Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.
सो, हा आहे दुसरा धागा.
चला, चर्चा करुया!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिनलला कित्ती ओरडले आज.
मिनलला कित्ती ओरडले आज. विकासला मात्र " तुसुद्दा अति बोललला" एवढच बोलले.
विशालने २५ लाखान्वर दावा केला होता त्यावर काहीच कमेण्ट नाही.
मीनलने ' आय लय यू, सोना" लिहिले होते का लव यू' ऐवजी?
मागच्या चावडीवर म मां मीनलला
मागच्या चावडीवर म मां मीनलला जरी अति बोलले होते तरी तिने त्यावर react व्हायला नको होतं. त्यामुळे त्यांना कोलीत मिळाले. बिचारी मीनल, तिला पाचवर पण ठेवतील आता.
सोना evict झाली म्हणतात, कशी काय. वोटिंग मध्ये दुसरी होती. तिला कसं काय काढू शकतात. मीरा यावेळी जायला हवी होती.
विशालला आता एक नंबरवरुन कोणी खाली आणू शकत नाही, जबरदस्त फॅन्स आहेत त्याचे आणि त्याने ट्विटस मध्ये शिवलाही मागे टाकले.
वोटिंग मध्ये दुसरी होती.
वोटिंग मध्ये दुसरी होती.
>>> हे कसं कळले?
मीनलने ' आय लय यू, सोना"
मीनलने ' आय लय यू, सोना" लिहिले होते का लव यू' ऐवजी?>>> लय लव यू असं लिहिलं होतं.सोनाचं खास वाक्य आहे ते..
सोना डाव्या हातानेच जेवताना
सोना डाव्या हातानेच जेवताना दिसते कायम.
काल विकास न राहवून म्हणालाच
काल विकास न राहवून म्हणालाच शेवटी मांजरेकरांना की तुम्ही गेम जरा जास्तच फोडता
मांजरेकरांनाही ते थोडेफार पटलेले दिसले..... इतर ठिकाणांहूनही त्यांना हा फीडबॅक मिळालाच असणार!!
एकूणच बिगबॉसच्या होस्टना
एकूणच बिगबॉसच्या होस्टना त्यांच्याविरुद्ध काही बोललेले आवडत नाही..... लगेच मनावर घेतात..... सलमान काय नि मांजरेकर काय!!
आणि घरातले स्पर्धक पण अगदी अश्या ठिकाणी कणाहीन वागतात..... बोललेली तर बोललेली ना मीनल..... तिने तोच स्टॅंड कायम ठेवला असता तर मोठी झाली असती लोकांच्या नजरेत.... भले मग न का जिंकूदे शो!!
तुम्ही आमच्याबद्दल व्यक्त केलेली मते आम्हाला दरवेळी पटतातच असे नाही तसेच आम्ही तुमच्याबद्दल व्यक्त केलेली मते तुम्हाला पटलीच पाहिजेत असे नाही..... Lets agree to disagree इतका सिंपल स्टॅंड का घेता येत नाही लोकांना? त्यात काय होस्टचा अपमान होत नाही. शांत पण संयमी सुरात हे सगळे मांडता यायला हवे...... पण अश्यावेळी सगळे एकदम लाचार मोड मध्ये जातात आणि का आपण लोक यांना इतका सपोर्ट करतो असा प्रश्न पडतो!!
अजूनही त्यातल्या त्यात विकासच आवडतोय
सोनालीने माझ्यावर गाणे म्हणत नाही, भूक लागतीय वगैरे काहीच्या काही चालू केले काल
तरीही सोनालीला बाहेर दिसणारा सपोर्ट बघता ती जर का उत्क्या आणि मीराच्या आधी बाहेर पडत असेल तर eviction फक्त आणि फक्त वोटींगवर होत नाही हे म्हणायला नक्कीच भरपूर वाव आहे.
सोनालीला का म्हणे इतका सपोर्ट
सोनालीला का म्हणे इतका सपोर्ट बाहेर? पिरपीर तर करत असते सारखी. आधी किचनच्या कामावरुन... मग विशालला .. अन आता मिनलला! कुठलाही विषय घट्ट पकडुन ठेवते डोक्यात. ती वेडी मिनलही तिचे इतके मन धरते. सोड ना म्हणावं! तसही मिनल इतर फालतु गोष्टी डोक्यात ठेवत नाही. कालही सकाळपासुन सुरु झाले. ती मिनल इतकी म्हणतेय तिला.. सोड ना बाई, तिथल्या तिथे विषय विसर! तरी आपलं हिचं सुरुच.
