मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीनल ची image last 2 weeks मध्ये खराब का केली असेल ?
Was she really at fault?>> ह्म्म आता सिझन सन्पल्यावर बोलुन फारसा फायदा नाहि पण आक्खा सिझन ममा सगळ्याना विषेश करुन टिम ए ला तर दर चावडिला फेअर खेळा सान्गत होते तेच त्यानी एकदा बीबी टिमला ही सान्गितल असत तर बर झाल असत, उत्कर्शला शेवटच्या एपिसोडस पर्यत ममा बोलत होते की तु सेकन्ड टु जयच खेळतोस ,तसाच दिसतोस, बुगुबुगु झालाय वैगरे मग अचानक एव्हि दाखवताना तो ऑलराउडर झाला? शिन्देशाहीच दडपण असेल, अजुनही काही गोष्टि एकिवात आल्या होत्या ज्यामुळे चॅनेलने दादुसला ठेवले होते आणि माचिसला वर आणले पण ते इथे लिहलेले कदाचित योग्य होणार नाही.
मीनलची काहिही चुक नव्हती अस मला १०० % वाटत.

आपला लाडका विशाल , कलर्स मराठीच्या
" आई, मायेचं कवच' सिरीयल मध्ये आला!
कालच एक झलक दिसली. Lol
त्याच्या सरळसोट स्वभावाच्या अगदी विरुद्ध रोल मिळालाय.

मध्यंतरी मिरा व जय यांचे एक कोळीगीत युट्युबवर पाहिले. एकदम हास्यास्पद ... कुठल्या अंगाने हे कोळी वाटतात कोणास ठाऊक..

https://www.youtube.com/watch?v=tziq8qUe2Y4

तो विशाल काय मुख्य व्हिलन आहे का, आई मधे.

तसंही त्याचा पहीला रोल व्हिलनचाच होता स्टार प्रवाहवर, त्यानंतर ज्योतिबा केलं.

@आर्या:
लिंक Trustable नाही वाटत

https://www.admissionlogin.in/bigg-boss-marathi/
बिग बॉस -४ च्या कन्टेस्टन्टसची लिस्ट >>>>
बापरे! ही सगळी मंडळी आली तर झी मराठीला टाळच माराव लागेल. रच्याकने, दरवर्षी हीच यादी बीग बॉस सुरू व्हायच्या आधी फिरत असते.

काल किचन कलाकारमध्ये ( झीम) तृप्ती देसाई आणि बिचुकले आले होते जेवण बनवायला. तृप्तीताई जिन्कल्या, बिचुकलेच तोण्ड बघण्यासारख झाल होत.

मराठी KBC कोणी बघते का ? किती ढब्बू कन्टेस्टंट येत आहेत, अगदी पहिल्या प्रश्नाला (हजार रुपयाच्या ) लोकांना लाईफ लाईन घ्यावी लागते आहे .

नऊ वाजता दुसरं काही नसल्याने जेवताना थोडा वेळ बघितले जाते. आज जी बाई आलेली, शेतकऱ्याची बायको ती खरंच हुशार होती. चांगलं बोलली आणि छान खेळली. मागचे दोन दिवस स्पर्धा परीक्षा देणारी मुलं आली होती पण पहिल्या काही प्रश्नात सगळ्या लाईफलाईन वापरून टाकतात. खरंच काय अभ्यास करतात असा प्रश्न पडतो. एकाने तर सरपंच उपसरपंचांकडे राजीनामा देतो असे उत्तर दिले. कोणीही आपल्या ज्यूनिअरकडे का राजीनामा देईल, हा कॉमनसेन्स आहे. निशा मधुलिका यांचे चॅनेल कशाबद्दल आहे असा प्रश्न होता, म्हणजे आता यूट्यूब बद्दल ही प्रश्न विचारले जातात. फिफ्टी फिफ्टी ही लाईफ लाईन जाऊन त्याजागी दुसरी लाईफलाईन आली आहे. फोन अशा लोकांना करतात ज्यांना उत्तर माहिती नसते Proud

बायका छान खेळतायेत असं मला वाटतंय. तो एक दीपक जोशी ही छान खेळले, नंतर त्यांचा स्टँड अप कॉमेडी बोअर झाला मात्र. त्या दिवशी बदलापुरच्या दबडे आणि वर चंपा यांनी उल्लेख केलेल्या ताई छान खेळल्या.

निशा मधुलिका यांचे चॅनेल कशाबद्दल आहे असा प्रश्न होता, म्हणजे आता यूट्यूब बद्दल ही प्रश्न विचारले जातात. फिफ्टी फिफ्टी ही लाईफ लाईन जाऊन त्याजागी दुसरी लाईफलाईन आली आहे. फोन अशा लोकांना करतात ज्यांना उत्तर माहिती नसते Proud >>>>>>>>>>>

नवीन Submitted by चंपा on 22 June, 2022 - 14:4१>>>>>>>>>>

तो प्रश्न ज्या मुलाला विचारण्यात आला होता तो स्वतः एक यूटुबर होता सिल्वर प्ले बटन मिळवलेला आणि त्यानेच पहिल्या प्रश्नापासून लाईफ लाईन वापरायला सुरुवात केली होती त्याने सुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी तयारी केली होती।

एकाने तर सरपंच उपसरपंचांकडे राजीनामा देतो असे उत्तर दिले. कोणीही आपल्या ज्यूनिअरकडे का राजीनामा देईल, हा कॉमनसेन्स आहे >>>>

तो पोलीस परीक्षेची तयारी करत होता, गेला होता ८० हाराजांपर्यंत पण आधीच सर्व लाईफ लाईन वापरल्याने त्याला ८० हजाराचा टप्पा पार नाही करता आला। दहा हजारावर समाधान मानावे लागले .

स्वतःचे चॅनेल असले तरी सगळ्या चॅनेलची माहिती असावी ही अपेक्षा नव्हतीच. मलाही निशा मधुलिका माहिती आहे कारण मी रेसिपी चॅनेल बघते. आज फास्टेस्ट फिंगर फर्स्ट (ह्याला मराठीत काय म्हणतात) चा प्रश्न कठीण होता. तिथीचे पर्याय बघितल्यावर मला वाटलं अरे हे किती सोपय, तृतीया, पंचमी, नवमी आणि काहीतरी नंबरप्रमाणे Lol पण ते भलतेच काहीतरी होते. भाग घेतलेले स्पर्धक लेन्सकार्टची जाहिरात करतात हे माहिती नव्हते.

विशाल निकमने नवीन गाडी घेतली. मीनलनेही जीपसारखी गाडी घेतली. बाकी मीराचे व्हिडीओ असतात तूनळीवर ती काय खाते, तिचा वॉर्डरोब, हजार रुपयात तीने काय काय विकत घेतलं वगैरे पण मी बघत नाही.

चौथ्या सीझनच्या बातम्या येऊ लागल्यात. मांजरेकर होस्ट नसतील . सिद्धार्थ जाधव असेल.

प्रवाह पिक्चर्सवर कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होणार आहेत. त्याचे प्रोमोज स्टार प्रवाहवर दाखवतात. त्यात शिवलीलाचा आवाज आहे. कीर्तनात जसा खणखणीत आवाज लावते, तसाच प्रोमो जमध्येही लावलाय. तो कानाला टोचतो. विठ्ठलभक्ती इ. म्हणताना खूप हार्श वाटतो. भक्तीरसाऐवजी वीररस!

Pages