Submitted by मेधा on 1 December, 2021 - 09:24
आधीच्या धाग्यावर २००० पेक्षा जास्त पोस्टी आल्या म्हणून हा नवा धागा
आधीच्या धाग्यांचे दुवे :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा -३ https://www.maayboli.com/node/38475
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनु स्क्रबची आयडीया चान्गली
अनु स्क्रबची आयडीया चान्गली आहे..रेसिपी शोधते...सगऴ्यानी दिलेल्या सल्ल्यासाठी धन्यवाद! ..
(कॉस्टको नावाच्या घातक गुहेतुन अशा नको असलेल्या प्रमाणात खरेद्या येतात , खरेदी करणारा उत्साहाने आरभशुर बनुन एक आठवडा खातो...बाकी ज्याचे मेन्दु तल्ल्ख व्हावे, लहानपणि आपल्याला न मिळालेले पदार्थ त्याना मिळावे म्हणून आणले ती पिढी फ्रुट रोल अप,चिझ इट चाखत बसते...बाकिच्याना असल्या क्लुप्त्या लढवत बसाव्या लागतात.)
अक्रोड आवडत असतील तर वर्क
अक्रोड आवडत असतील तर वर्क फ्रॉम होमच्या टेबलवर ठेवून द्यावे. संपतात. संपले की दुसरं काय संपवायचं असेल ते आणून ठेवावे. ते नाही केलं तर परत जाऊन अक्रोडच विकत आणले जाऊ शकतात, आणि मग मूळ खवट होते हे समजू शकतं.
खवटपणाचा त्रास नाही होणार
खवटपणाचा त्रास नाही होणार बहुतेक>>> हे गंभीरपणे लिहिलेय का?
रोपांना कशाला खवटपणाचा त्रास होईल?
वर्क फ्रॉम होमच्या टेबलवर->>
वर्क फ्रॉम होमच्या टेबलवर->> मीही करते असं.
मागच्या वेळी आणलेले तेव्हा नाही खाल्ले तिने त्यामुळे ह्यावेळी मला फार अपेक्षा नव्हत्या. बारकं पिल्लू फक्त गोडाचं आवडीने खात असतं आणि शेंगदाणे.
नवडतं असं काही नाही विशेष. पण कधी कधी काही खावंसं वाटत नसेल आणि संपवायचं असेल तर काम करत करत काहीही खाल्लं जातं.
Cocomelon duo ला आताशी चव कळू लागली आहे. ते जरा धोक्याचं होऊ शकतं.
रमा अक्रोड ला butterfly सारखं दिसतं असं म्हणते आणि खाते
बाकी ज्याचे मेन्दु तल्ल्ख
बाकी ज्याचे मेन्दु तल्ल्ख व्हावे, लहानपणि आपल्याला न मिळालेले पदार्थ त्याना मिळावे म्हणून आणले ती पिढी फ्रुट रोल अप,चिझ इट चाखत बसते...बाकिच्याना असल्या क्लुप्त्या लढवत बसाव्या लागतात.)
>>>>>
अगदी अगदी…
रमा अक्रोड ला butterfly सारखं दिसतं असं म्हणते आणि खाते
>>>
आमच्याकडे अक्रोड ब्रेनसारखं दिसतं म्हणून नव्याचे ९ दिवस झाले. बेदाणे मात्र स्टेपल. पोळीबरोबरही खाऊन आम्ही नवा पायंडा पाडलाय.
आक्रोड वरून उडी मारते.एकदा
आक्रोड वरून उडी मारते.एकदा डिस्काउंट होता म्हणून किन्वा मागवलं(ममव.उद्या 85% डिस्काउंट असेल तर 1 किलो विष पण मागवू
)
तर आता याचं काय करावं कळत नाहीये.इंटरनेट सूचना मानून खरपूस कढईत भाजलं. मिक्सरमध्ये बारीक करून थोडी कणिक आणि ज्वारी पीठ आणि बेसन आणि जिरे मिरची वाटण घालून मसाला थालीपीठ कम भाकरी केली.ती चवीला चकली सारखी लागली पण लुक्स रोडगा टाईप.