मला तर काय कळलेच नाहीये. गेल्या दोन एपिसोडपासुन सगळेच काय मीनलच्या डोक्यात हवा गेलीय अस म्हणत आहेत. कधी ती असे गर्वाचे बोल बोलली?... अन असेलही तर या दोघांच्या वागण्याने जो उद्वेग होतो त्यात बोलली असेल. तिच्यापेक्षा जय-मीराला किती माज होता.
मला चालेल .. ती अन उत्क्या गेलेले.
विशाल, मीनल, विकास, जय, मीरा.. हे पहिल्या पाचात ठिक आहे. किंवा विशाल, मीनल, जय, विकास, मीरा.. जर बिबॉला जयला पहिल्या तिनात आणयचे असेल तर.
पण बिबॉच्या घराचे लाईट मात्र विशाल, मीनलनेच दिमाखात बंद कराय्ला हवेत.
काल मांजरेकरांची शिवानी
काल मांजरेकरांची शिवानी सुर्वे झाली होती मीनलच्या बाबतीत. राईचे अनेक पर्वत केले.
अजून एपिसोड पाहिला नाहीये
अजून एपिसोड पाहिला नाहीये कालचा.
पण मिनल ज्यावेळी बोलली होती की टीम A ला बुस्ट केलं वै त्यावेळीच ते पचवणं कठीण होतं ममाना हे वाटलेलं.
नाही पटलं तर आणि ते बोललं गेलं तरी राग का आला हे नाही कळत. तरी सगळेच कंटेस्टंट चावडीनंतर झालेल्या विषयावर चर्चा करताना जपून बोलतात.
चावडीवर ममाना अजून elaborate करण्यासाठी आजवर फक्त विशालच बोलला असेल बहुतेक. स्नॅप करतोस असं बोलले त्या एपिसोड मध्ये.
A टीम चावडी आणि त्यातील विषयावर फार जपून चर्चा करतात. समजून घेतात समोरच्याला काय म्हणायचं आहे ते. पहिल्यांदाच B टीम ने सर असे का बोलले ते कळालं नाही इतकंच स्टेटमेंट दिलेलं.
मग
महागुरु नाहीयेत हे वाचून हायसं वाटलं.
Btw, मिनलला sympathy मिळून जाईल का ह्यामुळे?
मेघाला देखील बरच बोललं जायचं शेवटी शेवटी.
त्यामुळे तिला विनर करतील की नाही अशी शंका होती तेव्हा देखील.
सोनाली खरतर आधीच जायला पाहिजे
सोनाली खरतर आधीच जायला पाहिजे होती .कटकट आणि पिरपिर करण्याव्यतिरिक्त काहीही करत नव्हती.मुद्देसूद बोलता येत नव्हत,कुठेही हसायची,कधीही भांडायची.
सोनाली एवजी नीथा
तुपारे एवजी त्रुप्ती
दादूस एवजी आदिश
हे असायला हव होत,मजा आली असती.
पण या कंटेंट देणार्यांना किंवा खेळणार्यांना काढून न खेळणार्यांना यावेळी बिबॉसने जास्त दिवस का ठेवल ते कळत नाही.
विशाल ,जय, मिनल हे टॉप 3 असतील.पण जय आणि विशाल लाईट्स बंद करतील ,अस वाटत आहे.
कारण कितीही निगेटिव्ह आसला,तरीही बिबॉसला अपेक्षित असलेला कंटेंट आणि टीआरपी मीरा आणि जयनेच दिला हे सत्य आहे.
तरी बघू,कलर्स त्यांच्या फेससाठी म्हणजे विकाससाठी अडून राहत का?
आजच्या भागात अंकुश
आजच्या भागात अंकुश chaoudharee येणारे.आपल्या मायबोलीकर धुंद रवी (रवींद्र मठाधिकारी) लिखीत लकडाऊन चित्रपटाच्या प्रोमो करता...
आता विकासला मीनल
आता विकासला मीनल त्याच्याबद्दल बोलत असल्याची चुगली आली आहे.
मीनलला पाडायचा आणि इमोशनली तोडायचा पद्धतशीर डाव वाटतोय आता.
