श्रीलंकन बीट करी

Submitted by रसायन on 2 July, 2016 - 22:45
shrilanka beet curry
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३-४ बीटं
नारळाचं दूध
कढीपत्ता
१/२ कांदा (अमेरिकन राक्षसी), भारतातला एक चालेल
अगदी अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट
५-६ मेथी दाणे
मोहरी
२ चमचे बडीशेप
२-३ हिरव्या मिरच्या
धने- जिरे पावडर

क्रमवार पाककृती: 

बीट हा प्रकार कोशिंबीरीत आवडतोच पण बाकी त्याखेरीज जिकडे तिकडे केवळ लोटलेलाच बघितला आहे. मेव्हण्याने मध्यंतरी ही करी खाऊ घातली तेव्हापासून व्यसन लागलं आहे Happy
१. बीटं कुकरमधून शिजवायची आणि सालं काढून तुकडे करून घ्यायचे.
२. तेलात मोहरी, कढीपत्ता, मेथी दाणे, आणि बडिशेप अशी फोडणी करून घ्यायची
३. त्यात बारिक चिरलेला कांदा परतून, शिजवून घ्यायचा.
४. आलं-लसूण पेस्ट आणि धने-जिरे पूड घालून ती शिजवलेली बीटं त्यात परतून घ्यायची
५. शेवटी नारळाचं दूध घालून एक वाफ काढायची
६. भात / पोळीसह ओरपायची Happy

वाढणी/प्रमाण: 
एकाच माणसाने सगळी संपवल्यास कं.ज.ना. :)
अधिक टिपा: 

- आलं-लसूण पेस्ट अती घालू नये- उरलेल्या सगळ्या तुलनेने सौम्य मसाल्यांची मजा जाते असं वाटतं.

माहितीचा स्रोत: 
मेहुणा- त्याच्या महितीचा स्रोत आंतरजाल.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी खाल्ली आहे बीटरुटाची अशी भाजी इथे सिंगापुरात. पण वाफवलेला बीट जरा रबरासारखा लागतो. मला गोल गोल चकत्या करुन बीट जास्त आवडतो. तो कापताना जो रस झरतो तो खूप दाट असतो पण हळदीसारखा कशालाच चिकटून बसत नाही ते एक चांगले आहे.

तुमची कृती आवडली.

अजून कृत्या पोस्ट करा.

लंकेत सगळे काही आकाराने राक्षशीसच असते Happy त्यांची जिलेबीसुद्धा ताटाइतकी गोल असते आणि आकाराने केळ्यासारखी जाड Happy

भारी. नक्की करणार. या रेसिपीनं जरा परतून घेतलेली वांगी किंवा शिजवलेल्या दुधीच्या फोडी पण चांगल्या लागतील असं वाटलं.

आज या पाकृत काही बदल करून बीटाची सरसरीत भाजी केली.
घरात ओलं खोबरं नव्हतं. म्हणून मग सुकं खोबरं + आलं लसूण पेस्ट + हिरव्या मिरच्या + जिरे + कोथिंबिरीचं वाटण केलं. फोडणीत कांदा परतल्यावर वाटण घालून तेल सुटेस्तोवर परतलं. मग बीट, धणेपूड घालून परतलं, एक वाफ आणली. त्यात थोडसं पाणी, एम टी आरचा सांबार मसाला सढळ हस्ते व मीठ घालून पुन्हा थोडी वाफ आणली. गॅसबंद करून मसाला मुरू दिला. चांगली चव आली होती भाजीला. यावेळी आणलेली बीटं चवीला जरा तुरट वाटली. त्यामुळे सांबार मसाला, हिरवी मिरची व मीठ यांनी भाजी तारली. Wink

संशोधक, दिनेश, ऑर्किड, मॅगी, हर्ट, सिंडरेला, स्वाती_आंबोळे, सुनिधी, अरुंधती कुलकर्णी- धन्यवाद!

हर्ट- Happy तुमच्या पद्धतीने गोल चिरुन करून बघीन एकदा.. आळस म्हणून आधी शिजवून घेतली.. दुसरं काय? Happy तुमच्याकडेही काही लंकन कृत्या असतील तर जरुर टाका, मजा येईल.

सिंडरेला- करून बघा आणि दुधी / वांगं आवडलं तर सांगा Happy

अरुंधती- मस्त वाटतंय.. सांबार मसाला घालून बघतो पुढच्या वेळेला..

ही भाजी फार म्हणजे फारच सुंदर होते. तरी मी नारळाचे दूध जरा कमीच घातले. खुप धन्यवाद रसायन. बीटचा हा इतका चवदार पदार्थ सांगितल्याबद्दल.

मी सुकी भाजी बनवते...सेम प्रोसिजर फक्त विदाऊट कोकोनट मिल्क आणि आलं लसूण पेस्ट....
अशी बनवेन एकदा..

हो मी सुद्धा बीटा ची कोशिंबीर किंवा नुसतंच सॅलेड म्हणून असंच खाल्लय आत्तापर्यंत. नारळाचं दुध घालून बघितली पाहीजे करी .

ही भाजी करुन बघेन,
बिटाची जिरे फोडणीला घालून खोबरक, कोथिंबीर आणि मिरची वाटून घालून पण भाजी छान होते.

मी हा प्रकार कुणाकडेतरी खाल्ला आहे. फॉर चेंज चांगला आहे. आता एकदा करून पाहिन. बीट आणावं लागेल Wink

मी हा प्रकार कुणाकडेतरी खाल्ला आहे. फॉर चेंज चांगला आहे. आता एकदा करून पाहिन. बीट आणावं लागेल Wink