नुसतं किंवा खायला कडवट लागतं आहे.शिजवून ओट सारखं खायची हिंमत नाही.लोकांनी रोटी केल्या आहेत त्यांच्या एकदम नॉर्मल चपाती दिसत आहेत.पण मी मिक्सरमध्ये बारीक केलेल्या किंवा ला जरा खरबरीत टेक्श्चर आहे.फक्त थालीपीठ लायकी चे.चक्कीत पाव किलो दळायला 50 ग्रॅम पात्यालाच लागून वाया जाईल.
आता उरलेला भाजलेला पाव किलो किंवा माझ्या आणि नवऱ्याच्या पोटात जास्तीत जास्त ओळखीच्या मार्गाने कसा घालावा?
किनवा सॅलड खाल्ले होते. काही
किनवा सॅलड खाल्ले होते. काही फार आवडले नव्हते. पण त्यात भिजवून की उकडून घातलेला होता. बहुतेक उपम्यासारखा प्रकार होऊ शकेल
अनु !
मी ही आणलेला किन्वा एकदा अर्धा किलो.
त्याला असेच खरपूस भाजून वरई टाईप उपमा करुन बघितला ( तूप आणि जिर्याची फोडणी, दाण्याचे कूट वगैरे घालून!).
कुणालाही आवडला नाही.
आता पडला आहे!
कणकेत ढकलून द्यावा का दळणासोबत?
तसेही कणकेसोबत सोयाबीन, मेथ्या इ इ दळून आणण्याबद्दल मला इथली मतं विचारायचीच होती!
त्यातल्या त्यात डोसा पिठात
आंबटगोड
सेम पिंच
त्यातल्या त्यात डोसा पिठात तांदूळ प्रमाण अर्धे करून अर्धा किन्वा असे घालून खपवता येईल.इथे मायबोलीवर किन्वा बरोबर आनंदाने नांदणारे कोणी आहे का?
कणकेत सोयाबीन थोडं भाजून आम्ही टाकतो.साधारण किलोला एक मूठ असं. उडीद पण भाजुन टाकतो.
किन्वा शिजवून केलेला उपमा
किन्वा शिजवून केलेला उपमा चांगला लागतो चवीला. पण ते पीठ वगैरे करून नाही हं. किन्वा उपमा खूप रेसिपीज आहेत युट्युब वर. याची त्या बेचव ओट्सशी तुलना करू नका.
नारळी किन्वा पाकृ पण आहे मायबोलीवर अस्मादिकांची. घरी हिट आहे. म्हणजे एकदम काही भन्नाट चव वगैरे नाही, जसे पोहे, उपमा, शिरा वगैरे पदार्थ असतात त्या प्रकारात मोडणारी चव आहे शिजवून केलेल्या किंवा पदार्थांची.
किन्वा शिजायला वेळ लागतो १५ मिनिट आसपास. नीट शिजल्याची खुण म्हणजे त्याला कोंब फुटल्या प्रमाणे दिसु लागतो. ही खुण लक्षात ठेवा.
(चव चांगली असली तरी केवळ कोणी त्याला पौष्टिक म्हटले म्हणुन नको वाल्यांनी दुर्लक्ष करावे या पोस्टकडे.)
ओके धन्यवाद मानव, धनी, आंबट
ओके धन्यवाद मानव, धनी, आंबट गोड
उपमा एकदा करून पहावा नारळी रेसिपी ने.
मला ओट चं टेक्श्चर चावायला आवडतं.म्हणजे सगळं जे खायला वेळ लागेल ते आवडतं.(ब्राऊन राईस, ओट, तो युरोप मध्ये मिळतो तो खडबडीत कडक होल व्हिट ब्रेड, इथेही बेकर्स डझन मध्ये मिळतो.)