वोटिंग मध्ये दुसरी होती. >>>
वोटिंग मध्ये दुसरी होती. >>> दोन ठिकाणच्या यूट्यूब vlogs मुळे, ते म्हणतात voot कडून वोटिंग ट्रेंडस आलेले आहेत. आता ख खो काय माहिती पण मीराला सर्वात कमी होते अस समजलं. मागच्यावेळी मला मीरा आधी गा दा जायला हवी होती म्हणून मी मीराला वोटिंग केलेलं, यावेळी मला सोना हवी होती होती. अर्थात मी कोण ठरवणारी म्हणा, हाहाहा.
Btw, मिनलला sympathy मिळून जाईल का ह्यामुळे? >>> नाही वाटत तसं. विशालचा एक नंबर कोणीच घेऊ शकत नाही ही आता काळ्या दगडावरची रेष आहे पण मीनल आणि विकास दुसरे येऊ नयेत, जय यावा यासाठी चाललंय सर्व वाटतं आता.
काल विकास न राहवून म्हणालाच शेवटी मांजरेकरांना की तुम्ही गेम जरा जास्तच फोडता >>> झालं आता याला म मां पाचवा ठेवतील. कलर्सने हस्तक्षेप करायला हवा आता.
आजच्या भागात अंकुश chaoudharee येणारे.आपल्या मायबोलीकर धुंद रवी (रवींद्र मठाधिकारी) लिखीत लकडाऊन चित्रपटाच्या प्रोमो करता... >>> अरे वा अभिनंदन धुंद रवी आणि सायली, नानबा.
चुगली पहिली... चुकीचे काय
चुगली पहिली... चुकीचे काय त्यात.. मीनल बरोबरच बोलली.. विकास हा मीनल, विशाल आणि सोना मुळेच इथपर्यंत आलाय...
त्याचा स्वतःचा काय मुद्दा होता आतापर्यंत... ना टास्क मध्ये पुढे ना मुद्द्या मध्ये...
दोन ठिकाणच्या यूट्यूब vlogs
दोन ठिकाणच्या यूट्यूब vlogs मुळे, ते म्हणतात voot कडून वोटिंग ट्रेंडस आलेले आहेत.>>> voot कसं जाहीर करेल व्होटिंग ट्रेंड? आणि केले असते तर आपल्या सगळ्यांना दिसले असते. हे युट्युबर लोकांनी बघावं म्हणून काहीही सांगून दिशाभूल करतात. मागे पण दादूस आदिशच्या वेळी असंच केलं होतं त्यांनी. आता बिग बॉस संपला की यांचा बाजार उठणार आहे म्हणून शेवटच्या आठवड्यात बनवा काहीपण व्हिडिओ आणि पाच पैशे जास्त पदरात पाडा असं सुरू आहे.
बोकलात प्लस वन
बोकलात प्लस वन
हे युट्युबर्स ट्विटर वर सर्वे करतात आणि रँकिंग ठरवतात ...
सोना कटली
सोना कटली
हे युट्युबर लोकांनी बघावं
हे युट्युबर लोकांनी बघावं म्हणून काहीही सांगून दिशाभूल करतात. >>> असेलही तसं. मी एक दोन किंवा जास्तीतजास्त पाच मिनिटांचे vlogs असतील तर बघते.
सोना कटली >>> ओहह.
Mid week elimination..voting
Mid week elimination..voting lines open.
बुधवार दुपारी बारापर्यंत
विकासने मस्तं फिडबॅक दिला म
विकासने मस्तं फिडबॅक दिला म.मांना त्यांच्या होस्टिंग बद्दल

विकास खरच बरोब्बर प्रेक्षकांच्या मनातलं बोलतो, यासाठी त्याला स्पेशल प्राइझ द्या !
मीनलला उगीचच बॅश केलय पण तिच्याकडे उत्तर द्यायला फारसे शब्द नव्हते.. आय् होप सिंपथी वोट्स मिळतील तिला /मिळावी म्हणून बॅश केले !
सोनाली कित्ती मस्तं , कित्ती क्युट दिसत होती, मला तिचं बोलणं , कोल्हपुरी ठसका फार आवडतो तिला भरपूर काम मिळु देत !
ग्रोन आप कपलचा सैराट २.० काढला तर सोनाली आर्ची म्हणून फिट्ट बसेल , तस्साच स्वॅग आहे तिचा.. मस्तं करेल ती !
