युक्ती सुचवा युक्ती सांगा -भाग ४

Submitted by मेधा on 1 December, 2021 - 09:24

आधीच्या धाग्यावर २००० पेक्षा जास्त पोस्टी आल्या म्हणून हा नवा धागा

आधीच्या धाग्यांचे दुवे :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा -३ https://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतर पर्याय उपलब्ध झाल्याने फराळ व हिंदू मिठाई - श्रीखंड बासुंदी गुलाबजामुन आउटडेटेड होत आहेत. तिखटालाही चायनीज , मोघली असे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

शिवाय ते करायला फार वेळ लागतो , त्यापेक्षा 100 रु फेकले की बाजारात मूठभर मिळते , तसेही आताच्या 40 नंतरच्या बायका करियर ओरिएंटेड असल्याने हे सगळे येत असणार याची शक्यता कमी आहे. वेळही नाही , आणि करायचेच म्हटले तर 3 माणसांच्या घरात किती आणि कधी करणार ?

यावर्षी मीही ड्रायफ्रूट देणार होते.जास्त चिकित्सा झाली.मग कंटाळून मिठाईचे बॉक्स दिले.बिग बास्केटला ड्रायफ्रूटसाठी छान ऑफर होत्या.

मी शनिवारी दुपारी मिसळ पाव केला,तर पाव राहिले मग शिल्लक पाव संपवायला बटाटे वडे केले,मग पाव सम्प्ले नि वडे राहिले,मग रस्सा वडा केला तर covering साठीच बेसन पीठ शिल्लक राहिलं शेवटी त्यात कांदा बटाटा घालून भजी केली .........husssssh

बाप रे मनीमोहोर, मी पण अगदी तशीच होते. आईला खूप त्रास दिलेला आठवतो. तिळगुळाचे लाडू किंवा इतर कोणतेही लाडू ‘तिच्याच हातचे’ आवडायचे मला. पुडाच्या वड्यांवरून भांडले होते तिच्याशी, सगळ्यांना देऊन संपवून टाक. आमच्यासाठी ठेवूच नको, म्हणून.

मीपण होते अशी, पण आईनेच न बोलता सरळ केलं आम्हाला. आणि बाबांना अजिबात आवडत नसे अन्नाला नावं ठेवलेली. आणि नोकरीमुळे आई रोज उठून खास करून संध्याकाळी सटरफटर खाणं करून देऊ शकत नव्हती त्यामुळे घरगुती ऑर्डर घेणाऱ्या काकूंकडे कधीतरी लाडूंची, खोबऱ्याच्या वड्यांची ऑर्डर असे. वेळ होईल तेव्हा आईपण करायची, पण बाहेरून आलेल्या अन्नालाही बोल लावायचा नाही. मग चोचले आटपलेच आमचे. मग हॉस्टेलवर राहून तर आनंदीआनंद. "नाकझाडी नुसती" असं म्हणायची आई मला.

ते सगळे लाडू मिक्स करून भाजून घेतलं मिश्रण. थोडी गुळाची पावडर, भाजलेल्या तिळ-दाण्याचा कूट बाईंडींग करता घालून अशा झाल्या. इति. बेसनलाडू पुराण समाप्त Proud अर्धी कणीक अर्धा मैदा घेतला होता पोळ्यांसाठि.

unnamed_1.jpg

मस्तच झाल्यात ...न संपणाऱ्या गोष्टी संपवण्यासाठी घेतलेल्या कष्टांना आणि कल्पना शक्ती दोन्हीला सलाम.

हा हा धन्यवाद मंडळी.... पोळ्या संपायला आल्या नशीब १५-२० च केल्या होत्या, आगीतून फुफाट्यात नको म्हणून. नाहीतर या उरलेल्या पोळ्यांच काय करू म्हणून विचारावं लागलं असतं Proud Lol

हाहाहा.

मी लाडू वगैरे फार खात नसले तरी संपवायचे टेंशन नसते. नवरा, मुलगा खातात.

मस्त दिसताहेत पोळ्या!
बेला चमचाभर तूप घालून मावेत ३० सेकंद गरम करून खाणे हा फार आवडता प्रकार आहे. अर्थात घरचे आईनी केलेले असतील तर नुसतं तूप. पण कुठले दुसरीकडले असतील तर मग जरा मॉडिफाय करायला लागायचे गरम करतांना.