मी quinoa तांदळा त mix करून (
मी quinoa तांदळा त mix करून ( म्हणजे भात करायला घेताना, 1 वाटी तांदूळ तर पाव ते अर्धी वाटी quinoa) नेहमी प्रमाणे भात करते. अजिबात कळत नाही.
ओके भात, हेही करून बघायला हवे
ओके भात, हेही करून बघायला हवे.
किन्वा चा गुळाचा शिरा ओके लागेल का?प्रयोग करून बघेन.
इतर काही करून बघण्या आधी उपमा
इतर काही करून बघण्या आधी उपमा करून बघा,
तो जमला आणि ओके वाटला तर पुढचं काही करून बघा असं सुचवेन.
व्हीडिओ लिंक देतो शोधून, आधी त्या नुसार करायचो.
----
आता एवढे व्हिडीओज आले आहेत त्याचे, ती सापडणे कठीण.
पण जवळपास जाणारी ही.
यात फोडणी करताना आवडत्या भाज्या घालणे हा एक ऑप्शन.
माझी मिलेट पुलाव रेसीपी बघा.
माझी मिलेट पुलाव रेसीपी बघा. गणपती उत्सवातली एंट्री. सात आठ तास किन्वा भिजत घालून मग त्या रेसीपीने पुलाव बनवा. गरम खा मात्र तूप घालुन.
ओके धन्यवाद अमा,मन मोहन
ओके धन्यवाद अमा,मन मोहन
इथे काही रेसिपी मिळाल्या, त्या करून संपेल.फार नाहीये तसा.
हो मानव, ट्राईड रेसिपी लिंक मिळाली तर उत्तम.
किन्वाचा उपमा चान्गला होतो,
किन्वाचा उपमा चान्गला होतो, किवा रेसिपीप्रमाणे शिजवुन थन्ड करुन दही बुत्ती पण चान्गल लागत...
(शिजवुन मात्र निट घ्यायचा).
साबुदाणा खिचडी टाइप करायचा असेल तर आधि किन्वा शिजवुन थन्ड करुन मोकळा करायचा मग तुप्,जिरे फोडणी,दाण्याचा कुट रेग्युलर प्रोसेस ...सेम अर्थातच लागणार नाही.
अनु, उपमा करुन पाहा, पण
अनु, उपमा करुन पाहा, पण चवीबद्दल फार अपेक्षा न ठेवता!!
किन्वा मिलेट्स मधे मोडतो का?
किन्वा किंवा राळे,

चवीत नाहीत निराळे!
मी मागे 3 मिलेट विकत घेऊन
मी मागे 3 मिलेट विकत घेऊन भाकरी चे पीठ बनवायचे(मग आमच्या मावशींनी इस्केलेशन केले भाकरी लवकर कडक होतायत म्हणून, तेव्हा मग नॉर्मल ज्वारी वर आलो), त्यातले एक किन्वा सारखेच होते.बहुतेक राळे असेल तेच.
मिलेट वापरता ना गोल्डन रूल
मिलेट वापरता ना गोल्डन रूल म्हणजे सात आठ तास भिजवायचे. रागी मुद्दे रेसीपी बघुन घ्या. भाकरी कडक होत असतील तर मुद्दे सारखे काही बनव ता येइल . रागी मुद्दे कशाही बरोबर खातात. व्हेज करी, मटन चिकन वगैरे.
ओके, भिजवून बघेन एकदा.
ओके, भिजवून बघेन एकदा.(मिलेट आणले की)
प्राजक्ता, अलसो धन्यवाद.
मिलेट्स भिजवुन दोसा हा
मिलेट्स भिजवुन दोसा हा मिलेट्स मधला सगळ्यात टेस्टी प्रकार वाटला, नंतर इडल्या नंतर मिलेट्स पुलाव/ खिचडी/मिलेट्सचा साधा भात सांबार.
(सहा वर्षांपासुन खातोय.)
