मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या मिराची काही वेगळी स्टोरी आहे का? आधी ती पुरूष होती व मग जेंडर बदलून घेतले अशी काही? फेसबूकवर असे काही फोटो आलेत. >>>>>>>> नाही. तिला लहानपणी मुलासारख राहण्याची आवड होती. म्हणून ती मुलान्चे शर्ट पॅण्ट घालायची, बॉयकट केला होता. बिबॉच्या प्रिमियरमध्ये सान्गितलय तिने हे. तिच्या लहानपणीच्या फोटोजमध्येही दाखवलय हे.

खरी असूदे न्युज. म मां आपल्या लाडक्या मीराला घेऊन बाहेर जाऊदेत. ते येणार होते ना घरात.

बाय द वे त्या ग्रुपमधली मीराच मला बरी वाटायची, गा दा जावी म्हणून मी तिला वोटींगही केलं, आधीही केलेलं एक दोनदा पण सोनाच्या वेळी मला ती जायला हवी होती. सोना हवी होती.

मीरा एव्हिक्ट झाली आहे ,अशी न्यूज आहे... मग खोटे असणार. आतापर्यंत अशा वावड्या खोट्या निघाल्या. दोने दिवसांनी असा काय डोंबलाचा फरक पडणारे? बर, हे पण क्लिअर आहे एव्हाना की त्यांना ज्याला जिंकवायचे आहे त्यालाच जिंकवणार मग कशाला नाटके लास्ट मिनिट एव्हिक्शनची

एकगठ्ठा कोणाला मतं मिळू नयेत म्हणून केलेली आयडिया वाटते. शिवला जबरदस्त मिळाली होतीना. आता दोन तीन दिवसांत वोटिंग करणार फायनलसाठी पब्लिक.

मिडविक मलाही आवडलं नाही, पटलं नाही पण वरची आयडिया असणार टीमच्या डोक्यात.

Spoiler.
.
.
.
.
.
.
.
.

.
..
.
.
.

मीरा एलिमिनेटेड. जय, विकास, उत्कर्ष या क्रमाने सेफ प्लेयर अनाउन्स केले. या चौघांनी शेवटी मीनल सेफ असेल असं प्रेडिक्ट केलं आणि तेच झालं.
मीराला एक पर्सनल गुड न्यूज मिळाली.

या चौघांनी शेवटी मीनल सेफ असेल असं प्रेडिक्ट केलं आणि तेच झालं.<< मीनल शेवटी ? कसे शक्य आहे? उत्क्या हवा होता तिथे. बहोत नाइन्साफी हे.

मीनल तिसरी असून danger zone मध्ये दाखवली काय. अर्थात ही ट्रिक जुनी झाली bb ची.

हुश्श मीरा गेली बाहेर.

म मां नी मिराला पिक्चर ऑफर केला असेल किंवा आपल्या डायरेक्टर टीममध्ये asst म्हणून ऑफर दिली असेल, जा मीरा जा जी ले अपनी जिंदगी.

ती उत्तम अभिनय करते, चेहेरा बोलका आहे तिचा.

तो अभिनय नसून सहज प्रतिक्रिया असाव्यात.
शेवटच्या दोन मुली दाखवायच्या असतील.
व्होटिंग लाइन्स आता ११ ला सुरू होतील. शनिवार दुपार १२ पर्यंत.

मीराच्या आईबाबांचा व्हिडिओ दाखवला की काय तिला, बरं झालं. बाबांचा विरोध होता या क्षेत्रात किंवा इथेही येण्यासाठी तो मावळला असेल तर चांगलं आहे.

विकासची जर्नी खूप वेळ दाखवली. मस्त होती.

त्याला वजीर म्हणाले म्हणजे किंग किंवा राजा विशाल होणार आणि राजा वजीर शेवटी लाईट्स बंद करणार का. त्याला मनाचा राजा म्हणाले पण असं वजीर म्हणाले बिग बॉस.

बाकी कोणाची बघण्यात इंटरेस्ट नाही.

मीरा गेल्याने तिच्या fans ची votes जय उतक्यापैकी कोणाला मिळतील काय माहिती.

मीराच्या आईबाबांचा व्हिडिओ दाखवला की काय तिला >>>>>> हो. आईबाबा आता तिला सपोर्ट करतायत. तिच फेअरवेल छान झाल.

विकास किव्वा विशाल किव्वा मिनल यापैकी कोणीही जिन्कू देत. जयला बिबॉ हिन्दी किव्वा किवा बिबॉ ओटीटी मध्ये पाठवायला हव.

बिबॉने जय आणि विकासला दिलेली शिक्षा फनी होती. ह्या सिझनमध्ये सर्वात जास्त हेच दोघे झोपलेले. मीराचा तिसरा नम्बर झोपण्यात.

ती उत्तम अभिनय करते, चेहेरा बोलका आहे तिचा. >>>>>>> अगदी अगदी झीमवाल्यान्नी अचानक हिचा पत्ता कट केला 'येकतमीना' मधून

मीराला विशाल जिन्कावा अस वाटत.

मीरासाठी गूड न्यूज ऐकून वाटल की पुन्हा तिच्यावर एव्हिक्शन प्रॅन्क करतील की काय.

