालासकट अर्धाकच्चा उकडून सोलून किसून भरपूर दही, मीठ, हिरवी मिरची, दोन लसूण पाकळ्या, बारीक चिरून किंवा बारीक ठेचून घालून कोशिंबीर बरी लागते. चिमूटभर साखर हवी तर.

माझ्या वाचना प्रमाणे, लोहाचे (अथवा कुठल्याही घटकाचे) पदार्थातील प्रमाण किती या पेक्षा ते कुठल्या पदार्थातून शरीरात किती प्रमाणात शोषल्या जाते (bioavailability) हे महत्वाचे. जसे पालकात भरपूर लोह आहे पण ते non-heme प्रकारचे असते आणि नीट शोषल्या जात नाही.
मांसाहारी पदार्थांमधून मिळणारे लोह जास्त प्रमाणात शोषल्या जाते.
तसेच असेही वाचल्याचे आठवते की लोह नीट शोषल्या जाऊन ते अंगी लागण्यास लोहा सोबत इतर जीवनसत्त्वे व मिनरल्स सुद्धा लागतात. लोह जास्त असणाऱ्या मांसाहारी पदार्थांतून अशी जिवनसत्वे व मिनरल्सही मिळतात.

शाकाहारी पदार्थांतून लोह मिळवताना मग सोबत तशी जीवनसत्वे व मिनरल्स देणारे पूरक पदार्थही घेतले पाहिजेत.

तेव्हा इतरवेळी ठीक आहे पण लोहाची कमतरता असेल तर खास करून शाकाहारी / नियमित मांसाहार न करणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टर, डाएटिशनच्या सल्ल्याने आहारातून लोह कसे मिळवावे हे जाणुन घ्यावे.

शाकाहारी पदार्थांतून लोह मिळवताना मग सोबत तशी जीवनसत्वे व मिनरल्स देणारे पूरक पदार्थही घेतले पाहिजेत.>> ते कोणते? लोहा बद्दल
वेग ळा धागा काढून लिहा. मला हिमोग्लोबिन १२ च्या वर व डि व्हिटामिन हेल्दी लेव्हल मेंतेन कर णे आवश्यक आहे.

अवांतर
शोषल्याले जाते.

लोह - नपुं एकवचनी.

क्रियापदाची तृतीयपुरुषी रूपे
(कर्मणी प्रयोग)
एकवचन - केला, केली , केले
अनेकवचन - केले, केल्या, केली.

यापुढे फक्त जाणे या क्रियापदाचे योग्य ते रूप लावले की कर्तरी प्रयोग झाला.

केला गेला, केली गेली, केले गेले
केले गेले, केल्या गेल्या, केली गेली

हीरा,मुलाच्यावेli, डॉक्टरांनी लाल रंगाच्या भाज्या खा म्हणून सांगितले होते.बीट,टोमॅटो,लाल माठ,खजूर,लाल भोपळा खाऊ शकता.
डॉक्टर, डाएटिशनच्या सल्ल्याने आहारातून लोह कसे मिळवावे हे जाणुन घ्यावे.........+१.

अमा, मी काही तज्ञ नसल्याने वेगळा धागा काढणे इष्ट नाही.
मी हे मालती कारवारकर यांच्या पुस्तकात प्रथम आणि मग इतर काही लेखात वाचले, पुस्तक सापडल्यास त्याविषयावरील एखाद्या धाग्यावर ती माहिती देईन.

भरत, नोटेड, धन्स.

मध्यंतरी कलिंगड हा लोहाचा एक उत्तम पुरवठेदार आहे, अगदी लाल माठ,पालक, भोपळा, शिमला मिरची, बीटपेक्षाही, असे वाचनात आले. आता प्रश्न असा की ह्या एकाच पुरवठेदारावर अवलंबून राहावे की वेगवेगळ्या पुरवठ्यातून वेगवेगळ्या प्रमाणात लोह मिळवावे? मुळात शरीराला रोज आवश्यक तितके उपयोगी लोह मिळवण्यासाठी वरीलपैकी कोणत्या भाज्या किती प्रमाणात घ्याव्या?( सेवन कराव्या?)

हीरा +1
खरंच खूप योग्य प्रश्न आहे.
बाजारात कधी मिळणाऱ्या हिरव्या रान भाज्या, वांगं, पांढरा भोपळा, वालाच्या शेंगा, शेपू ,कारलं या गोष्टी अनेक प्रकार करून अन्नात घुसवाव्या लागतात. यांपैकी कितीचा किती प्रमाणात उपयोग आहे. यातून खरचं भरपूर व्हिटॅमिन्स , मिनरल्स मिळतात का जी इतर आवडत्या पदार्थातून मिळत नाही. की फक्त फायबर म्हणून याचा उपयोग होतो, या प्रश्नांची उत्तरे मलाही हवी आहेत.

*अवांतर - नारळात कुठलतरी मिनरल की काहीतरी आहे जे फक्त आईच्या दुधात मिळतं. ते मिनरल या दोन गोष्टींव्यतिरिक्त इतर कशातही मिळत नाही म्हणे. त्यामुळे रोजच्या आहारात एक चमचा तरी नारळ असावा असं कुठेतरी वाचलं होतं.

आज जे घटक सापडले आहेत , ते आजवर सापडलेले घटक आहेत,

म्हणून बिट मध्येही अमुक घटक आहे, गाजरातही आहे, मग रोज बिटच खाऊ की , असा विचार करू नये, कारण उद्या सायंटिस्ट लोक जाहीर करतील की गाजरात अमुक अजून एक तत्व असते, ते बिटात आणि अंड्यात नसते.

त्यामुळे शास्त्र , शास्त्रज्ञ ही जगातील सर्वात बेभरोश्याची वस्तू आहे , ते उद्या काय सांगतील ह्याचा नेम नसतो

Pages