मिलेट्सच्या पोळ्या/भाकऱ्या घरी केल्या नाहीत कधी, रेस्टॉरंट मधल्या आवडल्या नाहीत.
मिलेट्स भिजवुन दोसा हा
मिलेट्स भिजवुन दोसा हा मिलेट्स मधला सगळ्यात टेस्टी प्रकार वाटला, नंतर इडल्या नंतर मिलेट्स पुलाव/ खिचडी\ठेला पुलाव >>>> +१
मायबोलीवर किन्वा बरोबर
मायबोलीवर किन्वा बरोबर आनंदाने नांदणारे कोणी आहे का?>>> हो मी केलेय प्रयोग. दाल खिचडी प्रमाणे करा, त्यात १ मोठा चमचा नारळ दूध & नॉर्मल आलं लसूण कांदा, टोमॅटो जसे मसाला खिचडी करतात तसे घाला. भाज्या आवडीप्रमाणे, ओन्ली रीप्लेस राईस विथ किन्वा. पाव भाजी मसाला घाल. शिजायला जरा वेळ ज्यादा लागतो. शिजत आले की वरून तूप/बटर घाल.
ह्या मेथड ने केल्यास मुलं पण खातात असा अनुभव आहे, पण तरी राईस वालीच कर नेक्स्ट टाईम ही टिप्पणी असते पण
ओके आशु, नोंद किया है(अर्ज
ओके आशु, नोंद किया है(अर्ज किया है सारखं)
रात्री टीपापा करणी येतील
रात्री टीपापा करणी येतील त्या भरपूर रेसीपी सांगतील. वाहत्या धाग्यावर वाचल्या आहेत.
1) https://iheartvegetables
1) https://iheartvegetables.com/instant-pot-mexican-quinoa/
2)https://www.maayboli.com/node/24483?page=3
किन्वा ची साबुदाणा खिचडी
किन्वा ची साबुदाणा खिचडी सारखी रेसिपी आहेच इथे.
भारतातले बहुतेक मिलेट्स तृणवर्गीय, एकदल असतात. राजगिरा अपवाद कारण राजगिरा द्विदल आहे . किन्वा॑ देखील द्विदल आहे. अमेरिकेत बरेचदा स्युडो ग्रेन म्हणतात किन्वाला.
शोनू +१
शोनू +१
किन्वा भातासारखाच दुप्पट पाणी घालून शिजवायचा. एकदा शिजला की एकदम व्हर्सटाइल प्रकार आहे. नुसतं दूधसाखर घालून खीर/लापशी खा, किंवा भाज्या घालून उपमा/खिचडी करा, तूप जिर्याची फोडणी घालून किखि करा, बारीक चिरलेले कांदा-टोमॅटो-काकडी-कोथिंबीर-हिरवीमिरची आणि लिंबू-मीठ-साखर-चाट मसाला घालून सॅलड म्हणून खा.
वर कोणीतरी लिहिलंय तसं अर्धे तांदूळ आणि अर्धा किन्वा असाही छान लागतो - ग्रेव्हीमधल्या कुठल्याही मीट किंवा भाजीशी खाता येतो.
शिजवून मग अव्हनमध्ये भाजूनही खातात. इथे कधीकधी तयार सॅलड किट्सबरोबर पुड्या मिळतात तशा टोस्टेड किन्वाच्या - मस्त लागतात. तशा (लाही फुटत नसावी, पण प्रोसेस तीच!) लाह्यांचा चिवडा वगैरेही करता येतो. इथे इन्डियन ग्रोसरी स्टोअरमध्ये पाहिले आहेत वेगवेगळे फ्लेवर्स.
अगदी बहुगुणी आहे.
एक दोन प्रयोगांत तुम्हाला किती पाणी घातलं की इन्टेन्डेड रेसिपीनुसार गिच्च ते मऊ ते फ्लफी शिजतो त्याचा अंदाज येईल.