प्रीकॅप पाहिल्यावर वाटतय की एक्स स्पर्धक पुन्हा येणार आहेत उद्या, ऑल दि बेस्ट करायला.

प्रीकॅप पाहिल्यावर वाटतय की एक्स स्पर्धक पुन्हा येणार आहेत उद्या, ऑल दि बेस्ट करायला. >>> स्नेहा काकू नको.

जयच्या घरचे स्नेहा बाहेर पडली म्हणून खुश झाले असतील, पण नंतर bb ने तिला मागे परत आणून त्यांच्या मनात धडकी बसवली असेल. परत पत्रकार परिषद बघूनही आणि उद्या तिला आणलं तर परत. त्यात फायनलला भेटेलच त्यांना, हाहाहा.

विकास किव्वा विशाल किव्वा मिनल यापैकी कोणीही जिन्कू देत. जयला बिबॉ हिन्दी किव्वा किवा बिबॉ ओटीटी मध्ये पाठवायला हव. >>> अगदी अगदी.

बिबॉने जय आणि विकासला दिलेली शिक्षा फनी होती. ह्या सिझनमध्ये सर्वात जास्त हेच दोघे झोपलेले. >>> हो तो शॉट बघितला, भारी होता. विकासची पंचलाईन जास्त भारी महाराष्ट्र बघतोय, तीच त्याला आकडे म्हणत म्हणायला लावली, हाहाहा.

माझा उगीच एक आपला अंदाज की ममां जाणार असतील घरात. कारण सगळे जण त्या व्यक्तीला बघून जाम एक्साय्टेड दिसले. तसेही मीराला निरोप द्यायला ममां आलेच आहेत Happy
मला जर्नी बघायला आवडल्या पण त्या आधीचे नॅरेशन फार लांबलचक आणि अगदी म्हणजे अगदी टुकार होते सगळ्यांच्याच वेळी. कोण रायटर्स आहेत काय माहित.

माझा उगीच एक आपला अं.दाज की ममां जाणार असतील घरात. कारण सगळे जण त्या व्यक्तीला बघून जाम एक्साय्टेड दिसले. तसेही मीराला निरोप द्यायला ममां आलेच आहेत >> +१
ममा अजुनहि मिनलवर फुगलेलेच आहेत वाटत, छे एवढ काय सोडुन द्यायच की
नॅरेशन फार लांबलचक आणि अगदी म्हणजे अगदी टुकार होते >>>त्यामुळे मी एकही एव्ही बघितला नाही एकतर त्या उत्क्याला नको तेवढ हाइप केल ते वाचुनच चिडचिड झाली.
कोबडे वाजवले ते ठिक आहे पण टास्क रात्री सुरु करतात, स्पर्धकाच्या झोपाही होवु देत नाहित, दिवसा झोपतिल नाहितर काय? त्यातही जय-विकास आधिच झोपाळू आहेत.
फिनालेचे डान्स आशिष पाटिल कोरिओ करतोय वाटत, अक्षय-निथा-सोनालीचे व्हिडियो बघितले डान्स रिहर्सल चे, सोना गोड दिसत होती.

AV तर रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या की.
मग झोपायचं कधी. त्या AV मधील आवाज आत्मध्येही जात होता.
हे big boss तर 8 वाजताच गाणी लावून उठवतात.

सगळेच AV बघून जाम खुश होते.
मीरा तर बॉस लेडी वर एकदम खुश झालेली.

आता टास्क नाहीयेत तर खूप TP सुरू असतो आत.
Extra मसाला मध्ये डब्बा गुल खेळतानाचा video आहे.

मला जर्नी बघायला आवडल्या पण त्या आधीचे नॅरेशन फार लांबलचक आणि अगदी म्हणजे अगदी टुकार होते सगळ्यांच्याच वेळी. कोण रायटर्स आहेत काय माहित. >>>>>>> अगदी अगदी. सारख सारख तेच ' असे म्हणतात की'

कोबडे वाजवले ते ठिक आहे पण टास्क रात्री सुरु करतात, स्पर्धकाच्या झोपाही होवु देत नाहित, दिवसा झोपतिल नाहितर काय? त्यातही जय-विकास आधिच झोपाळू आहेत. >>>>>>> नैतर काय. आता तर काहीच टास्क नाही. सो, झोपू दयाव त्यान्ना मस्तपैकी. फक्त एकेकाची झोपण्याची वेळ बिबॉने ठरवावी. मागच्या सीझनला तर एकेकाला रात्री झोपेतून उठवून नाचायला लावल हा हा हा

ममां येतील बहुतेक, मेघाच्याही सिझनला आले होते ! >>>>>> तसच असेल. तसही कोविड नॉर्म्समुळे सगळयाच स्पर्धकान्ना आत नेऊ शकत नाही.

म मां मीनलवर नाराज असतील तर तिला पाचवी ठेवतील आणि उत्क्याला पुढे नेतील. बिग बॉस टीमने असं होऊ देऊ नये.

जरी मीनलवर राग असला तरी मुद्दाम तिला टार्गेट करून पाचवी ठेवणं असले प्रकार वाटत नाही मांज्या करेल. एव्हड्या कोत्या मनाचा नाहीये मांज्या.

Pages