परश्या म्हणून विशाल चालून जाईल
एप्रिलमध्ये लगेच पुढचा सीझन
एप्रिलमध्ये लगेच पुढचा सीझन आणणार असतील तर विशाल फार कमी दिवसांचा विनर राहील. शिव मात्र सव्वादोन वर्ष राहिला.
तिला भरपूर काम मिळु देत ! >>> नक्की मिळतील, वैजूचा रोल पण छान केलेला तिने.
बिबॉसला एवढा वोटिंगचा हव्यास
बिबॉसला एवढा वोटिंगचा हव्यास का?शेवटी बिबॉसला हव त्यालाच काढणार ना,मग कशालि हे मिड एव्हिक्शन च नाटक
त्यापेक्षा आजच डबल एव्हिक्शन करायला हव होत.
म्हणजे बाकीच्यांना पूर्ण आठवडा वोटिंग मिळाल असत.
त्यापेक्षा आजच डबल एव्हिक्शन
त्यापेक्षा आजच डबल एव्हिक्शन करायला हव होत. >>> हो ना.
शिव मात्र सव्वादोन वर्ष
शिव मात्र सव्वादोन वर्ष राहिला.
>>> बिग बॉस संपले कि कुत्रे विचारत नाही विनर ला... विसरतात...
डिजे +१
डिजे +१
मीनलने ममाविषयी मागच्या आठवड्यात बोलल नसत तर कदाचित काल विकासलाच भरपुर पडि मिळाली असती, काल पण मिनलला नक्कि काय उत्तर द्यावे ते कळत नव्हत पण तिला ते डोक्यात हवा गेली वैगरे अजिबात पटत नव्हत हे तिच्या चेहर्यावर स्पश्ट दिसत होत.
तो शिव मला अजिबात आवडला नाही
तो शिव मला अजिबात आवडला नाही मी काही सिझन फॉलो केला नाही,सुरवातिचे १-२ एपिसोड पाहिले पण त्यात कुणीही फार स्पार्क असलेल वाटत नव्हत त्यात शिवानी आणी बिचकुले यानी तर वात आणला होता, एवढे इरिटेटिन्ग स्पर्धक कुठेही नसतिल. बिचकुले तर थोडे मेन्टलच वाटत होते आता तिकडे हिन्दीत जाउन एकदम लो ग्रेड वागतायत.
त्यांना हिंदीत का बोलावलं काय
त्यांना हिंदीत का बोलावलं काय माहिती.
मगाशी एक प्रोमो बघितला दोन वि आणि मीनल मस्त गप्पा मारत होते.
बिग बॉस संपले कि कुत्रे विचारत नाही विनर ला... विसरतात... >>> हाहाहा पण विशालला मिळतील कामं. त्याची हाईट, personality, अभिनय सर्व शिवपेक्षा चांगलं आहे. तो आधीच मराठी सिरियल्समध्ये फेमस होत चाललेला. जयला व्हिलनचे रोल्स चांगले मिळतील. मला मीनलची काळजी वाटते, ती tallented असून करियर किती बहरेल काय माहिती. इथे दूसरा नंबर तरी देणार का तिला.
बाय द वे हे मिडविक evictionचे नाटक कशासाठी, मीनल कॅप्टन होऊनही फायनलला पहिली गेली नाहीच. फक्त विशाल फायनलला गेला. तो सोडून सर्व नॉमिनेट. बुधवार ते रविवार काय फरक पडला असता. एकेकाला रविवारी बाद करत न्यायचं. मी मीनल, विकासला वोटिंग करून आले.
शिव आणि मेघ यांचे सिझन भयानक
शिव आणि मेघ यांचे सिझन भयानक पकाऊ होते...
विनर मटेरियल नव्हतेच... मीनल जय किंवा विशाल असते तेंव्हा हे जिंकलेही नसते...
सोनाली कसली गोड दिसत होती
सोनाली कसली गोड दिसत होती एकदम्, जेन्युइनली साधी आहे ती ,गेमही तिला फारसा कळत नव्हता,छक्के-पन्जे करणारी नाही ती, तिला खरतर भरपुर वोट्स मिळत होते, बरेच सोना फॅन अनफेअर एव्हिक्शन म्हणून वुट अॅपच काढणार होते.
Pages