ओके, सर्वांना धन्यवाद,
ओके, सर्वांना धन्यवाद, सर्वांचे आभार. पुढचा किन्वा प्रयोग विकेंड ला करून इथे शेअर करेन.
इन्टरनेटवर बर्याच रेसिपीज
इन्टरनेटवर बर्याच रेसिपीज मिळतील. ही एक वानगी.
आशु मला समजलं नाही काय
आशु मला समजलं नाही काय विचारायचं आहे ते, खवटपणा असेल, तर रोपं त्या त्रासावर मात करत असावीत, जे खाऊन आपल्याला कदाचित त्रास होईल तो रोपांना होत नसावा असं वाटलं मला.
अन्जू, खवट चव आपल्याला येते
अन्जू, खवट चव आपल्याला येते ना, रोपं चव कुठे घेणार, म्हणून ते रोपांना त्रास होत नसावा हे मला उपरोधिक वाटले
नाही नाही उपरोधिक नाही
नाही नाही उपरोधिक नाही
अनु, किन्वा मी नेहमी करते. मी
अनु, किन्वा मी नेहमी करते. मी सगळ्या भाज्या परतुन त्यात किन्वा टाकुन एक दोन शिट्ट्या घेते. याच रेसिपिने करते नेहमी. प्रयोग नाही करत. मसाले वेगवेगळे टाकते फक्त. जसे कि फ्राईड राइस मसाला, कांदा लसुन, किंवा मग मॅगी मसाला.
राजमा, छोले केले कि फक्त भाता सारखा शिजवुन त्याबरोबर खाते.
ओके धन्यवाद पेरू आणि इतर
ओके धन्यवाद पेरू आणि इतर किन्वा एक्सपर्टस.तिळासारखा वास काल जाणवला डब्यात भरताना.पण इथे सांगितलेल्या अनेक रेसिपीज वापरून पाहते.पर्सनली किन्वा भातासारखा शिजवून छोले राजमा बरोबर खाणे किंवा उडीद वापरून नेहमीचे 1 रात्र भिजलेले डोसा बॅटर करून वापरणे हे पर्याय आवडले आहेत.
मला वाटतंय आपण आता आणायला
मला वाटतंय आपण आता आणायला गेलो एक आणि आणले भलतेच..!
काय म्हणतेस mi_anu
असा पण एक धागा काढूया
किन्वा चा वेगळा धागा असेल
किन्वा चा वेगळा धागा असेल आधीच.
किन्वा नसेलही
किन्वा नसेलही
(No subject)
(No subject)
किन्वाचा धागा आहे वेगळा.
किन्वाचा धागा आहे वेगळा. राजगिर्याची उपासाची खिचडी करतो तशी ती किन्वुदाणा खिचडी लागते. मी गेल्या २-३ वेळा रेडिओ भातात १:१ तांदूळ आणि किन्वा घातला होता. अजिबात कळत नाही सगळा तांदूळ नाहीये. डाळ-तांदळाची खिचडी करतो त्यात पण किन्वा मस्त लागतो. आपण एरवी ज्या प्रमाणात भात/पोळी खातो तेवढ्या पोर्शनमध्ये एकदम किन्वा खाऊ नये, दमानं खावा.
ओके, म्हणजे थोडा थोडा मिसळून
ओके, म्हणजे थोडा थोडा मिसळून बेताने वापरायला हवा, म्हणजे त्याची चव बाकी गोष्टी ओव्हर पॉवर करणार नाही.
धागा शोधते.
हे काही धागे मिळाले.
https://www.maayboli.com/node/47546
https://www.maayboli.com/node/48939
https://www.maayboli.com/node/48764
https://www.maayboli.com/node/84192
https://www.maayboli.com/node/21639
https://www.maayboli.com/node/45269
https://www.maayboli.com/node/63584
https://www.maayboli.com/node/51743
https://www.maayboli.com/node/24483
पण चव मास्क करून, किन्वा
पण चव मास्क करून, किन्वा घातलाय की नाही कळणार सुद्धा नाही असे प्रकार करून किन्वा खाण्याचा अट्टाहास कशाला?