ब्लॅक कॅट,

उरलेला कॉर्नफ्लेक्स चिवडा असेल तर तो भरडून ब्रेडक्रम्स सारखा वापरता येतो. आणि उरलेल्या चकलीची शेव भाजी मस्त होते Wink

धन्यवाद मंडळी Happy

उरल्या तर उरलेल्या पोळ्यांना फोडणी देऊन फोडणीची पोळी करू शकता.>>>>>>>> Lol पोळीचा लाडू नाहीतर Wink

असे उरलेले चिवडा चकली घालून पराठे होतील का बघा>>>>>>>>>>>> चिवडा चकली समहाऊ उरत नाही Proud

पोळीचे लाडू माहित होते. लाडवांच्या पोळ्या! Lol ही झाली आपली लाडू-पोळी ड्युअ‍ॅलिटी. मांजर आहे का? नसेल तर पाळा आणि मग नोबेलला करुन टाका अप्लाय! Proud

लाडूपोळ्या हा उरक दांडगा आहे हे खरं, पण बेसन पोळी ही मूळ रेसिपी आहेच की! खवा पोळी, बेसन पोळी, गूळ पोळी या रेसिप्या माझ्या साबांकडच्या पुस्तकात आहेत.

आधीच बेसन , मग त्यात कणिक , त्यावर तूप

जिच्या घराबाहेर 50 फुटावर आड आहे आणि घरातल्या 10 लोकांसाठी शेंदून पाणी भरते , ती , किंवा 10 लोकांसाठी जो रोज लाकडे फोडतो, तो , असे सगळे पचवेल

Proud

इतरांनी नाद करू नये

धड पोळी लाटली नाही नि सारण कडेपर्यंत नाही गेलं तर तसंही "अनस्टफ्ड-क्रस्ट पिझ्झा" इंटर न्याशनल लेवलला जातंय... उगा त्या "स्टफ"पायी मागे नको पडायला...

असे उरलेले चिवडा चकली घालून पराठे होतील का बघा>>>>>>>>>>>> चिवडा चकली समहाऊ उरत नाही Proud>>>> बेला उरले तसेच काहीलोकांकडे चकलीचिवडे उरत असण्याची शक्यता आहेच ना .... त्यांच्याकरता युक्ती सुचवून ठेवली.....

Swasti,
तेलात /तुपात बेसन भाजून तिखट mix करा.बारीक चिरलेली कोथिंबीर,कांदा घालून तिखट पोlya करा.

चिवडा चकली उरले तर कांदा बिंदा घालून भेळ बरी होते.

बाकी कुठल्याही बेचव किंवा गोड नसलेल्या पदार्थांना कवेत घेण्यासाठी धालिपिट अथवा कटलेट बरं पडतं.
माझी आई तांदुळाच्या खिचडीतही बरीच भेसळ करायची.

आज ओट उडीद आप्पे केले
उडीद ओट भाजले, मग मिक्सरमध्ये बारीक केले.कांदा लसूण मिरची आलं वाटलं.आणि मग पाणी दह्याबरोबर मिसळून आप्पे केले.
चवीला चांगले झाले.पण तेल जास्त लागते आहे.यापुढे करणार नाहीये.
आम्ही नेहमी उडीद ओट डोसे करतो.ते चांगले होतात.
मला ओट दूध फळं आवडतात.

मेधावि, भेळ थालीपीठ/पराठे सर्वसमावेशक! मुलं तर म्हणायची आमच्याकडे कशाचेही पराठे करून मिळतील Happy

भेळ थालीपीठ/पराठे सर्वसमावेशक >>> + १०००० .
मी बरेच्दा , पराठे , कटलेट , मिक्स भाजी , थालीपीठ यात उरल सुरलं काहीबाही ढकलत असते .
खरतर , अशा उरलेल्या पदार्थांमधून नविन पदार्थ बनवण्यासाठी वेगळा धागा हवा Wink .
re-constructed साठी.

आवळ्याचे लोणचे करण्यासाठी कच्च्या आवळ्याचे काप केले होते, दिरंगाई झाल्या मुळे त्या फोडी लालसर झाल्या आहेत. काय करावे ? करू की नको लोणचे?
(नाही केले तर नवर्याच्या कष्ट वाया जातील) लयचं मोठ्या पेचात पडले राव!! Sad

माझ्या मते करायला काहीच हरकत नाही, तरी इतर कोणी नीट सांगतील. नाहीतर मीठ लाऊन वाळवा, सुपारी होईल. वाळवणार असाल तर सोबत आल्याचे पण थोडे तुकडे मिक्स करा, भारी लागेल.

हो यम्मी लागेल. मी श्रीरामपुरला असताना वर गच्ची होती म्हणून आलं आवळा सुपारी करायचे. हिंग वगैरे नाही लावायचे, मिरपुड कधी मिक्स करायचे. उपासाला चालायची ना अशी. उपास असला की बाकी बडीशोप वगैरे खाता नाही येत. पित्त होऊ नये म्हणून ही चघळली की झालं काम. हिंग चालत नाही ना उपासाला.

Pages