ते काही सुपरफूड वगैरे नाही. पौष्टिक खायचे असेल तर इतर कितीतरी पर्याय आहेत.
चव आवडली तर खावा नाहीतर ढिश्क्यांsव करावे.
जरा उग्र वास असतो, तीन वेळा धुवून, मग भाजून तो जातो.
अट्टहास नाहीये हो
अट्टहास नाहीये हो
एकदा करून पाहू म्हणून आणलेले संपवायचे आहे.आम्ही असे प्रयोग करत असतो.देशी विदेशी दोन्ही.ओट आणि चिया शी चांगली मैत्री झाली.अव्होकाडो स्वस्त असेल त्या सिझन मध्ये ग्वाकामोले बनलं, आवडलं.किन्वाशी मैत्री होते का बघायचं.नाही झाली तर करंट साठा संपवून बाय बाय.
किन्वाच्या पाकिटावर प्री
किन्वाच्या पाकिटावर प्री वॉश्ड लिहिलेले असले तरी मी तो परत एकदा धुवून घेते. बिर्याणी-पुलाव मसाला आणि भरपूर भाज्या घालून पुलाव करते किंवा टेक्स-मेक्स सिझनिंग, कांदा, सेलरी, बेलपेपर, टोमॅटो ( अगदीच वेळ नसला तर बाटलीतला साल्सा) वापरुन शिजवते. काही वेळा अर्धवट शिजत आला की त्यातच ब्लॅक बिन्स घालते . मी आधी स्टोव टॉपवर नुसताच शिजवत असे मग कळले की आज्या मंडळी प्रेशर कुकरमधे शिजवतात, त्याचे काहीतरी कारण आहे ते आता नीट आठवत नाही.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/77731
हा एक माझा धागा. किन्वाची खिचडी.
स्वातीताई पोस्ट मधला पुलाव आवडला, करून बघेन.
चव मास्क करून, किन्वा घातलाय
चव मास्क करून, किन्वा घातलाय की नाही कळणार सुद्धा नाही असे प्रकार करून किन्वा खाण्याचा अट्टाहास कशाला? >>>
प्लॅन्ट-बेस्ड प्रोटिनसाठी किन्वा एक चांगला पर्याय आहे म्हणून आणायचा आणि मग आणलाच आहे तर संपवायचा. मसालेभातासारखा अस्सल मराठी प्रकार किन्वा घालून केला तर खाणारे (म्हणजे मीच) नाकं मुरडतात म्हणून चव कळणार नाही ही दवंडी. बाकी, जरा एखादं फॉरेन फुड आणल्याचं समजलं तर लगेच त्यावर फुली मारायचा अट्टहास का? तसा किन्वा राजगिर्याच्या कुळातला त्यामुळे अगदीच फारिन नाही.
फारिन फुड वर काट मारायचा
फारिन फुड वर काट मारायचा अट्टाहास नाही, ती चव मास्क करुन/ कळणार नाही हे करुन खाण्याच्या अट्टाहासावर काट मारण्याचा मात्र आहे.
किन्वा खायचा असेल तर जरुर खावा. तो ब्लँड लागतो त्यामुळे गळी उतरेलच पण तो चांगला लागतो वगैरे गळी उतरणे कदापि शक्यच नाही. कारण तो चांगला लागत नाही. नाही म्हणजे नाही. आम्हाला चांगला लागतो कोणी म्हटलं तर ते खोटं बोलताहेत मिलॉर्ड!
मला किन्वा मुगडाळीची खिचडी
मला किन्वा डाळ तांदूळ खिचडी करुन खातो तशी करुन खायलाच आवडतो फक्त. साबुदाणा खिचडी सारखे उद्योग मला करवत नाही. साखि ही साखिच. त्याला पर्याय नाही.
Pages